Maharashtra

Sangli

CC/14/309

SHRI RAJEEV ANNASAHEB LALE - Complainant(s)

Versus

MANAGER, RELIANCE RETAIL LIMITED ETC. 3 - Opp.Party(s)

30 Sep 2015

ORDER

                                              नि.13

मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

मा.प्रभारी अध्‍यक्ष सौ वर्षा नं. शिंदे 

मा. सदस्‍य – सौ मनिषा कुलकर्णी

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 309/2014

तक्रार नोंद तारीख   :  16/12/2014

तक्रार दाखल तारीख  :   19/01/2015

निकाल तारीख          :   30/09/2015

 

श्री राजीव आण्‍णासाहेब लाले

रा.292/अ, लाले बंगला, महावीरनगर, सांगली                    ....... तक्रारदार

 

विरुध्‍द

 

1.  मॅनेजर, रिलायन्‍स रिटेल लिमिटेड,

    एस.एफ.सी. मेगा मॉल, स्‍टेशन रोड, सांगली

2.  मॅनेजर,

    बजाज फिनसर्व्‍ह (बजाज फायनान्‍स सर्व्हिसेस),

    एम-2 ब्‍लॉक, सिटी लिंक्‍स, गिरनार टॉवर,

    वासन आय केअर सेंटर शेजारी,

    मिरज सांगली रोड, विश्रामबाग, सांगली

3.  सेल्‍स मॅनेजर,

    रिलायन्‍स रिटेल लिमिटेड

    4, जी.एफ.बी.सी.03, ब्‍लॉक –बी,

    बिल्‍डींग नं.4, रिलायन्‍स कार्पोरेट पार्क,

    द्वारा रिलेन पेट्रोकेमिकल्‍स लि.

    घनसोळ – ठाणे 400 701                                    ......... सामनेवाले

     

                                 तक्रारदार  : व्‍यक्‍तीशः

                                    सामनेवाला क्र.1 :  नो से

                                    सामनेवाला क्र.2 व 3 :  एकतर्फा

 

- नि का ल प त्र -

द्वारा : मा. प्रभारी अध्‍यक्ष: सौ वर्षा नं. शिंदे

1.    प्रस्‍तुतची तक्रार, तक्रारदाराने रक्‍कम अदा करुनही सामनेवालाने त्‍यास टी.व्‍ही. न देवून सेवात्रुटी केलेने दाखल करण्‍यात आली आहे.  प्रस्‍तुत तक्रार अर्ज स्‍वीकृत करुन सामनेवाला यांना नोटीस आदेश झाला.  नोटीस लागू झालेनंतर सामनेवाला क्र.1 हे हजर झाले परंतु त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, त्‍यांचेविरुध्‍द नो से आदेश करण्‍यात आला.  सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू होऊन देखील सामनेवाला क्र.2 मंचासमोर उपस्थित न राहिलेने त्‍यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत केला आहे.  सामनेवाला क्र.3 यांना नोटीसची बजावूनही होवूनही ते याकामी हजर झालेले नाहीत.  सबब, त्‍यांचेविरुध्‍द आजरोजी एकतर्फा आदेश करण्‍यात येत आहे. तक्रारदारतर्फे नि.12 ला लेखी युक्तिवाद दाखल. 

 

2.    थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदाराने दिवाळी सणाचे औचित्‍य साधून दि.17/10/14 रोजी ए.ओ.सी.-40, एलईडी-40 ए-63 या कंपनीचा व मॉडेलचा 40 इंची टीव्‍ही रक्‍कम रु.24,990/- या किंमतीस सामनेवाला क्र.1 यांचेकडे बुक केला.  सदर टीव्‍हीवर शून्‍य टक्‍के व्‍याजदर व नो प्रो‍सेसिंग चार्जेस अशी जाहीरात सामनेवाला यांनी केली होती व त्‍यानुसार सामनेवाला यांनी सामनेवाला क्र.2 या फायनान्‍स कंपनीची स्‍कीम व कर्ज उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले.  तदनंतर तक्रारदारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेनंतर सामनेवाला क्र.1 व 2 यांनी डाऊन पेमेंटपोटी रक्‍कम रु.9,229/- भरुन घेतली व तक्रारदार यांना रक्‍कम रु.16,659/- चे कर्ज दि.17/10/14 रोजी मंजूर केले.  त्‍यानंतर सदरचा टीव्‍ही हा दि.19/10/14 रोजी डिलीव्‍हरी करण्‍यात येवून सामनेवाला क्र.1 चा तज्ञ माणूस त्‍याची जोडणी करुन जाईल, असे तक्रारदार यांना सामनेवालांनी सांगितले.  सदर टीव्‍ही खरेदीसाठी प्रोसेसिंग चार्जेस नसताना व तशी जाहीरात असतानाही सामनेवाला यांनी अनुक्रमे रक्‍कम रु.249/- व रु.649/- असे एकूण रु.898/- इतकी रक्‍कम बेकायदेशीररित्‍या भरुन घेतली.  सदर कर्जापोटी सामनेवाला क्र.1 यांनी सर्व आवश्‍यक ती कागदपत्रे तसेच कर्जपरतफेडीसाठी सहा कोरे चेक घेतले होते.  सदरची सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र.2 याचे ताब्‍यात आहेत.  परंतु सामनेवालांनी कबूल केल्‍याप्रमाणे दि.19/10/14 रोजी टीव्‍ही डिलीव्‍हरी सामनेवालांनी दिली नाही म्‍हणून याबाबत सामनेवालांकडे चौकशी केली असता सामनेवालाच्‍या संबंधीत इसमाने संबंधीत टीव्‍ही कंपनीच्‍या पुण्‍यातील डेपोकडून आमच्‍या अद्याप आलेले नसल्‍याने आम्‍ही तुम्‍हास टीव्‍हीची डीलीव्‍हरी देऊ शकलो नाही, एक-दोन दिवसांत डिलीव्‍हरी देवू, असे त्‍याने सांगितले. परंतु तरीही टीव्‍ही न दिल्‍याने पुन्‍हा याबाबत सामनेवालांकडे तक्रारदाराने चौकशी केली असता दिवाळी सणाची धांदल असल्‍याने तुम्‍ही खरेदी केलेला टीव्‍ही मिसप्‍लेस झाल्‍याचे कारण सांगितले.  तदनंतर तक्रारदार दोन-तीन दिवस गप्‍प बसले. परंतु त्‍यानंतरही वेगवेगळी कारणे व सबबी सांगून तक्रारदार यांना टीव्‍ही देण्‍यास सामनेवालांनी टाळाटाळ केली.  अशा प्रकारे सर्व रक्‍कम भरुन सामनेवालांना आजअखेर तक्रारदारास टीव्‍ही दिलेला नाही.  म्‍हणून तक्रारदाराने वकीलांचेमार्फत सामनेवाला यांना दि.10/11/14 रोजी नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवालांनी कोणतीही पूर्तता केलेली नाही.  सबब, डाऊन पेमेंटपोटी भरलेली रक्‍कम रु.9,229/-, आर्थिक, मानसिक, शारिरिक त्रासापोटी रु.30,000/-, नोटीस खर्च रु.1,000/- अशी एकूण रक्‍कम रु.40,229/- व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून 15 टक्‍के दराने होणारे व्‍याज व तक्रारअर्जाचा खर्च रु.4,000/- मिळावा, तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांनी घेतलली सर्व कागदपत्रे व कोरे चेक परत मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

 

3.    तक्रारअर्जाचे पुष्‍ठयर्थ तक्रारदाराने नि.2 ला शपथपत्र दाखल करुन नि.3 या फेरिस्‍तसोबत एकूण 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्‍यामध्‍ये रक्‍कम भरलेची पावती, सामनेवालांना पाठविलेली  नोटीस, पोस्‍टाची पावती, सामनेवालांनी पेपरमध्‍ये केलेली जाहीरात इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  तक्रारदाराने नि.8 वर सरतपासाचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदाराने नि.10 सोबत सामनेवाला क्र.3 यास नोटीसची बजावणी झालेचा पोस्‍टाचा दाखला दाखल केला आहे. 

 

4.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू झालेनंतर सामनेवाला क्र.1 हे हजर झाले परंतु त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, त्‍यांचेविरुध्‍द नो से आदेश करण्‍यात आला.  सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू होऊन देखील सामनेवाला क्र.2 मंचासमोर उपस्थित न राहिलेने त्‍यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत केला आहे.  सामनेवाला क्र.3 हे  नोटीस लागू होवूनही याकामी हजर राहिलेले नाहीत.

5.    तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, लेखी युक्तिवाद व तक्रारदाराचे वकीलांचा युक्तिवाद यांचा विचार करता सदर प्रकरणात खालील मुद्दे निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात.

          मुद्दे                                              उत्‍तरे

1.  तक्रारदार हा ग्राहक आहे काय ?                                   होय.

2.  सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्‍ये त्रुटी

    केली आहे काय ?                                           होय.

3.  तक्रारदार मागणी केलेल्‍या रकमा मिळणेस पात्र आहेत काय ?        होय, अंशतः

4.  अंतिम आदेश                                          शेवटी दिलेप्रमाणे.

:-  कारणे  -:

मुद्दा क्र.1 ते 3

6.    तक्रारदाराने नि.3/4 वर दाखल केलेले सामनेवाला यांचे जाहीरातीस अनुसरुन दि.17/10/14 रोजी ए.ओ.सी.-40 एल.ई.डी.-40 ए-63 या कंपनीचा व मॉडेलचा 40 इंची एलइडी टीव्‍ही रक्‍कम रु.24,990/- या किंमतीस सामनेवाला यांचेकडे बुक व खरेदी केला होता.  त्‍याबाबतची रिसीट नि.3/1 वर दाखल आहे.  त्‍यानुसार तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 याने त्‍याचेकडून डाऊन पेमेंटपोटी 9229/- रोखीने दि.17/10/14 रोजी भरुन घेवून रु.16,659/- चे कर्ज, लोन रेफरन्‍स नं.एसएफ 18124068 स्‍कीम नं.24470 ने मंजूर करुन सदरचा टीव्‍ही दि.19/10/14 रोजी फ्री होम डीलीव्‍हरी करुन सामनेवाला क्र.1 यांचा तज्ञ माणूस तक्रारदाराने दिलेल्‍या व सांगितलेल्‍या पत्‍त्‍यावर येवून टीव्‍ही जोडून माहिती देईल असे सांगितले होते. मात्र जाहीरातीमध्‍ये कोणतेही प्रोसेसिंग चार्जेस नसताना तक्रारदाराकडून रु.249/- व रु.649/- असे एकूण रु.898 प्रोसेसिंग चार्जेसपोटी भरुन घेतलेले आहे व त्‍याअनुषंगिक सर्व कागदपत्रेही सामनेवाला क्र.2 कडून घेतलेली आहेत.  तसेच तक्रारदारकडून कर्जपरतफेडीपोटी क्र.161035 ते 161040 असे कोरे सहा चेक घेतलेले आहेत.  तरीही तक्रारदारास नमूद टीव्‍हीची डीलीव्‍हरी दिलेली नाही.  तक्रारदाराने दाखल केलेल्‍या पुराव्‍यावरुन तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक असल्‍याची बाब निर्विवादरित्‍या स्‍पष्‍ट होते.  सबब, तो सामनेवाला यांचा ग्राहक आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच यत आहे म्‍हणून त्‍याचे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

 

7.    या मंचाने नि.3/4 वर असलेल्‍या सामनेवाला क्र.1 यांच्‍या उत्‍पादनाच्‍या विक्रीसाठीच्‍या प्रसिध्‍द केलेल्‍या जाहीरातीचे अवलोकन केले.  यामध्‍ये वेगवेगळी उत्‍पादने व उत्‍पादनाच्‍या किंमती याचा तपशील नमूद केलेला असून Finance with zero processing fees through Bajaj Finserve, Down payment – Rest in 12 easy EMIs on 32 & above LED/PDP, Rest in 15 easy EMIs on 40 & above LED/PDP अशी जाहीरात दिलेली असून त्‍यामध्‍ये अन्‍य ऑफरही आहेत.  त्‍यास अनुसरुन तक्रारदाराने 40 इंची एलईडी टीव्‍ही खरेदी करण्‍याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.  त्‍यानुसार त्‍याने मुद्दा क्र.1 मध्‍ये नमूद केलेप्रमाणे डाऊन पेमेंटपोटी 9,229/- रोखीत भरली आहे  व दि.17/10/14 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी रु.16,659/- इतक्‍या रकमेचे कर्ज मंजूर केले.  त्‍याचे परतफेडीपोटी तक्रारदाराकडून सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी चेकही घेतलेले आहेत. सदर कर्जाची सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र.2 फायनान्‍स कंपनीचे ताब्‍यात आहेत. दि.19/10/14 रोजी फ्री होम डिलीव्‍हीरी करणेबाबत आश्‍वासित करुनही सामनेवला यांनी नमूद टीव्‍ही आजअखेर तक्रारदारास दिलेला नाही अथवा त्‍याचे कर्ज कागदपत्रे व कोरे चेक्‍सही परत केलेले नाहीत. त्‍यामुळे तक्रारदाराने नि.3/2 अन्‍वये सामनेवाला क्र.1 व 2 यांना नोटीस पाठवून त्‍याने अदा केलेल्‍या रकमांची मागणी केली व कर्जापोटी घेतलेल्‍या संपूर्ण कागदपत्रांचीही मागणी केली तसेच मानसिक, शारिरिक नुकसानीपोटी रु.30,000/- ची मागणी करणारी नोटीस सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविली. सदर नोटीस सामनेवाला क्र.1 व 2 यांना मिळाली असून त्‍याची पोस्‍टाची पोचपावती नि.3/3 व 3/3/1 वर दाखल आहेत.  यावरुन सामनेवाला यांना सदर नोटीस प्राप्‍त होवूनही त्‍यास कोणतेही प्रत्‍युत्‍तर केलले नाही.  प्रस्‍तुत तक्रार दाखल झाल्‍यानंतर सामनेवाला यांना मंचाने पाठविलेल्‍या नोटीसा मिळालेल्‍या आहेत. त्‍याची पोहोच अनुक्रमे नि.5 व 6 वर दाखल आहे.  सामनेवाला क्र.3 यांना पाठविलेली नोटीस त्‍यांना मिळालेबाबत पोस्‍टाचा दाखला फेरिस्‍त नि.10 अन्‍वये दाखल केलेला आहे.  तरीही सामनेवाला यांनी प्रस्‍तुत प्रकरणी हजर होवून तक्रारदाराची तक्रार खोडून काढलेली नाही ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. 

 

8.    ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(r) - Unfair trade practice चा विचार करता सामनेवाला क्र.1 व 3 यांनी त्‍यांच्‍या उत्‍पादनाची विक्री वाढविण्‍याकरिता नि.3/4 सारख्‍या जाहीरातींचे प्रसिध्‍दीकरण करुन तसेच मोफत प्रोसेसिंग चार्जेस व नमूद सामनेवाला क्र.2 फायनान्‍स कंपनीचा कर्जपुरवठा मिळत असलेबाबत व नमूद उत्‍पादने थोडेसे डाऊन पेमेंट भरुन व नमूद सामनेवाला क्र.2 कडून कर्ज घेवून उर्वरीत रक्‍कम कर्जरुपाने मासिक हप्‍त्‍यामध्‍ये भरण्‍याची सोय उपलब्‍ध करुन देवून ग्राहकांचा आकर्षित करुन अशा प्रकारे रकमा भरुन घेणे, कर्ज उपलब्‍ध करुन देणे, त्‍याअनुषंगिक कागदपत्रे स्‍वीकारणे, कोरे चेक स्‍वीकारणे, डाऊन पेमेंटची रक्‍कम घेणे इ. ग्राहकांकडून वसूल करुन घेवून उत्‍पादन ग्राहकांच्‍या घरी न पोचवणे ही ग्राहकाची शुध्‍द फसवणूक आहे.  सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन सदर तक्रारदाराकडून वर नमूद केल्‍याप्रमाणे रकमा स्‍वीकारुनही नमूद केलेला टीव्‍ही दिलेला नाही.  मात्र तसेच तक्रारदाराने त्‍यासंदर्भात त्‍यांचेकडे वकीलामार्फत नोटीस पाठवून कायदेशीर मागणी केली असता त्‍यास साधे उत्‍तर देण्‍याचे कर्तव्‍य सामनेवाला यांनी घेतलले नाही. ग्राहकाकडून विक्री करावयाच्‍या वस्‍तूपोटी रकमा स्‍वीकारुनही प्रस्‍तुतची विक्री न करणे ही ग्राहकास द्यावयाच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी आहे असे या मंचाचे ठाम मत आहे.  सामनेवाला यांनी तक्रारदाराने पाठविलेल्‍या कायदेशीर  नोटीसीला उत्‍तरही दिलेले नाही तसेच प्रस्‍तुत प्रकरणी हजर होवून म्‍हणणे मांडून पुरावा दाखल करुन तक्रारदाराची तक्रार खोडून काढलेली नाही यावरुन त्‍यांना तक्रारदाराची तक्रार मान्‍यच आहे असा निष्‍कर्ष काढणे चुकीचे होणार नाही.  तसेच जाहीरातीमध्‍ये प्रोसेसिंग फी मोफत असल्‍याचे नमूद करुनही नि.3/1 वरील पावतीमध्‍ये प्रोसेसिंग चार्जेस रु.249/- व 649/- लावलेली आहे.  यावरुनच सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे शाबीत होते.  सबब, तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये सामनेवाला यांनी त्रुटी केली आहे या निष्‍कर्षास हे मंच येत आहे.  तसेच सदर सेवात्रुटीसाठी सामनेवाला क्र.1 ते 3 हे वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या जबाबदार आहेत.  म्‍हणून या मुद्याचे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

 

9.    वरील विस्‍तृत विवचन व दाखल पुराव्‍याचा विचार करता, नि.3/1 वरील पावती नुसार तक्रारदाराने सामनेवालांना रु.9,229/- इतकी डाऊन पेमेंटची रक्‍कम अदा केल्‍याचे दिसून येते.  मात्र त्‍यास टीव्‍ही मिळालेला नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांना त्‍यांनी उर्वरीत नमूद 40 इंची टीव्‍हीच्‍या रकमेपोटी मिळणा-या कर्जपुरवठयासाठी विविध कागदपत्रे व सहा कोरे चेक्‍स दिल्‍याचे प्रतिपादन शपथेवर केले आहे.  त्‍याचे नंबरही नमूद कलेले आहेत व नमूद रिसीटमध्‍ये लोन रेफरन्‍स नं.SF181 20468 Scheme 24470 अन्‍वये बजाज फायनान्‍सचे रु.16,659/- चे कर्ज रक्‍कम दिसून येते तसेच बजाज प्रोसेस फी म्‍हणून रु.249 व रु.649 ची आकारणी केल्‍याचे दिसून येते.  तसेच नमूद रकमा सामनेवाला यांनी घेवूनही तक्रारदारास त्‍याने बुक केलेला टीव्‍ही दिलेला नाही हीही बाब शाबीत झालेली आहे कारण सदर टीव्‍ही दिला अथवा कसे हे सामनेवाला यांनी हजर होवून शाबीत करणे आवश्‍यक होते, ते त्‍यांनी केलेले नाही. तसेच तक्रारदाराच्‍या कायदेशीर नोटीसीसही त्‍याने उत्‍तर दिलेले नाही.  यावरुन अशा प्रकारे फसव्‍या जाहीराती करुन ग्राहकांना आकर्षित करुन घेणे व तदनंतर ग्राहकांची फसवणूक करणे. यामुळे ग्राहकाला सदर रकमा अदा करुनही नमूद वस्‍तू मिळत नाही व तिच्‍या उपभोगापासून वंचित रहावे लागते तसेच कर्जप्रकरणासाठी द्यावयाच्‍या कागदपत्रांची पूर्तता करणे, कोरे धनादेश देणे इ.बाबींमुळे त्‍यास निश्चितच मानसिक, शारिरिक, आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले आहे ही बाब हे मंच ग्राहय धरत आहे. मात्र तक्रारदाराने केलेली रक्‍कम रु.30,000/- ची मागणी या मंचास संयुक्तिक वाटत नाही.  मात्र सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असल्‍याने व सदरची बाब ही गंभीर असल्‍याने त्‍याचा विचार करुन हे मंच तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु.10,000/- मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. त्‍याचप्रमाणे त्‍याने डाऊन पेमेंटपोटी भरलेली रक्‍कम रु.9,229/- ही मिळणेस पात्र आहे. त्‍याने पाठविलेल्‍या नोटीस खर्चापोटी रु.1,000/- चे फीची मागणी केली मात्र नमूद फीची पावती दाखल केलेली नाही. मात्र सदर नोटीस त्‍यास द्यावी लागलेली आहे ही बाब शाबीत झालेली आहे.  त्‍यामुळे जरी सदर फीची पावती नसली तरी तक्रारअर्जाच्‍या खर्चामध्‍येच सदर मागणी समाविष्‍ट करण्‍यात येते. सबब तक्रारदारास झालेल्‍या तक्रारअर्जाच्‍या खर्चापोटी नोटीस खर्चासहीत रक्‍कम रु.2,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.  तसेच आदेशीत रकमांवर तक्रारदार तक्रार दाखल केले तारखेपासून ते रक्‍कम हाती पडेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज मिळणेस पात्र आहे.  तसेच तक्रारदाराने त्‍याने कर्जापोटी सामनेवाला क्र.1 व 3 यांनी घेतेलेली सर्व कागदपत्रे व सहा सहया केलेले कोरे धनादेश परत देणेबाबत सुध्‍दा मागणी केलेली आहे.  जरी सामनेवाला क्र.2 फायनान्‍स कंपनीने कर्ज दिले असले तरी ते तक्रारदारास अदा न करता नमूद सामनेवाला क्र.1 या कंपनीस सदर रक्‍कम अदा केली असेल व तरीही तक्रारदार यास, ज्‍या वस्‍तूपोटी सदर उपद्व्‍याप केला, ती वस्‍तूच जर मिळाली नसेल तर, सदर संपूर्ण व्‍यवहारच रद्दबातल होतो. त्यामुळे सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी घेतलेली कर्जप्रकरणाच्‍या अनुषंगिक सर्व कागदपत्रे व सर्व कोरे चेक्‍स तक्रारदारास परत करावेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तसेच सदर आदेशाची पूर्तता सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या करणेची आहे.  कारण अशा जाहीरातीद्वारे उत्‍पादित कंपन्‍या व कर्ज पुरवठा करणा-या कंपन्‍या यांचे काम हे साखळी पध्‍दतीने चालू असते.  त्‍यामुळे चूक कोणी जरी केली तरी त्‍याचे सामूहिक व वैयक्तिक उत्‍तरदायित्‍व त्‍यांचेवरच येते.  त्‍यामुळे आदेशाची पूर्तता करण्‍याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 ते 3 यांची आहे.  सबब आदेश.  

आदेश

1.    तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करणेत येत आहेत.

2.    सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या तक्रारदारास आर्थिक, शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- अदा करावी. 

3.    सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या टीव्‍ही खरेदीचे डाऊन पेमेंटपोटी भरलेली रक्‍कम रु.9,229/- अदा करावी. 

4.    सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 2,000/- अदा करावेत.

5.    सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी आदेशीत रकमांवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने होणारे व्‍याज द्यावे.

6.    सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या कर्जापोटी घेतेलेली सर्व कागदपत्रे व देना बँक सांगली या बँकेचे चेक नं.161035 ते 161040 हे सहा कोरे चेक परत करावेत.

7.    वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी या आदेशाच्‍या तारखेपासून 45 दिवसांत करणेची आहे.

8.    सामनेवाला यांनी विहीत वरील आदेशाची अंमलबजावणी न केल्‍यास तक्रारदारास ग्राहक

संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करण्‍याची मुभा राहील.

9.  सदर निकालपत्राच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

सांगली

दि. 30/09/2015        

    

             

      ( सौ मनिषा कुलकर्णी )                     ( सौ वर्षा नं. शिंदे )   

            सदस्‍या                            प्रभारी अध्‍यक्ष

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.