Maharashtra

Nagpur

CC/15/13

Badriprasad Shankar Bais - Complainant(s)

Versus

Manager, Reliance Life Insurance Company Ltd Nagpur - Opp.Party(s)

Sanjay Kasture

18 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/15/13
( Date of Filing : 14 Jan 2015 )
 
1. Badriprasad Shankar Bais
Plot No 530/5 Old bagadgainj Gangabaighat Chowk Nr Yashodhara Apartment Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Reliance Life Insurance Company Ltd Nagpur
2nd floor, Mile stone, 5, Ramadaspeth, Wardha Road, Nagpur
Nagpur
Maharastra
2. Managing Director Reliance Life Insurance
H Block 1st Floor Dhirubhai Ambani Knowledge City Navi Mumbai 400710
Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Sanjay Kasture , Advocate
For the Opp. Party: Adv. Ashwini Athalye/ Amod Bhole, Advocate
Dated : 18 Feb 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याची आई स्‍व. राधा बाई शंकर बैस, राह. नागपूर यांनी विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍याकडून केअर डायग्‍नोस्‍टीक हॉस्‍पीटल,  नागपूर या रुग्‍णालयातून वैद्यकीय तपासणी केल्‍यावर एक मुस्‍त विमा हप्‍ता रक्‍कम रुपये 1,50,000/- धनादेशा द्वारे जमा करुन विमा पॉलिसी RLIC CLASSIC PLAN SINGLE दि. 23.03.2011 रोजी घेतली व त्‍याची परिपक्‍तवा तिथी 28.03.2026 होती.  या शिवाय पॉलिसीधारकाचा मृत्‍यु झाल्‍यास वि.प.यांनी पॉलिसी धारकाला Total Sum Assured + Total Fund Value + Amount equal to base sum Assured देण्‍याबाबतचे  स्‍पष्‍टपणे पॉलिसीत नमूद केले आहे.  विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या आईला दिलेल्‍या पॉलिसी अंतर्गत Sum Assured रुपये 2,25,000/- निश्चित करण्‍यात आले.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याच्‍या आईने उपरोक्‍त विमा पॉलिसी घेते वेळी विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांच्‍या प्रतिनिधीने भरलेल्‍या फॉर्मवर आपली सही केली होती. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍या प्रतिनिधीने प्रश्‍नाच्‍या उत्‍तरामध्‍ये नमूद केलेल्‍या बाबीबाबत तक्रारकर्त्‍याच्‍या आईस पूर्ण कल्‍पना देण्‍यात आली नव्‍हती. परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या आईने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्‍या प्रतिनिधीस स्‍वतःच्‍या प्रकृतीबाबत व घेतलेल्‍या औषधोपचाराबाबत पूर्ण माहिती दिली होती. त्‍यामुळेच तक्रारकर्त्‍याच्‍या आईची वैद्यकीय तपासणी संबंधित रुग्‍णालयात विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍या निदर्शनाप्रमाणे करण्‍यात आली होती व तक्रारकर्त्‍याची आई ही उपरोक्‍त विमा पॉलिसी मिळण्‍या योग्‍य असल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या आईला विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्‍त पॉलिसी प्रदान केली होती.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याच्‍या आईचे दि. 18.11.2012 रोजी सेंट्रल रेल्‍वे हॉस्‍पीटल नागपूर येथे निधन झाले. याबाबतची विरुध्‍द पक्ष 1 ला दूरध्‍वनीवरुन माहिती दिली होती व विरुध्‍द पक्ष 1 च्‍या निर्देशानुसार पॉलिसी अं‍तर्गत विमा दावा मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष 1 कडे दि. 05.12.2012 रोजी अर्ज सादर केला असता विरुध्‍द पक्ष क्रं. 1  यांनी पॉलिसी अंतर्गत Sum Assured रक्‍कम रुपये 2,25,000/- व इतर फायदे मिळून होणारी रक्‍कम न देता फक्‍त Fund Value रुपये 1,48,678/- दिली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या आईने विमा पॉलिसी घेतांना प्रस्‍तावित अर्जात दिला असलेला Hypothyroidism आजाराबाबतची माहिती लपविल्‍याच्‍या कारणावरुन तिचा Fund Value  वगळता इतर विमा रक्‍कमेबाबतची मागणी नाकारली. परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या आईचा मृत्‍यु Hypothyroidism या एकमेव कारणास्‍वत झाला याबाबतचा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही, तसेच Hypothyroidism हा आजार नसल्‍यामुळे तो व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युस कारण ठरू शकत नाही.  विरुध्‍द पक्ष 1 व 2 हे विमा पॉलिसी अंतर्गत देय असणारे फायदे देण्‍यास टाळाटाळ करीत आहे.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी करुन अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा वापर केल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या आईच्‍या मृत्‍युनंतर पॉलिसी अंतर्गत मिळणा-या संपूर्ण फायद्यातील रक्‍कम दि. 22.02.2013 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत मिळावी. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश व्‍हावा.
  4.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या आईने विरुध्‍द पक्षाकडून विमा पॉलिसी काढली होती व त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या आईला किंमत रुपये 2,25,000/- चे Sum Assured दिले होते.  तक्रारकर्त्‍याच्‍या आईने विमा पॉलिसीचे प्रपोझल फॉर्म भरतांना तिच्‍या वैद्यकीय प्रकृतीबाबतची खोटी माहिती दिली होती. तक्रारकर्त्‍याच्‍या आईने जर प्रकृतीबाबतची खरी माहिती नमूद केली असती तर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या आईला विमा पॉलिसी दिली नसती. तक्रारकर्त्‍याच्‍या आईचे मृत्‍युचे कारण  Myocardial Infarction with right Hemiplegic  with Hypothyroidism  & Hypertension असल्‍याचे क्‍लेम फॉर्म बी भरणा-या शेवटी उपचार करणा-या डॉक्‍टरचे म्‍हणणे आहे व तसे त्‍यात नमूद आहे. Hypothyroidism हा रोग नसल्‍याचे नाकारण्‍यात येत आहे. उलट सदरचा आजार जीवघेणारा आजार आहे असे नमूद केले आहे.
  5.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या आईचा विमा उतरवितांना तिला विम्‍याचे दस्‍तऐवज तपासण्‍याची संधी दिली नाही हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोटे असून तक्रारकर्तीच्‍या आईने विमा उतरवितांना कंपनीच्‍या प्रतिनिधीला तिच्‍या प्रकृतीबाबतची माहिती व त्‍याकरिता घेत असलेल्‍या औषधोपचाराची सत्‍य माहिती लपवून ठेवली. तसेच विमा करार करण्‍यापूर्वी तक्रारकर्तीची वैद्यकीय तपासणी तिने दिलेल्‍या उत्‍तरावरुन करण्‍यात आली. दि. 18.11.2012 रोजी सेंट्रल रेल्‍वे हॉस्‍पीटल, नागपूर येथे तक्रारकर्त्‍याच्‍या आईचे निधन झाले याबाबत वाद नाही.  तक्रारकर्त्‍याने विमा मागणी प्रस्‍ताव दि. 05.12.2012 ला सादर केला. परंतु तक्रारकर्त्‍याची आई मृतक विमाधारकाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास उघड केला नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला Sum Assured ची रक्‍कम रुपये 2,25,000/-  देण्‍यास बाध्‍य नाही.  विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍यास रुपये 1,48,678.14 इतकी रक्‍कम देण्‍यास तयार आहे व तसे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दि. 26.03.2014 रोजी कळविले होते.
  6.      तसेच तक्रारकर्त्‍याने बीमा लोकपाल कार्यालय मुंबई यांच्‍याकडे तक्रार नोंदविली होती व दोन्‍ही पक्षांनी आपली बाजू व पुरावे सादर केले होते. बीमा लोकपाल कार्यालय मुंबई यांनी आपल्‍या निर्णयामध्‍ये विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिली नसल्‍याचे नमूद करुन तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज केली.
  7.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, त्‍यांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले .

               अ.क्रं.           मुद्दे                            उत्‍तर

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?     होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?  होय

3. काय आदेश ?   अंतिम आदेशाप्रमाणे

 

                                                        निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –  तक्रारकर्त्‍याच्‍या आईने विरुध्‍द पक्षाकडून Sum Assured किंमत रुपये 2,25,000/-ची पॉलिसी दि. 23.03.2011 रोजी घेतली होती व त्‍याची परिपक्‍वता तारीख 28.03.2026 होती. पॉलिसी धारकाचा मृत्‍यु झाल्‍यास वि.प.यांनी पॉलिसीधारकाला Total Sum Assured + Total Fund Value + Amount equal to basic sum Assured देण्‍याबाबत स्‍पष्‍टपणे देण्‍याबाबत पॉलिसी नमूद केले आहे. तक्रारकर्तीचा मृत्‍यु   Myocardial Infarction with right Hemiplegic with Hypothyroidism  & Hypertension झाल्‍याचे डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या अहवालात नमूद केले आहे. परंतु Hypothyroidism हा आजार नसून Hypothyroidism असलेल्‍या व्‍यक्‍ती मध्‍ये  Thyroid glands  पुरेशा Thyroid हार्मोन्‍स निर्माण करीत नाही परंतु सदरची बाब मृत्‍युचे थेट कारण आहे असे विरुध्‍द पक्षाने सिध्‍द केले नाही. सबब विरुध्‍द पक्षाने चुकिच्‍या कारणाने विमा दावा.  नाकारुन सेवेत त्रुटी केली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                       अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या आईच्‍या पॉलिसीचे विमा दावा रक्‍कम रुपये 2,25,000/- अदा करावे व त्‍यावर  दि. 05.12.2012 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी. 
  3. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  4. उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क प्रत परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.