Gorakh Laxman Pawar filed a consumer case on 06 Dec 2010 against Manager, Reliance General Insurcance Co. Ltd., in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/09/851 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Aurangabad
CC/09/851
Gorakh Laxman Pawar - Complainant(s)
Versus
Manager, Reliance General Insurcance Co. Ltd., - Opp.Party(s)
Adv. Sachin Thorat
06 Dec 2010
ORDER
DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
Adv.R.H.Dahat, Adv.M.P.Bhaskar, Advocate for Opp.Party
Dated : 06 Dec 2010
JUDGEMENT
तक्रारदाराचे वडिल हे शेतकरी व शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते. दिनांक 11/6/2008 रोजी जिन्यावरुन खाली पडून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एफआयआर व घटनास्थळ पंचनामा तसेच पीएम करण्यात आले. हे सर्व कागदपत्रे घेऊन तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 3 तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिनांक 3/3/2009 रोजी क्लेम दाखल केला. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारदाराने प्रस्ताव मुदतीत सादर न केल्यामुळे दिनांक 24/3/2009 रोजी परत केला. त्यानंतर तक्रारदारानी मंचामध्ये तक्रार केली. मंचाने गैरअर्जदार रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस आणि तालुका कृषी अधिकारी यांना नोटीसा पाठविल्या. गैरअर्जदार रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांनी त्यांच्याकडे क्लेमफॉर्म आणि कागदपत्रे मिळाली नसल्याचे म्हणतात. जीआर नुसार विमाधारकाच्या वारसाकडून आलेला प्रत्येक फॉर्म,क्लेमफॉर्म,कागदपत्रे याची छाननी करुन कृषी अधिका-यामार्फत कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस कंपनीकडे पाठवावयाचे असते. त्यानंतर कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस कंपनीने त्याची छाननी करुन ते रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठवावयाचे असते. प्रस्तूतच्या प्रकरणामध्ये तालुका कृषी अधिकारी यांनी नियमाप्रमाणे कार्यवाही न करता प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाला म्हणून प्रस्ताव तक्रारदारास परत केला आहे. त्यामुळे कृषी अधिकारी यांच्याकडून नियमाप्रमाणे कार्यवाही झाली नाही हे स्पष्ट दिसून येते. म्हणून मंच तक्रारदारास असा आदेश देते की, त्यांनी या आदेशाच्या प्राप्ती पासून 2 आठवडयाच्या आत क्लेमफॉर्म तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रासहीत दाखल करावा. तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारदाराचा क्लेमफॉर्म नियमानुसार कार्यवाही करुन तो कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस कंपनीकडे पाठवावा व कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांनी तो तात्काळ रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठवावा. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने, कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेसकडून तो मिळाल्यानंतर 4 आठवडयाच्या आत त्यावर निर्णय घ्यावा व तसे तक्रारदारास कळवावे.
वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1.तक्रारदाराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 2 आठवडयाच्या आत क्लेमफॉर्म आवश्यक त्या सर्व कागदपत्रासहीत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे द्यावा, तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारदाराचा क्लेमफॉर्म मिळाल्यानंतर नियमाप्रमाणे तो कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेसकडे पाठवावा व कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेसने तो तात्काळ रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठवावा.
2.रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने, कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्याकडून क्लेमफॉर्म मिळाल्यापासून 4 आठवडयाच्या आत त्यावर निर्णय घ्यावा व तसे तक्रारदारास कळवावे.