(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. मयत किशोर चरवंडे हे शेतकरी आणि शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभधारक होते. दि.17.07.2008 रोजी विमाधारक आणि त्यांचा मित्र हे मोटर सायकलवरुन जात असतांना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यात किशोर चरवंडे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम करण्यात आले. तक्रारदार हे विमाधारकाचे वडील आहेत. त्यांनी दि.24.11.2008 रोजी सर्व आवश्यक त्या कागदपत्रासहीत क्लेम कृषी अधिका-यांकडे पाठवून दिला. गैरअर्जदार इन्शुरन्स कंपनीने क्लेमची रक्कम दिली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार, गैरअर्जदाराकडून रु.1,00,000/- 18% व्याजदराने, रु.10,000/- नुकसान भरपाई आणि रु.10,000/- तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी, त्यांचा लेखी जबाब मंचात दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचा क्लेम हा त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाही. कबाल इन्शुरन्सच्या लेखी उत्तरामध्ये तक्रारदाराचा क्लेम त्यांना दि.12.12.2008 रोजी प्राप्त झाला, आणि पॉलीसीचा कालावधी हा दि.14.08.2008 पर्यंतच होता. त्यामुळे तक्रारदारानी हा क्लेम दि.14.11.2008 पर्यंत पाठविणे आवश्यक होते. वरील कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स कंपनीने त्यांचा लेखी जबाब पोस्टाद्वारे पाठवून दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचा क्लेम त्यांना दि.12.12.2008 रोजी प्राप्त झाला. पॉलीसीचा कालावधी दि.15.08.2007 ते 14.08.2008 पर्यंत होता. हा क्लेम 90 दिवसाच्या आत दाखल करावयास पाहिजे. म्हणजेच दि.14.11.2008 पर्यंत दाखल करणे आवश्यक होते. कबाल इन्शुरन्स कंपनीने हा क्लेम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठवून दिला, तो त्यांना दि.31.01.2009 रोजी प्राप्त झाला. गैरअर्जदार क्र.3 यांची पोच पावती मंचास प्राप्त तरी, गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द मंचानी एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित केला. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचानी पाहणी केली. तक्रारदाराचा मुलगा हा शेतकरी होता, हे तलाठी वैजापूर यांच्या प्रमाणपत्रावरुन दिसून येते. तसेच सर्व कागदपत्रासहीत तक्रारदारानी कृषी अधिकारी वैजापूर यांच्याकडे दि.24.11.2008 रोजी क्लेम दिल्याचे दिसून येते. तालुका कृषी अधिका-यांनी तक्रारदाराचा क्लेम आणि कागदपत्रे कबाल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविली. कबाल इन्शुरन्स कंपनीने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविल्याचे त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात. परंतू रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा क्लेम त्यांना अद्यापपर्यंत प्राप्त झाला नसल्याचे त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात. म्हणून मंच कबाल इन्शुरन्स कंपनी आणि तालुका कृषी अधिकारी यांना असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदाराचा क्लेम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दोन आठवडयाच्या आत पाठवून द्यावा. तो प्राप्त झाल्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा क्लेम चार आठवडयात त्यावर कार्यवाही करावी. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) कबाल इन्शुरन्स कंपनी आणि तालुका कृषी अधिका-यांनी तक्रारदाराचा क्लेम आणि सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे दोन आठवडयात पाठवून दयावेत.त्यानंतर रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने तो प्राप्त झाल्यानंतर चार आठवडयात त्यावर कार्यवाही करुन तक्रारदारास कळवावे. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |