निकाल
दिनांक- 03/08/2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्य क्ष)
(2) त.क्र.41/2012
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्व2ये, दाखल केली आहे.
तक्रारदार नं.1 ही मयत शिवाजी पारधे यांची पत्नी आहे. तक्रारदार नं.2 ही त्यााची मुलगी आहे.तक्रारदार व मयत शिवाजी हे मौजे गिरवली तालुका अंबाजोगार्इ येथे राहात होते. तक्रारदार यांचे पती यांनी सामनेवाला 1 इन्शुेरन्सक कंपनीमध्येे त्यातचा वैयक्तिक अपघात विमा काढलेला होता. विम्याीचा कालावधी दि.10.09.2009 ते 09.09.2010 असा होता. सामनेवाला 1 यांनी मयत शिवाजी यास विमा पॉलीसी दिलेली आहे. दि.20.07.2010 रोजी मयत शिवाजी हा अंबाजोगाई अहमदपूर रोडवर स्वयतःच्याी ताब्याेतील महिंद्रा चॅम्पी.यन नं.एम.एच.44-4069 चालवित होता. सदर रोडवर अचानक म्ह0शींनी प्रवेश केला व त्याा अॅटोवर धडकल्याा त्या.मुळे अॅटो पलटी होऊन आत बसलेल्यात व्यवक्तींडना व मयत शिवाजी यास गंभीर मार लागला. जखमी शिवाजी यास अंबाजोगाई या ठिकाणी तात्काहळ औषधोपचारासाठी दवाखान्याीत दाखल केले, औषधोपचार चालू असताना तो मयत झाला. तक्रारदार हया सर्वस्वीय मयत शिवाजी याच्याा उत्प न्नाचवर अवलंबून होत्याा. तक्रारदार क्र.1 यांचे पती मयत झाल्याॅमुळे त्यांिचे आर्थिक नुकसान झाले. तक्रारदार यांनी सामनेवाला 1 यांच्यााकडे माहिती भरुन विम्या ची रक्कंम मिळण्यािसाठी दि.07.08.2010 रोजी अर्ज केला. त्यायसोबत सर्व कागदपत्राची पुर्तता केली. अर्ज मिळूनही सामनेवाला यांनी कोणतीही दखल घेतली नाही. सबब तक्रातक्रारदार यांना तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदार यांच्याअ मते मयत शिवाजी याने रु.3,00,000/- रकमेचा अपघात विमा काढलेला होता, ती रक्कीम सामनेवाला 1 व 2 यांचेकडून व्या0जासहीत मिळावी.
सामनेवाला 2, 3 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही. दि.19.06.2013 रोजी सामनेवाला 1 करीता अॅड. ए.पी.कुलकर्णी यांनी अर्ज दिला होता की, सामनेवाला 1 हा मुदतीत कैफियत दाखल करु शकला नाही, अगर मंचासमोर हजर होऊ शकला नाही. म्हाणून एकतर्फा हुकूम झाला आहे, तो रदद करुन जबाब दाखल करण्याास परवानगी द्यावी. सदरील अर्जावर दि.10.07.2013 रोजी आदेश करुन तो नाकारण्याखत आला. सबब सामनेवाला तर्फे जबाब दाखल केलेला नाही.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत इन्शु रन्स प्रमाणपत्र, क्लेकम इन्टीलमेशन फॉर्म, गुन्हरयाची प्रथम खबर, जबाब, प्रेत ताब्या,त मिळाल्यालबाबत पावती, शवविच्छेादन अहवाल, मरणोत्तार पंचनामा, तसेच इन्शु1रन्सत कंपनीकडे क्लेेम दाखल केल्याफबाबत पोस्टािची पोच पावती, मयताचे लायसन्सा दाखल केले आहेत.
तक्रारदार क्र.1 हिने तिचे स्वुतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.गिरवलकर यांचा
(3) त.क्र.41/2012
युक्ती वाद ऐकला. न्या3यनिर्णयासाठी मंचासमोर खालील मुददे उपस्थित होतात. व त्या्चे समोरच त्यातची उत्तारे दिलेली आहेत.
मुददे उत्तलर 1. सामनेवाला 1 व 2 यांनी सेवा देण्या स त्रुटी
ठेवली आहे काय ? होय.
2. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्कनम मिळण्याास पात्र आहे काय ? होय.
3. इन्शुयरन्सत कंपनीने विमा पॉलीसी रक्क म देण्या स
टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी केली काय ? होय.
4. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 4 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे निष्प न्नय होते की, तक्रारदार याचे पती हे दि.20.07.2010 रोजी अंबाजोगाई ते अहमदपूर रोडवर त्यां च्याप ताब्यादतील अॅटोरिक्षा चालवित होता. सदरील अॅटोरिक्षा शिरोडी शिवारात आली असता समोरुन एक म्हैास उधळत येऊन अॅटोवर धडकली त्याआमुळे अॅटो पलटी होऊन अॅटोमध्येा बसलेले पॅसेंजर व तक्रारदार क्र.1 हिचे पतीस मार लागला. तक्रारदार हिचे पतीस अंबाजोगाई येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व तो उपचार घेत असताना मयत झाला. मयत झाल्याहनंतर त्यावचा मरणोत्तार पंचनामा व शवविच्छेसदन करण्या त आले. सबब तक्रारदार क्र.1 हिचे पती अपघातात मयत झाले ही बाब सिध्दच होते.
तक्रारदार हिने दाखल केलेल्याद कागदपत्रावरुन असे निष्प न्नआ होते की, तक्रारदार क्र.1 हिचे पती यांनी वैयक्तिक अपघात विमा सामनेवाला 1 इन्शु रन्सी कंपनीकडे उतरविलेला होता व विम्याेची मुदत दि.10.09.2009 ते 09.09.2010 अशी होती. सामनेवाला 1 यांनी विमा पॉलीसीची रक्कलम रु.3,00,000/- अंतर्भूत केलेली होती. सबब तक्रारदार क्र.1 हिचे पती शिवाजी प्रभू पारधे हा वैयक्तिक अपघातामध्येक मयत झाल्याास सामनेवाला 1 इन्शु रन्सब कंपनी रु.3,00,000/- पॉलीसी अंतर्गत देणे लागतो.
तक्रारदार हिने आपल्या0 शपथपत्रात कथन केले आहे की, त्यांानी दि.07.08.2010 रोजी सामनेवाला इन्शुारन्सप कंपनीकडे सर्व कागदपत्राची पुर्तता करुन, अर्ज भरुन पाठवला होता, तो अर्ज मिळूनही सामनेवाला कंपनीने काही दखल घेतली नाही. सदरील बाब सिध्दर करण्याजसाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पाठविलेल्याक कागदपत्रासंबंधी जी पोस्टाणची पोच मिळाली आहे,
(4) त.क्र.41/2012
ती दाखल केली आहे. यावरुन सामनेवाला यांना तक्रारदार यांनी केलेला क्लेकम अर्ज मिळाला होता ही बाब निष्पहन्न होते. सदरील क्लेाम प्रपत्र मिळूनही सामनेवाला यांनी कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. तक्रारदार क्र.1 हिचे पती मयत झाल्यािनंतर व सामनेवाला यांचेकडे रितसर अर्ज केल्याहनंतर विमा पॉलीसीमध्येा नमुद केलेली रक्कपम देण्याहची जबाबदारी सामनेवाला क्र.1 व 2 यांची होती, ती त्यां नी पार पाडली नाही व सेवेत कसूर केली आहे. सबब तक्रारदार हे मयत शिवाजी प्रभू पारधे याने काढलेल्या् विम्याेची रक्काम रु.3,00,000/- मिळण्या स पात्र आहे. तसेच सामनेवाला 1 व 2 यांनी ती रक्करम दिली नाही त्या,मुळे तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला त्याापोटी रक्कचम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.2500/- मिळण्याकस पात्र आहे. सबब मुददा क्र.1 ते 4 चे उत्तीर होकारार्थी देण्या त येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्या त येते. 2. सामनेवाला 1 व 2 यांना असे आदेश देण्यारत येते की, त्यांयनी सदर आदेशाची
प्रत प्राप्तल झाल्यावपासून 30 दिवसात तक्रारदार यांना रु.3,00,000/- (अक्षरी
रु.तीन लाख) द्यावेत. तसेच तक्रार दाखल तारखेपासून तर ते देईपावेतो
द.सा.द.शे. 10 टक्केश व्या ज द्यावे.
3. सामनेवाला 1 व 2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्क म
रु.3,000/- व तक्रारीच्याे खर्चापोटी रु.2,500/- द्यावे.
4 . ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्य क्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.