(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराच्या पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे, शासनाने काढलेल्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी विमा रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. (2) त.क्र.682/09 अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती शेतकरी असून, त्यांची चिकलठाण, ता.कन्नड येथे शेतजमिन आहे. दि.18.12.2007 रोजी फुलंब्री, औरंगाबाद जवळ एका वाहन अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दि.21.03.2009 रोजी अर्जदाराने योग्य त्या कागदपत्रासह तहसीलदार, यांना विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. गैरअर्जदार क्र.2 यांनी ही कागदपत्रे कबाल इन्शुरन्स कंपनीकडे पुढील कारवाईसाठी पाठविली. परंतु गैरअर्जदार यांनी विमा रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार शेतकरी विमा योजनेअंतर्गत अर्जदाराने दाखल केलेला अर्ज त्यांना मिळाला नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने चुकीच्या पत्त्यावर कागदपत्रे पाठविली असल्यामुळे त्यांना कागदपत्रे मिळालेली नाहीत. गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेल्या जवाबात त्यांनी अर्जदाराचा क्लेम फॉर्म दि.30.05.2009 रोजी, तालुका कृषी अधिकारी, तसेच दि.04.04.2009 रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद, व दि.25.05.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे पाठविला असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने दि.21.03.2009 रोजी त्यांच्याकडे क्लेम दाखल केला असून, तो मुदतबाहय असल्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदार यांचे पती शेतकरी असून, त्यांचे दि.18.12.2007 रोजी, फुलंब्री जवळ वाहन अपघातात निधन झाले आहे. गैरअर्जदार यांच्याबरोबर शासनाचा करार 15 ऑगस्ट 2007 ते 14 ऑगस्ट 2008 या वर्षाकरीता झाला होता. व शासन निर्णयाच्या, विमा कंपनी संबंधी असलेल्या परिपत्रकामध्ये कलम (क) 2 मध्ये, “शेतक-यांचा विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या कालावधीत केव्हाही प्राप्त झाला, तरी तो विचारात घेणे संबंधित विमा कंपनीला बंधनकारक राहील. अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्यापासून 90 दिवसापर्यंत विमा प्रस्ताव स्विकारण्यात येतील. समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त दावे स्विकारण्यात यावे” असे म्हटले आहे. पॉलीसीचा कालावधी 15 ऑगस्ट 2007 ते 14 ऑगस्ट 2008 हा असून, योजनेचा कालावधी संपल्यापासून 90 दिवसातही क्लेम फॉर्म दाखल झालेला नाही, व उशिरा क्लेम दाखल केल्याबददल योग्य (3) त.क्र.682/09 त्या कारणासाठी विलंब अर्ज ही दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी, अर्जदाराने दाखल केलेला क्लेम फॉर्म मुदतबाहय असल्याचे सांगून विमा रक्कम नाकारल्याची कृती योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |