निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदार क्र.1 ही मयत शेतकरी रंगनाथ भालेकर यांची पत्नी तर तक्रारदार क्र.2 हे त्यांचे पिता आहेत.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार क्र.1 चे पती रंगनाथ भालेकर हे शेतकरी होते. ते दि.19.03.2009 मध्ये रस्ता अपघातात मरण पावले. तिने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदार क्र.2 व 3 मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांना विमा प्रस्ताव पाठवला. तसेच कायदेशीर नोटीसही पाठवली. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही. म्हणून तक्रारदारांनी मंचात ही तक्रार दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे मंचासमोर हजर झाले. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.04.04.2013 रोजी पुर्सीस दाखल केली की, सदर प्रकरणात यापुर्वीच तक्रार क्र.94/2011 दाखल होऊन या मंचाने दि.21.05.2012 रोजी तक्रार मंजूर केली आहे. दोनही तक्रारीत अर्जदार व मयत एकच आहेत. तरी सदरची तक्रार रदद करयात यावी. सदरच्या तक्रारीतील तक्रारदार श्रीमती सुनिता यांनी दि.18.04.2012 रोजी त्यांनी यापुर्वी कोणतीही तक्रार दाखल केली नाही म्हणून शपथपत्र दिले.
तक्रार क्र.94/11 मधील आदेशाचे अवलोकन करता दोनही तक्रारी एकाच घटनेशी संबंधीत आहेत. त्या तक्रारीत सदरच्या अर्जातील तक्रारदार क्र.1 श्रीमती सुनिता रंगनाथ भालेकर या तक्रारदार आहेत व मयत श्री.रंगनाथ भालेकर हेच आहेत व ती तक्रार दि.04.05.2012 रोजी मंजूर होऊन तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रुपये एक लाख देण्याचा आदेश रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला झालेला आहे.वरील घटनेशी संबंधीत असलेली पुर्वीची तक्रार क्र.94/11 अगोदरच निकाली झालेली आहे. पुन्हा त्यांच घटनेशी संबंधीत तक्रार दाखल करण्यास कायदयाची बाधा आहे.
सबब, मंच, खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार खारिज करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत हूकूम नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड