निकालपत्र :- (दि.31.01.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीची बजावणी झाली आहे. आजरोजी भास्कर जाधव नामक व्यक्तीने मुदत मिळणेबाबतचा अर्ज दिला आहे. सदर श्री.जाधव हे अधिकृत स्वाक्षरीकर्ते नाहीत. तसेच, सदर अर्जास कोणतेही संयुक्तिक कारण नसल्याने अर्ज फेटाळणेत आला. तक्रारदारांच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकणेत आले.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीचे मोबाईल कनेक्शन दि.23.06.2003 रोजी घेतले होते. सदर मोबाईल कनेक्शन तक्रारदारांनी दि.20.01.2004 रोजीपर्यन्त वापरले होते. तक्रारदारांचा मोबाईल नं.2313546014 असा होता व अकौंट नं. 2034282328 असा होता. तक्रारदारांना दि.01.01.2004 रोजी रुपये 5047.36 पैसे इतके अवास्तव बिल आले. याबाबत सामनेवाला यांचेकडे तक्रार केली असता सदर चुकीने जादा बिल लावलेचे निष्पन्न झाले. सामनेवाला यांनी बिल कमी करतो असे सांगून रुपये 3,100/- भरुन हॅण्डसेट जमा करा असे तक्रारदारांना सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी दि.17.01.2004 रोजी सामनेवाला कंपनीकडे हॅण्डसेट जमा केला व दि.19.01.2004 रोजी रिसीट नं.110080039169 ने रक्कम रुपये 3,100/- जमा केली. (3) उपरोक्त वस्तुस्थिती असताना तक्रारदार हे सामनेवाला यांचे कोणतीही रक्कम अगर बिल देणे लागत नसताना दि.15.09.2010 रोजी म्हणजे जवळपास साडेसहा वर्षानी वकिलामार्फत नोटीस पाठविली व तथाकथित थकबाकी म्हणून रुपये 7,517/- ची मागणी केली. अचानक आलेली नोटीस पाहून तक्रारदारांना प्रचंड मानसिक धक्का बसला. सदर मानसिक धक्क्यामुळे तक्रारदारांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तक्रारदारांना दोन ते तीन वेळा दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे अकौंट स्टेटमेंटची मागणी केली असता तक्रारदारांनी दि.17.01.2004 रोजी हॅण्डसेट जमा केलेनंतर सदर हॅण्डसेटवरुन फोन केलेचे निदर्शनास आले. राजू ठाकूर व शेखावत नांवाच्या व्यकतींनी विना अधिकार कॉल करुन गैरकृत्य केलेने त्यांना सामनेवाला कंपनीने सेवेतून कमी केले असलेची माहिती तक्रारदारांना मिळाली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे हॅण्डसेट परत केल्यानंतर सदर हॅण्डसेटशी कोणताही संबंध अगर संपर्क आलेला नाही अगर त्याचा कोणताही वापर तक्रारदारांनी केलेला नाही. त्यामुळे दि.17.01.2004 नंतरचे कोणत्याही बिलाशी अगर रक्कमेशी तक्रारदारांचा संबंध नसताना सामनेवाला यांनी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय आवार कोल्हापूर यांचेकडे प्रि-लिटीगेशन केस नं.5041/2010 चे प्रोसिडींग अकारण व चुकीच्या पध्दतीने दाखल केले. सदर प्रि-लिटीगेशन चे कामात कागदपत्रे दाखविली असता तक्रारदारांनी सामनेवाला यांचे देणे लागत नाही त्यामुळे समेट करणेचा प्रश्नच उदभवत नसलेचे सांगितले. तरीसुध्दा अजूनही सामनेवाला कंपनी त्यांचे कर्मचारी पाठवून बिल भरा नाहीतर कायदेशीर कारवाई करु अशा चुकीच्या व बेकायदेशीर धमक्या देतात. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे. सबब, सदर त्रासापोटी रुपये 25,000/-, सामनेवाला यांनी निष्कारण दिलेल्या त्रासामुळे तक्रारदारांचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले त्यापोटी रुपये 25,000/-, कोर्ट खर्च रुपये 10,000/- देणेचे सामनेवाला यांना आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला तक्रारदारांना पाठविलेले फोन बिल, कॉल डिटेल्स, बिल भरलेनंतर दिलेली रिसीट, हॅण्डसेट जमा करुन घेवून दिलेली पोच, सामनेवाला यांची नोटीस, स्टेटमेंट ऑफ अकौंट, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची नोटीस, तक्रारदारांच्या ह्दयाचा कार्डीओग्राम, प्रिस्क्रीप्शन, मेडिकल सर्टिफिकेट इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) प्रस्तुत प्रकरणी कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदार सामनेवाला कंपनीचे मोबाईल कनेक्शन दि.20.01.2004 रोजीपर्यन्त वापरले आहे. सदरचा मोबाईल तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीकडे दि.17.01.2004 रोजी जमा केलेला आहे व तशी सामनेवाल यांनी पावती दिली आहे. प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला खातेउतारा पाहिला असता सामनेवाला कंपनीकडे हॅण्डसेट जमा केला असता त्यावर वेळोवेळी कॉल झालेचे दिसून येते. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :-
01/12 | 22:15:09 | 020310110908 | 2.31 | 3.00 | 05/12 | 22.15.33 | 09448457780 | 3.07 | 7.96 | 06/12 | 09.01.30 | 02162232285 | 0.54 | 1.99 | 10/12 | 14.41.07 | 02912516156 | 1.39 | 7.68 | 10/12 | 17.45.18 | 02912516156 | 16.26 | 67.83 | 12/12 | 11.30.40 | 9822096116 | 0.49 | 1.58 | 12/12 | 16.12.35 | 02912516156 | 12.32 | 31.87 | 12/12 | 18.08.10 | 09822549543 | 0.19 | 1.98 | 12/12 | 21.12.59 | 02912516156 | 5.16 | 23.94 | 12/12. | 21.18.56 | 02912516156 | 3.57 | 15.96 | 14/12 | 21.11.08 | 02912516156 | 2.07 | 11.97 | 14/12 | 21.58.13 | 02912516156 | 0.19 | 3.99 | 14/12 | 22.25.59 | 02912516156 | 2.57 | 11.97 | 15/12 | 13.04.02 | 9422047523 | 0.05 | 1.99 | 15/12 | 19.33.21 | 02912516156 | 0.46 | 3.99 | 18/12 | 18.58.03 | 02031010908 | 0.45 | 1.00 | 19/12 | 19.46.10 | 02912516156 | 1.23 | 7.98 | 19/12 | 21.35.09 | 02912516156 | 1.57 | 9.98 | 21/12 | 15.55.36 | 02992256164 | 6.52 | 27.98 | 22/12 | 15.00.17 | 02915101778 | 0.25 | 3.99 | 22/12 | 15.04.02 | 02912516156 | 22.36 | 91.77 | 22/12 | 16.31.52 | 02912516156 | 42.50 | 171.57 | 23/12 | 14.46.05 | 02912516156 | 5.27 | 23.94 | 23/12 | 17.51.10 | 02912516156 | 44.47 | 179.65 | 23/12 | 21.20.12 | 02912516156 | 2.30 | 11.97 | 24/12 | 13.08.30 | 02912516156 | 8.45 | 35.91 | 24/12 | 13.34.11 | 02912516156 | 29.02 | 119.70 | 24/12 | 14.12.22 | 02912516156 | 0.40 | 3.99 | 24/12 | 15.06.30 | 9822211354 | 0.23 | 1.99 | 24/12 | 15.18.29 | 02912516156 | 8.01 | 36.04 | 25/12 | 13.45.04 | 02912516156 | 9.07 | 6.98 | 25/12 | 13.46.13 | 02912516156 | 11.62 | 47.88 | 25/12 | 16.04.26 | 02912516156 | 23.46 | 26.06 | 26/12 | 19.14.07 | 02912516156 | 61.46 | 24.00 | 26/12 | 12.38.57 | 02912516156 | 45.15 | 183.34 | 26/12 | 17.46.02 | 02912516156 | 45.05 | 183.04 | 27/12 | 11.18.30 | 02335601790 | 3.22 | 7.96 | 27/12 | 15.00.00 | 02912516156 | 17.07 | 71.82 | 27/12 | 16.59.37 | 02912516156 | 67.44 | 27182 | 27/12 | 11.58.44 | 02912516156 | 67.10 | 271.82 | 27/12 | 14.25.24 | 02912516156 | 65.51 | 263.34 | 28/12 | 20.34.58 | 02912516156 | 1.51 | 7.98 | 28/12 | 21.39.31 | 02912516156 | 12.32 | 51.87 | 29/12 | 17.53.06 | 02912516156 | 33.21 | 135.66 | 29/12 | 23.31.31 | 02912516156 | 2.46 | 11.97 | 30/12 | 15.03.12 | 02912516156 | 11.31 | 47.68 | 30/12 | 16.01.18 | 02912516156 | 14.37 | 59.85 | 30/12 | 16.39.59 | 02912516156 | 5.25 | 23.94 | 30/12 | 17.44.54 | 02912516156 | 13.52 | 55.86 | 30/12 | 18.19.09 | 02912516156 | 33.25 | 135.66 | 31/12 | 11.19.27 | 02912516156 | 1.06 | 7.98 | 31/12 | 11.35.55 | 09890128801 | 0.52 | 1.99 | 31/12 | 13.14.04 | 02912516156 | 1.05 | 7.98 | 31/12 | 15.03.55 | 02912516156 | 0.41 | 3.99 | 31/12 | 17.47.47 | 02912516156 | 12.09 | 51.87 | 31/12 | 20.21.09 | 02912516156 | 23.06 | 95.76 |
(6) उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवाला कंपनीने हॅण्डसेट जमा करुनही त्यानंतर तक्रारदार ग्राहकाने कॉलिंग करणेचा प्रश्न नसताना त्यावर कॉलिंग दाखवून साडेचार ते साडेपाच वर्षांनी वकिलामार्फत नोटीस पाठवून तसेच, प्रि-लिटीगेशन प्रोसिडींगबाबत नोटीस पाठविलेली आहे. याचा विचार करता सामनेवाला कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेचे दिसून येते. अशा प्रकारे वकिलामार्फत नोटीस पाठविणे व अन्य प्रकारे त्रास देण्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे. त्याबाबत डॉ.महेंद्र जे. ओसवाल, MBBS, DNB 1, Dip.Card FCCP, Diplamate in Cardiology या कार्डिओलॉजिस्टकडे तपासणी केली आहे. त्याबाबत मेडिकल तपासणीबाबतचे सर्व पेपर्स दाखल केलेले आहेत. सामनेवाला यांच्या चुकीच्या वर्तुणुकीमुळे तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रास होवून त्यांना वैद्यकिय तपासणी करावी लागली. याची हे मंच गांभीर्याने दखल घेत आहे. अतिशन तांत्रिकपणे व निष्काळजीपणाने अशा प्रकारे ग्राहकांना नोटीस पाठविणे ही गंभीर बाब आहे. याचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आदेश
1. सामनेवाला यांनी मोबाईल कनेक्शनपोटी मागणी केलेले बिल रद्द करणेत येते.
2. सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- (रुपये पंचवीस हजार फक्त) द्यावेत.
3. सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावा. 4. सदरचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |