::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :-21.07.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने गैरअर्जदारांकडुन टु व्हीलर गाडी खरेदी करण्याकरिता मार्च 2013 मध्ये घेतले होते. कर्जाची रक्कम आणि व्याज म्हणुन एकत्र रूपये 2420/- प्रती महिना या प्रमाणे 18 हप्ते अर्जदाराला गैरअर्जदारांकडुन भरणा करायची होती. अर्जदाराने एकुण रक्कम 35000/- रूपये गैरअर्जदारांकडुन कर्ज घेतला होता. अर्जदाराने गैरअर्जदाराला दिनांक 10/04/2013 ते 17/12/2014 एकुण रूपये 38520/- ची भरणा केली होती. गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक 22/01/2015 रोजी असे सांगितले की, अर्जदाराला अजुन 17800/- रूपये ची भरणा गैरअर्जदारांकडे करायची आहे अन्यथा अर्जदाराची गाडी जप्त करण्यात येईल. गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही सुचना किंवा जप्तीचा पंचनामा न करता बेकायदेशीर पणे अर्जदाराची गाडी जप्त केली. अर्जदाराने गैरअर्जदाराला वकीला मार्फैत नोटीस पाठविले. सदर नोटीस प्राप्त झाल्यावर गैरअर्जदाराने खोटे उत्तर दिले. गैरअर्जदाराने अर्जदाराची गाडी बेकायदेशीर जप्त केली असल्याने अर्जदाराला परत देण्याचे आदेश व्हावे व अर्जदाराला झालेल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई गैरअर्जदारांकडुन मिळविण्याचा आदेश व्हावे म्हणुन सदर तक्रार मंचा समक्ष दाखल केली आहे.
अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदारांना नोटीस प्राप्त होवून गैरअर्जदार मंचासमक्ष हजर झाले व आपले लेखीउत्तर नि. क्रं. 14 प्रमाणे दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदाराविरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केलेले आहे की, अर्जदाराला कर्जाची हप्ते प्रत्येक महिनाची चार तारीख किंवा त्यापुर्वी गैरअर्जदाराकडे जमा करणे बंधन कारक होते. नाही तर प्रती महिना अर्जदारास रूपये 350/- एवढा दंड आकारण्यात येईल असे ठरले होते. अर्जदाराने ऑगस्ट 2013 पासुन मुदतीत हप्ता भरणे बंद केले होते. अर्जदाराने ऑगस्ट 2013 चा हप्ता ऑक्टोंबर 2013 मध्ये भरणा केली त्यानंतर जवळ पास 10 महिने अर्जदाराने कोणतीही किश्त भरली नाही. एकुण 18 किश्त प्रमाणे अर्जदाराला गैरअर्जदारांकडे रूपये 43560/- भरायचे होते. अर्जदाराने फक्त रूपये 33020/- गैरअर्जदारांकडे जमा केले आहे. अर्जदार इतर किश्त व दंडाची रक्कम गैरअर्जदारांकडे भरण्यास नेहमी टाळमटाळ करत असल्याने शेवटी अर्जदाराने दिनांक 17/12/2014 रोजी गैरअर्जदारांकडे उर्वरीत कर्जाची रक्कम न भरल्यास, अर्जदाराने स्वतः गैरअर्जदारांकडे गाडी जमा केली. अर्जदाराने कर्जाचे संपुर्ण रक्कम भरण्या केल्या शिवाय अर्जदाराला ती गाडी परत देणे न्याय संगत ठरणार नाही व अर्जदाराने खोटी व दिशाभुल करणारी तक्रार मंचा समक्ष दाखल केली असल्याने सदर तक्रार खारीज होण्यात यावी अशी विनंती केली आहे.
अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदारास प्रती न्युनता पुर्ण सेवा दिली आहे काय? नाही.
- अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
अर्जदाराने गैरअर्जदारांकडुन टु व्हीलर गाडी खरेदी करण्याकरिता मार्च 2013 मध्ये घेतले होते. कर्जाची रक्कम आणि व्याज म्हणुन एकत्र रूपये 2420/- प्रती महिना या प्रमाणे 18 हप्ते अर्जदाराला गैरअर्जदारांकडुन भरणा करायची होती. अर्जदाराने एकुण रक्कम 35000/- रूपये गैरअर्जदारांकडुन कर्ज घेतला होता. ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असुन अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
अर्जदाराने गाडी खरेदी करिता गैरअर्जदाराकडुन 35000/- रूपये गाडी कर्ज घेतले होते. अर्जदार यांना 2420/- रूपये प्रती महिना 18 किश्त प्रमाणे कर्जाची रक्कम गैरअर्जदाराकडे भरायची होती. त्याप्रमाणे अर्जदाराला एकुण रक्कम 43560/- रूपये गैरअर्जदाराकडे अर्जदाराला नियमीत पणे भरायचे होते. अर्जदाराचे तक्रारी नुसार अर्जदाराने फक्त 38520/- रूपये गैरअर्जदारांकडे भरणा केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीत भरलेली रक्कमाचे पावत्यांची पडताडणी करतांना असे दिसले की, दिनांक 10/04/2013, 15/05/2013, 13/07/2013, 15/10/2013, 11/08/2014, 11/11/2014 आणि 17/12/2014 ला अर्जदाराने गैरअर्जदारांकडे कर्जाची परतफेड म्हणुन रक्कम जमा केली आहे. यावरून असे सिध्द होते की, अर्जदाराने गैरअर्जदारांकडे नियमित, प्रत्येक महिने कर्जाची हप्तेची भरणा केली नाही.
गैरअर्जदाराने नि.क्रं 18 वर दाखल दस्त क्रं ब-2 ची पडताडणी करतांना असे दिसले की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रं 1 कडे दिनांक 17/12/2014 रोजी वादातील वाहन जमा केले होते. अर्जदारातर्फै प्रतिनिधीने युक्तीवादाच्या वेळी सदर दस्तावेजांवर असलेली अर्जदाराची स्वाक्षरी नाही असे सांगितले होते परंतु त्याकरिता अर्जदाराने सदर तक्रारीत तंत्र विशेषज्ञचा कोणताही साक्षी पुरावा दाखल केला नाही. या उलट दस्त क्र ब-2 वर असलेली अर्जदाराचे स्वाक्षरी व तक्रारीत असलेली स्वाक्षरी एकसारखी दिसुन येते. सबब अर्जदाराने वादातील वाहन गैरअर्जदार क्रं 1 कडे दिनांक 17/12/2014 ला जमा केले होते असे सिध्द झाले आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे फक्त 38,520/- रूपयांची कर्ज परत फेळ भरणा केली असुन अर्जदाराचे तक्रारीनुसार अजुन अर्जदाराला 5,040/- ची रक्कम भरायची आहे. म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन उर्वरीत कर्जाची रक्कम व त्यावर व्याज, दंड अकारून कोणतीही अर्जदाराप्रती सेवेत त्रुटी दिली नाही असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं 2 चे उत्तर नाकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
- अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
- उभयपक्षाने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावे.
- आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी..
चंद्रपूर
दिनांक - 21/07/2016