जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १४८/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २४/०९/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ०६/०६/२०१३
१) श्री. कौतीकराव पंडीतराव पाटील, वय-८०
२) सौ. जिजाबाई कौतीकाराव पाटील, वय-७५
दोन्ही रा. सिताई बंगला, नटराज टॉकीजच्यामागे,
धुळे, तालुका व जिल्हा धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१) प्रियदर्शिनी सहकारी सुत गिरणी म., शिरपुर
(चे समन्स व्यवस्थापक/ चेअरमन यांचेवर बजवावे)
२) श्री. भुपेशभाई रसिकलाल पटेल, चेअरमन
३) श्री. नितीन गोपाल अग्रवाल, व्हाईस चेअरमन
४) श्री. टागोरसिंग अंबरसिंग परदेशी, संचालक
५) श्री. मुरलीधर उंबर पाटील, संचालक
६) श्री. रूपसिंग महारू चौधरी, संचालक
७) श्री. प्रदयुतकुमार कंकूचंद शहा, संचालक
८) श्री. अशोक रामकृष्ण पाटील, संचालक
९) श्री. रविंद्र हांडू गुजर संचालक
१०) श्री.जगतसिंग आनंदसिंग राजपुत संचालक
११) श्री. मोतीलाल दौलत माळी, संचालक
१२) श्री. योगेश नारायण भंडारी, संचालक
१३) श्री. संग्रामसिंग सरदारसिंग राजपुत संचालक
१४) श्री. शामकांत रामराव ठाकरे, संचालक
१५) श्री. देविदास भिकारी गुजर संचालक
१६) श्री. निलेश विश्वासराव पाटील, संचालक
१७) श्री. प्रभाकरराव तुकाराम चव्हाण, संचालक
१८) श्री.मल्हारराव सुदाम भलकार, संचालक
१९) श्री.दिलीप गंगाराम पावरा, संचालक
२०) श्रीमती चेतना ज्ञानुसिंग चौधरी, संचालिका
२१) श्रीमती लताबाई सर्जेराव पाटील, संचालिका
२२) श्री.मा. प्रादेशिक उपसंचालक,
वस्त्रोदयोग, महाराष्ट्र शासन, मुंबई शासन प्रतिनिधी
२३) श्री. प्रसन्न जयराज जैन, स्विकृत तज्ञ संचालक
२४) श्री.यशवंत परशराम शिंपी निमंत्रीत संचालक
२५) श्री. लक्ष्मण बाजीराव पाटील जिल्हा बॅंक प्रतिनिधी
२६) श्री. अशोक एकनाथ पाटील संचालक
सर्व – सज्ञान, व्यवसाय – सुखवस्तु
सर्वाचा पत्ता प्रियदर्शिनी सहकारी सुत गिरणी म., शिरपूर
शिरपूर तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एन.ए. बोरसे)
(सामनेवाला तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘प्रियदर्शिनी सहकारी सुत गिरणी म., शिरपुर जिल्हा धुळे’ (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अंतर्गत रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. |
पावती नंबर |
ठेव दिनांक |
देय दिनांक |
ठेवलेली रक्कम रूपये |
मुदतीनंतर मिळणारी रक्कम रूपये |
१. |
३११६९० |
१८-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५४१ |
२. |
३११६९१ |
१८-४-१२ |
९-६-१२ |
१४९१४ |
१५१६९ |
३. |
३११६९२ |
१८-४-१२ |
९-६-१२ |
१४९१४ |
१५१६९ |
४. |
३११६९३ |
१८-४-१२ |
९-६-१२ |
१३७६७ |
१४००२ |
५. |
३११६९४ |
१८-४-१२ |
९-६-१२ |
१३७६७ |
१४००२ |
६. |
३११६९५ |
१८-४-१२ |
९-६-१२ |
१३६६३ |
१३८९७ |
७. |
३११६९६ |
१८-४-१२ |
९-६-१२ |
१८६०४ |
१८९२२ |
८. |
३११६९९ |
१४-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५६७ |
९. |
३११७०० |
१३-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५७३ |
१०. |
३११७०१ |
१३-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५७३ |
११. |
३११७०२ |
१२-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५७९ |
१२. |
३११७०३ |
१२-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५७९ |
१३. |
३११७०४ |
११-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५८६ |
१४. |
३११७०७ |
११-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५८६ |
१५. |
३११७१२ |
११-४-१२ |
९-६-१२ |
१७६३३ |
१७९७५ |
१६. |
३११७१५ |
११-४-१२ |
९-६-१२ |
१७६३३ |
१७९७५ |
१७. |
३११७१६ |
११-४-१२ |
९-६-१२ |
१७६३३ |
१७९७५ |
१८. |
३११७१८ |
११-४-१२ |
९-६-१२ |
१७६३३ |
१७९७५ |
१९. |
३११७२० |
१०-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५९२ |
२०. |
३११७२२ |
१०-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५९२ |
२१. |
३११७२३ |
९-४-१२ |
९-६-१२ |
९११३ |
९२९६ |
२२. |
३११७२४ |
९-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५९८ |
२३. |
३११७२६ |
९-४-१२ |
९-६-१२ |
१६९२५ |
१७२६४ |
२४. |
३११७२७ |
९-४-१२ |
९-६-१२ |
१९२१३ |
१९५९८ |
२५. |
३११७२८ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
२६. |
३११७२९ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
२७. |
३११७३० |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
२८. |
३११७३१ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
२९. |
३११७३२ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३०. |
३११७३४ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३१. |
३११७३५ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३२. |
३११७३६ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३३. |
३११७३८ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३४. |
३११७३७ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३५. |
३११७४० |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३६. |
३११७४२ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३७. |
३११७४३ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३८. |
३११७४५ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
३९. |
३११७४६ |
३१-३-१२ |
९-६-१२ |
१७५०४ |
१७९०७ |
४०. |
३१२२६५ |
२२-४-१२ |
१३-६-१२ |
१८९२२ |
१९२४५ |
४१. |
३१२२६६ |
२२-४-१२ |
१३-६-१२ |
१८९२२ |
१९२४५ |
४२. |
०४६३४९ |
१-७-१२ |
३१-७-१२ |
११५१९ |
१३१४४ |
४३. |
०४६३५१ |
१-७-१२ |
३१-७-१२ |
११५१९ |
१३१४४ |
४४. |
०४६३५२ |
१-७-१२ |
३१-७-१२ |
११३६३ |
१२९६६ |
४५. |
३११७२५ |
९-४-१२ |
९-६-१२ |
१५८९१ |
१६२१० |
एकुण रककम रूपये |
७,८७,१४४/- |
२. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेव पावतींमधील एकूण रक्कम रू.७,८७,१४४/- व्याजासह मिळावी. तसेच मानसिक, शारीरीक त्रासापोटी रू.२,००,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.२५,०००/- सामनेवाला यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ मुदत ठेव पावत्यांच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत.
३. सामनेवाला यांना मे. मंचाची नोटीस मिळूनही मुदतीत हजर झाले नाही. म्हणून सामनेवाला नं.१ ते २६ यांचे विरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे.
४. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विदवान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? आदेशाप्रमाणे
विवेचन
५. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावत्यांच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावत्यांमधील रक्कमा नाकारलेल्या नाही. मुदत ठेव पावत्यांमधील असलेली रक्कम याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
६. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदत ठेव पावत्यांमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला ‘चेअरमन/ व्हाईस चेअरमन/ संचालक/शासन प्रतिनिधी/ जिल्हा बॅंक प्रतिनिधी, प्रियदर्शिनी सहकारी सुत गिरणी म., शिरपुर’ यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे सामनेवाला नं.२ ते २६ यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला नं.१ प्रियदर्शिनी सहकारी सुत गिरणी म., शिरपुर यांचेकडून मुदत ठेव पावत्यांमधील एकूण रक्कम रू.७,८७,१४४/- सदर आदेश तारखे पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दरा प्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्यांमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला नं.१ प्रियदर्शिनी सहकारी सुत गिरणी म., शिरपुर यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदद क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.५- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली सर्व कागदपत्रे व वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला नं.१ प्रियदर्शिनी सहकारी सुत गिरणी म., शिरपुर यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदत ठेव पावतींमध्ये असलेली एकूण देय रक्कम रू.७,८७,१४४/- (अक्षरी रूपये सात लाख सत्यांशी हजार एकशे चौरेचाळीस मात्र) व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.