ग्राहक तक्रार क्र. 145/2013
अर्ज दाखल तारीख : 10/10/2013
अर्ज निकाल तारीख: 05/12/2014
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती राधाबाई बिभिषण गायकवाड (पाटील),
वय-50 वर्षे, धंदा – घरकाम व शेती,
रा.अंबेहोळ, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक श्री. प्रेम शिवदास,
फयूचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
डि.जी.पी. हाऊस, पहिला मजला, 88 सी,
जुना प्रभादेवी रोड, बेंगल केमीकल जवळ, प्रभादेवी, मुंबई-400025.
2. विभागीय प्रमूख श्री. नंदकुमार प्रभाकर देशपांडे,
डेक्कन इन्शुरन्स अॅन्ड रिइन्शूरन्स ब्रोकर्स प्रा. लि.,
औरंगाबाद 6 परखडे निवास, भानुदास नगर, बिग बझार मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद-431001.
3. मे. तालुका कृषी अधिकारी श्री. संजय प्रभाकर जाधव,
तालूका कृषी अधिकारी कार्यालय,
उस्मानाबाद ता. उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य..
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.आर.शिनगारे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : एकतर्फा.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री. मुकुंद बी. सस्ते यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार हे शेतकरी कुटुंबातील असून शेतकरी आहेत. त्यांचे पती नामे विभिषण बलभिम गायकवाड (पाटील) यांच्या नावे अंबेहोळ शिवारात गट क्र. 3 मध्ये क्षेत्र 1 हे. 09 आर एवढी जमीन आहे. हे दि.03/09/2012 रोजी मयत बिभिषण हे जमीन गट क्र. 3 मधील विहिरीवरील विदयुत पंपाचे मोटर चालू करण्यासाठी पत्र्याच्या पेटीतील स्टार्टर चालू करीत असतांना त्यांन विजेचा शॉक लागून जागीच मयत झाले. या घटनेची पो.स्टे. उस्मानाबाद (ग्रामीण) येथे आकस्मात मृत्यू क्र.28/2012 अन्वये करण्यात आली. तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा सर्व कागदपत्रांसहीत विप क्र.3 यांच्याकडे दि.23/01/2013 रोजी दाखल केला. विप क्र.1 यांनी दि.29/07/2013 रोजीच्या पत्राने नामंजूर केला. म्हणून सदरची तक्रार दाखल करणेस भाग पडले म्हणून तक्रारदारास सदरची विमा रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 व्याज दराने मानसिक त्रासापोटी रु.10,000/- तसेच प्रकरणाच्या खर्चापोटी रु.10,000/- विप क्र.1 ते 3 यांच्याकडून देण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत कागदपत्रांची यादीवर गट क्र. 3चा सातबारा उतारा, वसंतदादा नागरी सह. बँक यांचे पासबूक, MSEDCL कंपनी यांचा अहवाल, आयकर ओळखपत्र, पोस्टमार्टम रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, मृत्यूप्रमाणपत्र, मरणोत्तर पंचनामा, शासकीय रुग्णालय यांनी दिलेला अहवाल, आकस्मिक मृत्यूची खबर, पोलीस अहवाल, प्रती उपसंचालक वैज्ञानीक प्रयोगशाळा औरंगाबाद यांचे पत्र ई. कागदपत्रांच्य प्रती दाखल केल्या आहेत.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.04/06/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे.
तक्रारदाराने दावा आवश्यक कागदपत्रासही दाखल केला नाही. दि.20/03/2013, दि.10/05/2013, 06/06/2013 व 24/06/2013 च्या पत्रान्वये लेखी स्वरुपात मागणी केली होती त्याची पुर्तता आवश्यक असतांना तक्रारदाराने केलेली नाही दि.29/07/2013 रोजीच्या पत्रान्वये अपूर्ण कागदपत्रे असल्यामुळे योग्यरित्य नामंजूर केलेला आहे. तक्रारदाराने शवचिकित्सा अहवाल दाखल केला असून त्यानुसार व्हीसेरा रासायनीक पृथ:करणसाठी राखून ठेवण्यात आला आहे. मृत्यूच्या कारणाचा अंतिम अहवालाची कागदपत्रे विपकडे सादर केलेली नाहीत. सदरच्या अपघातात विमा धारकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असून सदर दावा नियम व अटीच्या अधीन राहून फेटाळण्यात आला आहे. तो बरोबर असून सदरची तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी असे नमूद केले आहे.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांना नोटीस पोहोचविण्यासाठी तक्रारदाराने स्टेप्स न घेतल्याने त्याच्या विरोधात दि.26/08/2014 रोजी दावा रदद करण्यात आला.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.3 यांना नोटीस मिळाल्यावर त्यांनी दि.12/11/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते पुढीलप्रमाणे.
सदरचा शेतकरी अपघात विमा प्रस्ताव सन 2012-13 या कालावधीतील असून सदरील विमापसताव खालील कागदोपत्रासह दि.23/01/2013 रोजी दोन प्रति प्राप्त झाला.
सदर दावा दोन प्रतिी विमा प्रस्ताव मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे या कार्यालयाचे पत्रक्रमांक/318/2013 दि.28/01/2013 अन्वये पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात आला आहे. असे नमूद करण्यात आले.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) सदरचा घटना ही अपघात आहे काय ? होय.
3) विरुध्द पक्षकारने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय .
4) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? हेाय.
5) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
मुद्या क्र.1 ते 3 चे विवेचन
5) तक्रारदाराने त्याच्या पतीच्या निधानानंतर महाराष्ट्र शासनाने शेतकरी जनता अपघात विमा संरक्षण मिळण्यासाठी जी पॉलिसी घेतलेली आहे त्या पॉलिसीचा लाभ तीला मिळणे नियमानुसार आवश्यक असतांना तो न मिळाल्यामुळे ही तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात विपने दि.29/07/2013 व 24/06/2013 च्या पाठविलेल्या पत्राचे अवलोकन केले असता अपूर्ण कागदपत्रामुळे दावा बंद करण्यात येत आहे व साक्षांकित केलेला व्हीसेरा रिपोर्ट न मिळाल्यामुळे दावा अमान्य करण्यात येत आहे असे कळविलेले दिसते. याचाच अर्थ त्यांना बाकीचे या व्यतरीक्त सर्व कागदपत्रे मिळालेले आहे व विप क्र.3 च्या म्हणण्यामध्येही ही बाब सांगितलेली आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तक्रारदाराचा मृत्यू हा विजेचा शॉक लागून झालेला आहे. व तशी नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला क्र.28/12 अन्वये करण्यात आलेली आहे. एफ.आय. आर.चे अवलोकन केले असता अ.क्र. 4 मध्ये इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू अशीच नोंद आढळते घटनास्थळाच्या पंचनाम्यातही तशी नोंद आढळते. तथापि मृत्यूचे प्रमाणपत्र हे अंतरीम प्रमाणपत्र दिले असून व्हीसेरा इज प्रिझर्व्ह फॉर केमीकल अनॅलीसीस असा शेरा मारुन केलेले आहे. मरणोत्तर पंचनाम्यामये पोलीस व पंच यांचे प्रेताच्या मरणाबाबत मत हे अनु क्र. 15 वर सांगितलेले असून त्यावरही इलेक्ट्रीकल तारेचा शॉक लागून मयत झाला असावा असे दिले आहे. दि.04/10/2012 रोजी पो. नि. पोलीस ठाणे उस्मानाबाद यांनी 1236/12 अन्वये उपसंचालक ज्ञानवैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडे व्हीसेरा तपासणी होऊन अभीप्राय मिळण्याबाबत विनंती केली आहे तथापि अदयापही मिळालेले नाही असे दिसून येते. त्यामुळे अर्थातच तक्रारदार शेतकर-याकडे तो असणे शक्यच नाही. व ही कागदपत्रे वारंवार त्याला मागणी करण्यात आली आहे. विपला जर सदर कागदपत्राशिवाय विमा मंजूर करणे कायदेशीररित्या अशक्य असल्यास त्याने तो स्वत:ही मागवून घेता आली असती तथापि याच्या व्यतरीक्त तक्रारदाराने सादर केलेले इतर पुरावे हा त्याचा मृत्यू इलेक्ट्रीकल शॉकने झाल्याचे स्पष्ट दर्शवितात व तो अपघातच आहे हे आमचे मत आहे. त्यामूळे तक्रारदाराच्या कस्टडीत नसलेलया व जे तो उपलब्ध परीस्थितीत देऊ शकत नाही त्यामुळे अशा परीस्थितीत तक्रारादाराचा दावा नाकारणे हे त्याला न्याय नाकारण्यासारखेच आहे. तसेच मा. वरीष्ठ न्यायालयाने तांत्रिक बाबींचा आधार घेऊन दावा नाकारु नये असे मत ब-याच ठिकाणी व्यक्त केले आहे. तसेच व्हीसेरा अहवाल हा विषारी पदार्थाच्या परीणामांच्या बाबतीत मत व्यक्त करतो तथापि सदर्भीय दाव्यात अपघात हा इलेक्ट्रीकल शॉकने झाला असल्याने व्हिसेरा अहवालास फारसे महत्व राहत नाही. त्यामुळे तो विमा मिळण्यास पात्र होता असे आमचे मत आहे. विपने दावा नाकारण्या संदर्भात दिलेलया पत्राच्या अनुषंगाने तक्रारदाराने त्याची तक्रार सप्रमाण सिध्द केलेली असल्याने आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1 ने तक्रारदारास शेतकरी अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक
लाख फक्त) द.सा.द.शे. 9 दराने दि.23/01/2013 पासून दयावे.
3) विप क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/-
(रुपये तीन हजार फक्त) दयावे.
4) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
.