जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/53 प्रकरण दाखल तारीख - 10/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 29/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य सुरेखा भ्र.किशन ऊर्फ कृष्णा गायकवाड, वय वर्षे 28, धंदा घरकाम, अर्जदार. रा.मादाळी ता.कंधार जि.नांदेड. ह.मु.वासरी ता.मुखेड जि.नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक, गैरअर्जदार. फिनोमेनल हेल्थकेअर, सर्व्हीस लि, 101, दिव्य स्पुर्ती, टोयाटो शोरुम समोर, लिंकींग रोड, मालाड (पश्चीम) मुंबई 64. 2. व्यवस्थापक, शाखा फिनोमेनल हेल्थकेअर सर्व्हीस लि, 307, 3 रा माळा सन्मान टॉवरवर, तरोडेकर मार्केट समोर, वजिराबाद, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.व्हि.जी.बारसे पाटील. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.प्रवीण आयाचीत. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार फिनोमेनल हेल्थकेअर सर्व्हीस यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारी म्हणतात, अर्जदार ही मयत किशन ऊर्फ कृष्णा गायकवाड यांची विधवा आहे. किशन गायकवाड आपल्या हयातीत फेनॉमेनल हेल्थकेअर सर्व्हीस यांचेकडे विमा क्र.जी.एम.ए. 19202912007 दि.05/12/2007 रोजी विमा उतरविला होता. दर महा रु.625/- प्रमाणे 19 हप्ते एकुण भरल्यानंतर अंतीम अशुअर्ड रक्कम रु.25,000/- विमा धारकास मिळणार होते. विमा धारकाने दि.08/01/2008 ते 25/10/2008 पर्यंत सलग पुर्ण विमा हप्ते गैरअर्जदाराकडे भरले. यात विमाधारक हजर असतांना काही हप्ते व मयत पावल्यानंतर काही हप्ते अर्जदाराने भरले आहे. वैद्यकिय खर्चापोटी अर्जदारांना रु.15,000/- मिळणार होते, पण मयत विमा धारक विमा कालावधीत अपघाताने मरण पावला तर नॉमीनी यांना रु.1,00,000/- देण्याचे गैरअर्जदारांनी कबुल केले होते. मयत किशन हा दि.28/12/2008 ते दि.31/12/2008 पर्यंत डॉ.दि.भा. जोशी रुग्णांलय येथे उपचारासाठी शेरीक होता त्याच्या डोक्यावर परीणाम झाल्यामुळे वेडसरपणा करत होता. यात उपचारासाठी अर्जदारांना रु.25,000/- खर्च आला. दि.08/02/2009 च्या रात्री मयत किशन यांनी वेडसरपणात गळफास घेऊन आत्महत्या केली. विमा धारकाचा मृत्यु हा उपचार चालु असतांना अपघाताने झाला यासाठी पोलिस स्टेशन मुदखेड येथे गुन्हा क्र. 04/2009 नोंद आहे. याबद्यल गैरअर्जदाराकडे अर्जदाराने रु.1,00,000/-, 12 टक्के व्याजाने तसेच उपचाराचे रु.15,000/- ची रक्कम व अशुअर्ड रक्कम रु.25,000/- व मानसिक त्रासा पोटी रु.50,000/- व दावा खर्चापोटी रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत म्हणुन ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांना पॉलिसी मान्य आहे परंतु ती अपघात या मर्यादेपर्यंत मान्य आहे. अर्जदाराने अपुर्ण माहिती दिली व खरी गोष्ट म्हणजे अर्जदार मयताचे अपघती मृत्यु बाबतचा विमा गैरअर्जदारा मार्फत ओरिएंटल इंशुरन्स यांचेकडे उतरविला होता. वैद्यकिय मदत याबाबत अटी व नियमाच्या आधीन राहून वैद्यकिय विमा देण्यात आला होता. यात खरी गोष्ट म्हणजे अर्जदाराचे पती हे पुर्वी पासुनच मानसिक रोगाने पीडीत असल्यामुळे त्यांच्या मनावर परीणाम झाला होता व असे असतांना अर्जदाराने तीच्या मयत पतीच्या वेडसरपणाची माहीती गैरअर्जदारांना दिली नाही किंवा त्यांच्या एजंटला सांगीतले नाही असे करुन अर्जदाराने कंपनीची फसवणुक केली आहे. खोटी माहीती देऊन गैरअर्जदाराकडुन विमा पॉलिसी प्राप्त केली. मयताने वेडसरपणाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर सुध्दा मयताच्या विमा पॉलिसीचा हप्ता भरणे चालुच ठेवले. यामुळे अर्जदाराचा हेतुवर शंका निर्माण होते. अर्जदार हीने केवळ कंपनीकडुन पैसे उकळण्यासाठी ही विमा घेतली ही गोष्ट स्पष्ट होते. मयत किशन यांचा मृत्यु हा अपघाती नसुन तो वेडसरपणात केलेली आत्महत्या आहे व विमा पॉलिसी ही केवळ अपघाती मृत्युबद्यल आहे. अर्जदाराची फिर्याद, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामास, मनोविकार तज्ञ डॉ. जोशी यांचे प्रमाणपत्र हे सर्व पुरावे स्पष्ट दर्शवितात की, मयताचा मृत्यु हा अपघाती नसुन, अर्जदाराने मयताच्या मृत्युनंतर जवळपास दहा महिन्यानंतर दावा दाखल केलेला आहे. अर्जदाराची फियार्द ही खोटी असुन ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 गैरअर्जदारांना पॉलिसी मान्य आहे इतकेच नव्हे तर हप्ते पुर्ण भरल्याचे मान्य आहे. त्यामुळे पॉलिसीबद्यल वाद नाही. अर्जदाराने दाखल केलेले डि.बी.जोशी यांचे प्रमाणपत्र मयत हॉस्पीटलमध्ये चारच दिवस अडमिट होता, त्यांना लिहुन दिलेले औषधी याचे फक्त पाचच बिले या प्रकरणांत दाखल आहे, त्याची किंमत रुपये तीन हजाराच्या आत आहे. दि.09/02/2009 रोजी पोलिस स्टेशन मुदखेड येथे मयत किशन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याबद्यल एफ.आय.आर. दाखल केलेले आहे यानुसार त्याच दिवशी मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पोलिसांनी करुन शवविच्छेदनही केलेला आहे. त्यात मृत्यु हा गळफास लावुन झाला म्हणजे आत्महत्या केली हे स्पष्ट आहे याला अर्जदार देखील नकार देत नाही. दाखल कागदपत्रावरुन हेही सिध्द होते की, मयत किशन हा वेडसर होता व बहुतेक ही बाब लपवुन गैरअर्जदार यांच्याकडुन पॉलिसी घेतल्या गेली यासाठी अधीक स्पष्टता म्हणुन मयत किशन यांच्या मृत्युनंतर म्हणजे दि.08/02/2009 नंतर देखील मृत्युची सुचना गैरअर्जदारांना न देता पॉलिसीचा हप्ता भरणे चालुच ठेवले यावरुन अर्जदाराचा हेतु विषयी शंका निमार्ण होते व गैरअर्जदारांना फसवुन पॉलिसी घेतली ही बाब स्पष्ट होते. अर्जदाराने दि.22/12/2009 ला वकीला मार्फत नोटीस पाठविली यासाठी त्यांनी गैरअर्जदाराकडे मृत्यु क्लेम दाखलच केले नाही. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात क्लेम मागीतला. वैद्यकिय बिलेही अपुरे आहेत. एकंदरीत अर्जदाराची फिर्याद ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी पुराव्यानीशी सिध्द करु शकले नाही व आत्महत्या ही अपघाती मृत्यु नाही. त्यामुळे विमा रक्कम रु.1,00,000/- देय नाही. एकंदरीत सर्व फिर्याद ही बनवाबनबीची आहे व पॉलिसी घेतल्यानंतर अर्ली डेथ क्लेम हे सर्व प्रकरण हे गोलगोल व संशयास्पद आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |