Maharashtra

Nagpur

CC/370/2022

SHRI. VINAY SHASHIKUMAR MAHADULE - Complainant(s)

Versus

MANAGER, PARAMPARA LAWN & BANQUET - Opp.Party(s)

ADV. VILAS N. WANJARI

05 Nov 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/370/2022
( Date of Filing : 24 May 2022 )
 
1. SHRI. VINAY SHASHIKUMAR MAHADULE
R/O. MAHADULE COMPLEX, QUETA COLONY, JUNA BHADARA ROAD, SUBHASH PUTLA, SATRANJIPURA, NAGPUR-440008
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MANAGER, PARAMPARA LAWN & BANQUET
73, S.F.A. BHADARA ROAD, WARDHAMAN NAGAR CHOWK, NAGPUR-440008
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI PRESIDENT
 HON'BLE MR. B.B. CHAUDHARI MEMBER
 
PRESENT:ADV. VILAS N. WANJARI, Advocate for the Complainant 1
 ADV. LINKAN BURDE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 05 Nov 2024
Final Order / Judgement

आदेश

मा.सदस्यश्री. बाळकृष्ण चौधरी यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-2019 च्या कलम 35 नुसार दाखल  केली  आहे.
  2. तक्रारदार यांचे म्हणणे थोडक्यात असे की, विरुध्‍द पक्ष यांचा परंपरा लॉंन अँड बॅक्वेट या नावाने व्यवसाय असून ते नागरिकांना विवाह,साक्षगंध व इतर कार्यक्रमा करिता देवून सेवा देत असतात. तक्रारदाराने त्यांचे भाचीचे दी. 3.05.2021 रोजी ठरलेल्या लग्नाकरिता वि.प.चे लॉन आरक्षीत केला व त्यांकरिता वि.प. यांनी त्या लॉंन चे एक दिवसा करिता रु.3,16,000/- ठरले होते त्यात 500 लोकांचे जेवणसह ठरले होते. तक्रारदाराने वी.प. यांना अॅडव्हान्स म्हणून दी. 07.12.2020 रोजी नगदी रुपये 50,000/- दिले होते त्याबाबत वि.प.ने पावती दिली. महाराष्‍ट्र शासनाने कोव्हीड महामारीमूळे मार्च 2020 या कालावधीपासून  अधिसुचना जारी केल्यामूळे नागपूर महानगरपालीका अंतर्गत लॉन व मंगलकार्यालयात लग्न समारंभ करण्यावर बंदी आणल्याने नोंदणी स्थळी लग्न करता येणे शक्य नव्हते त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला भेटून कोरोनाचा पादुर्भाव कमी होत नसल्या कारणास्तव लग्नाची तारीख ही दिनांक 20.5.2021 ला करण्याचे ठरविले त्यावर वी.प.यांनी होकार दिला. त्यानंतर कोरोंनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत नव्हता म्हणून तक्रारदार हे वी.प. यांना भेटण्याकरिता लॉंन च्या ऑफिस मध्ये गेले असता लॉंन बंद व ऑफिस सुद्धा बंद होते. तक्रारदार हे वी.प यांना वारंवार भेटण्याकरिता प्रयत्न केला परंतु भेट होऊ शकली नाही. तसेच मोबाइल द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर वी.प. यांचे कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.म्हणून निराश होऊन तक्रारदार यांनी नातेवाईकांना सोबत घेवून निर्णय घेऊन  उपरोक्त विवाह हा दी. 28.06.2021 रोजी देशमुख लॉंन येथे संपन्न केला. त्यानंतर वी.प.यांना भेटून नोंदणी रक्कम रुपये 50,000/- परत मागीतले. परंतु वि.प.यांनी संगितले की कुठून तरी बुकिंग आणून द्या तेव्हाच रक्कम परत करू सागितले व अश्या प्रकारे रक्कम परत करण्यास नकार दिला.  .
  3. तक्रारदाराने वि.प.कडुन लग्नकार्याकरिता कोणतीही सेवा घेतली नाही. वि.प. ने रक्कम परत न केल्यामूळे तक्रारदाराने दिनांक 09.07.2021ला लकडगंज पोलीस स्टेशन यांचेकडे तक्रार केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला वकीलामार्फत दिनांक 30.12.2021 ला कायदेशीर नोटीस पाठविली असता वि.प.ने त्यांची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन  वि.प.ने तक्रारदार यांना रक्कम रुपये 80,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याजाची मागणी केली.
  4. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प. यांना आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आली. वि.प.हजर झाले विरुध्‍द पक्ष यांनी आपले बचावात संगितले की, रक्कम परत करण्याचा कोणताही करार नव्हता, म्हणून ती रक्कम परत करता येत नाही. विरुध्‍द पक्ष यांनी बुकिंग प्रमाणे कार्य सुरु केले होते परंतु कोरोना महामारी मुळे वि.प. यांचे सुध्दा नुकसान झाले म्हणूनवि.प. यांनी कोणताही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नाही या कारणाने तक्रारकर्त्याची तक्रार खरीज करावी अशी विनंती आयोगास केली.    
  5. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे वाचन व दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर खालील मुद्दे विचारार्थ आले.

मुद्दे                                                          उत्तर

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                       होय.
  2. वि.प.ने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ?           होय.
  3. काय आदेश  ?                                                                      अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने त्यांचे भाचीचे लग्नाकरिता वि.प.चे लॉन व बॅंकेट हॉल दिनांक 3.05.2021 रोजी ठरलेल्या लग्नाकरिता रुपये 50,000/- देऊन आरक्षीत केल्याचे नि.क्रं.2(1) वर दाखल दस्तऐवजांवरुन स्प्‍ष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. मा. शासन पब्ली‍क हेल्थ डिपार्टमेंट यांची अधिसूचना व मा. आयुक्त महानगर पालीका नागपूर यांचे आदेशान्वये नागपूरातील संबंधीत सभागृह /मंगल कार्यालय/लॉन यां ठिकाणी होणा-या लग्नसमारंभाचे आयोजनास प्रतिबंध घालण्‍यात आले होते. तसेच वि.प. यांनी तक्रारकर्त्याला रक्कम परत करणे क्रमप्राप्त होते. परंतु वि.प. यांनी बुकिंग रक्कम रु. 50,000/- तक्रारकर्त्याला परत केली नाही. तक्रारकर्त्‍याने वी.प. यांचे कडे वारंवार रक्कमेची मागणी केली असता वी.प. यांनी रक्कम देण्‍यास टाळाटाळ केली यावरून प्रत्‍यक्ष कोणतीही सेवा न देता तसेच हॉल बुकिंग पोटी घेतलेली रक्‍कम कोणतेही सबळ कारण नसतांना तक्रारकर्त्‍याला परत करण्‍यास नकार देणे ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते असे आयोगाचे मत आहे. तक्रारकर्ता व वि.प. यांचेमधील करार अस्तीत्वात आला नाही त्यामूळे तक्रारकर्ता वि.प.कडुन लग्नसमारंभाकरिता लॉनचे   आरक्षणापोटी जमा केलेली रक्कम परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे.

सबब आदेश खालीलप्रमाणे……

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारदाराला लग्नसमारंभाकरिता लॉनचे  आरक्षणापोटी स्व‍िकारलेली रक्कम रुपये 50,000/- परत करावी. तसेच सदर रक्कमेवर रक्कम जमा केल्याचे दिनांक 07.12.2020 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजदाराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेता येणारी रक्कम अदा करावी.
  3. वि.प.ने तक्रारदाराला शारिरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 5,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेश पारित दिनांकापासून ४५  दिवसाचे आत करावी.
  5. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. B.B. CHAUDHARI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.