ग्राहक तक्रार क्र. 30/2013
अर्ज दाखल तारीख : 07/02/2013
अर्ज निकाल तारीख: 04/01/2014
कालावधी: 0 वर्षे 10 महिने 28 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सौ.पदमीनबाई मधुकर खराडे,
वय-55 वर्षे, धंदा – घरकाम व व्यापार,
रा.सेलू, ता.वाशी, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. विभागीय व्यवस्थापक,
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
विभागीय कार्यालय, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर,
व्दारा-व्यवस्थापक,
श्री.देशभुषण विठठलराव कंदले,
वय सज्ञान, धंदा- व्यवस्थापक,
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
शाखा सिव्हील हॉस्पिटल रोड,
मारवाड गल्ली, उ.बाद., ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा. श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
२) मा.श्री.मुंकूद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एन.एल.जकाते.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.पी.पी.देवळे.
निकालपत्र
मा.सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार ही मौजे सेलू, ता. वाशी, जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असून तिचे नावे एम.एच.क्र.25-एच-1951 टाफे फर्ग्युसन ट्रॅक्टरची व एम.एच.क्र.1201 या ट्रेलर आहे. अर्जदाराने विरुध्द पक्षकार यांच्याकडे सदर ट्रॅक्टर ट्रेलरचा पॅकेज विमा दि.13/07/2012 रोजी काढलेला आहे सदर पॅकेज पॉलिसी नं.161990/47/2013/138 असून सदर पॉलिसीची मुदत दि.14/07/2012 ते 13/07/2013 अशी आहे.
1.2) नमूद ट्रॅक्टर टेलरची एकूण रु.6,749/- विमा रक्कम जमा केलेली आहे. त्यामुळे अर्जदार ही विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक आहे. सदर पॅलिसीमध्ये ट्रॅक्टर बेसिक (own damage) ओ.डी.रु.3,65,000/- व ट्रेलर बेसिक (own damage) ओ.डी.रु.50,000/- यासाठी विमा रक्कम जमा केलेली आहे.
1.3) दि.16/08/2012 रोजी सदर ट्रॅक्टर व त्यावरील ड्रायव्हर नामे नानासाहेब फावडे हा सदर ट्रॅक्टर मलकापूर शिवारातून घेवून जात असतांना रस्त्याच्या परिस्थितीमुळे अचानक ब्रेक दाबल्याने ट्रॅक्टर रोडचे खाली उजव्या बाजूस शेत गट नं.26 मधील पडीक डोंगर जमिनीत गेले व प्रयत्न करुन रोडवर आणत असतांना ट्रॅक्टर क्र.एम.एच.25/एच-1951 चे हेड उचलल्याने पलटी झाले व सदर ड्रायव्हर मयत झाला व ट्रॅक्टर हेडचे रु.2,00,000/- चे नुकसान झाले. त्याबाबत पोलीस स्टेशन, येरमाळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद, येथे प्रथम अकस्मात मृत्यू नंबर20/2012 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे नोंद झाली असून त्यानंतर गु.र.नं.117/2012 अन्वये कलम 279,427,304(अ) अन्वये ड्रायव्हर विरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. सदर ड्रायव्हरकडे ट्रॅक्टर चालविण्याचा विहित परवाना होता. विरुध्द पक्षकार चे सर्व्हेअर श्री.ए.टी.कुलकर्णी यांनी घटनास्थळावर येवून सदर ट्रॅक्टरच्या नुकसानीचा सर्व्हे केला व त्यांनतर विरुध्द पक्षकारचे सांगण्याप्रमाणे सदर ट्रॅक्टर शिवानी ट्रॅक्टर्स, औरंगाबाद रोड येथे दुरुस्ती केला. सदर दुरुस्तीकरीता तक्रारदारास रु.2,52,650/- खर्च आला. अर्जदाराने विमाक्लेम सर्व आवश्यक कागदपत्रांसह विरुध्द पक्षकार यांच्याकडे दाखल केला. दि.22/11/2012 रोजी क्लेम मधील त्रुटी पुर्ण केल्या.
1.4) विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास दि.22/01/2013 रोजी दावा नाकारल्याचे लेखी पत्र देऊन कळविले आहे. अर्जदाराचे ट्रॅक्टर नं.एम.एच.25-एच-1951 च्या झालेल्या बेसिक ओ.डी.च्या नुकसान भरपाईसाठी रु.2,60,000/- दि.16/08/2012 रोजी पासून 12 टक्के व्याज दराने, झालेल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांना देण्याचा हुकुम व्हावा.
तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टयार्थ ट्रॅक्टर फोटो एकूण-3, दावा नाकारलेचे पत्र, मोटर दावा फॉर्म, विमा कंपनीस दिलेला अर्ज, शिवानी टॅक्टर उ.बाद यांचे बीले / इन्व्हाईस, विमा पॉलीसी कव्हर नोट, विमा पॉलीसी कव्हर नोट, ट्रॅक्टर नं.एम.एच.25.एच-1951 आरसी बुक, ड्रायव्हींग लायसेंस, एफआयआर, घटनास्थळ पंचनामा इ.
2) गैरअर्जदाराने आपले म्हणणे दि.11/06/2012 रोजी दाखल केले व त्यानुसार तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे ट्रॅक्टर हेडचे रु.2,60,000/- चे नुकसान झाले हे मान्य नाही. तसेच घटनेच्या वेळेसे टॅक्टर चालक नानासाहेब फावडे यांच्याकडे ट्रॅक्टर व ट्रेलर हे दोन्ही एकत्र वाहन चालविण्याचा विहित परवाना नव्हता. विरुध्द पक्षकारातर्फे सर्वेअर ए.टी.कुलकर्णी यांनी घटनास्थळावर जावून ट्रॅक्टरच्या नुकसानीबाबत सर्वे केला व ट्रॅक्टर दुरुस्ती करण्यास सांगितले तसेच विरुध्द पक्षकार यांच्या सांगण्यावरुन अर्जदाराने सदरचा ट्रॅक्टर शिवानी ट्रॅक्टर्स उस्मानाबाद यांच्याकडे दुरुस्तीस घेऊन आले, सदरच्या वाहनाच्या दुरुस्तीस तक्रारदारास रु.2,52,650/-चा खर्च आला, अर्जदाराने संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता केली वगैरे मजकूर खोटा असुन मान्य नाही. सर्व्हेअर यांनी दि.25/09/2012 रोजी ट्रॅक्टरचा अंतीम सर्वे करण्यापुर्वीच ट्रॅक्टर खोलण्यात आला होता. सर्व्हेअरने सर्व्हे करुन अहवाल दि.21/10/2012 रोजी सादर केला आहे त्यानुसार ट्रॉक्टरचा खर्च रु.91,604,374/- एवढा नमुद केलेला आहे. तक्रारदारास क्लेम नाकारल्याचे पत्र दिल्यानंतर दोन आठवडयात तक्रारदारास विरुध्द पक्षकार यांना स्पष्टीकरण देणे जरुरीचे असतांना कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज व्हावी व विरुध्द पक्षकार यांचा खर्च तक्रारदाराकडून द्यावा असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद व तोंडी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार हे विरुध्द पक्षकार यांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2) तक्रार या न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात येते काय ? होय.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांना देण्यात येणा-या
सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
5) मुद्या क्र.1 चे उत्तर:
तक्रारदाराने विरुध्द पक्षकार यांचेकडून विमा घेतलेला असून विरुध्द पक्षकार यांची शाखा उस्मानाबाद येथे असून त्याव्दारे सदरच्या संस्थेचे काम चालते. त्यामुळे विरुध्द पक्षकार किंवा त्यांची शाखा या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे या मंचास सदरची तक्रार चालवण्याचे अधिकार आहे.
2) मुद्या क्र.2 चे उत्तर:
तक्रारदाराने विरुध्द पक्षकार यांचेकडून त्यांचा वाहन विमा उतरविलेला होता. तक्रारदाराने ट्रॅक्टर एम.एच.क्र.25-एच-1951 व एम.एच.क्र.1201 या ट्रेलरचा पॅकेज विमा दि.13/07/2012 रोजी काढलेला होता. सदर पॉलीसीची मुदत दि.15/07/2012 ते 14/07/2013 असा होता परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या तकारीत दि.14/07/2012 ते 13/07/2013 असा आहे. शपथपत्रात सदर पॉलीसीमध्ये त्यांनी ट्रॅक्टर ट्रेलरच्या प्रिमीयम पोटी रु.7,749/- भरलेले असून सदर ट्रॅक्टर बेसीक (own damage) रु.3,65,000/- व ट्रेलर बेसीक (own damage) रु.50,000/- यासाठी विमा रक्कम जमा केलेली आहे. दि.16/08/2012 रोजी झालेल्या अपघातामध्ये ट्रॅक्टर रोडच्या खाली पडून हेड पलटी झाला. या अपघातामध्ये ड्रायव्हर नामे नानासाहेब फावडे हे मयत झाले. या संदर्भात गुन्हा क्र.117/12 नुसार ड्रायव्हर विरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे व सदर घटना घडल्यानंतर तक्रारदाराने विरुध्द पक्षकार यांना घटनेची माहीती दिली व सर्व्हेअर म्हणुन श्री.ए.टी. कुलकर्णी यांनी घटना स्थळावर येवून सदर ट्रॅक्टरचा सर्व्हे केला व सदर ट्रॅक्टर दुरुस्त करण्याबाबत सांगीतल्याबाबत जरी विरुध्द पक्षकार यांनी अमान्य केले असले तरी श्री.ए. टी. कुलकर्णी यांचे स्वतंत्र शपथपत्र सदरच्याबाबत अमान्य करण्यात आलेले नाही. उलटपक्षी दि.16/08/2012 रोजी एम.एच25 एच 1951 हा ट्रॅक्टर स्पॉट सर्व्हे करण्याचे काम मला दिले होते व सदरचे काम पुर्ण करुन दि.25/09/2012 रोजी देण्यात आलेले होते असे त्यांचे म्हणणे आहे. मग असा पश्न निर्माण होतो की सदरच्या वाहनाचा सर्व्हे कोणी केला किंवा केला की नाही. तसेच श्री.मंगरुळे आणखी एक सर्व्हेअर यांनी मध्यंतरीचा काळात सर्व्हे केल्याचे रेकॉर्ड दिसुन येते ते दि.19/08/2012 रोजीचे आहे. म्हणून त्या दिवशी सदर वाहनाचा स्पॉट सर्व्हे झालेला होता आणी त्यामध्ये रीमार्कच्या कॉलममध्ये श्री. मंगरुळे यांनी विरुध्द पक्षकार यांच्या सांगण्यावरुन सदरचा स्पॅाट सर्व्हे केला आहे असे स्पष्टपणे म्हंटलेले आहे. सदरचा सर्व्हे रिपोर्टस रेकॉर्डवर दाखल आहे. त्यामुळे श्री.ए. टी.कुलकर्णी यांनी मी फायनल सर्व्हे करण्याच्या वेळेस ट्रॅक्टर संपुर्ण उकललेल्या अवस्थेत होता हा मुद्या व्यक्त करणे अनावश्यक व अवाजवी वाटते व त्यामुळे एकूण तक्रारदारीच्या स्वरुपात कोणताही बदल संभवत नाही व त्याकारण तक्रारदाराची तक्रार किंवा क्लेम नाकारण्याचे कारण आम्हास आढळून येत नाही. तसेच विरुध्द पक्षकार कंपनीने वाहन चालकाचा वाहन परवान्याविषयी उपस्थीत केलेला म़ूद्या योग्य आहे किंवा नाही या संदर्भात कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.16/09/2010 ते 15/09/2013 पर्यंत सदर ट्रॉक्टरचालकाचा वाहन परवाना वैध व मुदतीत होता असे निष्कर्ष निघतो. या संदर्भात विरुध्द पक्षकार यांनी जे नोंदविलेले आक्षेप आहे ते कायदेशीर कसोटीवर टीकत नाहीत. याउलट तक्रारदाराने मा. वरीष्ठ न्यायालयात दाखले सोबत जोडलेले आहेत. त्यामध्ये मा. सर्वेच्य न्यायालयाचे नागशेटटी विरुध्द युनायटेड इंडीया दि.18/07/2001 रोजीचा निकाल त्यामध्ये न्यायनिर्णय असा नोंदविलेला आहे की. ट्रेलरसाठी जर वेगळा प्रिमीयम घेतला तर इंन्शुरंन्स कंपनीने ट्रॅक्टर व ट्रेलर यांचे दोन्हीचे नुकसानीची जबाबदारी आहे. तसेच 2013 AAC 2217 (AP) New India Insurance company versus M.A.C.M.A.No.3250 of 2011 यामध्ये चालकाच्या वाहन परवान्याविषयी मत स्पष्ट केले आहे. (A ) Motor Vehicles act(59 of 1088) S. 149-Liability of insurance company- Breach of insurance policy- Driver of offending vehicle held driving licence to drive non-transport variety of tractors- Licence to drive tractor automatically implies licence to drive transport vehicle –admittedly there was no endorsement on licence permitting driver of tractor to drive transport vehicles but there was no bar to driver to drive transport vehicles- absence of endorsement was technical shortfall- Driving licence to drive non- transport variety of tractors is no different from driving licence to drive transport variety of tractors as there is no difference in skill to drive both- driver holding valid and effective driving licence- Insurer liable to pay compensation.
यानुसार आमच्या सदर व्ड्रायव्हरचे लायसेंन्स वैध व विहीत कालावधीकरीता होते या आमच्या निष्कर्षास पुष्टी देणारे आहे. म्हणुन विमा कपंनीने दि.17/08/2012 रोजी तक्रारदाराचा क्लेम नाकारल्याने तक्रारदारास त्याच्या कायदेशीर हक्का पासुन दुर ठेवण्याचेच प्रयत्न आहे. त्यामुळे तक्रारदाराचे कायदेशीर दायीत्वाची पुर्तता करणे हे विरुध्द पक्षकार यांची जबाबदारी आहे व ती न पार पाडल्यामुळे त्यांनी निश्चीतपणे सेवेत त्रुटी केली आहे असे म्हणता येईल. बाकी तक्रारदाराची मागणी संदर्भात निरपेक्ष भावनेने विचार केला असता तक्रारदाराची मागणी आहे तशी मान्य करता येण्यासारखे नाही. एकूण तक्रारदाराने रु.2,52,600/-ची नुकसान भपाईची मागणी केलेली आहे त्याकरीता पावत्या सोबत जोडलेल्या आहेत त्याव्यतरीक्त मानसीक, शारीरिक, आर्थीक त्रासापोटी रु.20,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- वर पैकी सर्व्हेअरने असेसमेंट केलेले. दि.21/10/2012 रोजी सर्व्हेअर श्री. ए.टी. कुलकर्णी यांनी समरी असेसमेंटवर नमुद केलेला रु.91,604.34 खर्च अमान्य करण्यासाठी आमच्याजवळ कोणताही सबळ कारण नाही कारण इस्टीमेट कॉस्ट रु.2,41,706.55 या रक्कमेपैकी त्यांनी फक्त रु.1,27,387.05 रु.14,200/- रक्कम देणे मान्य केलेले आहे. असेसमेंट व त्यातुन दि.18/12/2012 च्या रि-इंन्सपेक्शन रिपोर्ट नुसार रु.97,250/- एवढी रक्कम बील चेक रिपोर्ट विरुध्द पक्षकाराकडे पाठविले आहे. त्यामध्ये रु.9,401.70 स्पेअपार्टसचे रु.4,700/- असे दाखविलेले आहे. तसेच रु.14,600/- चे 35 टक्के डिप्रीसीएशन दाखवून रु.11,000/- एवढे केले आहे. सॅव्हलेज रु.3,512/- वजा केले आहे. यामध्ये सदर ट्रॅक्टरचा दि.13/07/2012 रोजी इन्शुरंन्स झालेला आहे व त्याच वर्षात (2012-13) अपघात झालेला आहे तरीही ट्रॅक्टरचे डिप्रीसीएशन 35 ते 50 टक्के एवढा दाखविला आहे ते न्यायोचीत वाटत नाहीत तर न्यायविसंगत वाटतो. त्यामुळे सदरचे डिप्रीसेएशन हे मान्य करता येणार नाही व ती रक्कम विरुध्द पक्षकार यांना वजा करता येणार नाही म्हणून विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांना 9401+116940+12700+1500+4150 = रु.1,44,691/- एवढी रक्कम देणे योग्य राहील. तसेच, वाहन वाहतुकीसाठी (टोचनसाटी) दाखल असेलेले 371 नंबरचे बील ज्यावर तारीख नाही व स्टॅम्प तिकीटही नाही तेही रु.12,600/- एवढया रक्कमेचे आहे ते योग्य वाटत नाही त्यामुळे योग्य व्यावसायीक व व्यवहारीक न्याय निकषावर विचार करता मलकापुर ते उस्मानाबाद हे अंतर 30 ते 35 की.मी. एवढे आहे व त्याकरीता म्हणजे 70 की.मी. करीता ते रु.7,000/- एवढे टोचन करीताचे बील असणे अपेक्षीत आहे. पैकी रु.1,500/- अगोदरच final survey मध्ये घेतलेले आहे. त्यामुळे त्यामुळे रु.7,000/- वजा रु.1,500/- = रु.5,500/- ही रक्कमही तक्रारदारास देणे संयुक्तीक आहे. म्हणून केले आदेश.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांना विम्या पोटी नुकसान भरपाई एकूण
रक्कम रु.1,50,191/- (रुपये एकलाख पंन्नास हजार ऐकशे एक्यान्नऊ फक्त) द्यावी.
वरील रक्कम विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांना तक्रार दाखल तारखेपासून
रक्कम देय होईपर्यंत व्याज 9 टक्के द.सा.द.शे. दराने अदा करावी.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च रु.5,000/-(रुपये पाच हजार
फक्त) व मानसीक, शारीरिक त्रासापोटी रु.2,000/-(रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्रीमती ए.जी.सातपुते) (श्री.मुकूंद.बी.सस्ते)
अध्यक्ष सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.