Maharashtra

Nashik

CC/218/2011

Smt. Aruna Narayan Borade - Complainant(s)

Versus

Manager Oriental Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

Shri Keshav Shelke

12 Apr 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/218/2011
 
1. Smt. Aruna Narayan Borade
R/o Andersul,Tal.Yeola,Nashik
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager Oriental Insurance Co.Ltd
Plot No2,8 1st floor Hindustan colony near Ajni chowk Vardha Rd. Nagpur 440015
Nagpur
Maharashtra
2. Manager Kabal Jenral Insurance Servises Pvt.Ltd
4/A Dehmandir Co Opp Hsg Society
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Shri Keshav Shelke, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.अध्‍यक्ष, श्री.आर.एस.पैलवान  यांनी  निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र

 

      अर्जदार यांचे पती कै.नारायण नामदेव बोराडे हे दि.04/05/2010 रोजी मोटारसायकलवर पाठीमागे बसून जात असतांना मोटारसायकल झाडावर आदळून झालेल्‍या अपघातात जखमी होवून दि.05/05/2010 रोजी निधन झाले. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक् रु.1,00,000/- व त्‍यावर जुलै 2010 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक, शारिरीक आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.                                                     

         सामनेवाले क्र.2 तर्फे पोष्टाने प्राप्‍त जबाब पान क्र.18 लगत दाखल आहे. सामनेवाला क्र.1 यांचा जबाब पान क्र.28 लगत  व प्रतिज्ञापत्र पान क्र.29 लगत दाखल केलेले आहे.

अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्णणे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्र  त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

 

मुद्देः

 

1.    अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.    सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? --   होय.

     सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.

3.    अर्जदार हे सामनेवाले क्र.1 यांचेकडून विमा क्लेमची रक् व्याजासह मिळण्या

     पात्र आहेत काय? -- होय

4.    अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी अर्जाचे खर्चाची रक्

     मिळणेस पात्र आहेत काय? -- होय

5.    अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज  सामनेवाले क्र.2 विरुध्‍द नामंजूर

     करणेत येत आहे सामनेवाले क्र.1 विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे. 

  

विवेचनः

 

याकामी अर्जदार यांचेतर्फे अँड.के.एस.शेळके यांनी युक्‍तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांनी पान क्र.37 लगत लेखी युक्‍तीवाद सादर केलेला आहे.        

      महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.12/08/2009 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्‍तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/08/2009 ते दि.14/08/2010 असा होता.  सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ता स्विकारलेला आहे.  

सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्णणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यांचेमध्‍ये सामनेवालेची भुमिका अत्‍यंत जुजबी आहे, यामध्‍ये शेतक-यांचा विमा दावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्पणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे, त्‍यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज्‍य शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद  आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्‍द नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्‍तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही  शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान्‍य केलेली आहे. अर्जदार हया मयत कै.नारायण नामदेव बोराडे यांच्‍या पत्‍नी आहेत ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्णणे त्यामधील कथनावरुन अर्जदार हया कै.नारायण नामदेव बोराडे यांचे वारस म्णून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये घेतलेल्‍या बचावामध्‍ये, अर्जदार यांचा विमाक्‍लेम दि.11/4/2011 रोजी सामनेवाला यांना मिळालेला आहे. अर्जदार यांनी विमा क्‍लेम मुदतीत दाखल केलेला नाही. शासन व सामनेवाला यांच्‍यात ठरलेल्‍या करारानुसार सदरील क्‍लेम हा विमा पॉलिसीचे अवधीत किंवा तो अवधी संपल्‍यानंतर 90 दिवसांचे आत करणे बंधनकारक होते. अशा परिस्थितीत सेवा देण्‍यात कोणताही कसूर केलेला नाही. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा, असे नमूद केलेले आहे.

      याबाबत सामनेवाला यांनी असा बचाव घेतला आहे की, क्‍लेम मुदतीत दाखल केलेला नाही. परंतु उशिरा कागदपत्रे सादर केली किंवा वेळेत कागदपत्रांची पूर्तता केली नाही केवळ या कारणाखाली सामनेवाले यांना क्‍लेम नाकारता येत नाही.

       महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकातील कलम 6 मध्‍ये विमा सल्‍लागार, शासन व विमा कंपन्‍या यामधील त्रिपक्षीय करार अथवा विमा पॉलिसीमध्‍ये काहीही नमूद असले तरी या शासन निर्णयामधील नमूद अटी शर्ती व मार्गदर्शक सुचना विमा सल्‍लागार व विमा कंपन्‍यांना बंधनकारक असतील. त्‍यानंतर कलम 19 क (2) शेतक-यांचा विमा प्रस्‍ताव विहीत कागदपत्रासह विमा योजनेच्‍या कालावधीत केंव्‍हाही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे संबंधीत विमा कंपनीला बंधनकारक राहील. अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्‍यापासून 90 दिवसांपर्यंत विमा प्रस्‍ताव स्विकारण्‍यात ये‍तील. समर्थनीय कारणास्‍तव 90 दिवसानंतर प्राप्‍त दावे स्विकारण्‍यात यावेत. असे नमूद आहे. सदर कलमांचा विचार होता विमा प्रस्‍ताव दाखल करण्‍यास उशीर झाला असला तरी समर्थनीय कारण असल्‍यास सामनेवाला यांनी क्‍लेम स्विकारणे आवश्‍यक आहे. याबाबत शासन समितीचा निर्णय लक्षात घेणे आवश्‍यक आहे. मा.आयुक्‍त कृषी,महाराष्‍ट्र राज्‍य,पुणे यांचे अध्‍यक्षतेखाली नियुक्‍त वाद विवाद निवारण समिती च्‍या दि.16/2/2006 चे बैठकीत उशिरा प्रस्‍ताव सादर केला या कारणास्‍तव प्रस्‍ताव नाकारण्‍यात येऊ नये, असा निर्णय घेतलेला आहे.  याचा विचार होता सामनेवाले यांना उशिरा प्रस्‍ताव दाखल केला या कारणाखाली क्‍लेम नाकारता येणार नाही.

      अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी येवला यांचेकडे जुलै 2010 मध्‍ये सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन प्रस्‍ताव सादर केल्‍याबाबत अर्ज कलम 5 मध्‍ये नमूद केलेले आहे. यावरुन  अर्जदार यांनी पॉलिसी कालावधीत प्रस्‍ताव सादर केलेला असल्‍याचे दिसत आहे.  सामनेवाले यांनी केवळ तांत्रीक बाबीचा आधार घेतलेला दिसत असल्‍यामुळे त्‍यांनी वर घेतलेल्‍या बचावात काही तथ्‍य नाही.

अर्जदाराने पान क्र.13 लगत 7/12 उतारा, पान क्र.14 लगत फेरफार नोंदवहीचे पान व  पान क्र.15 लगत हक्‍काचे पत्रक गा.नं.6 च्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केलेल्‍या आहेत. यावरील नोंद पाहता मयत  कै.नारायण बोराडे हे अपघाताचेवेळी व विमा कराराचेवेळी शेतकरी होते असे स्‍पष्‍ट होत आहे.

      शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकानुसार शेती व्‍यवसाय करतांना होणारे रस्‍त्‍यावरील अपघात, विज पडणे, पूर,सर्पदंश इ. नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अपघात किंवा अन्‍य कोणतेही अपघात यामुळे शेतक-यांना मृत्‍यू किंवा

अपंगत्‍व ओढवल्‍यास अपघातग्रस्‍त कुटुंबास आर्थिक लाभ देण्‍याकरीता सदरची विमा योजना केलेली आहे. याचा विचार होता अर्जदार यांना सदर विमा पॉलिसीचा आर्थिक लाभ होणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. पोलिस कागदपत्रांप्रमाणे व परिपत्रकातील कलमाप्रमाणे सामनेवाले यांच्‍या विमा करारातील अटी शर्थींचा भंग होत नाही असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांना अर्जदार यांचा क्‍लेम अद्यापपावेतो न देवून सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे तसेच अर्जदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे विचारात घेतली असता शेतकरी अपघात विमा योजनेनुसार शेतक-याचा मृत्‍यू झाल्‍यास रु.1,00,000/-ची विमा जोखीम घेण्‍यात आली,  दावा रकमेवर व्‍याज मिळणेस अर्जदार हे पात्र आहेत. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/- व या रकमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून म्‍हणजेच

दि.26/09/2011 पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.अर्जदार यांनी सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी व खर्चाचे रकमेची मागणी केलेली आहे.  वास्‍तविक वर उल्‍लेख केलेल्‍या महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकानुसार सामनेवाले यांनी कोणत्‍याही तांत्रिक बाबींचा आधार न घेता अर्जदाराचा विमा क्‍लेम योग्‍य त्‍या वेळेत मंजूर करणे गरजेचे होते.  विमा क्‍लेमची रु.1,00,000/- इतकी मोठी रक्‍कम अर्जदार यांना योग्‍य वेळेत मिळालेली नाही.  विमा क्‍लेमची रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्जदार यांना सामनेवालेकडून या मंचात दाद  मागावी लागलेली आहे. वरील कारणांमुळे निश्चितपणे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍यास खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

याकामी मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेणेत आलेला आहेः

1. 2010(2)Mh.L.J  उच्‍च न्‍यायालय, मुंबई. पान 880, शकुंतला धोंडीराम मुंडे   

   विरुध्‍द  स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र व इतर

2. मा.राज्‍य आयोग मुंबई यांचेकडील प्रथम अपील क्र.1384/2008. निकाल तारीख   

   06/03/2009. योगिता मच्‍छींद्र बहीरट  विरुध्‍द  महाराष्‍ट्र शासन व

   आय.सी.आय.सी.आय.लोम्‍बार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कं.

वरील निकालपत्रांत शेतकरी अपघात विमा योजनेबाबत विचार करुन निर्णय देण्‍यात आलेला आहे.  यामुळे या निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.

अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्‍तीवाद तसेच सामनेवाले क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वर उल्‍लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्‍ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

 

                                              आ दे श

 

1)        अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

2)        अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.   

 

 3)        आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदारास खालीलप्रमाणे रक्‍कम दयावीः

अ.          विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/-व या रकमेवर दि.26/09/2011

    पासून द.सा.द.शे. 12% दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज दयावे.

ब.  मानसिक त्रासापोटी रु.5,000/- दयावेत.

क.  अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.