ग्राहक तक्रार अर्ज क्र.256/2011
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.23/11/2011
अंतीम आदेश दि.27/02/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्रीमती मिराबाई साहेबराव शिंदे तक्रारदार
रा.नांर्दुटेक,ता.चांदवड,जि.नाशिक (अँड.डी.पी.शिंदे)
विरुध्द
1. शाखाधिकारी, सामनेवाला
ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि., (अँड.आर.आर.सुराणा)
आय टी आय सिग्नलजवळ,
उद्योग भवन, सातपूर, नाशिक.
2. शाखाधिकारी,
4/ए, देहमंदीर को.ऑप.हौसिंग सोसायटी,
श्रीरंगनगर, पंपीग स्टेशन रोड,
गंगापूर रोड, नाशिक.422002.
(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांचे पती कै.साहेबराव महादु शिंदे यांचा दि.30/12/2009 रोजी रस्ता वाहन अपघातात मृत्यु झाला. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ न दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- दि.01/09/2010 पासून 18% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रार क्र.256/2011
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा जबाब पान क्र.24 लगत व प्रतिज्ञापत्र पान क्र.25 लगत दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा जबाब पोष्टाद्वारे पाठवला असून तो पान क्र.19 लगत दाखल केलेला आहे.
अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे व त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -- होय.
सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.
3. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व्याजासह
मिळण्यास पात्र आहेत काय? -- होय
4. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? -- होय
5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर
करणेत येत आहे व सामनेवाले क्र.1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.डि.पी.शिंदे यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामेनवाला यांनी पान क्र.34 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.12/8/2009 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/8/2009 ते दि.14/8/2010 असा होता. सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजना स्विकारलेली आहे.
तक्रार क्र.256/2011
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमा दावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज्य शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद आहे. याचा
विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार हया मयत कै.साहेबराव महादु शिंदे यांच्या पत्नी आहेत ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व त्यामधील कथनावरुन अर्जदार हे कै.साहेबराव महादु शिंदे यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये घेतलेल्या बचावामध्ये, “सामनेवाला यांनी अर्जदाराकडून कागदपत्रांची पुर्तता करण्यास दि.14/02/2011, दि.28/02/2011 व दि.14/03/2011 चे पत्राने सांगितलेले आहे. सदर क्लेम हा पॉलिसी अवधीत किंवा अवधी संपल्यानंतर 90 दिवसाचे आत सादर करणे बंधनकारक होते. परंतु अर्जदार यांनी 7/12 उतारा या कागदपत्राची पुर्तता केलेली नाही. पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. त्यामुळे सदरची क्लेमफाईल बंद केलेली आहे. सामनेवाला यांनी सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा.” असे नमूद केलेले आहे.
अर्जदार यांनी अपघाताचेबाबत पोलिसांकडील कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या कागदपत्रांमध्ये पान क्र.7 लगत फिर्याद यामध्ये कै.साहेबराव महादु शिंदे यांचा मोटारसायकलने जात असतांना अपघात होवून मृत्यु झाला असल्याचे नमूद आहे. त्याबाबतचा मयताचा पोष्ट मार्टेम रिपोर्ट पान क्र.10 लगत दाखल केलेला आहे.
तक्रार क्र.256/2011
त्यामध्ये मयताचा मृत्यु Shock due to head injury ने झालेला आहे असे नमूद आहे. यावरुन मयताचा मृत्यु हा अपघाताने झाला असे स्पष्ट होत आहे.
परंतु याबाबत सामनेवाले यांनी, असा बचाव घेतला आहे की, अर्जदाराकडून 7/12 या कागदपत्रांची पुर्तता पत्राने मागणी करुनही केलेली नाही. सदर क्लेममध्ये महत्वाची कागदपत्रे सामनेवाला यांना मिळाली नाही त्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे.
याबाबत शासन परिपत्रकाप्रमाणे अर्जदाराने विमाक्लेमचा प्रस्ताव संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करुन त्यांनी तो सामनेवाला क्र.2 कबाल इन्शुरन्स कंपनी यांचेकडे देवून त्यांनी तो प्रस्ताव सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे द्यावयाचा आहे. अर्जदार यांनी स्वतंत्रपणे विमा कंपनीकडे प्रस्ताव करावयाची आवश्यकता नाही. विमा कंपनीस कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास त्यांनी सदर कागदपत्रे कबाल इन्शुरन्स सर्व्हीस कंपनीकडे मागणी करावयाची आहे. त्यानंतर कबाल इन्शुरन्स सर्व्हीसने आवश्यक ती कागदपत्रे संबंधीत तहसिलदार यांचेकडे मागणी करावयाची आहेत. संबंधीत तहसिलदार यांनी त्याबाबतची पुर्तता करावयाची आहे. याबाबत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार पान क्र.3 कलम 10 यामध्ये शासन निर्णयासोबत नमूद केलेली कागदपत्र शेतक-याने स्वतंत्रपणे सादर करण्याची आवश्यकता नाही. विमा प्रस्तावासंदर्भात काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही कागदपत्रे सादर करावयाची राहिल्यास पर्यायी कागदपत्रे किंवा चौकशीच्या आधारे प्रस्तावाचा निर्णय घेण्यात यावा असे नमूद आहे. वरील मुद्यांचा विचार होता, सामनेवाला यांनी कबाल इन्शुरन्स सर्व्हीस यांचेकडे मागणी केलेली आहे तसेच कबाल इन्शुरन्स सर्व्हीस यांनी संबंधीत तहसिलदार यांचेकडे मागणी केलेली आहे याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही त्याचप्रमाणे सामनेवाला यांना आवश्यक असलेला 7/12 उतारा हे कागदपत्र संबंधीत तहसिलदार कार्यालय हे योग्य असे कार्यालय आहे की ज्यामार्फत आवश्यक असलेले कागदपत्रे सहजपणे उपलब्ध होवु शकते. परंतु सामनेवाला क्र.1 व 2 यांनी याबाबत कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही तसेच सदर विमा योजना मयत शेतक-यांच्या कुटुंबियांकरीता तयार केलेली आहे. त्यामुळे विमा कंपनी यांनी
तक्रार क्र.256/2011
कोणताही तांत्रीक मुद्यांचा विचार न करता क्लेमचा विचार करणे आवश्यक आहे. याचा विचार होता सामनेवाला यांचे बचावात तथ्य नाही
अर्जदाराने पान क्र.13 लगत गाव नमुना 7/12 उता-याची प्रत व पान क्र.14 लगत खाते उतारा व पान क्र.15 लगत 6 ड ची प्रत दाखल केलेली आहे. यावरील नोंद पाहता मयत हे अपघाताचेवेळी व विमा कराराचेवेळी शेतकरी होते असे स्पष्ट होत आहे.अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी चांदवड यांचेकडे प्रस्ताव दिलेला आहे. त्यानंतर कृषी अधिकारी चांदवड यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे पाठवलेला आहे. यावरुन अर्जदार यांनी क्लेमची पुर्तता केली आहे असे स्पष्ट होते.
शासन परीपत्रकातील कलम 19 क (2) मध्ये “शेतक-यांचा विमा प्रस्ताव विहीत कागदपत्रासह विमा योजनेच्या कालावधीत केंव्हाही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे संबंधीत विमा कंपनीला बंधनकारक राहील. अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्यापासून 90 दिवसांपर्यंत विमा प्रस्ताव स्विकारण्यात येतील. समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त दावे स्विकारण्यात यावेत.” असे नमूद आहे. सदर कलमांचा विचार होता विमा प्रस्ताव दाखल करण्यास उशीर झाला असला तरी समर्थनीय कारण असल्यास सामनेवाला यांनी क्लेम स्विकारणे आवश्यक आहे.
वरील सर्व कारणांचा विचार होता,सामनेवाला यांना आवश्यक असलेला 7/12 उतारा हा अर्जदार यांनी सदर अर्जामध्ये दाखल केलेला आहे. या कागदपत्रांचा सामनेवाला यांनी विचार करुन क्लेमबाबत पुर्तता करणे आवश्यक होते परंतु सामनेवाला यांनी तसे केलेले दिसत नाही. शासन परिपत्रकाचा, कागदपत्रांचा व वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाले यांना अर्जदार यांचा क्लेम अद्यापपावेतो न देवून सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार शेती व्यवसाय करतांना होणारे रस्त्यावरील अपघात, विज पडणे, पूर,सर्पदंश इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात किंवा अन्य कोणतेही अपघात यामुळे शेतक-यांना मृत्यू किंवा अपंगत्व ओढवल्यास अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता सदरची विमा योजना केलेली आहे. याचा विचार होता अर्जदार यांना सदर
तक्रार क्र.256/2011
विमा पॉलिसीचा आर्थिक लाभ होणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. पोलिस कागदपत्रांप्रमाणे व परिपत्रकातील कलमाप्रमाणे सामनेवाले यांच्या विमा करारातील अटी शर्थींचा भंग होत नाही असे मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे विचारात घेतली असता शेतकरी अपघात विमा योजनेनुसार शेतक-याचा मृत्यू झाल्यास रु.1,00,000/-ची विमा जोखीम घेण्यात आली, दावा रकमेवर व्याज मिळणेस अर्जदार हे पात्र आहेत. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- व या रकमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून म्हणजेच दि.23/11/2011 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी व खर्चाचे रकमेची मागणी केलेली आहे. वास्तविक वर उल्लेख केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सामनेवाले यांनी कोणत्याही तांत्रिक बाबींचा आधार न घेता अर्जदाराचा विमा क्लेम योग्य त्या वेळेत मंजूर करणे गरजेचे होते. विमा क्लेमची रु.1,00,000/- इतकी मोठी रक्कम अर्जदार यांना योग्य वेळेत मिळालेली नाही. विमा क्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवालेकडून या मंचात दाद मागावी लागलेली आहे. वरील कारणांमुळे निश्चितपणे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यास खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याकामी मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेणेत आलेला आहेः
2010(2)Mh.L.J.) मा. उच्च न्यायालय,मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, रिट
पिटीशन नं.519/2008 पान 880. शकुंतला धोंडीराम मुंडे वि. स्टेट ऑफ
महाराष्ट्र व इतर
वरील निकालपत्रांत शेतकरी अपघात विमा योजनेबाबत विचार करुन निर्णय देण्यात आलेला आहे. यामुळे या निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
तक्रार क्र.256/2011
अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद, वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदारास खालीलप्रमाणे रक्कम दयावीः
अ. विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/-व या रकमेवर दि.23/11/2011
पासून द.सा.द.शे. 12% दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
ब. मानसिक त्रासापोटी रु.5,000/- दयावेत.
क. अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.
(आर.एस.पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-27/02/2012