ग्राहक तक्रार अर्ज क्र.253/2011
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.24/11/2011
अंतीम आदेश दि.30/03/2012
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्रीमती बेबीताई तात्याभाऊ ठोके तक्रारदार
रा.द-हाणे, ता.बागलाण,जि.नाशिक (अँड.एस.ए.कदम)
विरुध्द
1. शाखाधिकारी, सामनेवाला
ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि., (अँड.एन.इ.हिंगे)
2,प्लॉट नं.8, पहिला मजला,
हिंदुस्थान कॉलनी, अजनी चौकाजवळ,
वर्धा रोड, नागपूर-440015.
2. शाखाधिकारी,
कबाल जनरल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि.,
4/ए, देहमंदीर को.ऑप.हौसिंग सोसायटी,
श्रीरंगनगर, पंपीग स्टेशन रोड,
गंगापूर रोड, नाशिक.
(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांचे पती कै.तात्याभाऊ शामसिंग ठोके यांना दि.17/10/2009 रोजी सर्पदंश झाला व उपचारादरम्यान दि.02/11/2009 रोजी त्यांचे निधन झाले. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ न दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- दि.16/02/2010 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रार क्र.253/2011
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा जबाब पान क्र.29 लगत व प्रतिज्ञापत्र पान क्र.30 लगत दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा जबाब पोष्टाद्वारे पाठवला असून तो पान क्र.22 लगत दाखल केलेला आहे.
अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे व त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत आहे काय? -- होय
3. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -- होय.
सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.
4. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व्याजासह
मिळण्यास पात्र आहेत काय? -- होय
5. अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? -- होय
6. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर
करणेत येत आहे व सामनेवाले क्र.1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार यांचे वतीने पान क्र.41 लगत लेखी युक्तीवाद सादर करण्यात आलेला आहे. सामनेवाले यांचेवतीने पान क्र.42 लगत लेखी युक्तीवाद सादर करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.12/8/2007 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/8/2009 ते दि.14/8/2010 असा होता. सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा
तक्रार क्र.253/2011
विमा दावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज्य शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार हया मयत कै.तात्याभाऊ शामसिंग ठोके यांच्या पत्नी आहेत ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व त्यामधील कथनावरुन अर्जदार हे कै.तात्याभाऊ शामसिंग ठोके यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र.3 लगत विलंब माफीचा अर्ज दिलेला आहे. सदर अर्जावर आदेश होवून अर्जदार यांचा विलंब माफ करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर अर्जास मुदतीची बाधा येत नाही.
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये घेतलेल्या बचावामध्ये, “सामनेवाला यांनी अर्जदाराकडून दि.14/02/2011, दि.28/02/2011 व दि.14/03/2011 याप्रमाणे वेळोवेळी कागदपत्रांची पुर्तता करण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे कायदेशीरपणे दि.28/07/2011 रोजी अर्जदाराचा अर्ज रद्द केल्याचे कळविलेले आहे. कारण अर्जदाराकडून सदर प्रस्तावातील पोस्टमार्टेम रिपोर्ट, व्हीसेरा व इतर कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्याने कै.तात्याभाऊ ठोके यांचा मृत्यु सर्पदंशाने झाल्याचे अर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत त्यामुळे अर्जदाराचा अर्ज रद्द करावा.” असे नमूद केलेले आहे.
अर्जदार यांनी याकामी पान क्र.6 लगतचे दस्तऐवज यादीसोबत पान क्र.7 ते पान क्र.10 व पान क्र.37 लगत अपघाताचेबाबतचे पोलिसांकडील खबर, पंचनामा, पोलिस अहवाल व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे समरी मंजुरी आदेश ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या कागदपत्रांचा विचार होता मयत कै.तात्याभाऊ ठोके दि. 17/10/2009 रोजी 17.00 वाजेच्या दरम्यान त्यांचे मळयात दोन्ही हातास सर्पदंश झाल्याने सुयश
तक्रार क्र.253/2011
हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले व उपचार चालु असतांनाच दि.02/11/2009 रोजी पहाटे त्यांचे निधन झालेले आहे. तसेच पान क्र.36 लगत सुयश हॉस्पीटल यांचे पत्र दाखल केलेले आहे. त्यातही दोन्ही हातास सर्पदंश झाल्याचे नमूद केलेले आहे.
याबाबत सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की मयताचा व्हिसेरा राखून ठेवलेला आहे त्यामुळे मयताचा मृत्यु हा नेमका कशाने झाला आहे ही बाब सिध्द झालेली नाही. परंतु याबाबत सामनेवाले यांनी, मयत व्यक्तीचा मृत्यु हा सर्पदंशाने झाला नाही याबाबतचे कोणतेही इन्व्हेस्टिगेशन केल्याचे दिसत नाही. तसेच सामनेवाले हे कोणत्या पुराव्याच्या आधारे सदरचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला नाही त्याबाबतचा खुलासा व त्यापृष्ठयर्थचा पुरावा दाखल केलेला नाही. केवळ सामनेवाले यांनी जबाबात मृत्यु हा सर्पदंशाने नाही असा केवळ बचाव घेतलेला आहे. तसेच मयताचा व्हिसेरा रिपोर्ट हा दाखल केलेला नाही. परंतु शासन निर्णयाप्रमाणे एखाद्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यु झाला असल्यास त्यासोबत आवश्यक कागदपत्र दाखल केलेली असल्यास व्हिसेरा रिपोर्ट दाखल करणे बंधनकारक नाही. तसेच पोलिस कागदपत्रांमधील खबर या कागदपत्राचा विचार होता मयत व्यक्तीस सर्पदंश झाल्याने त्यांना सुयश हॉस्पीटल नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले, त्यांचेवर उपचार चालु असतांना दि.02/11/2009 रोजी डॉ.दुबे यांनी तपासले असता त्यांनी मयत झाल्याचे घोषीत केलेले आहे. याचा विचार होता मयताचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला आहे असे स्पष्ट होत आहे. सामनेवाले हे मयताचे व्हिसेरा रिपोर्ट दाखल केलेला नाही या कारणांचा बचाव घेऊन क्लेम नाकारु शकत नाही. सबब सामनेवालेंचे बचावात काही तथ्य नाही असे मंचाचे मत आहे.
याबाबत शासन परिपत्रक दि.24/8/2007 चा विचार होता महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा शेती व्यवसाय करतांना होणारे रस्त्यावरील अपघात, विज पडणे, पूर,सर्पदंश इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात किंवा अन्य कोणतेही अपघात यामुळे शेतक-यांना मृत्यू किंवा अपंगत्व ओढवल्यास अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता सदरची विमा योजना केलेली आहे. याचा विचार होता अर्जदार यांना सदर विमा पॉलिसीचा आर्थिक लाभ होणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
वरील शासन परिपत्रकाचा व कागदपत्रांचा विचार होता सामनेवाले क्र.1 यांचे लेखी म्हणणे यामध्ये घेतलेला बचाव हा याकामी स्पष्ट लागू होत नाही हे होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाले यांना केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेऊन
तक्रार क्र.253/2011
अर्जदाराचा क्लेम नाकारलेला आहे व त्यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदाराने पान क्र.35 लगत गाव नमुना 7/12 उता-याची प्रत दाखल केलेली आहे. यावरील नोंद पाहता मयत हे अपघाताचेवेळी व विमा कराराचेवेळी शेतकरी होते असे स्पष्ट होत आहे
सामनेवालेचे लेखी म्हणणे तसेच अर्जदार व सामनेवालेंनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे विचारात घेतली असता शेतकरी अपघात विमा योजनेनुसार शेतक-याचा मृत्यू झाल्यास रु.1,00,000/-ची विमा जोखीम घेण्यात आली, या दावा रकमेवर व्याज मिळणेस अर्जदार हे पात्र आहेत. परंतु अर्जदार यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.2 कडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- व या रकमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून म्हणजेच दि.24/11/2011 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 12% दराने व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी व खर्चाचे रकमेची मागणी केलेली आहे. वास्तविक वर उल्लेख केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सामनेवाले यांनी कोणत्याही तांत्रिक बाबींचा आधार न घेता अर्जदाराचा विमा क्लेम योग्य त्या वेळेत मंजूर करणे गरजेचे होते. विमा क्लेमची रु.1,00,000/- इतकी मोठी रक्कम अर्जदार यांना योग्य वेळेत मिळालेली नाही. विमा क्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवालेकडून या मंचात दाद मागावी लागलेली आहे. वरील कारणांमुळे निश्चितपणे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यास खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याकामी अर्जदार यांनी पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्रे सादर केलेली आहेत.
1. IV(2007) सि.पी.जे. मा.राष्ट्रीय आयोग. पान 389. युनायटेड इंडिया
इन्श्यु.कं.लि. विरुध्द पालामरेड्डी अरुणा.
2. मा. उच्च न्यायालय, मुंबई. शकुंतला धोंडीराम मुंडे विरुध्द स्टेट ऑफ
तक्रार क्र.253/2011
महाराष्ट्र व इतर (2010(2)Mh.L.J.)
वरील निकालपत्रांत शेतकरी अपघात विमा योजनेबाबत विचार करुन निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरची निकालपत्रे या कामी लागु होतात.
अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद, वर उल्लेख केलेली वरिष्ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 विरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र. 1 यांनी अर्जदारास खालीलप्रमाणे रकमा दयाव्यातः
अ. विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/-व या रकमेवर दि.24/11/2011
पासून द.सा.द.शे. 12% दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
ब. मानसिक त्रासापोटी रु.5,000/- दयावेत.
क. अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.
(आर.एस. पैलवान) (अॅड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-30/03/2012