Maharashtra

Raigad

CC/08/150

Deepak Shrirang Bandal - Complainant(s)

Versus

Manager Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv.R.V.Oak

26 Mar 2009

ORDER


District Forum Raigad, Alibag
District Consumer Disputes Redressal Forum, Block No 6 and 8,Patil Sadan,New by pass road,Chendhare, Alibag
consumer case(CC) No. CC/08/150

Deepak Shrirang Bandal
...........Appellant(s)

Vs.

Manager Oriental Insurance Co.Ltd.
...........Respondent(s)


BEFORE:
1. Hon'ble Shri R.D.Mhetras 2. Post vacant 3. Shri B.M.Kanitkar

Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):
1. Manager Oriental Insurance Co.Ltd.

OppositeParty/Respondent(s):
1. Adv.R.V.Oak

OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.

 

                                            तक्रार क्र.150/2008.                                                  तक्रार दाखल दि.31-12-2008.                                                तक्रार निकाली दि.30-3-2009.

 

श्री.दिपक श्रीरंग बांदल,

रा.कांबळे तर्फे बिरवाडी, ता.महाड,

जि.रायगड.                                   ... तक्रारदार.

     विरुध्‍द

मॅनेजर,

ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कं.लि.

युनियन बँकेसमोर, यशोधन बिल्डिंग,

रा.मु.पो.ता.माणगांव, जि.रायगड.                       ...  विरुध्‍द पक्षकार. 

 

 

                           उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्‍हेत्रस, अध्‍यक्ष.

                                 श्री.बी.एम.कानिटकर, सदस्‍य.

 

                       तक्रारदारतर्फे वकील- श्री.आर.व्‍ही.ओक.

                         सामनेवालेतर्फे वकील-श्री.एस.ई.दरंदले.         

                      

                              -निकालपत्र -

द्वारा- मा.सदस्‍य, श्री.बी.एम.कानिटकर.

 

1.           तक्रारदारांचा मालवहातुकीचा व्‍यवसाय असून त्‍यांनी सौ.विजया नारायण शेठ यांच्‍या मालकीचा ट्रक क्र.MH-06/K-3767 हा दि.25-11-06 रोजी खरेदी केला.  तक्रारदारांचा विष्‍णु मोटार ट्रान्‍स्‍पोर्ट या नावे व्‍यवसाय असून त्‍यानी त्‍यासाठी हा ट्रक खरेदी केला होता.  त्‍या ट्रकची पॉलिसी ट्रकआधी ज्‍यांच्‍या मालकीचा होता त्‍यांच्‍या नावे होती.  त्‍या ट्रकची संबंधित कागदपत्रे आर.टी.ओ.कडून तक्रारदारांच्‍या नावे सौ.शेठ यांच्‍या दि.4-12-06च्‍या पत्रान्‍वये तक्रारदारांचे नावे फिरवण्‍यात आली.  त्‍या दिवशी सामनेवालेना पण सदर ट्रकच्‍या विमा पॉलिसीतील पूर्वीच्‍या मालकाचे नाव बदलून पॉलिसी तक्रारदाराचे नावे करण्‍यासाठी पत्र दिले होते.  त्‍या ट्रकचे मूळ मालक सौ.विजया शेठ यांनी सदर ट्रकची पॉलिसी सामनेवालेंकडे उतरवली होती व तिची मुदत दि.25-5-07 पर्यंत होती.  दि.2-12-06 रोजी भिवंडी येथून सदर ट्रकमध्‍ये रंगासाठीची पावडर घेऊन ट्रक एम.आय.डी.सी.महाड येथे माल पोचविण्‍यासाठी जात असता रात्रौ सु.12.00 वा.ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे रेल्‍वेस्‍टेशनसमोर ट्रक आला असता ट्रकला अजाणतेपणाने आग लागली व त्‍यात तो ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला.  ट्रकला लागलेल्‍या आगीत तक्रारदारांची किंवा ट्रकचालकाची कोणत्‍याही प्रकारे चूक किंवा कसूर नव्‍हती.  केवळ नैसर्गिक आपत्‍तीमुळे ट्रकला आग लागली होती.  सदर आगीची खबर तुर्भे पोलिस स्‍टेशन, नवी मुंबई येथे अकस्‍मात आग रजिस्‍टरमध्‍ये क्र.15/06 वर नोंदवली गेली आहे.  सामनेवालेंकडे सदर ट्रकचा विमा रितसर उतवरला असून झालेले नुकसान देण्‍यास ते जबाबदार व बांधील आहेत.  सदर ट्रकचा विमा रक्‍कम रु.3,80,000/- धरुन उतरविला होता.  वास्‍तविकतः सदर ट्रकची अपघाताच्‍या वेळेची किंमत रु.5,70,000/- इतकी होती.  परंतु विमा पॉलिसी मात्र रु.3,80,000/- असल्‍यामुळे तेवढीच रक्‍कम सामनेवाले तक्रारदारास देण्‍यास बांधील होते.  सदर आगीची घटना घडल्‍यानंतर  सामनेवालेंकडे झालेल्‍या नुकसानीची मागणी आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह दाखल केली आहे.  सामनेवालेनी त्‍यांचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर एसव्‍हीजे यांचेमार्फत तपासणी केली आहे.  तक्रारदारानी त्‍यांना नुकसानभरपाई मिळण्‍याबाबत सामनेवालेंकडे अनेकवेळा हेलपाटे घालूनही नुकसानभरपाईची रक्‍कम देण्‍याबाबत उत्‍तर देण्‍यास टाळाटाळ केली आहे.  शेवटी दि.26-11-07 रोजी पत्राद्वारे सदर ट्रकमध्‍ये स्‍फोटक ज्‍वालाग्राही मालाची तक्रारदारानी विनापरवाना वाहतूक केली आहे.   त्‍यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग झाला असल्‍याचे कळविले आहे शिवाय मोटार वाहन कायदयातील नियमांचा भंग केला असल्‍याचे कळविले आहे.  या कारणामुळे तक्रारदारांचा नुकसानभरपाईचा दावा नाकारला आहे.   सदर वाहनातून PATHOALIC,  ANHYDRIDE  ही पावडर घेऊन जात होते.  ही पावडर स्‍फोटक/घातक किंवा ज्‍वालाग्राही नाही यासाठी सामनेवालेनी नि.5/3 वर मोटार वाहन कायदा 1989 अन्‍वये एक टेबल दाखल केले असून त्‍याप्रमाणे ही पावडर ज्‍वालाग्राही नसलचे दाखवले आहे.  असे असूनही सामनेवालेनी ही पावडर ट्रकमध्‍ये असल्‍यामुळे ट्रकला आग लागल्‍याचे सांगून आपली जबाबदारी नाकारली आहे.  वास्‍तविकतः विमा पॉलिसी मुदतीत असताना व सदर पावडर ही ज्‍वालाग्राही नसतानाही नुकसानभरपाई देण्‍याचे टाळले आहे.  दि.2-12-06 रोजी ट्रकला आग लागून तो संपूर्णपणे निकामी होऊन तक्रारदारांचे अतोनात नुकसान झाले, शेवटी विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्‍यास नकार दिल्‍यामुळे दि.2-12-06 पासून तक्रारदारांच्‍या वाहतूक व्‍यवसवायाचे नुकसान झाले आहे.  सामनेवाले विमा कंपनीने नुकसानभरपाई न देण्‍याबाबतचा निर्णय कळविण्‍यास सुमारे एक वर्षाचा कालावधी जाणीवपूर्वक लावलेला आहे.  प्रारंभिक नुकसानभरपाई मिळेल अशी आशा दाखवून सुमारे एक वर्षाच्‍या कालावधीनंतर सामनेवाले त्‍यांची जबाबदारी असूनही नुकसानभरपाई  देण्‍याची टाळाटाळ करीत आहेत, त्‍यामुळे तक्रारदारास मंचापुढे येणे भाग पडले.  त्‍यांनी आपल्‍या तक्रारीत मंचाला खालीलप्रमाणे विनंती केली आहे-

1.     सदर अपघाताच्‍या नुकसानीची रक्‍कम देताना दि.2-12-06 पासून प्रत्‍यक्ष नुकसानीची रक्‍कम मिळेपर्यंत व्‍यापारी रीतीरीवाजाप्रमाणे द.सा.द.शे.18 टक्‍के दराने होणारी व्‍याजाची नुकसानीची रक्‍कम 18 टक्‍के दराने देण्‍याचे आदेश व्‍हावेत. 

2.    सामनेवालेनी बेकायदेशी‍ररित्‍या तक्रारदाराची नुकसानभरपाई देण्‍याचे नाकारल्‍यामुळे तक्रारदाराना झालेल्‍या व्‍यवसायाच्‍या नुकसानभरपाईची रक्‍कमसुध्‍दा तक्रारदारास मिळणेबाबत आदेश देण्‍याची विनंती केली आहे.  सदर तक्रारीमधील तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.एक लाख देण्‍याचे आदेश करण्‍यात यावेत. 

 

2.          तक्रारदारानी आपल्‍या तक्रारीत मंचापुढे सामनेवालेनी रु.9,07,000/- अशी रक्‍कम मिळण्‍यासाठी विनंती केली आहे. 

3.          नि.1 अन्‍वये तक्रार असून नि.2 अन्‍वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.  नि.3 अन्‍वये श्री.रविंद्र ओक यांचे नावे वकीलपत्र, व नि.5 अन्‍वये सुमारे 21 कागद दाखल केले असून त्‍यात प्रामुख्‍याने विमा पॉलिसी, विमा दावा नाकारल्‍याचे पत्र, मोटार व्‍हेईकल कायदयामधील परि.3च्‍या कोष्‍टकाची प्रत, दावा मागणी अर्ज, चालकाचा परवाना, ट्रकच्‍या मूळ मालकानी सामनेवालेना दिलेल्‍या पत्राची प्रत, घटना घडल्‍याच्‍या दिवशी ट्रकमध्‍ये असलेल्‍या सामानाच्‍या बिलांची प्रत, ट्रान्‍स्‍फर चलनाची प्रत, पोलिस पंचनामा, झालेल्‍या खर्चाबाबतची बिले व सामनेवालेशी केलेल्‍या पत्रव्‍यवहाराची प्रत इ.कागदपत्रे दाखल आहेत. 

 

4.          मंचाने नि.6 अन्‍वये सामनेवालेना नोटीस काढली असून त्‍याची पोचपावती अभिलेखात दाखल आहे.  नि.8 अन्‍वये सामनेवालेनी श्री.दरांदले यांचे वकीलपत्र दाखल केले असून नि.11 अन्‍वये आपला जबाब दाखल केला आहे.  नि.12 अन्‍वये सामनेवालेनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.  आपल्‍या लेखी जबाबात तक्रारदार हे दि.2-12-06 रोजी त्‍यांच्‍या वाहनाची पॉलिसी सौ.विजया नारायण शेठ यांच्‍या नावे असल्‍यामुळे त्‍यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत.  या कारणास्‍तव त्‍यांची तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती त्‍यांनी मंचाला केली आहे.  आधीच्‍या वाहन मालकांनी विमा कंपनीला सदर वाहनाचे मालक म्‍हणून तक्रारदार यांचे नाव लावणेसाठी दि.25-11-06 व दि.29-11-06 ची दोन्‍ही पत्रे दि.4-12-06 रोजी एकत्रितरित्‍या मिळाली.  त्‍यामुळे अपघातग्रस्‍त वाहन जे आधी विजया नारायण शेठ यांच्‍या नावे आर.टी.ओ.कडे नोंदवले होते ते दि.29-11-06 रोजी तक्रारदाराच्‍या नावे बदलणेत आले.  आपल्‍या लेखी जबाबात ते पुढे म्‍हणतात की, अपघाताचेवेळी वाहन चालवीत असलेल्‍या चालकाकडे मोटार वाहन कायदयाप्रमाणे धोकादायक व विषारी माल वाहतुकीच्‍या परवान्‍याची नोंद सदर चालकाच्‍या परवान्‍यावर नव्‍हती आणि असे असूनही त्‍यावेळी सदर वाहनामध्‍ये धोकादायक व विषारी सामानाची वाहतूक केली जात होती, त्‍यामुळे तक्रारदाराकडून विम्‍याच्‍या पॉलिसीच्‍या नियमांचा भंग झाला आहे त्‍यामुळे तक्रारदारांची ही तक्रार चालण्‍यास अयोग्‍य आहे.  अपघाताच्‍या दिवशी  ट्रकचा विमा तक्रारदाराच्‍या नावे नसल्‍यामुळे त्‍यांना विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यात येत नाही.  जरी अपघातग्रस्‍त ट्रकचा विमा रु.4,00,000/-चा  उतरविला असला तरी अपघाताच्‍या दिवशी विम्‍याची पॉलिसी तक्रारदाराच्‍या नावे केली गेली नव्‍हती.  म्‍हणून विमा दाव्‍याची रक्‍कम रु.3,80,000/- तक्रारदारास देण्‍याचे सामनेवाले नाकारीत आहेत.  विमा कंपनीच्‍या बाजूने कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा तक्रारदाराना देण्‍याचा प्रश्‍नच येत नाही.  विमा कंपनीने सदर ट्रकमध्‍ये असलेल्‍या सामानाचे G.E.O Chem Laboratories, Rajkot Pvt.Ltd. यांच्‍याकडून अपघातग्रस्‍त वाहनातील मालाची तपासणी केली असून त्‍यांनी सदर माल हा धोकादायक असल्‍याचे प्रमाणपत्र दिले आहे.  सदरचे प्रमाणपत्र अभिलेखात नि.ई वर दाखल केले असल्‍याचे म्‍हटले आहे, परंतु ते अभिलेखात दिसून येत नाही, तसेच आपल्‍या लेखी जबाबात परि.11 मध्‍ये सुशीलकुमार दुबे यांचा इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट दि.25-1-07 रोजी नि.एफ वर जोडल्‍याचे म्‍हणत आहेत व त्‍याप्रमाणे तक्रारदाराच्‍या नुकसानीचा दावा नामंजूर केला असल्‍याचे प्रतिपादन करतात, परंतु सदर इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट अभिलेखात उपलब्‍ध नाही.  शेवटी सामनेवालेनी मंचाला विनंती केली की, तक्रारदाराच्‍या दाव्‍याच्‍या  नुकसानीची रक्‍कम देणे सामनेवालेवर बंधनकारक नाही.  म्‍हणून तक्रारअर्ज फेटाळण्‍यात यावा.  नि.12 वर विमा कंपनीचे वरिष्‍ठ विभागीय मॅनेजर यांनी शपथपत्र दाखल केले असून त्‍यात G.E.O Chem Laboratories, Rajkot Pvt.Ltd. यांच्‍या अहवालानुसार अपघाताचे वेळी ट्रकमध्‍ये धोकादायक माल असल्‍याचे प्रतिपादन केले आहे, परंतु त्‍या कंपनीचे तसे प्रमाणपत्र अभिलेखात दाखल केल्‍याचे दिसून येत नाही.  सामनेवालेनी दि.24 मार्च रोजी नि.14 वर आपल्‍या प्रतिपादनाचे मुद्दे दाखल केले आहेत.  त्‍यात त्‍यांनी काही न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत.  दि.26 मार्च रोजी अंतिम सुनावणीच्‍या वेळी तक्रारदाराचे वकील व सामनेवाले विमा कंपनीचे वकील उपस्थित होते.  त्‍यांनी केलेले युक्‍तीवाद ऐकले, दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले व अंतिम आदेशासाठी प्रकरणाची सुनावणी स्‍थगित करण्‍यात आली.  सदर तक्रारीच्‍या निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

मुद्दा क्र.1 तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक होतात काय?

उत्‍तर    - होय. 

 

मुद्दा क्र.2 तक्रारदाराना सामनेवालेंकडून सदोष सेवा मिळाली आहे काय?

उत्‍तर    - होय.

 

मुद्दा क्र.3 तक्रारदारांच्‍या मागणीप्रमाणे त्‍यांना नुकसानभरपाई मंजूर करता येईल काय?

उत्‍तर    - अंतिम आदेशात नमूद केल्‍याप्रमाणे.

 

विवेचन मुद्दा क्र.1

5.          तक्रारदारानी सौ.विजया शेठ यांच्‍याकडून ट्रक क्र. MH-06/K-3767 हा दि.25-11-06 रोजी खरेदी केला.  खरेदी करतेवेळी सदर ट्रकचा विमा आधीच्‍या मालकांनी उतरवला होता व त्‍याची मुदत दि.26-8-06 ते दि.25-8-07 अशी होती.  सदरची बाब तक्रारदारानी विमा कंपनीला त्‍यांच्‍या दि.29-11-06च्‍या पत्रान्‍वये कळविली असून त्‍यासोबत तक्रारदाराचे नावे ट्रक नोंदणी झाल्‍याच्‍या आर.टी.ओ.च्‍या कागदपत्रांच्‍या झेरॉक्‍स त्‍यांनी विमा कंपनीकडे पाठविली होती.  त्‍या पत्रासोबत सौ.विजया शेठ यांनी विमा कंपनीला सदर ट्रकची पॉलिसी दिपक बांदल- तक्रारदार यांच्‍या नावे करुन देण्‍याचे पत्र दिले होते.  सामनेवालेनी आपल्‍या लेखी जबाबात सदरची दोन्‍ही पत्रे त्‍यांच्‍या कार्यालयात दि.4-12-06रोजी मिळाल्‍याचे मान्‍य केले होते.  सदर वाहनाला दि.2-12-06 रोजी अपघात झाला होता.  त्‍यावेळी सदरचा ट्रक हा तक्रारदाराच्‍या ताब्‍यात असून त्‍याची नोंदणी आर.टी.ओ.कडे त्‍यांचे नावे झाली असल्‍याचे सदर पत्रावरुन दिसून येत आहे.  विमा कंपनीने अपघात झाला असल्‍यामुळे व त्‍याच दिवशी तक्रारदाराचे नावे पॉलिसी केली नसल्‍यामुळे तक्रारदार हे विमा कंपनीचे ग्राहक होत नाहीत असे आपल्‍या लेखी जबाबात म्‍हटले आहे.  परंतु नि.5/2 अन्‍वये विमा कंपनीने विमा दावा  नाकारताना दि.26-11-07 चे पत्रात हा मुद्दा विचारात घेतला नसून विमा दावा नाकारण्‍याचे कारण अपघाताच्‍या वेळी सदर वाहन चालवणा-या चालकाकडे धोकादायक तसेच स्‍फोटक, ज्‍वालाग्राही पदार्थ वाहनातून नेणारे वाहन चालविण्‍याची अनुज्ञप्‍ती नव्‍हती.  त्‍यामुळे वाहन अधिनियमातील तरतुदींचा भंग झाल्‍यामुळे विमा दावा देण्‍याचे नाकारले आहे.  विमा पॉलिसी ही वाहनाची नुकसानी टाळण्‍यासाठी देण्‍यात आलेली हमी आहे, त्‍यामुळे तक्रारदार हे केवळ अपघाताच्‍या दिवशी सदर अपघाताच्‍या पॉलिसीवर मालक म्‍हणून नोंदवले न गेल्‍यामुळे ते सामनेवालेचे ग्राहक ठरत नाहीत असे म्‍हणणे तर्कसंगत नसल्‍याचे मंचाचे मत आहे.  तक्रारदार व वाहनाचा जुना मालक या दोघांचीही पत्रे विमा कंपनीला एका दिवशी मिळाल्‍याचे त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात म्‍हटले आहे.  अभिलेखातील दाखल दोन्‍ही पत्रावरील शिक्‍क्‍यावरुन ते किती तारखेला विमा कंपनीला मिळाले हे स्‍पष्‍टपणे दिसून येत नाही, परंतु सदर वाहनाच्‍या विम्‍याची रक्‍कम विमा कंपनीला आधीच मिळाली आहे व तक्रारदाराच्‍या पत्रावरुन अपघाताच्‍या चौकशीचे आदेश त्‍यांनी सर्व्‍हेअरला दिले होते.  सर्व्‍हेअरच्‍या अहवालावरुन चालकाकडे योग्‍य त्‍या शे-याचा ज्‍वालाग्राही व धोकादायक पदार्थ वाहून नेण्‍याचा शेरा नसलेली अनुज्ञप्‍ती असल्‍यामुळे विम्‍याचा दावा नाकारलेला आहे.  तक्रारदारानी दिलेला न्‍यायनिवाडा 2009 (I)CPR 157 राज्‍य आयोगाचा आहे.  United India Insurance Co. V/s. Shankar Keshav Parle  हा दिला आहे.  परंतु सदरच्‍या न्‍यायनिवाडयात तक्रारदारानी घेतलेल्‍या वाहनाबाबत विमा पॉलिसीमधील त्‍यांचे नाव बदलल्‍याचे पत्र विमा कंपनीला पोचले नसल्‍याचे दिसून येते.  त्‍यामुळे तो दाखला या ठिकाणी चपखलपणे लागू पडतो असे मंचाला वाटत नाही.  सदर न्‍यायनिवाडयात वाहनाची चोरी झालेली होती व विमा कंपनीकडे नाव बदलण्‍याचे पत्रा पोचलेले नव्‍हते.  मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निकाल 1995 D.G.L.S (soft.) 1110 यात मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या complete insulations Pvt. V/s. New India Assurance Co.Ltd. या न्‍यायनिवाडयात खालीलप्रमाणे म्‍हटले आहे-

" The National Consumer Disputes Redressal Commission was right in the view it took based on the decision in Kondaiah  case because the transferee-insured could not be said to be a third party qua the vehicle in  question.  It is only in respect of third party risks that Section 157 of the New Act provides that the certificate of insurance together with the policy of insurance described therein shall be deemed to have been transferred in facour of the person to whom the motor vehicle is transferred."                 

      त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक असल्‍याचे मंचाचे मत आहे.  सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होय असे आहे. 

 

विवेचन मुद्दा क्र.2

6.          सामनेवालेनी विमा दावा नाकारताना अपघाताचे वेळी ट्रकमध्‍ये धोकादायक व ज्‍वालाग्राही पदार्थ असल्‍यामुळे व तसा माल असलेल्‍या गाडया चालविण्‍याचा शेरा हा अपघाताचे वेळी असलेल्‍या चालकाच्‍या अनुज्ञप्‍तीवर नसल्‍याचे कारण देऊन नाकारण्‍यात आला आहे.  अभिलेखात दाखल असलेल्‍या कागदपत्रामधील इन्‍व्‍हॉईसमध्‍ये ट्रकमध्‍ये भरलेल्‍या रसायनाचे नाव 'PHTHALIC  ANHYDRIDE' असे लिहीलेले आहे.   सामनेवालेनी याबाबत आपल्‍या लेखी युक्‍तीवादात सदरचे हे रसायन धोकादायक व ज्‍वालाग्राही असल्‍याचे प्रमाणपत्र  त्‍यांनी G.E.O Chem Laboratories, Rajkot Pvt.Ltd. यांनी दिलेल्‍या प्रमाणपत्रावर म्‍हटले आहे, परंतु ते प्रमाणपत्र अभिलेखात दिसून येत नाही.  याउलट तक्रारदारानी मोटार व्‍हेईकल अधिनियम 1991 मधील परि.3च्‍या कोष्‍टकाची प्रमाणित प्रत जोडली आहे, त्‍यानुसार Central Motor Vehicles  rools 1989-Table-3 च्‍या पृ.क्र.83वर ट्रकमध्‍ये असलेल्‍या केमिकल्‍सचे नाव दिलेले आहे, परंतु सदर कोष्‍टकाच्‍या क्र.2च्‍या रकान्‍यात त्‍याबद्दल हे रसायन धोकादायक किंवा ज्‍वालाग्राही असल्‍याची नोंद दिसून येत नाही.  दाखल पुराव्‍याचे अवलोकन केले असता अपघाताचे वेळी सदर वाहनामध्‍ये धोकादायक किंवा ज्‍वालाग्राही माल नव्‍हता असे मंचाचे मत झाले आहे, त्‍यामुळे तशा प्रकारचा माल हाताळण्‍याचा शेरा वाहनचालकाच्‍या अनुज्ञप्‍तीवर असणे आवश्‍यक नाही असे मंचाचे मत आहे.  अभिलेखात दाखल असलेल्‍या मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडयाचा संदर्भ 2003 D.G.L.S.(soft.)371 जितेंद्रकुमार विरुध्‍द ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कं.लि. यात असे म्‍हटले आहे की,

      "However, it  does not empowered insurance co. to repuduate claim for damages which occured due to acts to which driver has not in any manner contrubuted.......  In case, of damage caused due to mechanical failure, insurance co. could not  repudiate claim."

      यावरुन अपघाताच्‍या वेळी सदर वाहनात धोकादायक किंवा ज्‍वालाग्राही पदार्थ नसल्‍यामुळे व तसा पदार्थ असलेले वाहन चालविण्‍याचा शेरा यावेळच्‍या चालकाच्‍या अनुज्ञप्‍तीत नसेल तर या वेळी विमा कंपनीने अपघाताच्‍या नुकसानीचा दावा देणे नाकारणे हे अयोग्‍य असल्‍याचे मंचाचे मत आहे.  सबब विमा कंपनीने तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे, म्‍हणून मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होय असे आहे. 

 

विवेचन मुद्दा क्र.3

7.          तक्रारदारानी मंचाकडे विनंती केली आहे की, त्‍याना सामनेवालेकडून ट्रकच्‍या अपघातातील नुकसानीपोटी रु.3,80,000/- मिळावेत व त्‍यावर 18 टक्‍के दराने दि.1-2-06 ते 1-10-08 पर्यंत रु.1,25,400/- मिळावेत, तसेच विमा दावा नाकारण्‍यास विलंब लावल्‍यामुळे व्‍यवसायाच्‍या झालेल्‍या नुकसानीपोटी रु.3,00,000/- मिळावेत, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु.15,000/- मिळावेत.  तक्रारदारांच्‍या या मागण्‍या अवास्‍तव असल्‍याचे मंचास वाटते.  सदर वाहनाचा विमा उतरवते वेळी उभय पक्षकारानी मान्‍य केलेली रक्‍कम रु.3,80,000/- आहे.  सदर वाहनाचा अपघात दि.2-12-06 रोजी झाला आहे, परंतु विमा दावा नाकारण्‍याचे पत्र कंपनीने दि.26-11-07 रोजी दिल्‍याचे अभिलेखात दाखल आहे.  ट्रक अपघातात संपूर्णपणे जळून गेला असल्‍यामुळे वाहनाच्‍या नुकसानीपोटी विमा कंपनीने तक्रारदारास रक्‍कम रु.3,80,000/- देणे योग्‍य असल्‍याचे मंचाचे मत आहे.  यासंदर्भात विमा दावा नाकारण्‍याची कृती ही अत्‍यंत विलंबाने म्‍हणजे सुमारे एक वर्षाने केली आहे.   यात Insurance regulatory & Development Authority  (protection of policy holders interest) यांच्‍या 2002च्‍या अधिनियमाप्रमाणे परि.क्र.9(1) प्रमाणे विमा कंपनीने घटना घडल्‍याची सूचना मिळाल्‍यानंतर 72 तासात सर्व्‍हेअर नेमावयाचा आहे तर (4) प्रमाणे सर्व्‍हेअरने आपला अहवाल विमा कंपनीला अपघाताची सूचना मिळाल्‍यापासून 3 आठवडयात देण्‍याचा आहे, तसेच (5) प्रमाणे सर्व्‍हेअरचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यापासून विमा कंपनीने 30 दिवसात विमा दावा स्विकारणे किंवा नाकारणे हे विमेदारास कळवावयाचे आहे.  प्रस्‍तुतच्‍या घटनेमध्‍ये अपघात झाल्‍यापासून विमा दावा जवळजवळ एका वर्षाने नाकारण्‍यात आला आहे त्‍यामुळे तक्रारदारास विमा कंपनीने 1 फेब्रुवारी 07 पासून द.सा.द.शे.8 टक्‍के दराने नुकसानीची रक्‍कम रु.3,80,000/- वर व्‍याज देणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे.  तक्रारदारानी जरी त्‍यांच्‍या धंदयाची झालेली नुकसानभरपाई जरी मागितली असली तरी या कायदयानुसार देता येत नाही.  मानसिक त्रासापोटी तक्रारदारानी मागितलेली रक्‍कम फार अवाजवी असल्‍याचे मंचाचे मत आहे.  त्‍याऐवजी मानसिक त्रासापोटी तक्रारदारास विमा कंपनीने रु.25,000/- दयावेत व तक्रारीचा खर्च रु.10,000/- देण्‍यात यावा या निष्‍कर्षाप्रत मंच आले आहे. 

 

9.          सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येतो-

 

                              -ःआदेश ः-

     आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाच्‍या आत विमा कंपनीने तक्रारदारास खालीलप्रमाणे रकमा दयाव्‍यात-

1.         ट्रकच्‍या नुकसानीपोटी रु.3,80,000/- (रु.तीन लाख ऐंशी हजार मात्र) व त्‍यावर दि.1-2-06 पासून रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे.8 टक्‍के दराने व्‍याजासहित दयावेत. 

2.         शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- (रु.पंचवीस हजार मात्र) व न्‍यायिक खर्चापोटी रु.10,000/- (रु.दहा हजार मात्र) देण्‍यात यावेत. 

3.         विहीत मुदतीत सामनेवाले विमा कंपनीकडून वरील रकमा तक्रारदारास न मिळाल्‍यास वरील सर्व रकमा वसूल करण्‍याचा तसेच वर कलम 1 मधील रक्‍कम द.सा.द.शे.8 टक्‍के दराने व्‍याजासह वसूल करण्‍याचा अधिकार तक्रारदारास राहील. 

 

4.         सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना पाठविण्‍यात याव्‍यात. 

 

ठिकाण- रायगड- अलिबाग.  

दिनांक- 30-3-2009.

 

                  (बी.एम.कानिटकर)          (आर.डी.म्‍हेत्रस)

                  सदस्‍य                  अध्‍यक्ष

             रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,अलिबाग.

 




......................Hon'ble Shri R.D.Mhetras
......................Post vacant
......................Shri B.M.Kanitkar