(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांनी सामनेवाले यांचेकडून गहाळ केलेला चेक क्र.070846 ची रक्कम रु.50,000/-मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी या कामी पान क्र.17 लगत लेखी म्हणणे व पान क्र.18 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-
तक्रार क्र.132/2011
नाही.
3) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर
करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांचे वतीने पान क्र.40 लगत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आलेला आहे. सामनेवाला यांचे वतीने अँड.श्रीमती एस.एस.पुर्णपात्रे यांनी युक्तीवाद केलेला आहे
अर्जदार यांचे नावे सामनेवाला यांचे बँकेत बचत खाते क्र.10980379597 हे खाते आहे व या खात्यावर चेकची सुविधा दिलेली होती ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत चेक जमा केल्याबाबतची काऊंटरस्लिपची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 ची काऊंटरस्लिप याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “रक्कम रु.50,000/- या रकमेचा चेक दि.01/06/2010 रोजी सामनेवाला यांचेकडे भरण्यात आला. तो चेक सामनेवाला यांनी नागपूर येथे पाठवला. परंतु सेंट्रल क्लिअरींग प्रोसेसिंग सेंटरला प्रत्यक्ष पाठवावा असा शेरा मारुन पुन्हा सामनेवाला कडे आला. या चेक नंतर भरलेला रु.2,50,000/- चा चेक सेंट्रल क्लिअरींग प्रोसेसिंग सेंटरला पाठवण्यात आला व वटला. परतु दोन शाखाच्या दरम्यान व क्लिअरींग हाऊसला पाठवण्याच्या दरम्यान रु.50,000/- चेक सापडेनासा झाला. चेक शोधण्याचा खुप प्रयत्न केला. कुरीयरमार्फत पुन्हा शाखेकडे चेक आला ही माहिती कळाली परंतु बँकेकडे चेक सापडला नाही. याची माहिती अर्जदाराला देण्यात आली. अर्जदार यांना हा चेक श्री.रसाळ नामक व्यक्तीने दिलेला होता. रसाळ यांनी अर्जदार यांना दुसरा चेक द्यावा म्हणून सामनेवाला यांनी नागपूर येथे जाऊन स्वतः प्रयत्न केले. नंतर चेक सापडल्यावर तोच चेक नागपूरला स्वतः जावून व्हॅलिडेट करुन आणला व अर्जदाराचे खात्यात भरला. चेक सापडत नसल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. कोणताही मगरुरपणा अर्जदार यांचे बाबतीत दाखवला नाही व उध्दटपणे उत्तरेही दिली नाहीत.” असे म्हटलेले आहे.
या कामी अर्जदार यांनी पान क्र.6 ते पान क्र.9 लगत पत्रव्यवहार व नोटीसीची प्रत दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी पान क्र.22 लगत त्यांचे दि.08/09/2011 चे पत्र दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला यांनी पान क्र.25 ते
तक्रार क्र.132/2011
पान क्र.32 लगत पत्रव्यवहाराच्या प्रती व अकाऊंट स्टेटमेंट दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला यांनी पान क्र.36 व पान क्र.37 लगत रेल्वे तिकीटांच्या झेरॉक्स प्रमाणीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
अर्जदार यांचे तक्रार अर्जामधील कथन तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणण्यामधील कथन व सामनेवाला यांनी पान क्र.22 तसेच पान क्र.25 ते पान क्र.32 लगत दाखल केलेली कागदपत्रे व पान क्र.36 व पान क्र.37 लगत दाखल केलेली रेल्वेची तिकीटे या सर्वांचा एकत्रीतरित्याविचार करीता जरी सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांचा चेक गहाळ झालेला होता तरी त्याबाबत सामनेवाला यांनी चेक शोधण्यासाठी व अर्जदार यांना ज्यांनी चेक दिलेला होता त्यांचेकडून पुन्हा दुसरा चेक मिळण्यासाठी योग्य ते सर्व प्रयत्न केलेले आहेत व चेक सापडल्यानंतर व्याजासह चेकची रक्कम अर्जदार यांचे खात्यावर जमा केलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. म्हणजेच सामनेवाला यांनी अर्जदार यांना जाणूनबुजून त्रास व्हावा व अर्जदार यांचे आर्थीक नुकसान व्हावे या हेतुने सेवा देण्यामध्ये जाणीवपुर्वक कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही हे वरील सर्व कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.