(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांनी अर्जदार यांचा मोबाईल योग्य प्रकारे दुरुस्त करुन द्यावा अथवा सदरचा मोबाईल दुरुस्त न झाल्यास या मोबाईलच्या किंमतीचा नवीन मोबाईल वारंटीसह अर्जदार यांना द्यावा. आर्थीक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
तक्रार क्र.168/2011
सामनेवाला नं.3 यांनी पान क्र.21 लगत लेखी म्हणणे व पान क्र.22 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
सामनेवाला नं.1 यांनी म्हणणे योग्य त्या वेळेत दाखल केले नाही म्हणून त्यांचेविरुध्द म्हणणे दाखल नाही असे आदेश दि.28/09/2011 रोजी केलेले आहेत.
अर्जदार यांच्या दि.17/10/2011 रोजीच्या पान क्र.19 च्या पुरसीसवरील आदेशाप्रमाणे सामनेवाला नं.2 यांचे नाव या तक्रार अर्जातून कमी करण्यात आलेले आहे.
अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 3 यांचे ग्राहक आहेत.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय. सामनेवाला क्र.1 व 3 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून नवीन मोबाईल मिळण्यास किंवा त्याची रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 3 यांचेकडून नवीन मोबाईल मिळण्यास किंवा त्याची रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत.
4) अर्जदार हे मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 3 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 व 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
याकामी अर्जदार यांचे वतीने पान क्र.23 लगत व सामनेवाला क्र.3 यांनी पान क्र.25 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि.26/01/2011 रोजी सोनी एरीक्सन जीएसएम हॅण्डसेट रक्कम रु.4600/- ला विकत घेतल्याची मुळ अस्सल पावती पान क्र.5 लगत हजर केलेली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे म्हणणे
तक्रार क्र.168/2011
दाखल करुन त्यांचेकडून मोबाईल घेतल्याची बाब नाकारलेली नाही. सामनेवाला क्र.2 हे मोबाईल उत्पादक कंपनी आहेत व सामनेवाला क्र.3 हे मोबाईल दुरुस्त करणारे सर्व्हीस सेंटर आहे. सामनेवाला क्र.3 यांनी मोबाईलबाबत दुरुस्तीची सेवा दिलेली आहे ही बाब सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 ची पावती यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 3 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला क्र.1 यांचे निर्देशानुसार मोबाईल दुरुस्तीसाठी आलेला होता मात्र प्रस्तुत सामनेवाला यांनी मोबाईल वारंटीत असल्या कारणास्तव कोणताही मोबदला न घेता अर्जदाराचे समाधान होईल अशा पध्दतीने दुरुस्त करुन दिलेला होता. त्यानंतर या सामनेवालाकडे मोबाईल दुरुस्त होण्याची शक्यता नसल्याने सामनेवाला क्र.3 यांनी संदर्भीत मोबाईल सामनेवाला क्र.2 यांचेकडे दुरुस्ती व अनुषंगीक पुर्तताकरीता पाठवलेला होता. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
अर्जदार यांनी पान क्र.5 लगत सामनेवाला क्र.1 यांची मोबाईल खरेदीची रक्कम रु.4600/- ची पावती हजर केलेली आहे तसेच पान क्र.6 व पान क्र.7 लगत वादातील मोबाईलबाबतचे सामनेवाला क्र.3 चे जॉबकार्ड दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 5 मध्येच वारंटी पिरीयडमध्ये मोबाईल खराब झालेला होता ही बाब मान्य केलेली आहे. पान क्र.6 व पान क्र.7 लगतचे जॉब कार्डवरील नोंदी विचारात घेता मोबाईलमध्ये “चार्जींग प्रॉब्लेम, बॅड बॅटरी परफॉर्मन्स, अँटो ऑफ, कॉल डिसकनेक्ट प्रॉब्लम, अँटोमेटींक स्विच ऑफ अँण्ड हँग, फोटो नॉट ओपन व एस एम एस नॉट सेंड प्रॉब्लम” असे दोष वारंटी पिरीयडमध्येच निर्माण झालेले होते हे स्पष्ट झालेले आहे.
अर्जदार यांनी तक्रार कलम 11 मध्ये सामनेवाला क्र.3 यांनी मोबाईल परत दिलेला नाही असे उल्लेख केलेला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 6 मध्ये “संदर्भीत मोबाईल सामनेवाला क्र.2 यांचेकडे दुरुस्ती व अनुषंगीक पुर्तताकरीता पाठवलेला होता.” हे मान्य केलेले आहे. परंतु मोबाईल पुर्णपणे दुरुस्त करुन सामनेवाला क्र.3 यांनी अर्जदार यांना तो परत केला किंवा नाही याबाबतचा कोणताही योग्य तो पुरावा सामनेवाला क्र.3 यांनी दाखल केलेला नाही. सामनेवाला क्र.3 यांचे लेखी म्हणणे कलम 6 मधील मजकुराचा विचार होता वादातील मोबाईल
तक्रार क्र.168/2011
अद्यापही सामनेवाला क्र.3 यांचेकडे दुरुस्त होवून अद्याप परत आलेलाच नाही हेच स्पष्ट होत आहे.
पान क्र.6 व पान क्र.7 चे जॉबकार्ड व सामनेवाला क्र.3 यांचे लेखी म्हणणे कलम 5 व 6 मधील मजकुर याचा विचार होता. सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना दोषयुक्त मोबाईलची विक्री केलेली आहे ही बाब स्पष्ट होत आहे.
वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 व 3 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये सामनेवाला कडून वादातील मोबाईलच्या किंमतीएवढा नवीन मोबाईल मिळावा किंवा वादातील मोबाईल दुरुस्त करुन मिळावा अशी मागणी केलेली आहे. पान क्र.6 व पान क्र.7 चे जॉब कार्ड व सामनेवाला क्र.3 यांचे लेखी म्हणणे याचा विचार करीता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 3 यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीक रित्या वादग्रस्त मोबाईल दुरुस्त करुन मिळणेबाबत किवा त्याच किमतीएवढा नवीन मोबाईल मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून वादातील मोबाईल दुरुस्त करुन मिळावा किंवा नवीन मोबाईल मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 3 यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीक रित्या मानसिक त्रासापोटी रु.1000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.500/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, सामनेवाला क्र.3 यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 व 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला क्र.1 व 3 यांनी वैय्यक्तीक व
संयुक्तीक रित्या अर्जदार यांना सोनी एरीक्सन मॉडेल नं.डब्ल्यु 100 आय एस
एम इ 2 355510045192027 हा वादातील मोबाईल पुर्णपणे योग्य रित्या दुरुस्त
तक्रार क्र.168/2011
करुन परत करावा.
3) वर कलम 2 मध्ये लिहील्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 व 3 यांनी अर्जदार यांना
30 दिवसांचे आत मोबाईल दुरुस्त करुन न दिल्यास सामनेवाला क्र.1 व 3
यांनी वैय्यक्तीक व संयुक्तीक रित्या रक्कम रु.4600/- इतक्या किंमतीचा
नवीन मोबाईल वारंटीसह अर्जदार यांना द्यावा.
4) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 व 3 यांनी वैय्यक्तीक व
संयुक्तीक रित्या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
अ) मानसिक त्रासापोटी रु.1000/- द्यावेत.
ब) अर्जाचे खर्चापोटी रु.500/- द्यावेत.