जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/164. प्रकरण दाखल तारीख - 16/07/2009 प्रकरण निकाल तारीख –22/10/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य शशिकांत पि. लक्ष्मण पाटील वय, 33 वर्षे, धंदा नौकरी रा.मंजूळा नगर, नांदेड रोड,भोकर ता. भोकर जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा, शाखा श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर. 2. व्यवस्थापक, गैरअर्जदार बँक ऑफ हैद्राबाद, शाखा भोकर ता.भोकर जि. नांदेड. 3. व्यवस्थापक, 3.भारतीय आयुर्विमा महामंडळ, 0959, 3.दुधडीया बिल्डींग, श्रीरामपूर ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर. अर्जदारा तर्फे वकील - अड.सुरेश पन्नासवाड गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे - अड.जे.एस.गुहीलोत. गैरअर्जदार क्र.3 तर्फे - अड.एम.डी.देशपांडे. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, अर्जदार यांनी त्यांचे एलआयसी पॉलिसी नंबर 951316374 यांचा मनी बँग पॉलिसीसाठी त्यांना रु.7500/- चा दि.27.02.2008 रोजीचा बँक ऑफ बडोदा अहमदनगर येथील धनादेश मिळाला होता. अर्जदार हे भोकर येथे राहत असल्यामूळे त्यांनी त्यांचे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे असलेले खाते नंबर 52119624215 या खात्यामध्ये दि.31.3.2008 रोजी धनादेश वटविण्यासाठी त्यांचे खात्यात जमा केला पंरतु त्या धनादेशाची रक्कम अद्यापपर्यत अर्जदाराच्या खात्यात जमा झाली नाही यांला एक वर्षाचा कालावधी होऊन गेला. अर्जदाराने यासंबंधी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी सदरील धनादेश हा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे वटविण्यासाठी पाठविला आहे व त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना दोन वेळा रिमांईडर केला परंतु त्यांचेकडून तो धनादेश अद्यापही वापस आलेला नाही. त्यामूळे अर्जदाराच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. अर्जदाराने दि.9.4.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांना लेखी कळविले परंतु त्याचा काहीही परीणाम झाला नाही. त्यामूळे त्यांने दि.15.6.2009 रोजी एक कायदेशीर नोटीस पाठविली. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांचे मूळ रक्कम रु.7500/- व मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- असे एकूण रु.22,500/- त्यांना मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस पाठविण्यात आली त्यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहीले.म्हणणे देण्याची संधी असताना त्यांनी ती घेतली नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पैसे मिळण्यासाठी सतत पाठपूरावा केलेला आहे. यासाठी त्यांनी दि.24.1.2009,19,2,2009, 20,8,2009 रोजी पञ पाठवून चेकचे पैसे लवकर पाठविण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून कोणतीही सेवेत ञूटी झालेली नाही. म्हणून पैसे मिळण्यास झालेला विलंबा बददल ते जबाबदार नाहीत. अर्जदारानी धनादेश त्यांचे भोकर येथील शाखेत जमा केल्यानंतर तो वटविण्यासाठी, गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविला त्यांनी सदरील धनादेशाची रक्कम त्यांचे नांदेड येथील शाखेचा ड्राफट काढून तो गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे न पाठविता त्यांचे चूकीमूळे तो भोकर येथील एस.बी.आय. कडे पाठविला गेला. भोकर येथे बँक ऑफ बडोदा येथील शाखा नसल्यामूळे त्यांनी त्यांचे नांदेड शाखेची चूक आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी ड्राफट न पाठविता श्रीरामपूर येथील बँक ऑफ बडोदा शाखेचा चेक दिला होता. बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूर गैरअर्जदार क्र.1 यांनी चेकचा ड्रॉफट गैरअर्जदार क्र.2 कडे न पाठविल्यामूळे त्यांनी सतत पाठपूरावा केला. यात खरे तर गैरअर्जदार क्र.1 यांची चूक आहे. त्यांना एस.बी.आय भोकरला ड्रॉफट पाठविण्याची गरज नव्हती. परंतु हे चूकीतून पाठविले असेल तर त्यांचेकडून यासाठी ड्रॉफट वापस मागवून घेऊन परत गैरअर्जदार क्र.2 ला पाठविला असता व गैरअर्जदाराच्या खात्यात जमा करता आला असता एकंदरीत या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया भोकरचा काही संबंध येत नाही. तरी त्यांनी पैसे घेतले व त्यांचे संस्पेन्स खात्यात रक्कम जमा केली. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 ला दूसरे काही करता येत नव्हते. गैरअर्जदार क्र.1 ने चेकचे पैसे यापूर्वी गैरअर्जदार क्र.2 कडे वर्ग केले नाही त्यांची वरिष्ठ कार्यालय आर.बी.आय. यांचेकडे दाद मागावी लागेल. सदरील प्रकरणात गैरअर्जदार क्र.2 यांनाच मनस्ताप व ञास झालेला आहे. गैरअर्जदार हे सतत एक वर्षापासून अर्जदाराला ञास देत आहेत व त्यामूळे त्यांचा बराच वेळा वाया गेला. गैरअर्जदार यांचा चेक नसल्याकारणाने रु.5,000/- खर्चासह तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.3 एल.आय.सी यांनी त्यांचे विमा नंबर 951316374 नुसार दर पाच वर्षानी दयावयाचा बोनस रक्कम या बाबत दि.27.02.2008 रोजी रु.7500/- चा धनादेश ज्यांचा नंबर 016402 आहे व हे त्यांना मान्य आहे. परंतु संबंधीत धनादेश वटलेला नाही हे त्यांना मान्य नाही. या बाबत गैरअर्जदार यांचे खाते बँक ऑफ बडोदा श्रीरामपूर शाखेतून पास होऊन गैरअर्जदार यांचे खात्यात नांवे पडलेले आहे. त्यामूळे पूढील व्यवहाराशी गैरअर्जदार यांचा काही संबंध नाही. गैरअर्जदार क्र.1 बँक ऑफ बडोदा यांनी दि.29.08.2009 रोजी दिलेल्या प्रमाणपञानुसार व अकाऊटंस ऑफ स्टेटमेंटनुसार अर्जदाराचा धनादेश हा दि.21.04.2008 रोजी पास झालेला आहे. त्यामूळे गैरअर्जदारांनी सेवेत ञूटी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यात गैरअर्जदार यांना विनाकारण गोवण्यात आलेले आहे. त्यामूळे त्यांचे विरुध्दची तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराची तक्रार तपासली असता हे स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र.3 यांनी त्यांची मनी बँक पॉलिसी नंबर 951316374 यासाठी वापसी रककम करिता बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूर यांचा धनादेश नंबर 016402 रु.7500/- चा अर्जदार यांना दिला. तो धनादेश दि.21.04.2008 रोजी खात्यातून त्यांचे नांवे रक्कम पडून पास झाला. त्यामूळे गैरअर्जदार क्र.3 यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध उरला नाही. अर्जदार यांचे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा भोकर येथे खाते नंबर 52119624215 आहे. या खात्यात त्यांनी दि.31.03.2008 रोजी गैरअर्जदार ्र.3 यांनी दिलेला चेक वटविण्यासाठी जमा केला व याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 यांनी सदरील चेक वटविण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविला. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचेकडून तो चेक पास होऊन गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे आलाच नाही. म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांनी सतत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे विचारणा केली. त्यांनी त्यांला उत्तरही दिले नाही. धनादेशाची रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविली नाही. ही रक्कम मिळाली नाही म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांनी बराच पञव्यवहार गैरअर्जदार क्र.1 यांचेशी केला पण त्यांस गैरअर्जदार क्र.1 यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.21.04.2009 रोजी गेरअर्जदार क्र.2 यांना पञ लिहून त्यांनी पाठविलेला चेक नंबर 016402 दि.27.02.2008 रोजीचा रक्कम रु.7500/- यांचा हा चेक चूकून एस.बी.आय. शाखा भोकर येथे डि.डि. नंबर 263864 द्वारे भोकर येथे पाठविला आहे. तो त्यांचेकडे दि.8.7.2008रोजी जमा झाला आहे. त्यामूळे त्यांचेकडून पूर्ण कारवाई समाप्त झालेली आहे. त्यामूळे तूम्हीच क्लीअरिंग व्हेरिफाय करुन घेणे व धनादेश कूठे जमा झाला याबददल पाहणे अशा आशयाचे पञ दिलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली असताना त्यांनी ती घेतली नाही परंतु त्यांचे पञावरुन हे स्पष्ट होते की, त्यांचेकडून गैरअर्जदार क्र.2 यांना पाठविलेला धनादेश या संबंधीचा रक्कमेचा ड्राफट त्यांनी एस.बी.एच. भोकर न काढता चूकून एस.बी.आय. भोकर यांचेकडे पाठविला. त्यांनी तो संस्पेन्स अकाऊटला जमा करुन घेऊन वापस न करता त्यांचेकडेच ठेवला. या प्रकरणात स्पष्टपणे गैरअर्जदार क्र.1 तसेच एस.बी.आय. भोकर यांची चूक दिसून येते. चूक ही होऊ शकते पण झालेली चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर ती सूधारणे गैरअर्जदार क्र.1 यांचे कर्तव्य असताना याबददल त्यांनी कोणतीही दखल न घेता त्यावीषयी कारवाई करणे आवश्यक असताना त्यांनी काहीच पावले उचलली नाहीत. हीच त्याचे सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी चूकीने जो ड्राफट एस.बी.आय. भोकरला पाठविला तो वापस बोलावून घेऊन नवीन ड्राफट गैरअर्जदार क्र.2 यांचे नांवे पाठवीणे आवश्यक होते असे त्यांनी केले नाही व एस.बी.आय. भोकर यांनी देखील तो चूकीचा ड्राफट वापस न करता त्यांचे संस्पेन्स खात्यात जमा केला यात एस.बी.आय. भोकर यांना दंड लावता आला असता परंतु अर्जदाराने त्यांना पक्षकार केलेले नाही. मूळतः गैरअर्जदार क्र.1 हे दोषी आहेत. त्यांचे चूकीने हा सर्व प्रकार घडलेला आहे. म्हणून अजूनही गैरअर्जदार क्र.1 यांनी एस.बी.आय. भोकर ला पाठविलेला ड्राफट वापस बोलावून घ्यावा. गैरअर्जदार क्र.1 यांचे झालेल्या चूकीमूळे अर्जदार यांना बराच मानसिक ञास सहन करावा लागला यावीषयी वाद नाही. गैरअर्जदार क्र.2 व गैरअर्जदार क्र.3 यात त्यांची काहीही चूक नाही. वरील सर्व बाबी बारकाईने तपाल्यानंतर आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 यांनी धनादेश क्र.016402 यासाठी रु.7500/- चा नवीन ड्राफट काढून अर्जदार यांचे खात्यात जमा होण्यासाठी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठवावा. त्यांनी केलेल्या चूकी बाबत नूकसान भरपाईचे व्याज म्हणून दि.01.05.2008 पासून यावर 9 टक्के व्याज प्रत्यक्ष रक्कम देईपर्यत त्या दिवसापर्यतच्या व्याजासह अर्जदारास दूस-या ड्राफट द्वारे देण्यात यावे. 3. गैरअर्जदार क्र.1 यांचे चूकीमूळे झालेल्या मानसिक ञासा बददल अर्जदारास रु.7500/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- देण्यात यावेत. 4. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे विरुध्द आदेश नाही. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |