तक्रार क्रमांक – 15/2010 तक्रार दाखल दिनांक – 08/01/2010 निकालपञ दिनांक – 01/07/2010 कालावधी - 00 वर्ष 05 महिने 23 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर देवि दयाल नंदन कुंड, नागसेननगर गोकुल निवास, कुंड चाळ, क्रिकरोड, दादोजी कोडदेव समोर, ठाणे(प) 400 601. .. तक्रारदार विरूध्द 1.बिग बाजार कापूरबावडी नाका, ठाणे(प). 2.मैनेजर, नोकीया सर्व्हिस सेंटर, प्रुडेंट टेलीकॉम, सर्व्हिसेस, दुकान नं.4, देवीदर्शन बिल्डिंग, टेंभिनाका, ठाणे(प). .. सामनेवाला
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - मा. अध्यक्षा सौ.भावना पिसाळ - मा. सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - मा. सदस्य उपस्थितीः - त.क स्वतः वि.प. एकतर्फा आदेश (पारित दिः 01/07/2010 ) श्री.पी.एन.शिरसाट – मा.सदस्य यांचे आदेशानुसार 1. तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 नुसार विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीणा केला आहे त्यासंबंधी परिमार्जन करण्यासाठी दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिपतपणे खालील प्रमाणेः- तक्रारदाराने दि.03/09/2006 रोजी विरुध्द पक्षकाराकडुन रु.26,500/- एवढया किंमतीस ''एन.91 नोकिया मोबाईल'' खरेदी केला. तक्रारदार हे व्यवसायाने ठेकेदार आहेत व विरुध्द पक्षकाराचे मोबाईल शॉप असुन ते मोबाईलचा विक्री व्यवसाय करतात. तक्रारदाराने विकत घेतलेला मोबाईल 5 मिनिटे बोलल्यावर गरम होत होता त्यासंबंधी तक्रार केली. विरुध्द पक्षकाराने मोबाईल ठेवुन घेतला, पुन्हा मोबाईल गरम होणे चालुच होते. दि.10/03/2007 रोजी राहुल नावाच्या कर्मचा-याने बॅटरी बदलावी लागेल. बॅटरी बदलली, परंतु मोबाईल गरम होणे बंद झाले नाही. तक्रारदाराने टि.व्हि वर आक्टोबर 2007 रोजी बातमी वाचली की नोकिया मोबाईलची बॅटरी नं.बीएलएससी/37 आहे त्यामध्ये स्पोट होत आहे.
.. 2 .. म्हणुन त्याची तक्रार पुन्हा केली. त्यावेळी दि.01/11/2007 रोजी बॅटरी चॅर्जींगसाठी रु.250/- घेतले व वॉरंटी संपली असल्यामुळे रु.2,900 द्यावे लागतील असे फर्माविले व मोबाईल ठेवुन घेतला. अजुनपर्यंत मोबाईल विरुध्द पक्षकाराकडेच आहे. त्यामुळे तक्रारदाराचे सात (कौन्ट्रक्ट) ठेके हातुन निघुन गेल्यामुळे तक्रारदाराचे रुपये 3,50,000/- नुकसान झाले व अजुनही नुकसान होत आहे. म्हणुन सदरची तक्रार दाखल केली असुन तक्रार मुदतीच्या कायद्याच्या सिमेत आहे व या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा अधिकार आहे. तक्रारदाराची प्रार्थना खालील प्रमाणेः- 1. विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास नविन मोबाईल द्यावा. 2. विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास रु.3,50,000/- मानसिक नुकसानी पोटी भरपाई द्यावी.
2. वरील तक्रारीची मंचाची नोटीस विरुध्द पक्षकारास पाठविली परंतु विरुध्द पक्षकार मंचात हजर झाले नाहीत व लेखी जबाबही दाखल केला नाही म्हणुन विरुध्द पक्षकाराविरुध्द 'No W/S' 'काहीही म्हणणे नाही' असा आदेश पारीत करण्यात आला व प्रकरण एकतर्फा सुनावणीसाठी ठेवण्यात आले. तक्रारदाराने पुरशिस दाखल करून तक्रारीतील प्रतिज्ञालेखासह दाखल केलेले निवेदन हेच लेखी युक्तीवाद समजावे असे प्रतिपादण केले. या तक्रारीसंबंधी एकमेव प्रश्न उपस्थित होतो तो खालील प्रमाणेः- अ) विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी, न्युनता किंवा बेजबाबदारपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय? उत्तर - होय. कारण मिमांसा स्पष्टीकरणाचा मुद्दा अ:- तक्रारदाराचे तक्रारीतील कथन स्वयंस्पष्ट आहे की, दि.03/09/2006 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्षकाराकडुन नोकिया मोबाईल नं. एन.91 हा रु.26,500/- खरेदी केला. परंतु सदरच्या मोबाईलमध्ये उत्पादीत दोष (manufacturing defects) असल्यामुळे तो मोबाईल 5 मिनीटाने गरम होत असे त्याची तक्रार विरुध्द पक्षकाराकडे केली. त्यांनी मोबाईल ठेवुन घेतला. परंतु मोबाईल गरम होण्याचे बंद झाले नाही. पुन्हा राहुल नावाच्या कर्मचा-याने बॅटरी बदलण्याचा सल्ला दिला. बॅटरी बदलली परंतु मोबाईल गरम होणे सुरूच राहिले. टिव्हिवर नोकिया मोबाईल बॅटरीत स्फोट होत आहे व बॅटरी नंबर बी.एल.एस.सी/37/व्हि तसाच नंबर तक्रारदाराच्या बॅटरीचा आहे त्यामुळे विरुध पक्षकाराने बँटरी बदलण्यासाठी तक्रारदाराकडुन रु.250/- वसुल केले व वारंटी कालावधी समाप्त झाला आहे या कारणासाठी त्यासाठी वेगळे रु.2,900/- द्यावे लागतील असे सांगितले व मोबाईल ठेवुन घेतला. मोबाईल तक्रारदारास परत केला नाही. विरुध्द पक्षकाराने तक्रारदारकडुन रक्कम स्विकारल्यामुळे उभयतामध्ये प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रक्ट होता व आहे व उभय पक्षकारामध्ये त्यासंबंधी कन्सिडरेशनही झाले होते व आहे. सबब सदरचा मोबाईल योग्य रितीने दुरूस्त करणे विरुध्द पक्षकाराचे न्यायिक कर्तव्य होते व आहे. परंतु त्यांनी .. 3 .. त्यांचे न्यायिक कर्तव्य पार पाडले नाही म्हणुन त्यांनी सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे निर्विवादपणे स्पष्ट होते. तक्रारदाराची मागणी न्यायोचित व विधियुक्त व नैसर्गिक न्यायाचे दृष्टिकोनानेही योग्य आहे. तक्रारदाराने मानसिक नुकसानीपोटी केलेली रु.3,50,000/- च्या मागणीसाठी कोणतेही लेखा जोखा, विवरणपत्र, कॅश मेमो, पावत्या दाखल केल्या नाहीत त्यामुळे वरील मागणी मान्य करता येणार नाही तथापी मानसिक नुकसानीपोटी रु.5,000/- देणे न्यायोचित होईल असे या मंचास वाटले त्याप्रित्यर्थ हे मंच खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. तक्रार क्र.15/2010 हि अंशःत मंजुर करण्यात येत आहे. 2.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास चालु व योग्य स्थितीतील मोबाईल त्वरीत परत करावा. 3.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास मानसिक नुकसानीपोटी रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) द्यावे. 4.वरील आदेशाची तामिली सही शिक्कयाची प्रत मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्पर करावी (Direct Payment) अन्यथा अन्य दंडात्मक आदेश पारीत करण्याचे अधिकार या मंचास आहेत. 5.वरील आदेशाची साक्षांकित प्रत उभय पक्षकारास निशुल्क द्यावी.
दिनांक - 01/07/2010 ठिकाण - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ. भावना पिसाळत्र (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |