ग्राहक तक्रार क्र. 130/2012
अर्ज दाखल तारीख : 05/06/2012
अर्ज निकाल तारीख: 15/09/2014
कालावधी: 02 वर्षे 03 महिने 10 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सुरेखा सुभाष राठोड,
वय-40 वर्षे, धंदा – घरकाम, रा. अणदुर, ता. तुळजापूर,
जि.उस्मानाबाद.
2. मनीषा नामदेव पवार,
वय-23, धंदा- घरकाम, रा. अणदुर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
3. सचीन सुभाष राठोड,
वय-21, धंदा-शिक्षण, रा. अणदुर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
4. माधूरी सुभाष राठोड,
वय-19, धंदा- शिक्षण, रा. अणदुर, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद.
5. प्रवीण सुभाष राठोड, वय- 17, धंदा-शिक्षण,
अ.पा. अर्जदार क्र. 1 रा. अणदुर, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद.
6. प्रियंका सुभाष राठोड, वय- 15, धंदा- शिक्षण,
अ.पा. अर्जदार क्र.1 रा. अणदुर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखाधिकारी,
न्यु इंडिया असोरन्स कंपनी,
नाईक निवास, शाखा शिवाजी चौक, उस्मानाबाद.
2. शाखाधिकारी,
भारतीय स्टेट बँक शाखा अणदुर,
ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एच.व्ही.शेरकर.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी. दानवे.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : एकतर्फो.
निकालपत्र
मा. सदस्य, श्री.मुकुंद बी. सस्ते यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार क्र.1 ही अर्जदार क्र. 2 व 6 ची आई आहे. अर्जदार क्र. 5 व 6 अज्ञान असुन ते अर्जदार क्र.1 च्या पालनाखाली आहेत. अर्जदार क्र.1 ते 6 हे मयत सुभाष लिंबाजी राठोर यांचे कायदेशीर वारस आहेत. मयत सुभाष राठोड यांनी विप क्र.2 कडून कर्ज घेवून हिरो होण्डा पॅशन ही मोटार सायकल खरेदी घेतली आहे. सदर मोटार सायकल क्र.एस.एच.25/एस-1181, दि.08/07/2008 रोजी खरेदी केली. सदर वाहनाच्या विमा हप्त्यापोटी रु.1,100/- चा डीडी क्र.308882 दि.03/08/2009 विप क्र.1 कडे सदर कर्जावू घेतलेल्या वाहनाच्या विमा हत्याकरीता पाठविला. सदर विम्याचे नुतनीकरण विप क्र.1 यांनी केलेले आहे.
दि.08/11/2009 रोजी सदर मोटार सायकल सुभाष राठोड चालवित असतांना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्याबाबत पोलीस कारवाई झाली. विप क्र.2 यांना दि.03/08/2009 रोजी पैसे भरुनही विप क्र.1 यांनी पैसे घेवनूही पॉलीसीचे नुतनीकरण केले नाही किंवा विप क्र.2 यांनी नुतनीकरण करुन घेतले नाही. सदर विमा पॉलीसी हप्त्यापोटी दि.03/08/2009 रोजी सुभाष राठोड यांच्या खातेत रक्कम कमी केली आहे. सदर अपघाताच्या विमा दाव्यापोटी रु.23224.35 ची मागणी करीता नुकसानीची पाहणी करण्याकरीता व दि.21/02/2011, 27/12/2011, 06/01/2012 तोंडी व 06/01/2012 रोजी रजिष्टर पोष्टाने अर्ज केला असता विपने आमच्याकडे गाडीची पॉलीसी नव्हती असे म्हणून पाहणी करण्याचे नाकारले व विमा दावा नाकारला. म्हणून वकीलामार्फत नोटीस दिली. सदर तक्रारदाराने दि.20/01/2012 रोजी सदर गाडीची दुरुस्ती केली आहे त्याचे बिल रु.23,222/- झाले असून व्याजासह दि.03/08/2009 पासून देण्याचे, तसेच तक्रारीचा खर्च रु.5,000/- विपकडून देण्याबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत पोस्टाची पावती अर्ज प्रत, लक्ष्मी अॅटोमोबाईलचे बील, निकाल प्रत 346/2010, अर्ज दि.06/01/2012 , घटनास्थळ पंचनामा, आर.सी. बुक प्रत, बँकेची प्रत, पॉलीसी प्रत, पासबुक प्रत ई. कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.05/11/2012 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे.
तक्रारदाराने नमुद केलेल्या मोटारसायकल विमा विप क्र.1 यांच्याकडून घेतलेला नव्हता उलटपक्षी सदर विमा ओरीएंटल इन्शुरन्स कं. लि. कडून घेतला होता. त्यामुळे ओरीएंटल इन्शरन्स कं. लि. यांनी दिलेल्या पॉलीसीचे नुतनीकरण या ओ. पी. क्र. 1 यांनी करण्याचा पश्नच उदभवत नाही. सबब तक्रारदाराचे कथन की, प्रथम पॉलीसीची मुदत संपल्या नंतर त्या पॉलीसीचे पुन्हा नुतनीकरण करुन घेतले हे तक्रारदाराने सिध्द करावे. सदर विमा पॉलीसी नुतनीकरण करण्याकामी धनाकर्ष क्र.308882 विप क्र.1 कडे पाठविला व विप क्र. 2 यांनी पुन्हा नुतनीकरण केले हे अमान्य आहे. सदर वाहनाचे झालेले नुकसान व दुरुस्तीबाबत विपस माहीती नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी. असे नमूद केले आहे.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांना नोटीस मिळाल्यानंतरही त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांच्या विरुध्द दि.15/09/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत झाले.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? विप क्र. 2 पुरता होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? विप क्र. 2 पुरता होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? विप क्र.2 पुरता होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
5) निष्कर्षाचे विवेचन
मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर :
तक्रारदार हे मयत सुभाष लिंबाजी राठोड यांचे वारस असून त्यांनी तक्रार ही मयत यांचे विमा दायीत्व आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार त्यांनी बँके मार्फत दि.03/08/2009 रोजी विमा पॉलीसीची नोंदणी करण्याकरीता डि.डि. ने पैसे विप क्र.1 यांच्याकडे जमा केला आहे. तथापि त्यांना जी पॉलीसी क्र.15130531090100200063 या अन्वये क्र.एम.एच.25/एस-1181, या वाहनाकरीता पॉलीसी मिळाली आहे. सदर पॉलीसीचा कालावधी दि.10/11/2009 ते 09/11/2010 अशी आहे व मयताचा मृत्यू हा दि.08/11/2009 रोजी झालेला असल्यामुळे विमा कंपनीने सदरचा दावा ना मंजूर केलेला आढळून येतो. विप क्र.1 ने दिलेल्या लेखी उत्तरात ओपी क्र.1 कडून घेण्यात आलेली सदरची पॉलीसी ही दि.08/11/2009 रोजी मयत सुभाष रोठाड यांचेबददल माहीती न होवू देता प्राप्त केलेली आहे व फसवून केलेला करार हा वैध करार असू शकत नाही. दि.08/11/2009 रोजी विप क्र.1 यांनी पॉलीसी दिलेली नसल्यामुळे विप क्र.1 वर सदर विम्याबाबत कसलीही जबाबदारी येवू शकत नाही. तथपि दि.03/09/2009 रोजी मयत यांच्याकडे बँकेकडून इन्शूरंन्स रिनीवलसाठी ओपी बँकेने रु.1100/- डेबीट केल्याचे स्पष्ट दिसुन येते व ही तारीख मृत्यूच्या कितीतरी आधीची आहे. त्यामुळे तक्रारदाराने फसवणूक केली आहे असे म्हणता येणार नाही. त्याच बरोबर या पुर्वीच पॉलीसी जी विमा कंपनीची होती याच बरोबर सदर रक्कम मोटारसायकल विमा नोंदणीसाठी होती किंवा नाही याबाबत अधिकचा पुरावा म्हणून दि.23/12/2009 चे विप क्र.2 चे पत्रावरुन स्पष्ट होते. सदर पत्रावरुन ही रक्क्म इन्शूरंन्स नोंदणीसाठी होती त्यामुळे पॉलीसीचे कव्हरेज (कोणत्याही विमा कंपनीचे) तक्रारदाराला दि.03/08/2009 रोजी पासून म्हणजेच तक्रारदाराच्या खात्यातुन सदरची रक्कम वजा झाल्या नंतर मिळाणे अपेक्षीत होते तथापि विप क्र.2 ने याबाबत व्यवस्था केल्याचे आढळून येते. तसेच विप क्र.2 ने सदरची रक्कम कोठे गुंतवली अथवा कोणत्या इन्शूरन्स कंपनीकडे वर्गीकृत केली हे रेकॉडवर दिसुन येत नाही. त्यामुळे विप क्र.1 चे असे म्हणणे की, हा बँक ड्राफ्ट ओपी क्र.1 कडे दाखल करण्यात आलेला नाही व दि.08.11.2009 रोजी सुभाष राठोड यांचे अपघाती निधन झाले नंतर हा ड्राफ्ट दि.10/11/2009 रोजी सादर करुन संबंधीत मोटरसायकल बाबत विमा पॉलीसी दि.10/11/2009 रोजी वर नमूद केले नुसार वस्तुस्थिती लपवून व फसवणुक करुन घेण्यांत आली आहे. त्यामुळे संपुर्ण प्रकरणामध्ये विप क्र.2 चा निष्काळजीपणा स्पष्टपणे निदर्शनास येतो तसेच विप क्र.1 ला मिळालेली इन्शुरन्स रक्कम ही कोणामार्फत मिळाली हे जाणीवपुर्ण्वक सांगितलेली दिसुन येत नाही. व त्यामुळे विप क्र.1 ची जर फसवणूक झाली तर ती विप क्र.2 नेच केली असे म्हणावे लागेल. कारण विप क्र.1 च्या म्हणण्यामध्ये कायदयानुसार विमा कंपनीकडे रक्कम जमा होत नाही तोपर्यंत इंन्शुरन्स अॅक्ट कलम 64 बी नुसार विप क्र.1 दि.10/11/2009 पुर्वी कायदेशीर दायीत्वाच्या आधारावर करार होवू शकत नाही. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणामध्ये विप क्र.2 चा निष्काळजीपणा स्पष्ट होतो व सदरची रक्कम ही तक्रारदाराचे नुकसान विप क्र.2 च्या निष्काळजीपणामुळे झाला. त्यामुळे तक्रारदाराच्या नुकसानीस विप क्र.2 हेच जबाबदार असल्यामुळे तक्रारदाराच्या गाडीची नुकसान भरपाई रु.23,224/- दि.05/03/2012 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज दरासह देण्याची तक्रारदाराची मागणी संपूर्णपणे मान्य करण्यात येते.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.2 यांनी तक्रारदारास रु.23,224/- (रुपये तेवीस हजार दोनशे चोवीस फक्त)
झालेल्या नुकसान भरपाईपोटी दयावे.
3) विप क्र.2 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
4) विरुध्द पक्षकार क्र.2 यांनी तक्रारदारास झालेल्या तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/-
(रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
5) वरील रक्कम विप क्र.3 यांनी तक्रारदारास 45 दिवसात देवून तसा अहवाल दोन्ही
पक्षकाराने मंचा समोर सादर करावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.