Maharashtra

Nanded

CC/10/190

Chadrabai Shyamrao Jadhav - Complainant(s)

Versus

Manager, National Insurance co. - Opp.Party(s)

B.V. Bhure

12 Jan 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/190
1. Chadrabai Shyamrao JadhavKrusnur tal.NaigaonNandedNanded ...........Appellant(s)

Versus.
1. Manager, National Insurance co.Fort,mumbaiMumbai Maharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :B.V. Bhure, Advocate for Complainant

Dated : 12 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/190
                          प्रकरण दाखल तारीख - 03/08/2010
                          प्रकरण निकाल तारीख 12/01/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.      
 
चंद्राबाई भ्र.श्‍यामराव जाधव
वय 60 वर्षे, धंदा घरकाम                                अर्जदार
रा. कृष्‍णूर ता.नायगांव जि. नांदेड
     विरुध्‍द.
1.   व्‍यवस्‍थापक
     नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.             
     स्‍टलिंग सिनेमा बिल्‍डींग, दुसरा मजला,
65 मर्झबान रोड, डि.ओ.14 ख फोर्ट, मुंबई 400 001
2.   नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.                        गैरअर्जदार मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,
     शाखा नगिना घाट रोड, नांदेड.                                  
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.बी.व्‍ही. भुरे
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील  -  अड.रेयाजूल्‍ला खॉन.
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्‍यक्ष )
             अर्जदार चंद्राबाई मयत श्‍यामराव संभाजी जाधव यांची पत्‍नी आहे. मयत श्‍यामराव हे शेतकरी व्‍यवसाय करुन त्‍यांचे कूटूंबीयाचे व त्‍यांचे पालनपोषन करीत होते. त्‍यांचे नांवे शेत गट नंबर 538 मध्‍ये क्षेञफळ 65 आर आणि स्थित मौजे कृष्‍णूर येथे आहे. महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यास व त्‍यांचे कूटूंबियास सामाजिक न्‍याय देण्‍याच्‍या हेतूने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना सूरु केली होती. त्‍यामध्‍ये मयत श्‍यामराव यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 व 2 मार्फत उतरविण्‍यात आला आहे. सदर विम्‍याचा कालावधी दि.15.07.2006 ते 14.07.2007 असा होता. अर्जदाराचे पती दि.23.12.2006 रोजी जनावरे चारण्‍यासाठी शेताकडे गेले व जनावरे चारुन दूपारी 12 ते 12.30 वाजताचे सुमारास गावाजवळील तलावात
 
जनावरांना पाणी पाजण्‍यासाठी येत असताना नायगांव कडून नांदेडकडे येणा-या पोपटी रंगाच्‍या अज्ञात ट्रव्‍हल्‍सच्‍या ड्रायव्‍हरने धडक दिल्‍यामूळे अर्जदाराचे पती जागेवरच मरण पावले. सदर घटना ही नांदेड ते हैद्राबाद जाणा-या राज्‍या मार्गावर मौजे कृष्‍णूर एमआयडीसी येथे घडली. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायतचे मृत्‍यू प्रमाणपञ, मरणोत्‍तर पंचनामा इत्‍यादी आवश्‍यक त्‍या सर्व नियमानुसार कागदपञासह शेतकरी अपघात विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज केला. पण आजपर्यत अर्जदारास कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही म्‍हणून अर्जदारास हा अर्ज घेऊन मंचात यावे लागले. अर्जदाराने अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्‍टेशन कूंटूर येथे गुन्‍हा नंबर 81/2006 कलम 279, 304 (अ) द्वारे नोंदविली आहे. घटनास्‍थळ पंचनामा व तपास केला. अर्जदाराने अर्जासोबत एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा, 7/12 उतारावरील होल्‍डींग, नमूना नं.8 चा उतारा, 6 क चा उतारा,वारसा प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. नूकसान भरपाई म्‍हणून रु.1,00,000/- व त्‍यावर सन 2006 पासून 18 टक्‍के व्‍याजाने मागणी केली आहे. तसेच अर्जदारास झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. ज्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे अर्जदार ही मयत श्‍यामराव यांची पत्‍नी होती याबददल कोणताही पूरावा दाखल केलेला नाही किंवा वारसा प्रमाणपञ दाखल केलेले नाही. तसेच कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. मयत श्‍यामराव हे शेतकरी आहेत याबददल ही पूरावा दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी वर्ष 2009 चा 7/12 उतारा दाखल केला आहे, घटना ही वर्ष 2006 मध्‍ये झाली आहे त्‍यामूळे अर्जदार यांनी त्‍या वर्षाचा 7/12 दाखल करणे आवश्‍यक होते.  तसेच मयत श्‍यामराव यांनी प्रत्‍यक्षरित्‍या गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे पॉलिसी उतरविलेली नाही. मयत श्‍यामराव हे दि.23.12.2006 रोजी जनावरे चारण्‍यासाठी शेताकडे गेले व जनावरे चारुन दूपारी 12 ते 12.30 वाजताचे सुमारास गावाजवळील तलावात जनावरांना पाणी पाजण्‍यासाठी येत असताना नायगांव कडून नांदेडकडे येणा-या पोपटी रंगाच्‍या अज्ञात ट्रव्‍हल्‍सच्‍या ड्रायव्‍हरने धडक दिल्‍यामूळे अर्जदाराचे पती जागेवरच मरण पावले, हे अर्जदाराने सिध्‍द केलेले नाही. अर्जदाराचा अर्ज ते मान्‍य करु शकत नाही. तसेच त्‍यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही
 
 
 
 
म्‍हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह अमान्‍य करण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे.         
              अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 व 2  यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात.
              मूददे                                      उत्‍तर
1.   अर्जदार ग्राहक आहेत काय ?                             होय.
2.   गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्‍कम देण्‍यास
     बांधील आहेत काय ?                                होय.
3.   काय आदेश      ?                           अंतिम आदेशाप्रमाणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांनी ग्रामपंचायत चे मृत्‍यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच तलाठी यांनी गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्‍ये मृत भोगवटदाराचे नांव श्‍यामराव संभाजी जाधव दाखवलेले आहे. ज्‍यामध्‍ये चंद्रकलाबाई ही श्‍यामराव यांची पत्‍नी आहे असे लिहीलेले आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत श्‍यामराव यांचे वारस आहेत हे सिध्‍द झालेले आहे. अर्जदार ही मयत श्‍यामराव यांची पत्‍नी आहे हे सिध्‍द होत असल्‍यामूळे मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार ही मयत श्‍यामराव यांचे नांवावर शेती असल्‍याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्‍यामध्‍ये मयत श्‍यामराव यांचे नांवावर शेत जमीन असल्‍याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत श्‍यामराव हे दि.23.12.2006 रोजी जनावरे चारण्‍यासाठी शेताकडे गेले व जनावरे चारुन दूपारी 12 ते 12.30 वाजताचे सुमारास गावाजवळील तलावात जनावरांना पाणी पाजण्‍यासाठी येत असताना नायगांव कडून नांदेडकडे येणा-या पोपटी रंगाच्‍या अज्ञात ट्रव्‍हल्‍सच्‍या ड्रायव्‍हरने धडक दिल्‍यामूळे अर्जदाराचे पती जागेवरच मरण पावले हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्‍ये मृत्‍यूबदल पूरावा दाखल केला नाही म्‍हणून अमान्‍य केला आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्‍यामध्‍ये अर्जदाराचा मृत्‍यू हा ट्रव्‍हल्‍सने  धडक बसून झालेला होता अशी माहीती पोलिस स्‍टेशन कृष्‍णूर  येथे दिलेली आहे. त्‍याबददल जवाब घेण्‍यात आला व घटनास्‍थळ पंचनामा दाखल केला. त्‍याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्‍यामूळे मयत श्‍यामराव हे ट्रव्‍हल्‍सची धडक बसल्‍यामूळे जागीच मरण पावले हे सिध्‍द
 
 
झालेले आहे. सन 2006-07 मध्‍ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्‍यक्‍तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्‍यांचा विमा हप्‍ता महाराष्‍ट्र शासनाने भरला आहे. यामध्‍ये श्‍यामराव यांचा सहभाग असल्‍यामूळे व अर्जदार ही त्‍यांची पत्‍नी असल्‍यामूळे ती प्रत्‍यक्षरित्‍या जरी नाही तरी अप्रत्‍यक्षरित्‍या अर्जदार ही ग्राहक आहे. त्‍यामूळे अर्जदार ही विमा रक्‍कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्‍यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्‍यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्‍याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. दि.23.12.2006 रोजी घटना घडली आहे व त्‍याबददलची कागदपञे तहसील कार्यालय नायगांव यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना विम्‍याची रक्‍कम दिली नाही. वरील सर्व कागदपञ सिध्‍द झाल्‍याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्‍कम रु.1,00,000/- एक महिन्‍याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                                                आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्‍कम दयावी.
3.                                         मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
4.                                         वरील सर्व रक्‍कम एक महिन्‍याचे आंत न दिल्‍यास, एक महिन्‍यानंतर संपूर्ण रक्‍कमेवर 9 टक्‍के व्‍याज पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दयावे लागेल.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                         श्रीमती सुवर्णा देशमूख          
            अध्‍यक्ष                                                   सदस्‍या

 


[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT