Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/10/180

Shri Ruprao Gulabrao Wasnik - Complainant(s)

Versus

Manager, Nangiya Motars - Opp.Party(s)

Adv.C.P. Chandurkar

28 Mar 2011

ORDER


importMahashtraNagpur
Complaint Case No. CC/10/180
1. Shri Ruprao Gulabrao WasnikHouse No.96,Ward No.6,Near PanchshilBalwadi,Ambedkar Nagar, Wadi,NagpurNagpurM.S. ...........Appellant(s)

Versus.
1. Manager, Nangiya MotarsC-7,MIDC,Hingna Road,NagpurNagpurM.S.2. Manager,Tata Motars Finance Ltd.,Saybar Tek House,first floor,Plot No.B-63-65 To Savant Road,Wagle Estate,Thane-400604ThaneM.S. ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri V. N. Rane ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :

Dated : 28 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्‍या)
-///   आ दे श   ///- 
(पारीत दिनांक 28 मार्च, 2011)
    तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
    प्रस्‍तूत प्रकरणातील तक्रारदाराचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार नं.1 यांचेकडून टाटा कंपनीचे 909 क्र.एमएच—40 5560 हे वाहन दिनांक 5/9/2006 रोजी एकूण रक्‍कम रुपये 7,04,000/- एवढा मोबदला देऊन खरेदी केले होते. सदर रकमेपैकी रुपये 6 लक्ष एवढी रकमेचे गैरअर्जदार नं.2 यांचेकडून वित्‍तीय सहाय्य घेतले होते व वाहन सदर कर्जापोटी गहाण ठेवले होते. तक्रारदार व गैरअर्जदार नं.2 यांचेत झालेल्‍या कराराप्रमाणे सदर कर्जाची परतफेड प्रतिमाह रुपये 15,700/- याप्रमाणे 47 किस्‍तींमध्‍ये तक्रारदाराने गैरअर्जदारास करावयाची असे ठरले होते. तक्रारदार सदर किस्‍ती गैरअर्जदार नं.1 यांचेकडे जमा करीत होते व त्‍याच्‍या पावत्‍या गैरअर्जदार नं.1 हे तक्रारदारास देत होते. तक्रारदार शेवटची किस्‍त भरण्‍यासाठी गैरअर्जदाराकडे गेला असता त्‍यांनी सदर किस्‍त भरुन घेऊन सदर वाहनाचा बोझा उतरविण्‍यासाठी व नाहरकत प्रमाणपत्र मिळावे म्‍हणुन गैरअर्जदार नं.1 यांना विनंती केली असता त्‍यांनी गैरअर्जदार नं.2 यांचेशी संपर्क करण्‍यास सांगीतले व गैरअर्जदार नं.2 यांचे खात्‍याप्रमाणे तक्रारदाराकडे रुपये 69,486/- एवढी रक्‍कत तक्रारदाराकडे बाकी आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदार नं.2 यांना नोटीस पाठवून बोझा कमी करण्‍यासाठी व नाहरकत प्रमाणपत्र देण्‍याबाबत विनंती केली असता, तक्रारदारास असे कळले की, गैरअर्जदार नं.2 यांनी गैरअर्जदार नं.1 यांचेकडे तक्रारदाराची पाचवी किस्‍त वळती केली नाही म्‍हणुन रक्‍कम शिल्‍लक झाली असे कळविले. तक्रारदाराने दिनांक 4/11/2010 रोजी सत्‍तेचाळीसावी अंतीम मासिक किस्‍तचा रुपये 15,700/- चा चेकद्वारे भरणा केला. वास्‍तविक तक्रारदाराने गैरअर्जदार यांना संपूर्ण 47 किस्‍तींचा भरणा केलेला असूनही गैरअर्जदार यांनी अद्यापपर्यंत तक्रारदारास बोझा कमी करुन नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही ही गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेल्‍या सेवेतील कमतरता आहे तक्रारदाराने गैरअर्जदार यांनी वाहनावरील बोझा कमी करुन नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, नुकसान भरपाई रुपये 2 लक्ष आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रुपये 10,000/- मिळावे अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
    तक्रारदाराने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत पैसे भरल्‍याच्‍या पावत्‍या, नोटीस, पोसटाची पावती व पोचपावती, नोटीसचे उत्‍तर, हिशेबाचा उतारा, नाहरकत प्रमाणासाठी केलेला अर्ज, इत्‍यादी दस्‍तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत.
           सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्‍यात आली. त्‍यावरुन हजर होऊन गैरअर्जदार नं.2 यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केलेला आहे. गैरअर्जदार नं.1 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते मंचासमक्ष हजर झाले नाही वा त्‍यांचा लेखी जबाब सुध्‍दा दाखल केला नाही, म्‍हणुन त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 14/2/2011 रोजी पारीत करण्‍यात आला.
         गैरअर्जदार नं.2 यांचे कथनानुसार सदर तक्रारीस व्‍यावसायिक तत्‍वाची बाधा येते. तसेच उभय पक्षांमधील कराराप्रमाणे उद्भवलेल्‍या वादाचा निवाडा करण्‍याचा अधिकार मुंबई येथील न्‍यायालयास दिलेला आहे, त्‍यामुळे या मंचाला सदरची तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. तसेच तक्रारदाराचे सदर वाहन कर्जापोटी गहाण घेतल्‍याचे तक्रारदाराचे म्‍हणणे मान्‍य केलेले आहे.  
   गैरअर्जदार नं.2 यांनी तक्रारदाराने सदरचे वाहन खरेदी केल्‍याचे तसेच त्‍यांचे कडून रुपये 6 लक्ष एवढे वित्‍तीय सहाय्य घेतल्‍याचे तक्रारदाराचे म्‍हणणे मान्‍य केलेले आहे. गैरअर्जदाराचे मते उभय पक्षांमध्‍ये झालेल्‍या करारानुसार सदर रकमेची परतफेड रुपये 15,700/- प्रतिमाह याप्रमाणे 47 किस्‍तीत दिनांक 2/8/2010 पर्यंत गैरअर्जदार नं.1 यांचेकडे जमा करावयाची असे ठरलेले होते. आजपर्यंत तक्रारदाराने रुपये 15,700/- प्रमाणे 46 किस्‍तीत रुपये 7,34,385/- एवढ्या रकमेचा भरणा केलेला आहे व तो कराराप्रमाणे प्रत्‍यक्षात त्‍यांचेकडे केला नाही. गैरअर्जदार यांचे कथनानुसार तक्रारदाराने गैरअर्जदारास नोटीस पाठविली होती त्‍याचे उत्‍तरास तक्रारदाराकडे थकबाकी असलेली रक्‍कम भरुन नाहरकत प्रमाणपत्र घेण्‍यास सूचविले होते. तक्रारदाराकडून पाचव्‍या किस्‍तीची रककम अद्यापपावेतो गैरअर्जदार नं.2 यांना प्राप्‍त झाली नाही, त्‍यामुळे ती भरण्‍यास तक्रारदार जबाबदार आहे. तक्रारदाराने लेखी वा प्रत्‍यक्ष भेटून उर्वरित रकमेचा भरणा करुन वाहनाचा बोझा कमी करण्‍याची कधिही विनंती केलेली नव्‍हती तक्रारदाराने सदरच्‍या मासिक किस्‍ती कराराप्रमाणे कधीही वेळेत अदा केलेल्‍या नाहीत, त्‍यामुळे लेट पेमेंट चार्जेस, चेक बाऊसिंग चार्जेस व करारातील अटींप्रमाणे इतर चार्जेस घेण्‍याचे अधिकार गैरअर्जदारास आहेत. दिनांक 24/2/2011 रोजी रुपये 18,782/- एवढी रक्‍कम तक्रारदार देणे लागतात आणि ती मिळाल्‍यानंतरच सदर कर्जाचे नाहरकत प्रमाणपत्र व कर्ज संपल्‍याचे प्रमाणपत्र दिल्‍या जाऊ शकते. तक्रारदाराने कर्जाच्‍या पाचव्‍या किस्‍तीची रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडे भरल्‍याची माहिती नसल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार नं.2 यांनी तक्रारदारास दिलेल्‍या सेवेत कुठलिही कमतरता ठेवली नाही, म्‍हणुन त्‍यांचेविरुध्‍द सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मंचास विनंती केली आहे.  
         गैरअर्जदार नं.2 यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल केले असून, सोबत करारा संबंधी डिटेल्‍स व किस्‍तीचा हिशेब दर्शविणारा तक्‍ता असे मंचासमक्ष दाखल केले आहेत.
// का र ण मि मां सा //
    प्रस्‍तूत प्रकरणातील एकंदरीत वस्‍तूस्थितीचा विचार करता असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारदाराने सदरचे वाहन स्‍वतःचे उदरनिर्वाहासाठी घेतलेले असल्‍यामुळे त्‍यास व्‍यावसायिक तत्‍वाची बाधा येत नाही. तसेच ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 3 प्रमाणे या मंचास सदर तक्रार चालविण्‍याचा अधिकार आहे.
   निर्विवादपणे तक्रारदाराने गैरअर्जदार नं.1 यांचेकडून सदर टाटा कंपनीचे वाहन एकूण रक्‍कम रुपये 7,04,000/- एवढ्या मोबदल्‍यात खरेदी केले होते. सदर रकमेपैकी रुपये 6 लक्ष एवढी रककम तक्रारदाराने गैरअर्जदार नं.2 यांचेकडून वित्‍तीय सहाय्यापोटी घेतली होती व सदर रकमेपोटी गैरअर्जदार नं.2 यांनी सदरचे वाहन गहाण ठेवलेले होते. तक्रारदार व गैरअर्जदार नं.2 या उभयतांमध्‍ये झालेल्‍या करारानुसार सदरचे कर्जाच्‍या रकमेची परतफेड प्रतिमाह रुपये 15,700/- प्रमाणे एकूण 47 किस्‍तीत तक्रारदाराने अदा करावयाची असे ठरले होते. कागदपत्र क्र.8 वरील पावत्‍यांचे अवलोकन केले असता तक्रारदाराने एकूण 47 किस्‍ती अदा केलेल्‍या होत्‍या व त्‍यातील शेवटची किस्‍त दिनांक 4/11/2010 रोजी तक्रारदाराने अदा केलेली होती. गैरअर्जदार नं.2 यांचे मते तक्रारदाराने पाचवी किस्‍त तक्रारदाराने अदा केली नाही. एवढेच नव्‍हे, तर अदा केलेल्‍या किस्‍ती सुध्‍दा कराराप्रमाणे वेळेत अदा केलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदार कराराप्रमाणे लेट पेमेंट, चेक बाऊसिंग चार्जेस व इतर चार्जेस देण्‍यास तक्रारदार जबाबदार आहे. दाखल पावत्‍यावरुन तक्रारदाराने सदरच्‍या किस्‍ती या गैरअर्जदार नं.1 यांचेमार्फत गैरअर्जदार नं.2 यांना दिलेल्‍या होत्‍या व गैरअर्जदार नं.2 यांनी स्विकारलेल्‍या होत्‍या. गैरअर्जदार नं.1 यांनी तक्रारदारास पावत्‍या देखील दिल्‍या होत्‍या. यावरुन असे दिसते की, गैरअर्जदार नं.1 मार्फत पैसे स्विकारण्‍याची ही पध्‍दत गैरअर्जदार नं.2 यांनी स्विकारली असल्‍यामुळे गैरअर्जदार नं.2 यांचे म्‍हणणे की, तक्रारदाराने सदरच्‍या रकमा कराराप्रमाणे प्रत्‍यक्ष त्‍यांना अदा करावयाच्‍या होत्‍या, हे म्‍हणणे संयुक्तिक होणार नाही.
   कागदपत्र क्र.8 वरील पावत्‍या पाहता, तक्रारदाराने कर्जफेडीच्‍या रकमेपैकी पाचवी किस्‍त गैरअर्जदार नं.1 यांना अदा केली व त्‍यांनी सदर पावती तक्रारदारास दिली होती. दाखल दस्‍तऐवजांवरुन असेही दिसून येते की, गैरअर्जदार नं.1 यांनी सदरची किस्‍त गैरअर्जदार नं.2 यांचेकडे पाठविलेली नाही. कर्जाच्‍या रकमेचा हप्‍ता गैरअर्जदार नं.1 यांचेमार्फत गैरअर्जदार नं.2 यांना देण्‍याची वरील पध्‍दत लक्षात घेता, गैरअर्जदार नं.2 यांना किस्‍तीचा पाचवा हप्‍ता मिळालेला आहे असे समजण्‍यात येते. त्‍यामुळे त्‍यावर कुठलेही दंडव्‍याज देण्‍याची जबाबदारी तक्रारदाराची नाही. गैरअर्जदार नं.1 यांनी गैरअर्जदार नं.2 यांना तक्रारदाराकडून प्राप्‍त झालेला कर्जाचा पाचवा हप्‍ता पाठविलेला नाही, त्‍यामुळे तक्रारदारास त्रास सहन करावा लागला, ही त्‍यांनी तक्रारदारास दिलेल्‍या सेवेत कमतरता ठेवली आहे. गैरअर्जदाराने तक्रारदार यांचेकडून एकूण रक्‍कम रुपये 18,782/- एवढी रक्‍कम येणे असल्‍याचे म्‍हंटलेले आहे, परंतू गैरअर्जदार व तक्रारदार यांचेमध्‍ये झालेला करारनामा गैरअर्जदार नं.2 यांनी या मंचासमोर दाखल केला नाही. तसेच दाखल केलेले स्‍टेटमेंट कोणत्‍याही प्रकारे प्रमाणित केलेले नाही. त्‍यामुळे तक्रारदाराकडून रुपये 18,782/- हे कुठल्‍या आधारावर आकारलेले आहे हे स्‍पष्‍ट होत नाही. दाखल दस्‍तऐवज व पावत्‍यांवरुन तक्रारदाराने गैरअर्जदार यांना संपूर्ण 47 किस्‍ती अदा केलेल्‍या आहेत. असे असताना देखील तक्रारदाराकडे पाचवा हप्‍ता देय आहे असे सांगून त्‍यावर दंडव्‍याज लाऊन रक्‍कम मागण्‍याची, तसेच कुठल्‍याही सुस्‍पष्‍ट आधाराशिवाय दंडव्‍याजापोटी वेगवेगळ्या रकमा मागण्‍याची व त्‍याआधारे तक्रारदारास नाहरकत प्रमाणपत्र न देण्‍याची कृती ही सेवेतील कमतरता आहे असे मंचाचे मत आहे.  
   वरील सर्व बाबी लक्षात घेता, हे मंच खालीप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-/// अं ती म आ दे श ///-
1)      तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)      गैरअर्जदार नं.2 यांनी आठ दिवसांचे आत वाहनावर चढविलेला बोझा कमी करण्‍याची कारवाई करावी आणि तक्रारदारास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे व तक्रारदाराकडून कुठलेही चार्जेस, दंडव्‍याज इत्‍यादी घेण्‍यात येऊ नयेत.
3)      गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्‍या तक्रारदारास नुकसान भरपाई व इतर मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- आणि दाव्‍याचे खर्चापोटी रुपये 2,000/- याप्रमाणे एकूण रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) एवढी रक्‍कम द्यावी.

गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी उपरोक्‍त आदेश क्र.3 चे पालन त्‍यांना आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.


[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT