नि. २८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या : श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१९५९/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ९/७/२००९
तक्रार दाखल तारीख : २६/९/२००९
निकाल तारीख : २४/८/२०११
-------------------------------------------
श्री रावसाहेब शिवगोंडा मंगसुळी
वय वर्षे – ४०, धंदा – शेती
रा.कन्या शाळेच्या मागे, मु.पो.जत,
ता.जत जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. मॅनेजर
नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
कवठेमहंकाळ, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
२. श्री शिवलिंग चन्नय्या स्वामी (चेअरमन)
रा.नागज, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
३. श्री नारायण यशवंत पवार (व्हा.चेअरमन)
रा. रांजणी ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
४. श्री गणपती आप्पासो सगरे (संचालक)
रा.कवठेमहंकाळ, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
५. श्री सुहास शिवाजी पाटील
रा.आगळगांव, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
६. श्री सुकुमार बाबा कोठावळे
रा.कवठेमहंकाळ, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
७. श्री विश्वनाथ विठोबा कोळेकर
रा.निमज, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
८. श्री आण्णाप्पा लिंगाप्पा साबळे
रा.हिंगणगाव, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
९. श्री सत्यवान परशुराम कुंभारकर
रा.शिंदेवाडी (एम), ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
१०. श्री दत्तात्रय कृष्णा माळी
रा.कोकळे, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
११. श्री रामचंद्र सुखदेव जगताप
रा.अग्रण धुळगाव, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
१२. श्री शहाजी रामचंद्र एडके
रा.म्हैशाळ (एम), ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
१३. सौ संगिता संभाजी बजबळे
रा.धबडेवाडी, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली
१४. श्री विश्वास भगवान पवार
रा.देशिंग, ता.कवठेमहंकाळ, जि.सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷. पी.जे.तरंगे
जाबदार क्र.१ ते १४ : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- सदस्या : श्रीमती सुरेखा बिचकर
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार सोसायटीने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.कवठेमहंकाळ (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘सोसायटी’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम दामदुप्पट ठेवी अंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांच्या ठेवीची रक्कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ५ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. १ ते १४ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
३. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार सोसायटीमध्ये गुंतविल्याबाबतच्या ठेवपावत्यांच्या दोन प्रती नि.२७ चे यादीने दाखल केल्या आहेत. सदरच्या ठेवपावत्या या तक्रारदार यांचेकडील मूळ पावतीवरुन तपासण्यात आल्या. तक्रारदार यांनी ठेवपावती क्र.१५१४ व १५१३ अन्वये दि. २४/९/२००३ रोजी प्रत्येकी रु.२५,०००/- प्रमाणे एकूण रु.५०,०००/- जाबदार यांचेकडे गुंतविल्याचे दिसून येते. सदर ठेवपावतींची मुदत ही दि.२४/९/२००८ पर्यंत आहे. मुदतीनंतर तक्रारदार यांना दोन्ही पावत्यांवर एकूण रक्कम रु.१,००,०००/- मिळावयाची होती. पावतीची मुदत संपूनही जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्कम अदा केली नाही. त्यामुळे तक्रादार यांना मुदतीनंतर परत मिळणारी रक्कम व या रकमेवर ठेवींची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून द.सा.द.शे. १० टक्के दराने व्याज मंजूर करण्यात येत आहे.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र.२ ते १४ या सोसायटीचे संचालकांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून सोसायटीने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या सोसायटीमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती सोसायटीच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
५. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार क्र.१ सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना ठेव पावती क्र.१५१४ व १५१३ वरील मुदतीनंतर परत मिळणारी एकूण रक्कम रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) २५/९/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार क्र.१ सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.८/१०/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: २४/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११