::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार विमा कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार यांचे वडील तमल्ला जालाधर यांचा मृत्यू दि. २९.०८.२०१२ रोजी झाला. अर्जदारचे वडिलांनी गैरअर्जदार क्र. २ चे कार्यालयातून विमा क्र. ९७६९०६८८ रक्कम रु. २,००,०००/- चा करार केला होता. अर्जदाराने वडील तमल्ला जालाधर यांचा मृत्यूनंतर गैरअर्जदार क्र. २ यांच्याकडे विमा रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला. परंतु गैरअर्जदार क्र. १ ने दि. १५ एप्रिल २०१३ अन्वये विमाधारक हे डायबेटीस टाईप २, Hypertension, CAGIW+PWMI या आजाराने २००८ पासून ग्रस्त होते. ही बाब अर्जात नमूद केलेली नाही. त्यामुळे सदर विमा दावा रक्कम अदा केली नाही. अर्जदाराच्या वडिलांना कोणताही रोग नसल्याने विमा करार करतेवेळी सदर बाब नमूद केली नाही. अर्जदाराचे वडील तमल्ला जालाधर यांचा मृत्यू Severe Left Venticular मुळे झाला. विमा रक्कम अदा न केल्याने अर्जदाराने वकिलामार्फत दि. २०.०७.२०१३ रोजी नोटीस पाठवून विमा रक्कमेची मागणी केली. सदर मागणी गैरअर्जदार यांनी अमान्य केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून सामनेवाले यांनी विम्याची रक्कम तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
३. सामनेवाले क्र. १ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, मृतक तमल्ला जालाधर यांनी दि. ३१.०३.२०१० रोजी विमा करार करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये मयतास कोणताही आजार नसल्याबाबत नमुद केले होते. सदर माहिती सत्य असल्याबाबत अर्जदारांनी नमुद केले होते. अर्जदारांना सदर करारातील माहिती असत्य असल्यास विमा करार अवैध ठरेल हे मान्य केले होते. त्याचप्रमाणे विमा धारकांने गैरअर्जदार यांचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी दिली. मृतक विमाधारकाच्या उत्तरावर विश्वास ठेवुन गैरअर्जदार यांनी विमा करार केला. परंतु दिनांक २९/०८/२०१२ रोजी केअर हॉस्पीटल, हैद्राबाद येथे त्यांच्या मृत्यु झाल्याचे पत्र दिनांक १०/१२/२०१२ रोजी गैरअर्जदारास प्राप्त झाले. सदर पत्रामध्ये मृत्युचे कारण हृदय विकार होते. अर्जदाराने दवाखान्याचे उपचाराचे प्रमाणपत्र सादर केले. त्याप्रमाणे विमाधारकास दवाखान्यात भर्ती होण्यापुर्वी Diabetis Melitous, HTN, Caplwpwmi Zvd आजार असल्याचेनमुद आहे. तसेच मेडीकल अटेंडन्स यांनी मयताचे मृत्युचे कारण Severe Left Venticular Failure हे दिले आहे. तसेच मृत्युसमरी व मृत्यु अहवाल दाखल आहे. त्यामध्ये Knowl Case of - DM II, HTN,CAD-IW- PWMI, CAG-(2008)-ZVD on Medical Management, Severe LV DYSFUNCTION A Chronic Left Frontan Lobe असे नमुद आहे. यावरुन मृतक विमा धारकाचे Cordio Artery Graft २००८ मध्ये झाल्याचे दिसुन येते. परंतु सदर माहिती विमा करारात दिलेली नाही. अर्जदाराने दिनांक ०१/०२/२०१३ व २१/०२/२०१३ रोजी २००८ मध्ये घेतलेल्या उपचाराचे कागदपत्र दाखल नाही. असे कळविले. अर्जदाराच्या वडिलाचा मृत्यु विमा करार घेतल्यानंतर २ वर्ष ५ महिने १ दिवसात झाल्याने विमा कंपनीकडुन चौकशी करणे न्यायोचीत असल्याने संबंधित दवाखान्यातुन आजाराबद्दल कागदपत्रे मागविली असता मयत दिनांक ०९/०२/२००८ ते १३/०२/२००८ पर्यंत उपचारासाठी दाखल होते. व दिनांक २०/१०/२००० रोजी त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाल्यांची बाबही निष्पन्न झाली. सदर कागदपत्रे मयतांने विमा करार घेते वेळी सादर न केल्याने विमा करार असत्य माहिती दिल्याने रद्द झाला आहे. सबब गैरअर्जदार यांनी विमा करार रद्द करुन कोणतीही त्रुटी पुर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द न झाल्यानेतक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी. अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.
४. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवादाची पुरशीस तसेच सामनेवाले क्र. १ व २ यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाची पुरशीस व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले क्र. १ व २ यांनी अर्जदाराप्रती
न्यूनतापूर्ण सेवा दिली आहे काय? तसेच अनुचित
व्यापारी पद्धतीचा अवलंब केला आहे काय? नाही
२. आदेश ? तक्रार अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ :
५. प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराचे वडिलांनी गैरअर्जदार क्र. १ व २ कडून तक्रारीत नमूद पॉलीसी घेतली ही बाब निर्वीवाद आहे. अर्जदाराचे वडिलांनी पॉलीसी काढल्यानंतर त्याचा मृत्यु पॉलीसी निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासुन अल्प अवधित झाला असल्यामुळे नियमानुसार गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी त्याच्या मृत्युची चौकशी केली. चौकशी दरम्यान मयत पॉलीसी धारकांनी पॉलीसी काढण्याच्या पुर्वी ज्या रुग्णालयात मृत्यु झाला त्या रुग्णालयात भर्ती होते असे निदर्शनास आले. व त्या संबंधितीचे कागदपत्रे गैरअर्जदार यांनी तक्रारीत दाखल केले आहे. सदर सर्व दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता दस्त क्र. ७,१२ व १४ यावरुन असे स्पष्ट होते कि, अर्जदाराचे वडिल पॉलीसी काढण्याच्या अगोदरपासुन व्याधीनेग्रस्त होते व त्यावर केअर हॉस्पीटल, हैद्राबाद येथे दिनांक ०९/०२/२००८ ते दिनांक १३/०२/२००८ उपचार घेतला होता. गैरअर्जदार यांनी हि बाब सिध्द करण्याकरीता केअर हॉस्पीटल येथिल डॉ. एम.श्रीनीवास यांचेशपथपत्र दाखल करुन मयत तमल्ला जालाधर सन २००० व २००८ मध्ये उपचाराकरीता केअर हॉस्पीटल,हैद्राबाद येथे भरती झाले होते व त्यांनतर दिनांक २३/०८/२०१२ रोजी पुन्हा उपचाराकरीता भरती झाले असता त्यांचा मृत्यु झाला. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन मंचाचे असे मत आहे कि, वीरल पुर्ण बाबीची कल्पना असतांना ही अर्जदाराचे वडिलांनी गैरअर्जदार कंपनीकडे विमा प्रस्ताव भरतांना त्यांचे आरोग्या विषयी वैयक्तीक माहिती देतांना प्रश्न क्र. (क) (ख) (ग) (घ) (ड) चे उत्तर नाही असे देवुन पुर्वीच्या आजाराची माहिती हेतुपूरस्पर लपवुन ठेवली. सबब अर्जदाराचे तक्रारीतील कथन कि, गैरअर्जदार यांनी उत्तरात दिलेल्या व्याधीमुळे अर्जदाराचा मृत्यु झालेला नाही ही बाब ग्राह्य धरण्यासारखी नाही.
६. सबब अर्जदाराचे वडिलांनी गैरअर्जदार यांचेकडे पॉलीसी काढतांना दिलेले घोषणपत्र असत्य असल्याने त्याचे परीणाम स्वरुप सदर पॉलीसी ही रद्द होते. तसेच गैरअर्जदार यांनी केलेल्या कथनाला किंवा दस्तऐवजाला अर्जदाराने कोणताही पुरावा देवुन खोडुन काढलेले नाही. अशा परिस्थीत P.C.Chacko & Ans. Vs Chairman, LIC of India & Others, 2007 (13) Scale 329 या न्याय निर्णयाप्रमाणे जर विमीत व्यक्तीने विमा प्रस्तावामध्ये महत्वपुर्ण माहिती लपवुन ठेवली असेल किंवा खोटी माहिती दिली असेल तर विमा पॉलीसी रद्द ठरते. सदर प्रकरणात ही अर्जदाराचे वडिलांनी गैरअर्जदार कडुन विमा घेतांना खोटी माहिती दिल्यामुळे प्रस्तावात दिलेले घोषणापत्र असत्य असल्याचे स्प्ाष्ट होते व परीणाम स्वरुप विमा पॉलीसी अंतर्गत भरलेली रक्कम ही जप्त करण्याचा अधिकार गैरअर्जदार यांना आहे. मंचासमोरील वस्तुस्थिचा आणि मा. सर्वोच न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचा आधार घेता अर्जदाराचे वडिल यांनी सन २००० व २००८ मध्ये केअर हॉस्पीटल, हैद्राबाद येथे उपचार घेतले असुन सुध्दा प्रस्तावाच्या प्रश्नामध्ये मागील ५ वर्षात कोणत्याही व्याधीने ग्रस्त नसुन उपचाराकरीता हॉस्पीटलमध्ये भरती नव्हतो असे खोटे उत्तर देवुन गैरअर्जदार कंपनीची फसवणूक केली असल्यामुळे त्यांनी काढलेली सदर पॉलीसी ही शुन्यवतठरत असुन त्यांचे वारस कोणताही विमा लाभ मिळण्यास पात्र ठरत नाही. सबब गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा दावा नाकारुन अर्जदाराप्रती सेवेत न्यनता किंवा अनुचीत व्यापारी प्रध्दतीचा अवलंब केला नाही हे सिध्द झाले आहे. सबब मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी नोंदविले आहे.
मुद्दा क्र. २ :
७. मुद्दा क्रं. १ वरील उत्तराप्रमाणे गैरअर्जदार क्र. १ व २ यांचेकडुन कोणतीही न्युनतापुर्ण सेवा किंवा अनुचीत व्यापारीपध्दतीचा अवलंब न झाल्याने अर्जदार तक्रारीत केलेल्या मागणीस पात्र नाही. सबब मुद्दा क्र. २ चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १२६/२०१३ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाहीत.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमत श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)