तक्रार क्रमांक – 479/2008 तक्रार दाखल दिनांक – 06/11/2008 निकालपञ दिनांक – 20/03/2010 कालावधी - 01 वर्ष 04महिने 14 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. प्रमोद शिवगण तावडे बी 308, नवीन गौरव, पेंडसे नगर, डोंबिवली(पुर्व) 421201. .. तक्रारदार विरूध्द मॅनेजर, मे. ब्रॅडलेन नेटवर्क प्रा. लि, (फॉर्च्युन नेट, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर) बी 1, सरोज आर्केड, पाटकर पथ, डोंबिवली(पुर्व) 421 201. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क स्वतः वि.प तर्फे वकिल स्मिता संसारे-परब आदेश (पारित दिः 20/03/2010) मा. सदस्या सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री. प्रमोद तावडे यांनी मॅनेजर, मे. ब्रॅडलेन नेटवर्क प्रा. लि, (फॉर्च्युन नेट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर) यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी एकुण नुकसान भरपाई रक्कम रु.2,43,000/- संगणकाचे दुरूस्ती खर्चासकट मागितले आहे. तक्रारदार यांनी दि.15/03/2008 रोजी फॉर्च्युन नेट कंपनीकडुन मासिक खर्च व जोडणी चार्जे असे एकुण रक्कम रु.2,360/- भरुन इंटरनेट सेवा घेतली. विरुध्द पक्षकाराच्या कर्मचा-याने सदर जोडणी करुन दिली होती. तदनंतर दि.21/04/2008 रोजी दुपारी 1.50 वाजता संगणक बंद असतांनाही अचानक सि.पी.यु फुटुन प्लग सॅकेट जळुन गेले व त्यांच्या रहात्या परिसरातील संपुर्ण विद्युत पुरवठा बंद झाला. हा सर्व प्रकार केबल मधील जास्त दावाच्या प्रवाहामुळे निर्माण झाला. या प्रकारे झालेल्या संगणकाच्या हानीच्या दुरूस्तीबाबत नुकसान भरपाई तक्रारदाराने मागितली आहे.
2. विरुध्द पक्षकार यांनी दि.04/03/2009 रोजी यांची लेखी कैफीयत दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की केबल लावतांना अटी व शर्ती मधील 17 नंबरच्या अटी मध्ये स्पोटाचे नुकसान भरपाई देण्यास विरुध्द पक्षकार बांधील नाहीत असे म्हटले आहे. सदरचा स्पोट कदाचित कुणी त्रेयस्थाने केबल चोरी केल्यामुळे होण्याची शक्यता आहे. तक्रारदाराचा संगणक बंद अस्तांना त्यामधुन प्रवाह चालु होत नाही. .. 2 .. 3. उभय पक्षकारांची शपथपत्रे, लेखी कैफीयत, पुराव्याची कागदपत्रे, पुरावा व युक्तीवाद मंचाने पडताळुन पाहिला व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होतोः 1. विरुध्द पक्षकार यांनी दिलेल्या सेवेत त्रृटी व निष्काळजीपणा आढळतात का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारदार यांच्या घरातील संगणकाचा स्पोट होतांना सदर संगणक बंद अवस्थेत होता म्हणजेच इंटरनेट बंद होते परंतु इंटरनेट केबल मधुन प्रवाह चालु होता. इंटरनेट जोडणी करतांना संबंधित दोष तयार झाल्यामुळे किंवा दोषयुक्त केबल वायर वापरण्यात आल्यामुळे सदरचा प्रसंग घडला असे या मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षकार हे इंटरनेट सेवा देण्यास तसेच दोषमुक्त केबल पुरवण्यात निष्काळजी ठरले. विरुध्द पक्षकार यांनी दिलेल्या अटींनमध्ये 17 नंबरची अट वाचुन पाहिली त्यामध्ये केबल व केबल मधील प्रवाहामुळे स्पोट झाल्यास विरुध्द पक्षकार जबाबदार राहणार नाहीत असे म्हटले आहे. परंतु अशी अट दंडात्मक सिध्द होते असे या मंचाचे मत आहे. तरीही तक्रारदार यांनी सदर संगणक दुरुस्तीचा खर्च जरी रक्कम रु.13,000/- मागितला असला तरी तत्सम पुरावा दाखल नाही परंतु संगणक जळला याबद्दल उभय पक्षकारांचे दुमत नाही म्हणुन तक्रारदारास नुकसान भरपाई देणे मंच मान्य करीत आहे व पुढील अंतीम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 479/2008 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. तक्रारीचा खर्च विरुध्द पक्षकाराने रु. 500/-(रु. पाचशे फक्त) तक्रारदारास द्यावे. 2.विरुध्द पक्षकाराने संगणकाच्या नुकसानीपोटी रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) तक्रारदारास द्यावेत या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याच्या आत करावे. 3.विरुध्द पक्षकार यांनी मानसिक त्रासापोटी रु. 500/- (रु.पाचशे फक्त) द्यावेत. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 20/03/2010 ठिकान - ठाणे (श्री.पी.एन.शिरसाट)(सौ. भावना पिसाळ)
सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|