ग्राहक तक्रार क्र. : 172/2014
दाखल तारीख : 08/08/2014.
निकाल तारीख : 31/07/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 23 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. विद्या कोडींबा गायकवाड,
वय - 50 वर्षे, धंदा – घरकाम, रा.बौध्दनगर.
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
2. कोंडिबा पि. अंबादास गायकवाड,
वय – 51 वर्षे, धंदा – नोकरी,
न.प., भिमनगर, बौध्द नगर,
उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद., ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मॅनेजर,
मॅक्स लाईफ इन्शरन्स कंपनी लि.
ऑपरेशन सेंटर, प्लॉट नं.9 अ,
सेक्टर-18, उदयोग विहार, गुरगांव (हरियाणा)-122015.
2. कृष्णा प्रल्हाद कठारे (विमा एजंट/ सल्लागार)
वय – 35 वर्षे, धंदा – व्यवसाय,
रा. उस्मानाबाद, देशपांडे बस स्टॅन्डजवळ धाराशिव कामानीजवळ,
उस्मानाबाद व्ही-92258.
3 मॅनेजर,
इंडिया इन्फोलाईन इन्शुरंन्स ब्रोकर्स,
लि. रजि. ऑफीस 75, निलान कॉम्पलेक्स,
ऑपी, W.B.Highway, Goregaon (E),
Bombay, 400063. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.जे.आर.माळाळे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
अ) तक क्र.1 व 2 हे उस्मानाबाद येथील रहिवाशी असून त्यांनी विप कडून तक ने दि.14/05/2010 रोजी युनिट लिंक्ड पॉलिसी नं.780081113 जी. ओ. नांव एल. के. 005 प्रमाणे नोंदविलेला आहे. त्याप्रमाणे मॅक्स कंपनीने माझेकडून जिवन इन्शुरन्स पॉलिसी पुस्तिका दि.14 मे 2010 रोजी तयार करुन अटी नियम फायदे, भविष्य सुविधा, रक्कम भरणे माहितीची प्रत दिली. पॉलिसी मॅच्यूरिटी दि.14 मे 2030 होता व वार्षिक भरणा रु.12,000/- असून पॉलिसी रक्कम रु.1,20,000/- ची होती, त्याप्रमाणे तक्रारदाराने मॅक्स कपंनी शाखा उस्मानाबाद शहर, शिवाजी चौक, उस्मानाबाद चे शाखेमध्ये दि.05/05/2010 रोजी मॅक्स कंपनी पावती क्र.आर.0012854 ब्रँच कोड बी.एम.1394 अन्वये रु.6,000/- जमा केले आहेत. तसेच असे एकूण रु.30,000/- जमा केले. मॅक्स कंपनी शाखा शिवाजी चौक, उस्मानाबाद ऑफीसमध्ये तक्रारदाराचे भरणा केले आहेत. जानेवारी 2013 मध्ये मॅक्स कंपनी शाखा शिवाजी चौक, उस्मानाबा मध्ये हप्ता भरण्यासाठी गेले असता मॅक्स कंपनी शाखा उस्मानाबादने तक ला कसलीच पुर्व कल्पना न देता शाखा बरखास्त केली आहे. मुख्य ऑफीस गुरगांव हरियाणा यांना संपर्क केला. दि.24 मे, 2013 तक ने मॅक्स कपंनीचे पत्रक मिळाले व तपास करुन अहवाल मागितला असता विप तक कडे आलेच नाही म्हणून तक ने विप स विधिज्ञामार्फत नोटीस पाठवली. त्यावर कंपनीने तक दि.28/09/2013 रेजीचे सत्यप्रत क्र.9 पाठवून तक ने विप कडे रु.18,000/- भरणा केले नाहीत हे पत्रक वाचून तक क्र.1 व 2 ला मानसिक धक्का बसला व त्यामुळे तक क्र.1 ला दवाखान्यात उपचारासाठी न्यावे लागले. दि.30/06/2014 रोजी मॅक्स कंपनी विप क्र.1 यांस नोटीस पाठवली असता त्यांनी उत्तर न दिल्याने सदरची तक्रार दाखल करण्यात आली. विप क्र. 1 व 2 यांनी रु.30,000/- इतर जिवन विम्याचे फायद्यासह व अर्जच्या खर्चापोटी र.5,000/- व झालेल्या मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- विप कडून देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली.
ब) तक्रारदाराने तक्रारी सोबत पॉलिसी पुस्तीका, पॉलिसी क्र.78008113 जीओ JK005,पावती क्र.0012854, 0111652, 0284525, 0386155, दि.24 मे 2013 चे विप चे पत्र, दि.30 सप्टेंबर 2013 चे विप चे पत्र, दि.28 सप्टेंबर 2013 चे विप चे पत्र, दि.19/20/2013, दि.27/02/1997 वैद्यकीय पत्रक, विप स पाठविलेल्या नोटीसा, पोष्ट मास्तर यांना दिलेला अर्ज तसेच विप क्र.1 यांनी चेक क्र.586619 रु.30,000/- चा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
क) विप क्र.1 यांना नोटीस पाठविली असता त्यांनी नोटीस घेणेस नकार दिल्याने दि.29/09/2014 रोजी त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
ड) विप क्र.2 यांनी आपले म्हणणे दि.27/08/2014 रोजी मंचात दाखल केले असून ते पुढीलप्रमाणे.
विद्या कोंडीबा गायकवाड यांचे प्रकरण MII मार्फत मी IIFL चा प्रतिनिधी होतो. मी दि.05/05/2010 रोजी अर्जदाराचे कडून रु.6,000/- चा भरणा केलेले आहेत त्या पावतीवर माझी सही आहे. पा.क्र.R0012854 असा आहे.
दि.02/01/2011 पासून मी प्रतिनिधीत्व सोडून दिलेले आहे. त्यानंतर सौ.विद्या कोंडीबा गायकवाड यांनी तीन हप्त्याचा भरणा केलेला मला माहित आहे. (रु.6,000, 1200, 6,000/-) अशी एकूण रु.30,000/- (तीस हजार रुपये) अर्जदाराने भरणा केलेले मला ठाऊक आहेत सबब हे म्हणणे सादर केले आहे.
ई) विप क्र.3 यांना नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरुध्द दि.25/03/2015 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
फ) तक्रारदार यांची तक्रार व सोबत दाखल कागदपत्रे तसेच विप यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. उभयतांचा लेखी युक्तिवाद वाचला तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात आमच्या विचारार्थ खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
ज) 1) तक्रारदाराची प्रमूख तक्रार अशी आहे की, त्यांनी विप कडे पॉलिसी क्र.780081113 GK 005 काढली असता मॅक्स कंपनी शाखा शिवाजी चौक, उस्मानाबाद यांचे ऑफीस शाखा तक यास कोणतीही कल्पना न देता निघुन गेले. परिणामी तक यास मिळणा-या सेवेपासून वंचित रहावे लागले व हप्ते भरता आले नाही तसेच पॉलिसीस बाधा निर्माण झाली व जोखीम दायित्वाची सुविधा त्या काळा करीता मिळाली नाही. मात्र तक नेच सदर केलेल्या विप यांनी पाठविलेल्या दि.04/10/2014 रोजीचे पत्र व चेक क्र.586619 रु.30,000/- चा असे दर्शवितो की तक यांना सदर रक्कम विप यांनी पाठवून दिली असून तक ने ती स्विकारली आहे म्हणून तक यांनी विमा पॉलिसी करीता गुंतवलेले रु.30,000/- तक यांना परत मिळालेले असून तक यांनी मागणी केल्या प्रमाणे त्यांनी गुतवलेले रक्कम परत मिळालेली आहे.
2) सदरचा जिवन विमा जोखीम दायित्वाबाबत होते असे दिसते मात्र विप यांनी दिलेल्या सेवेमुळे तक यांची त्या काळातली जोखीम दायित्व मिळण्यात बाधा निर्माण होऊ शकली असती मात्र Insured event कोणता घडला व पॉलिसी Intact नसल्यामुळे जी विप च्या चुकीमुळे राहू शकली नाही. तक चे इतर काय नुकसान झाले जे पॉलिसीच्या अंतर्गत समाविष्ठ होते त्याबाबत स्पष्ट खुलासा अथवा मागणी तक ची नाही परंतु विप ने सुरवातीपासून तक शी चुकीच्या पध्दतीने जसे की आपले premium आमचेकडे जमा नाही असे उत्तर देणे व शाखा कार्यालय अचानक बदलून त्याबाबत तक ला कल्पना न देणे व पुढील हप्ता भरुन घेण्यासंदर्भात व्यवस्था न करणे इ. गोष्टी अव्यावसायिक पध्दतीने केल्या आहेत. म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.1, 2, व 3 यांनी तक्रारदार यांना दि.14 मे 2010 पासून ते दि.04/10/2014 पर्यंत सदर विम्या अंतर्गत येणारे सर्व लाभ द्यावे.
2) विप क्र. 1, 2, व 3 यांनी संयुक्तिकरित्या व स्वतंत्ररित्या तक यांना नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- द्यावे.
3) विप क्र.1, 2 व 3 यांनी तक्रारदाराला तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.