1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार हा शेतकरी असून मौजा आशी येथे अर्जदाराच्या मालकीचे व तांब्यातील सर्वे नंबर 201/1 सुमारे पाच एकर शेती व त्यालाच लागून त्याच्या मालकीची सर्वे नंबर 297 शेती आहे सदर दोन्ही शेतातून अर्जदार हा कापसाचे उत्पादन घेत असून वर उल्लेखित सर्वे क्रमांक अर्जदाराच्या मालकीच्या शेतात विहीर असून 2शे फूट अंतरावर बोरवेल सुद्धा मारलेला आहे दिनांक 1.6.2017 रोजी अर्जदाराने ड्रिप इरिगेशन सुरू केले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा अर्जदाराच्या शेतात पाणी उपलब्ध असते तसेच सदर शेताला तारेचे कंपाउंड असून 201 सर्वे मधून अंदाजे होत असते.अर्जदाराने मागील हंगामी वर्षात दिनांक 8.6.2017 रोजी खसरारा क्रमांक 201/1 सर्वे मधून अंदाजे 2शे क्विंटल कापसाचे उत्पन्न अर्जदाराला होत होते अर्जदाराने मागील वर्षात दिनांक 8. 6.2017 रोजी खसरा क्रमांक 201/1 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून कापूस बियाणे 7351 बीटी महिको खरेदी करून पेरणी केली होती..गैरअर्जदार क्रमांक 2चा सूचनेनुसार तसेच कृषी विभागाच्या तज्ञ मंडळी कडून मार्गदर्शन घेऊनच बियाणे पेरले त्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडून सदर बियाणाचे 10 पॅकेट्स एकूण साडे चार किलोग्राम किंमत 7500 बिल क्रमांक 4938 अन्वय खरेदी केले होते. त्या वेळेस गैरअर्जदार क्रमांक यांनी सांगितले की सदर बियाणे विशिष्ट तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेले असून अळीचे आक्रमण रोखण्याचा ते समर्थ आहेत व ते उत्पादन सुद्धा चांगले देईल. गैरअर्जदार क्रमांक 2 हे सदर बियाण्याचे विक्रते असून गैरअर्जदार क्रमांक एक हे बिर्याणीचे उत्पादक आहे. अर्जदार जून 2017 मध्ये पेरणी केल्यानंतर पिकाच्या सुरक्षतेसाठी पूर्ण काळजी घेतली होती व काही महिन्यांनी कापसाचे बोंड तयार झाले परंतु तपासणी केली असता सदर बोंडाला सेंद्रीय गुलाबी बोंडअळी लागली असल्याचे दिसून आले व सदर अळीने बोंडाच्या आतील भाग नष्ट केला होता असे दिसून आले. त्यामुळे यावर उपाय म्हणून संपूर्ण शेतात किटकनाशकांची फवारणी केली व खते पण टाकली परंतु बोंडअळीचा बंदोबस्त झाला नाही. सबब अर्जदाराला केवळ 10 क्विंटल उत्पादन हाती आले. पर्यायाने अर्जदाराचे अंदाजे 90 क्विंटल कापसाचे नुकसान झाले. अर्जदाराच्या सर्वे नंबर 201 हया शेतात पेरण्यासाठी जेंव्हा गैरअर्जदार क्रमांक 2 करून बियाणे विकत घेतले त्याच दिवशी गैरअर्जदार क्रमांक 2 कडूनच बिल क्रमांक 4938 इतर कंपनीचे बियाणे विकत घेण्यात आले होते. ते अर्जदाराने लगतच्या सर्वे नंबर 297 हया शेतामध्ये पेरण्यात आले त्यात चांगले उत्पादन झाले व सदर शेतात बोंड अळीचा प्रादुर्भाव नव्हता. अर्जदाराला गैरअर्जदाराने न्युनतापूर्ण सेवा दिली असल्याने दोन्ही गैरअर्जदार संयुक्तरीत्या नुकसान भरपाई देण्याबाबत जबाबदार आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 कडून वर उल्लेखित 2 जातीचे बियाणे अर्जदाराने घेतले होते व त्याच्या चांगल्या दर्जाबद्दल गैरअर्जदाराने आश्वासित केले. गैरअर्जदार क्र.1 हे बियाण्याचे उत्पादक होते. पिकाला लागलेल्या बोंड अळीने अर्जदाराच्या पिकाचे नुकसान झाले. अर्जदाराला दर वर्षी होणाऱ्या उत्पादनापेक्षा 90 क्विंटल कापसाचा घाटा झाल्याने त्याचे सुमारे 4,50,000/- चे नुकसान झालेले असून फवारणीचा खर्च 50,000/- व खताचा खर्च रू. 50,000/- इंधनाचा खर्च 20,000/- शारीरिक मानसिक त्रासापोटी 50,000/- व तक्रारीसाठी लागणारा खर्च रू.10,000/- असे एकूण 6,30,000/- व त्यावर पुन्हा 15 टक्के व्याज रक्कम अर्जदाराच्या हातात पडेपर्यंत देण्यात यावे ही अर्जदाराने मंचाला विनंती केली आहे. 3. अर्जदाराची तक्रार स्वीकारून गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस पाठवण्यात आले गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी यांच्या समक्ष उपस्थित राहून त्यांचे लेखी उत्तर दाखल करून प्राथमिक आक्षेप घेतला की सदर तक्रार ही खोटी असून संदिग्ध दाखल केलेली आहे. तक्रारीत अर्जदाराच्या शेतात बियाणे पेरण्याची तारीख, जमिनीचा प्रकार तसेच शेती कोणत्या प्रकारे करतो किंवा त्याने कोणत्या प्रतिबंधक औषधाचा वापर केला याबद्दल अर्जदाराने कुठेही नमूद केलेले नाही तसेच अर्जदाराने तक्रारीत बियाणे ही सदोष होती याबद्दल कोणताही तज्ञ अहवाल लावलेला नाही. गैरअर्जदार क्रमाक 1 कंपनीविरुद्ध अर्जदाराला तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडले नाही. अर्जदाराने आणि त्यांच्या तक्रारीच्या समर्थनासाठी कोणताही तज्ञ अहवाल दाखल केला नाही. कोणत्याही तज्ञ अहवालाच्या अनुपस्थितीत आणि व वैज्ञानिक आणि तांत्रिक आधाराशिवाय व प्रयोगशाळेच्या विश्लेषणाशिवाय बियाणे हे सदोष आहेत ही बाब सिद्ध होत नाही. तसेच ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13 (1)C नुसार अर्जदाराला असे वाटत असेल की वस्तू ही दोषपूर्ण आहे तर त्यासंबंधी योग्य प्रयोगशाळेने पृथक्करण व चाचणी केल्याशिवाय वस्तूमधील दोष सिद्ध होऊ शकत नाही. वस्तूचे सॅंपल प्रयोगशाळेकडे पाठविण्यात यावे. मात्र सदर प्रकरणात असे झालेले नाही कलम 14 नुसार वस्तूतील दोष सिद्ध झाल्याशिवाय अर्जदारास नुकसान भरपाई देता येणार नाही.अर्जदाराने नुकसान भरपाई बाबत कोणताही पुरावा दाखल केला नाही. तसेच अर्जदाराने त्यांच्या तक्रारीत पिकावर खते कीटकनाशकांची फवारणी केली असे नमूद केलेले आहे. परंतु खते किंवा कीटकनाशकांची बिले ही तक्रारीत दाखल केली नाही. सबब ही बाब अमान्य आहे की अर्जदाराने पिकावर कीटकनाशक व खतांचा वापर केला होता गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून बियाणे घेतली ही बाब सिद्ध करण्यासाठी बियाण्याचे रिकामे पॉकिट तक्रारीत दाखल केले नाही. तक्रारीत अर्जदाराने त्यांची तक्रार सिद्ध करण्याकरता कोणताही तज्ञ अहवाल दाखल केला नाही. याउलट गैरअर्जदार यांनी त्यांच्या तक्रारी त्यांचे प्रतिनिधीद्वारे मिळालेला रिपोर्ट दाखल केला आहे. तो प्रतिनिधी अर्जदाराच्या शेतात जाऊन निरीक्षण केले असता त्याला severe attack of aphid infestation on the crop असून त्यामुळे कीटकनाशक फवारणी करूनही पिकांना नुकसान होण्यापासून वाचवू शकले नाही असे आढळून आले. गैरअर्जदार क्रमांक 2 नमूद करतात की 7351 बि.टी. कॉटन हया बियाण्याच्या नानाविध गुणवत्ता नियंत्रण चाचण्या प्रयोगशाळेत घेतल्या असून सदर प्रयोगशाळाही केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मान्यताप्राप्त आहे. ग्राहक कायद्यानुसार अर्जदार हा ग्राहक तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तो सिद्ध करत नाही की उत्तरवादी व्यक्तीच्या सेवेमध्ये त्रुटी आहे सदर तक्रारीत अर्जदार यांनी ही बाब सिद्ध करू शकला नाही.सबब सादर तक्रार खारीज होणे आवश्यक आहे. 4. गैरअर्जदार क्र.2 हयांनामंचातर्फे नोटीस प्राप्त होवूनसुध्दा मंचात उपस्थीत न राहिल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 विरूध्द प्रकरण एकतर्फा आदेश दिनांक 23/10/2018 रोजी पारीत करण्यांत आला. 5. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदारक्र. १ यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तिवादाची पुरसीस तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. १ यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1.अर्जदार हा अर्जदार क्रमांक 1 व 2 चा ग्राहक आहे काय? होय 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार प्रति न्यूनता पूर्ण सेवा दिली आहे काय? होय 3. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार . .मुद्दा क्र. 1 बाबत :- अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडून गैरअर्जदार क्रमांक 1 निर्मित कापूस बियाणे 7351 बीटी महिको दहा पॅकेट्स एकूण साडेचार किलो ग्रॅम किंमत रू. 7500/- बिल क्रमांक 4938 अन्वये खरेदी केले होते याबाबत निशाणी क्रमांक चार वर दस्त क्रमांक ७ वर दाखल केलेले आहे व गैरअर्जदार क्रमांक १ यांनी अमान्य केलेली नसल्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. . मुद्दा क्र. 2 बाबत :- अर्जदाराने बियाणे विक्रेते गैरअर्जदार क्रमांक २ यांच्याकडून दिनांक 8 .6. 2017 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 निर्मित 7351 बीटी महिको याप्रमाणे कापूस बियाणे बिल क्रमांक 4938 खरेदी केले ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या पावती वरून सिद्ध होत आहे अर्जदाराने जी तक्रार दाखल केली आहे ती बियाणाची पेरणी केल्यानंतर कापसाचे बोंड तयार झाले परंतु तपासणी केली असता बोंडाला गुलाबी अळी लागलेली असल्याचे दिसून येऊन अळीने बोंडाच्या आतील भाग नष्ट झालेला दिसून आला. परंतु याबाबत अर्जदाराने त्यांच्या तक्रारी संबंधित कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याचे कुठेही नमूद नाही. अर्जदाराने त्यांच्या तक्रारी दस्तावेज निशाणी क्र. 2 वर गैरअर्जदार क्र.1 कडून विकत घेतलेल्या गैरअर्जदार क्र.2 निर्मित बियाण्यांचे बिल तसेच बोंड अळी लागलेले फोटो व लगतच्या शेतकऱ्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. परंतु उपरोक्त दस्तावेज हे गैरअर्जदार क्रमांक 2 निर्मिती व गैरहजर क्रमांक 1 यांनी विकलेले बियाणे सदोष आहे, ही बाब सिद्ध करण्यास परिपूर्ण नाही. याउलट गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 21/1/2019 रोजी दस्त क्र. 3 वर अर्जदाराने गैर अर्जदाराकडून घेतलेल्या बीटी कॉटन 7351 गुणवत्ता आश्वासन प्रयोगशाळेचे बियाणे चाचणी प्रमाण पत्र दाखल केलेले असून त्यात सदर बियाण्याची उगवण क्षमता ही 99.26% नमूद केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या उत्तरात आक्षेप घेतला आहे की अर्जदाराने तक्रार सिद्ध करण्याकरता कोणताही तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही. अर्जदार विद्यमान मंचात म्हणजे यामध्ये सदोष बियाणाची तक्रार घेऊन आला. कायद्यातील onus to prove या तत्त्वानुसार सदर बियाणे सदोष असल्याचे अर्जदाराला सिद्ध करायचे होते याबाबत माननीय राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या 2017(2)CPR329(NC) maharashtra hybreed seeds Private Limited versus Jagdish Kumar and another या निवाडयात allegation of defective seeds must be proved by Lab reports असे नमूद असून initial burden of proof that seeds were defective was on the complainant असा निर्णय दिलेला आहे. तसेच माननीय राष्ट्रीय आयोगाने 2018 (2) 398 zamindhara Agro centre and another versus Sukhdev Singh and another order dated 31 may 2017 या प्रकरणात report of agriculture Officer based upon field inspection alone without Sampling and testing of sample in laboratory can not be preferred over report of accredited laboratory of manufacturer असा निवाडा पारित केलेला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने national seeds Corporation versus Madhusudhan Reddy यामध्ये परिच्छेद क्र.34 मध्ये13(1)(सी) बाबत चर्चा केलेली आहे. वरील सर्व निवाडे लक्षात घेता केवळ अर्जदाराने तक्रारीत कथन करणे किंवा फोटोग्राफ्सवरून किंवा लगतच्या शेतकऱ्यांनी दिलेल्या शपथ पत्रावरून बियाणे सदोष असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही. सदर प्रकरणात ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 13 (१)c नुसार कोणताही रिपोर्ट अर्जदाराने दाखल केलेला नसल्यामुळे अर्जदार हा त्याची तक्रार सिद्ध करू शकला नाही अशा निष्कर्षाप्रत मंच् आलेले आहे. सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. 6.. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश |