Maharashtra

Osmanabad

CC/14/43

Abhimanu Bhaurao Mane - Complainant(s)

Versus

Manager Maharashtra State Seeds Co. Ltd. - Opp.Party(s)

S.S.Mane

15 Dec 2015

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/14/43
 
1. Abhimanu Bhaurao Mane
Village Ter Ta.& Dist. Osmanabad
Osmanabad
Maharashtra
2. Devanand Sukamal Hawale
Bori Ta. Tuljapur
Osmanabad
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager Maharashtra State Seeds Co. Ltd.
Mahabeej Bhavan TA.Dist. Akola
Akola
Maharashtra
2. Dist. Manager Maharashtra State Seeds Co.Ltd.
Samata Colony Osmanabad
Osmanabad
Maharashtra
3. Dist. Krishi Adhikari
Zp Osmanabad
Osmanabad
Maharashtra
4. Dist. Suprident Agri. Officer
Osmanabad
Osmanabad
Maharashtra
5. Taluka Agri. Officer
Osmanabad
Osmanabad
Maharashtra
6. Dist. Seeds Certification Officer
Osmanabad
Osmanabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ग्राहक तक्रार  क्र.  43/2014

                                                                               त. अर्ज दाखल तारीख   : 31/01/2014

                                                                               त. अर्ज निकाली तारीख : 15/12/2015

                                                                                    कालावधी: 01 वर्षे 10 महिने 15 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.   श्री. अभिमन्‍यु ऊर्फ अभिमान भाऊराव माने,

     वय –  सज्ञान, धंदा – शेती,

     रा. तेर, ता. जि. उस्‍मानाबाद.                      ....तक्रारदार

                                वि  रु  ध्‍द

1.    मा. व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ,

      महाबीज भवन, आकोला, ता.जि. आकोला.

2.    जिल्‍हा व्‍यवस्‍थापक,

महाराष्‍ट्र राज्य बियाणे महामंडळ,

समता कॉलनी, ता.जि.उस्‍मानाबाद.

3.    मा. अध्‍यक्ष, जिल्‍हास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समिती,

      तथा कृषी विकास अधिकारी,

      कृषी विभाग, जिल्‍हा परीषद, उस्‍मानाबाद.

4.    मा. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी,

      जुनी जिल्‍हा परीषद कार्यालय, उस्‍मानाबाद.

5.    मा.अध्‍यक्ष, तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समिती,

तथा तालूका कृषी विकास अधिकारी,

कृषी विभाग जिल्‍हा परिषद, उस्‍मानाबाद.

6.    जिल्‍हा बीज प्रमाणिकरण अधिकारी,

मध्‍यवर्ती प्रशासकीय ईमारत, उस्‍मानाबाद.    ..विरुध्‍द  पक्षकार

 

 

कोरम :       1)  मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                                    2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्‍य.

                  3)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍य.

                                  

                          तक्रारदारातर्फे विधिज्ञ      :  श्री.एस.एस.माने.

                         विप क्र.1 व 2 तर्फे विधिज्ञ : श्री.ए.एन.देशमुख.

                    न्‍यायनिर्णय

मा.अध्‍यक्ष श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी यांचे व्‍दारा :

1)    अर्जदार हे मौजे तेर ता.जि.उस्‍मानाबाद येथील रहिवाशी असून मौजे तेर येथील जमीन गट क्र.869 एकुण 06 एकर सन 2013 मधील खरीप पिकाच्‍या पेरणीसाठी सोयाबीन जे.एस.335 या पायाभुत बिजोत्‍पादनासाठी योग्‍य मेहनत व मशागत करुन घेऊन योग्य व पोषक वातावरणात खतासोबत पेरणी केली परंतु शंका आल्‍याने तालुका कृषी अधिकारी व विप यांना पाहणीबाबत विचारणा केली असता सोयाबीन संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी दि.20/08/2013 रोजी प्रत्‍यक्ष पाहणी करुन अहवाल दिला. त्‍यात सोयाबीन पिकामध्‍ये 33.24 टक्‍के भेसळ असल्याचा लेखी अभिप्राय देण्‍यात आलेला आहे.

 

2)   तक यांनी काढणीचा जास्‍तीचा खर्च, उत्‍पादनातील घट, तसेच प्रोत्‍साहनपर वाढीव दराचे नुकसान, लो ग्रेड/घाण कच-या करीता झालेले नुकसान, बोनसमध्‍ये नुकसान, वाहतुक खर्च असे एकुण रु.7,14,000/- नुकसानीबाबत विप यांना नोटीस पाठवली असता त्‍यांनी नुकसान भरपाई न दिल्‍याने सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असून विप कडून तक यांना नुकसानी पोटी रु.7,14,000/-, तक्रार अर्ज व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- देण्‍याचा आदेश पारीत व्‍हावा अशी विनंती केली आहे.    

 

3)   विप क्र.1 व 2 यांना सदर तक्रारीबाबत नोटीस पाठवली असता त्‍यांनी आपले म्‍हणणे  दाखल केली असून ती खालीलप्रमाणे...

 

4)  तक चे जमीनीचे मालकीबाबत माहिती नाही. अर्जदार हा स्‍वत:चे नफ्याकरीता पायाभुत बियाणे घेऊन पुन्‍हा विप यांना विक्री करत असल्‍यामुळे तो ग्राहक या संज्ञेत येत नाही त्‍यामुळे प्रस्‍तुतचा अर्ज या मंचासमोर चालू शकत नाही व त्‍यास अधिकार क्षेत्राची बाधा येते.

5)   चांगले उत्‍पन्‍न येण्‍याकरीता जमीनीत ओलावा व इतर पोषक वातावरण असणे आवश्‍यक आहे. अर्जदाराला नुकसान भरपाई शासनाकडून मिळालेली आहे. तसेच विम्‍याची रक्‍कमही मिळालेली आहे. प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल घेतलेला नसल्याने सोयाबीन पिकामध्‍ये भेसळीचा अहवाल दिला हे अमान्‍य आहे. तक यांनी उपकलम ब मधील उत्‍पादन घट व सरासरी उत्‍पादन, दर अवास्‍तव दर्शविलेले आहे. तसेच खर्च अवास्‍तव दाखविला असून तक्रार खोटी आहे. सबब अर्जदाराचा अर्ज फेटाळण्‍यात यावा.

 

6)   तक ची तक्रार सोबत जोडलेली कागदपत्रे केलेला युक्तिवाद विप चे म्‍हणणे सोबत जोडलेली कागदपत्रे विप चा युक्तिवाद याचा एकत्रितपणे विचार करुन निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे निघतात.    

            मुद्दा                               उत्‍तर

1) तक विप चा ग्राहक आहे काय?                          होय.

2) तक ची तक्रार बियाणातील दोषा संदर्भात

     तक ने सिध्‍द केलेली आहे काय ?                                                होय.

3) तक नुकसान भरपाईस पात्र आहे काय?                                       होय

4) काय आदेश ?                                   शेवटी दिल्‍याप्रमाणे.

                        कारणमिमांसा

मुद्दा क्र. 1

7)     तक क्र.1 हा बियाणे उत्‍पादक संस्‍था असून विप क्र.2 हे विप क्र.1 चे स्‍थानीक  कार्यालय आहेत. विप क्र.1 ने उत्‍पादीत केलेला अथवा विप क्र.2 मार्फत उत्‍पादन केलेल्‍या बियाणांचे नियंत्रण नियमन व व्‍यवस्‍थापन करते.

 

8)   तक्रारदाराने विप क्र.2 कडून विप क्र. 1 चे पायाभुत बियाणे उत्‍पादन करण्‍यासाठी व विक्री करण्‍यासाठी घेतले आहे / होते हि बाब विप ने अमान्‍य केली नाही. त्‍यामुळे तक्रारदार व विरुध्‍द पक्ष यांचेमध्‍ये खरेदीदार ग्राहक व सेवा पुरवठा करणारा विक्रेता हे नाते अमान्‍य करण्‍याचे या न्‍यायमंचास काही कारण नाही. पुर्नखरेदीची हमी ही, हे नाते प्रत्‍यक्षात हा व्‍यवहार झाल्यावर बदलले असते. तरीही पुर्नखरेदीमुळे ग्राहक वाद या संकल्‍पनेस कोणतीही बाधा पोहचत नाही. म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देतो.

मुद्दा क्र. 2

9)    तक ने विप क्र.2 कडून जे एस 335 या पायाभूत बियाणांचे उत्‍पादन करण्‍यासाठीचे चलन घेतले व विप चे खात्‍यावर सदरची रक्कम भरली. त्यानंतर तक ने सदर बियाणांची पेरणी खरीप हंगाम 2013 साठी केली. तथापि पेरणी केलेली दिनांक तक्रारीत नाही. परंतु सदर बियाणांमध्‍ये भेसळ असल्याची त्‍याला शंका आल्‍याने तालूका कृषी अधिकारी यांना अर्ज केला व जून 2013 रोजी पेरणी केलेल्‍या सोयाबीन बियाणांच्‍या संदर्भात पिकाची तपासणी करुन अभिप्राय मिळण्‍याबाबत अर्ज दिसुन येतो तसाच एकत्रित अर्ज विप कडे केलेला दिसुन येतो. संबंधीत अर्जाच्या अनुषंगाने तालूका कृषी अधिकारी यांनी प्रभारी अधिकारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना दि.20 व 21/08/2013 रोजी शास्‍त्रज्ञांना पाठवून एकूण 13 शेतक-यांच्‍या तक्रारी अर्जाच्‍या संदर्भाने पत्र व्‍यवहार केला व त्याची एक प्रत तक्रारदारासही देण्‍यात आली. त्‍यानुसार गट क्र.869 क्षेत्र 7 एकर ला भेट देऊन तालूका कृषी अधिक्षक, मंडल कृषी अधिक्षक, कृषी अधिक्षक पंचायत समिती, महाबीज प्रतिनिधी व क्षेत्र प्रमाणिकरण अधिकारी यांचे उपस्थितीत व संबंधीत शेतक-यांच्‍या उपस्थितीत पंचनामा करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये गट क्र.869 या क्षेत्रात इतर वाणाचे झाडाचे प्रमाणे 63.84 टक्‍के अशी भेसळ झालेली झाडे आढळून आली. असा पंचनामा / अहवाल दाखल करण्‍यात आलेला आहे. असा अहवाल ता. कृषी अधिकारी यांच्‍या सहीचा तक ने दाखल केला आहे. या संदर्भात विप चे म्‍हणणे बघीतले असता सदरचा अहवाल अमान्‍य केलेला असून जे. एस. 335 वाहनाचे पायाभुत प्रमाणित बियाणे बिज प्रमाणीत यंत्रणेने मुक्‍तता अहवाल दिल्‍यानंतरच दिला आहे. व या प्रकरणी बियाणे कायद्यानुसार तपासणी अहवाल घेतलेला नसल्‍याने प्रकरणाच्‍या वैधतेविषयी शंका व्‍यक्‍त केली आहे. हे खरे की ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 सी नुसार उत्‍पादनातील दोष असेल तर सदरचे उत्‍पादन हे प्रयोग शाळेत पाठवून दोषा विषयी अहवाल मागवला जातो. तथापि प्रकरणातील शेतकरी यांनी या संदर्भात बियाणे किंवा बियाणाचे नमूने या न्‍यायमंचात मागणी केल्यानंतर दाखल केले नाही. मात्र तोंडी युक्तिवादात शेतक-यांनी सदरचे बियाणे हे संपूर्णपणे वापरले असल्‍यामुळे ते देता येत नसल्‍याचे तक चे विधिज्ञांनी न्‍यायमंचासमोर सांगितले. तक्रारदाराने दाखल केलेले ता.कृषी अधिकारी यांचा पंचनामा अहवाल व त्‍याला विप ने दाखल केलेला महाराष्‍ट्र राज्‍य बिज प्रमाणि‍करण यांचा मुक्‍तता अहवाल यांचे संदर्भात विचार केला असता विप ने जो मुक्‍तता अहवाल दिला आहे तो दि.15/05/2013 चा आहे व तक चा जो पुरावा म्‍हणून पंचनामा म्‍हणून दाखल केलेला आहे तो दि.23/08/2013 चा आहे. विप ने दाखल केलेला मुक्‍तता अहवाल हा पेरणीपुर्वी बियाणे तपासणी अहवाल आहे. तक ने दाखल केलेला हा बियाणे लागवडीनंतर प्रत्‍यक्ष शेतातील पाहणीचा आहे. विप ने दाखल केलेला अहवाल हा बिज प्रमाणिकरण यंत्रणेकडे पाठवलेला एकूण पिशव्‍या 274 याच्‍या संदर्भात असून हा लॉट क्र.314 हा आहे. विप ने तक ला विकलेले बियाणे हे याच लॉट मधील आहे असे विप ने कोठेही म्हंटलेले नाही. त्‍याच बरोबर विप ने तक ला जे बियाणे पुरवठा केलेले होते ते किंवा ज्‍या बियाणांच्‍या उगवण क्षमतेबद्दल तक्रारदाराने तक्रार केलेली आहे. त्‍या बियाणाचा लॉट क्रमांक याचा उल्‍लेख तक्रारीत दिसून येत नाही. त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या प्रत्‍यक्ष शेतातील पाहणी पंचनामा ज्‍यामध्‍ये विप चा सहभाग आहे तो नाकारण्‍यात काहीही अर्थ नाही. त्‍यामुळे विप ने तक ला जे बियाणे पुरवठा केले ते दोषयुक्‍त होते असेच म्‍हणावे लागेल. अर्थात नुकसान भरपाईची रक्कम मान्‍य करुन विप ने ही तशी अप्रत्‍यक्ष कबुली दिली आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठचे डॉ.के.एस.बेग यांनी दिलेला अहवाल हा सक्षम प्रयोगशाळा अहवाल म्‍हणून मान्‍य करता येईल म्‍हणून विप ने दोषयुक्‍त बियाणे पुरवठा करुन तक चे नुकसान केले आहे हे मान्‍य करत आहोत. नुकसान भरपाई संदर्भात विचार करतांना तक्रारदाराने उत्‍पादित झालेले बियाणे हे खुल्‍या बाजारात विक्री केलेले आहे हे कबूल आहे. अर्थात खुल्‍या बाजारात सदरचे किती बियाणे विक्री करुन त्‍याला किती पैसे मिळाले हे त्याने स्‍पष्‍टपणे सांगितलेले नाही. परंतू या न्‍यायमंचाने या पुर्वीच निश्चित केलेला असून तो शासनाचा एम.एस.पी. व बाजारभाव यांचे अनुषंगाने रु.3,000/- क्विंटल निश्चित केला आहे. पायाभुत बियाणे हे विप स्‍वत: च खरेदी करत असल्‍यामुळे व त्याचा वापर हा बियाणे म्‍हणून होत असल्‍याने सर्वसाधारणपणे रु.3,000/- ते 3,500/- प्रती क्विंटल व इतर इन्‍सेंन्‍टीव्‍ह व बोनस म्‍हणून 20 टक्‍के इतकी अतिरिक्‍त धरली तर रु.3,500/- अधिक रु.700/- इन्‍सेन्‍टीव्‍ह असा मिळून रु.4,200/- प्रतिक्विंटल दर मिळणे शेतक-याला अपेक्षित होते. परंतू उत्‍पादीत माल हा भेसळयुक्‍त असल्‍यामुळे झालेले नुकसान हे बाजार भावातील विक्री व बियाणे म्हणून महाबीजची अपेक्षीत खरेदी किंमत या भावातील फरका एवढेच झालेले आहे. त्‍यामुळे नुकसानीचे मुल्यांकन आम्‍ही खालील प्रकारे करत आहोत.

 

बियाण्‍यांच्‍या बॅग

(वापरलेल्‍या)

गट / क्षेत्र

आलेले उत्‍पादन

बाजारभावाने मिळू शकणारी किंमत

हमी भावाने मिळु शकणारी रक्कम

भेसळ

नुकसानीची निश्चित केलेली रक्‍कम

 

06

59,60 / 10 एकर.

08 क्विंटल

रु.3,000/-

प्रति क्विटल

रु.4,200/- प्रति क्विंटल.

53.84 टक्‍के

रु.1200/- प्रति क्विंटल.

 

 

 

 

 

 

 

 

 

     प्रस्‍तुत प्रकरणातील तक ने विप कडून 07 बँगा खरेदी केले चे म्‍हणणे आहे मात्र तक यांनी 6 बँगची पेरणी केलेल्‍या क्षेत्राचा पंचनामा हजर केला म्‍हणून 6 बँग बियाणांची पेरणी केली असे गृहीत धरता येईल. त्‍याप्रमाणे त्‍यापासून येणारे उत्‍पन्‍न एकरी आठ क्विंटल जे या पुर्वीच या न्‍यायमंचाने निश्चित केले आहे. त्‍यानुसार 48 क्विंटल होते. त्‍यापैकी बाजारभावाने रु.1,44,000/- त्‍यांना मिळणे अडचणीचे नाही. तसेच बाजारभावातून त्‍याने किती मालाची विक्री केली व त्‍याचे किती रक्कम मिळाली अशा स्‍वरुपाचे कागदपत्रे रेकॉर्डवर नाहीत परंतू बाजारभावाने विक्री करावी लागली असे तक चे म्‍हणणे रेकॉर्डवर आहे. तथापि रु.1,200/- प्रती क्विंटल हा त्‍यांचा विक्री दरातील फरक असून ते नुकसान 48X1200 = रु.57,600/- एवढे होत आहे. ते मिळण्‍यास तक्रारदार हानिश्चितच पात्र आहे. (न्या यनिर्णयासाठी संदर्भीय वरीष्ठक न्यावयालयाचे निवाडे पृष्ठा (अ) वर जोडले असून ते या न्या यनिर्णयाचा भाग समजण्याईत यावा)

                       आदेश

1) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येते.

2) विप क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्‍या व संयुक्तिकरित्‍या रु.57,600/- (रुपये सत्‍तावन्‍न  हजार सहाशे फक्‍त) नुकसान भरपाईपोटी तक्रारदार यांस द्यावी.

    वरील हिशोबातील रकमेव्‍यतरिक्‍त जर काही रक्‍कम विप ने तक ला यापुर्वी नुकसान भरपाई म्‍हणून दिली असेल तर ती रक्कम या अंतीम देय रकमेतून वजा करुन उर्वरीत रक्‍कम तक स देय राहील.

3) विप क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रारीचा, मानसिक व शारीरिक खर्च म्‍हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) द्यावे.

 

4)  वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर

    सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची

    पुर्तता विप यांनी न केल्‍यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज द्यावा.

 

5)  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

   (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

  (श्री.मुकुंद.बी.सस्‍ते)                                  (सौ.विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                                      सदस्‍या 

                जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.