2. तक्रारकर्ता हे मेसर्स अर्जुन टायर्स चे प्रोप्रायटर असून ते स्वतःच्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता एम.आर.एफ. कंपनीचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर्स विक्री करतात. सदर व्यवसायाकरिता तक्रारकर्त्याने दिनांक 19/4/2017 रोजी विरुद्ध पक्ष क्रमांक 1 कंपनीचे निर्मित स्वाईप मशीन क्रमांक एम स्वाईप G2 मशीन सिरीयल क्रमांक10910729165436 विरुद्ध पक्ष क्रमांक 2 विक्रेता यांचेकडून रुपये 4399/- ला विकत घेतले. उपरोक्त मशीन विकत घेताना विरुद्ध पक्षांनी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी तक्रारकर्त्याच्या दुकानामध्ये येऊन सदर मशीन इन्स्टॉल करून देतील असे तक्रारकर्त्यास वचन दिले परंतु तीन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्यास सदर स्वाईप मशीन चे इंस्टॉलेशन करून दिले नाही. तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाकडे प्रत्यक्ष भेट देऊन स्वाईप मशीन इन्स्टॉल करून देण्यास तोंडी विनंती केली परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 28/7/2017 रोजी विरुद्ध पक्षांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविला परंतु सदर नोटीस प्राप्त होऊन सुद्धा विरुद्ध पक्षांनी नोटीस ची पूर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांविरुद्ध तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली की विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास स्वाईप मशीन ची विक्री करून त्याचे इन्स्टॉलेशन करून मशीन चालू करून दिली नाही त्यामुळे सदर सेवा न्यूनता पूर्ण सेवा घोषित करून विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे स्वाईप मशीन परत घेऊन रुपये 4,399/- ही रक्कम 9 टक्के व्याजासह परत करावी तसेच शारीरिक व त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 5,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली. 3. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांना नोटीस काढली. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांना नोटीस पाठवूनही उपस्थित नाही सबब त्यांचेविरूध्द दिनांक 16/1/2018 रोजी आदेशपत्रावर एकतर्फा आदेश पारीत.
4. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनी उपस्थित होऊन लेखी कथन दाखल केले असून त्यामध्ये विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ही स्वाईप मशीन ची उत्पादक कंपनी असून तक्रारकर्त्याने दिनांक 19/4/2017 रोजी एम स्वाईप G2, मशीन सिरीयल क्रमांक 10910729165436 ही विरुद्ध पक्ष क्रमांक 2 कडून रुपये 4,399/- ला विकत घेतले व तेव्हाच विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी तक्रारकर्त्याचे दुकानांमध्ये पाठवून सदर मशीन चे इन्स्टॉलेशन करून देतील असे वचन दिले होते, सदर बाबी मान्य केल्या असून तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरित कथन नाकबूल करून पुढे विशेष कथनामध्ये नमूद केले की विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचे राजुरा येथे मागील 34- 35 वर्षांपासून प्रतिष्ठित दुकान असून आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाने कोणतीच तक्रार केलेली नाही. तक्रारकर्त्यास दिलेले स्वाईप मशीन हे 1 मोबाईल सारखे उपकरण असून त्याचा उपयोग त्यामध्ये मोबाईल सिम टाकून किंवा ब्लूटूथ द्वारे आर्थिक व्यवहार करण्याकरीता करता येतो. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 19/4/2017 रोजी स्वाईप मशीन विक्री केल्यानंतर दिनांक 26/4/2017 रोजी विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याचे दुकानामध्ये जाऊन इंस्टॉल करून सुरू करून दिले. तसेच सदर मशीन सुरू केले व तसा ई-मेल कंपनीला पाठविल्यानंतर त्याच दिवशी कंपनीकडून सदर उपकरणाचा पासवर्ड विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचे इमेल आयडीवर आला. व सदर पासवर्ड बाबतची माहिती सुद्धा तक्रारकर्त्यास देऊन सदर उपकरण सुरू करून दिले. त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर उपकरणाचा उपयोग सुद्धा केला. एकदा कंपनी कडून उपकरण ऍक्टिव्हेट करून दिल्यानंतर ते परत घेता येत नाही आणि दुसऱ्याला विकत देता येत नाही. सदर उपकरणांमध्ये कोणताही दोष नाही आणि तशी तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांकडे तक्रार सुद्धा केलेली नाही. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्यास पूर्ण सेवा दिली आहे. सबब सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारकर्त्याच्या तक्रारीलाच रिजॉईंडर समजण्यात यावे अशी निशाणी क्रमांक 8 क वर पूर्सिस दाखल, लेखी युक्तिवाद, विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचे लेखी कथन, व लेखी कथनालाच विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचे शपथपत्र समजण्यात यावे अशी निशाणी क्रमांक 9 वर पूर्सीस, लेखी युक्तिवाद आणि तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्र.1 यांचे तोंडी युक्तिवाद यावरून मंचाचे निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष 1. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी स्वाईप मशीन विक्री कराराप्रमाणे सेवा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? नाही 2. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार कारण मिमांसा मुद्दा क्रमांक 1 बाबत ः- 6. तक्रारकर्त्याने दिनांक 19/4/2017 रोजी विरुद्ध पक्ष क्रमांक 1 कंपनीचे निर्मित एम स्वाईप मशीन क्रमांक एम स्वाईप G2 मशीन सिरीयल क्रमांक10910729165436 विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचेकडून रुपये 4399/- ला विकत घेतले. सदर मशीन खरेदी केल्याची पावती तक्रारींमध्ये दस्त क्रमांक 1 वर दाखल आहे. हे विरुद्ध पक्ष क्र.2 यांनी आपले लेखी कथनामध्ये मान्य केले असल्याने तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्षांचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनी निशाणी क्रमांक 8 वर दाखल केलेल्या दस्त क्रमांक 8 अ ई-मेल मध्ये अर्जुन टायर्सने खरेदी केलेले कस्टमर डिवाइस आयडी क्रमांक 10910729165436 हे दिनांक 26/4/2017 रोजी ऍक्टिव्हेट केल्याचे तसेच पासवर्ड इत्यादी नमूद आहे. यावरून विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्यास उपरोक्त स्वाईप मशीन इन्स्टॉल करून दिनांक 26/4/2017 रोजी ऍक्टिव्हेट करून दिले होते व त्याच दिवशी तसा अॅक्टीव्हेशन टिमकडून विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांना इमेल प्राप्त झाला हे सिद्ध होते. यावरून विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्यूनता दिली नाही असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. 2 बाबत :-
7. मुद्दा क्र. 1 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश |