जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –65/2011 तक्रार दाखल तारीख –02/05/2011
मोहरबाई भ्र. कृष्णा झनझन,
वय – 40 वर्षे, धंदा – घरकाम/मजूरी,
रा.साखरे बोरगांव, पो. मोरगाव, ता.जि.बीड ...तक्रारदार
विरुध्द
1. मा.झोनल मॅनेजर,
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एल.आय.सी.ऑफ इंडिया),
वेस्टर्न झोनल ऑफिस योग क्षेम जीवन विमा मार्ग,मुंबई
2. शाखा व्यवस्थापक,
भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी),
कार्यालय जीवन-ज्योती पोलीस ग्राऊंड समोर,
नगर रोड, बीड ता.जि.बीड
3. दत्तात्रय पि. गंगाधर जगदाळे,
वय – सज्ञान, धंदा – विमा प्रतिनिधी,
रा.साखरे बोरगांव, पो. मोरगाव, ता.जि.बीड ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- वकिल – एकनाथ काकडे,
सामनेवाले 1 व 2 तर्फ :- वकिल – ए.पी.कुलकर्णी,
सामनेवाले 3 तर्फ :- वकिल – आरविंद कुलकर्णी,
निकालपत्र
( घोषितद्वारा अजय भोसरेकर – सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार ही साखरे बोरगाव येथील रहिवाशी असुन तक्रारदाराचे मयत पतीचे नावाने सामनेवाले यांचेकडे एक विमापॉलीसी खरेदी केली होती. सदर पॉलीसी ही सामनेवाले नं.1 व 2 चे विमा प्रतिनिधी सामनेवाले नं.3 यांचेकडून खरेदी केली होती. तक्रारदाराचे विमा पॉलीसीचा क्रं.984993727 असा असुन याचा वार्षिक हप्ता हा रु.10,000/- या प्रमाणे निश्चित करुन दि.11.5.2007 रोजी प्रथम हप्ता भरला आहे. तक्रारदारास सदर पॉलीसी ही 180/20 मनिप्लस या अंतर्गत असुन या पॉलीसीच्या योजनेअंतर्गत तक्रारदारास गंभीर स्वरुपाचा अजाराने मृत्यू झाल्यास रु.1,00,000/- आधिक जमा हप्त्याची रक्कम अधिक बोनस इत्यादी वारसास मिळण्याचे हक्क तक्रारदारास प्राप्त झाले. म्हणुन तक्रारदाराने सदर पॉलीसी खरेदी केली. तक्रारदाराचे पतीचा पॉलीसी घेतल्यानंतर दि.7.8.2009 रोजी कॅन्सर हा आजार उदभवला व त्यांनी बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पीटल व सहयाद्री हॉस्पीटल, पूणे इत्यादी ठिकाणी औषधोपचार घेत असताना तक्रारदारास रक्कम रु.1,50,000/- खर्च करावा लागला. त्यात तक्रारदाराचे पतीचा दि.5.11.2009 रोजी मृत्यू झाला. तक्रारदाराने सर्व कागदपत्रे व विमा पॉलीसी क्लेम फार्म भरुन देवून सामनेवाले नं.1 यांचेकडे अर्ज केला.त्यात सामनेवाले यांनी तक्रारदारास लेखी पत्रा नुसार आरईएफ क्लेम/983/1137 या पत्राने आपले पती हे मनोरुग्ण होते ही बाब विमा पॉलीसी घेताना न सांगीतल्यामुळे आपणास पॉलीसीची रक्कम देता येणार नाही असे उत्तर दिले.
तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यांना दि.12.1.2011 रोजी संपूर्ण कागदपत्र रजिस्टर पोस्टाने पाठविले ते दि.17.1.2011 सामनेवाले यांना मिळाले असुन सामनेवाले यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर तक्रारदारस दिले नाही. तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात पी अँण्ड टी 180/20 या योजनेअंतर्गत घेतलेली विमा पॉलीसीची रक्कम रु.1,00,000/- तसेच पॉलीसीत हप्तेपोटी भरलेली रक्कम रु.20,000/- मिळण्याची मागणी करुन झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अशी एकुण 1,48,000/- व्याजासह सामनेवाले यांचेकडून मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्हणणेचे व तक्रारीचे पुष्ठयार्थ एकुण 9 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.3 यांनी आपले लेखी म्हणणे दि.11.8.2011 रोजी दाखल केले असुन त्यांना तक्रारदारानी पॉलीसी घेतली हे मान्य आहे. तक्रारदाराने पॉलीसी पोटी भरणा केलेली रक्कमेची पावती तक्रारदारास वेळोवेळी दिले आहे. सामनेवाले नं.3 यांनी तक्रारदारास देवू करावयाचे सेवेत कोणताही कसूर केलेला नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी.
सामनेवाले नं.3 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्ठयार्थ अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
सामनेवाले नं.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दि.11.8.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदाराची पॉलीसी ही मान्य आहे. परंतु तक्रारदाराने प्रोपोजल फॉर्म भरुन देताना डॉ.एस.एच.मोगले यांचेकडे बीड येथे 2003 ते 2005 या कालावधीत मनोरुग्णासाठी औषधोपाचार घेत होता ही बाब तक्रारदाराने प्रोपोजल फॉर्ममध्ये झाकुन ठेवली त्यामुळे तक्रारदारास प्रोपोजल फॉर्मच्या प्रश्न क्रं.6 ऐ आणि बी व प्रश्न क्रं. ए ते एच आणि जे ते एल याचे उत्तर तक्रारदाराने नाही असे दिले आहे. म्हणुन तक्रारदाराने त्याचे मागील 5 वर्षात घेतलेले वैद्यकीय औषधोपचाराची माहिती झाकुन ठेवून पॉलीसी घेतल्यामुळे सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदाराचा विमा पॉलीसी दि.29.8.2010 रोजी नाकारुन व तक्रारदार हा दि.5.11.2009 रोजी ब्लड कॅन्सर या आजाराने मृत्यू झाला असल्यामुळे तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी केली नाही, त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीस करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाले नं.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्ठयार्थ एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, कागदपत्रे दोन्हीचा तोंडी युक्तीवाद याचे बारकाईने आवलोकन केले असता,
सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्राच्या छायाप्रती पाहता डॉ.मोगले यांचेकडे तक्रारदार हा मनोरुग्णावर उपचार घेत असल्या बाबतची दि.21.4.2006 मं 19.1.2009 या दरम्यानच्या कालावधीची आहेत. पंरतु सामनवाले यांनी त्यांचे लेखी उत्तरात हे 2003 ते 2005 या दरम्यानच्या कालावधीत उपचार घेतले असल्याचे म्हंटले आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेली डॉ. मोगले यांचे औषधोपचाराची कागदपत्रे ही तक्रारदाराचीच आहेत हे सिध्द करण्याची सामनेवाले यांनी भारतीय पुरावा कायदयानुसार योग्य असा पुरावा सादर केला नाही. म्हणून तो पुरावा होवू शकत नाही असे तक्रारदाराने म्हंटले आहे.
सामनेवाले यांनी माननीय सुप्रिम कोट, व माननीय मुंबई हायकोर्ट यांचे निकाल 2006 व 2008 चे दाखल केले आहेत. त्यातील परिस्थिती पहाता सदर निकाल हे तक्रारदाराचे प्रकरणाशी मिळते जुळते नसल्या बद्दलचे दिसून येते. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबतची कागदपत्रे व दोघांचा युक्तीवाद ऐकला असुन तक्रारदार हा ज्या आजारासाठी उपचार डॉ.मोगले यांचेकडे घेत होते, त्या बाबतचा सामनेवाले यांदी दाखल केलेली कागदपत्रे ही त्यांना लेखी म्हणण्यात दिलेल्या तारखांत विसंगती असुन तक्रार हा ब्लड कॅन्सर सारख्या आजाराने मयत झाला आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार हा ब्लड कॅन्सरने मयत झाला असुन अन्य आजाराचे कारण देवून जे की तक्रारदाराचे पतीच्या मृत्यूचे कारण नसताना नाकारुन सेवेत त्रूटी केली आहे, हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील आदेश करीत आहे.
।। आदेश ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.1 ते 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराचे मयत पतीची विमा पॉलीसी क्रं.984993727 याची देय असणारी सर्व लाभासह रक्कम आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
3. सामनेवाले नं.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्रं.2 चे पालन मुदतीत न केल्यास दि.29.8.2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजसह तक्रारदाराचे पदरी पडेपर्यन्त देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाले नं.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) तसेच तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- ( अक्षरी रुपये दोन हाजर फक्त ) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
5. सामनेवाले नं.3 यांना खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
( अजय भोसरेकर ) ( पी.बी.भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड