Maharashtra

Nanded

CC/10/69

Anisa Begam Mahmad Abdul Khalekh - Complainant(s)

Versus

Manager, LIC - Opp.Party(s)

Adv. M.A. Gani

23 Aug 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/69
1. Anisa Begam Mahmad Abdul Khalekh Nijam Colony, Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager, LIC Hingoli Road Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,PRESIDING MEMBER
PRESENT :

Dated : 23 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/69.
                          प्रकरण दाखल तारीख - 26/02/2010
                          प्रकरण निकाल तारीख 23/08/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
अनिसा बेगम भ्र. महंमद अब्‍दूल खालेख
वय 50 वर्षे, धंदा घरकाम                                   अर्जदार
रा.निजाम कॉलनी, नांदेड
     विरुध्‍द.
मा. व्‍यवस्‍थापक
भारतीय जीवन बिमा निगम,
विभागीय कार्यालय, जिवन प्रकाश                     गैरअर्जदार
पोस्‍ट बॉक्‍स नं23, हिंगोली रोड, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.एम.ए.गनी
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील     -  अड.विवेक नांदेडकर
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
             गैरअर्जदार भारतीय जीवन बिमा निगम यांच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल अर्जदार यांनी तक्रार दाखल केली असून त्‍यांची हकीकत खालील प्रमाणे, अर्जदाराचे पती महंमद अब्‍दूल खालेख पि. म. अब्‍दूल रज्‍जाक यांनी स्‍वतःचे नांवाने तिन पॉलिसी प्रस्‍ताव दिले होते. यानंतर त्‍यांची वैद्यकीय तपासणी करुन  गैरअर्जदार यांनी पॉलिसी नंबर 983094148, 987008996 व 983399789  हे तिन विमा पॉलिसी दिल्‍या. सदरीत तिनही पॉलिसी चालू असताना दि.08.06.2009 रोजी अर्जदार हा कॅन्‍सर या आजाराने मरण पावला. गैरअर्जदार यांना सूचना दिली व आवश्‍यक ते कागदपञही दिले परंतु गैरअर्जदार यांनी  या तिन पॉलिसी पैकी पॉलिसी नंबर 983094148 या पॉलिसीची मॅच्‍यूरिटी रक्‍कम लाभासह अर्जदारांना दिली. उर्वरित दोन पॉलिसीची रक्‍कम अर्जदाराचे पती मागील सात वर्षापासून डी.एम. अन्‍ड एचटीएन च्‍या आजाराने पिडीत आहेत असे कारण दाखवून क्‍लेम नामंजूर केला. अर्जदारास मृत्‍यूपूर्वी चार ते पाच महिनेपूर्वी कॅन्‍सर झाल्‍याचे निदान
 
 
झाले होते. ज्‍यामूळे मयतास इंडो अमेरीकन कॅन्‍सर इन्‍स्‍टीटयूट हैद्राबाद व विनायक रुग्‍णालय नांदेड व धूत हॉस्‍पीटल औरंगाबाद येथे उपचार देण्‍यात आले. यानंतर त्‍यांचे नीधन झाले. गैरअर्जदाराने दि.05.10.2009 रोजी पॉलिसीची रक्‍कम देण्‍यास नकार दिला. म्‍हणून आता अर्जदाराची अशी मागणी आहे की,  पॉलिसी नंबर 987008996 व 983399789 या दोन्‍ही पॉलिसीची मॅच्‍यूरिटी रक्‍कम सर्व लाभासहीत अर्जदारास मिळावी तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.5,000/- व मानसिक ञासापोटी रु.25,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराने मा. मंचापासून खूप गोष्‍टी लपवून ठेवलेल्‍या आहे. अर्जदाराचा क्‍लेम दि.05.10.2009 रोजी गैरअर्जदराने खारीज केला यानंतर झोनल क्‍लेम्‍स रिव्‍हयू कमिटी  यांनीही तोच नीर्णय कायम ठेवला. मयत व्‍यक्‍तीने विमा पॉलिसी काढताना त्‍यांना असलेल्‍या आजाराची संपूर्ण माहीती लपवून ठेवली. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे  त्‍यांनी मयत व्‍यक्‍तीची वैद्यकीय तपासणी केली होती हे म्‍हणणे अमान्‍य केले आहे. विमाधारकाची दि.08.06.2009 रोजी कॅन्‍सर या आजाराने नीधन झाले हे त्‍यांना मान्‍य आहे व पॉलिसी नंबर 983094148 या बाबतची रक्‍कम त्‍यांना देण्‍यात आली हे ही त्‍यांना मान्‍य आहे. दूस-या पॉलिसी मध्‍ये आवश्‍यक असलेले कागदपञ लपवून ठेवले त्‍यामूळे गैरअर्जदारांनी धूत हॉस्‍पीटल औरंगाबाद यांचेकडून रेकॉर्ड मागवावे लागले. गैरअर्जदाराने अर्जदारास सात वर्षापासून आजार जडल्‍याचे कारण दर्शवून क्‍लेम नाकारला हे कारण योग्‍य आहे. विमाधारकास मृत्‍यूपूर्वी चार महिनेपूर्वी कॅन्‍सर झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले हे त्‍यांचे म्‍हणणे खोटे आहे. पॉलिसी काढताना मयताने त्‍यांना कोणताही आजार नव्‍हता हे स्‍पष्‍टपणे सांगितले होते व मयत व्‍यक्‍तीच्‍या कागदपञावरुन व बीवन फॉर्म, विनायक हॉस्‍पीटल, नांदेड  यांनी सादर केल्‍यावरुन हे निष्‍पन्‍न झाले की मयत व्‍यक्‍ती हा मरणापूर्वी Diabetic Melletin with Carcinoma Secondaly या आजाराने ञस्‍थ होते ही बाब त्‍यांनी विमा पॉलिसीत नमूद केली नाही. मयताने पॉलिसी काढल्‍यापासून केवळ एक वर्ष आठ महिने नऊ दिवसांत मृत्‍यू झाला. त्‍यामूळे Suppressed of material facts  या विमा पॉलिसीच्‍या नियमानुसार क्‍लेम नामंजूर करण्‍यात आला. अर्जदाराची तक्रार खोटी असून ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे.
 
 
दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
1.                 गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार
      सिध्‍द करतात काय ?                           होय.
2.    काय आदेश ?                        अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदारांनी गैरअर्जदाराकडून विम्‍याच्‍या तिन पॉलिसी घेतल्‍या होत्‍या. त्‍यात पॉलिसी नंबर 983094148 या बददल वाद नाही. ही पॉलिसी दि.08.09.2006 रोजीची आहे व ही पॉलिसी रु.1,00,000/- ची आहे. पॉलिसी नंबर 983399789 ही पॉलिसी देखील रु.2,00,000/- ची आहे.यात प्रपोजलप्रमाणे मयत महंमद अब्‍दूल खालेख यांची प्रकृती चांगली असल्‍या बददलचा उल्‍लेख केलेला आहे. असे जरी असले तरी त्‍यांचा मृत्‍यू दि.08.06.2009 रोजी झाला. यात अर्जदाराने असे म्‍हटले आहे की, मरताना त्‍यांना   कॅन्‍सर सारखा आजार होता व ही बाब पॉलिसीच्‍या नियमाप्रमाणे suppressed of material facts खाली येते म्‍हणून मयताला क्‍लेम दिला नाही. अर्जदार ही मयताची पत्‍नी असून ती नॉमिनी आहे. आता यात महत्‍वाची बाब म्‍हणजे गैरअर्जदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे मयत हा वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे सात वर्षापासून पिडीत आहे काय  ?  हे बघणे महत्‍वाचे आहे.यासाठी गैरअर्जदाराने जे रेकॉर्ड दाखल केले त्‍यात Focus Diagnostics  हा Radiology चा रिपोर्ट दि.11.02.2009चा आहे यात सात वर्षापासून जूना आजार होता असा निष्‍कर्ष काढलेला नाही. तसेच Indo-American Cancer Institute & Research Centre Hydrabad यांचाही रिपोर्ट 2009 चाच आहे. केस ऑफ हिस्‍ट्री मध्‍ये यापूर्वी तो आजार होता असा कोणताही उल्‍लेख केलेला नाही. सेठ नंदलालजी धूत हॉस्‍पीटल औरंगाबाद यांचे डिसचार्ज कार्ड पाहिले असता यात मयतास दि.13.04.2009 रोजीला अडमिट करण्‍यात आले व दि.27.04.2009 ला डिसचार्ज देण्‍यात आला. शेट नंदलाल धूत यांचे हॉस्‍पीटल मध्‍ये रोज काय उपचार दिला हे हॉस्‍पीटलचे रेकार्ड दाखल केलेले आहे. हे सर्व रेकार्ड 2009चे आहे. यावरुन पेंशटला गेल्‍या सात वर्षापासून कॅन्‍सर सारखा रोग होता हा दाखवणारा सन 2006-07 चे कोणतेही रेकार्ड गैरअर्जदार दाखल करु शकले नाहीत. सन 2006 पासून मयत यांचेकडे पॉलिसी आहेत. म्‍हणजे गैरअर्जदार म्‍हणतात याप्रमाणे यातही पॉलिसीला सात वर्ष झालेले नाहीत.    असे असताना गैरअर्जदार यांनी एका पॉलिसीची
 
 
रक्‍कम कशी दिली ? मग हया पॉलिसीची रक्‍कम दिली असेल तर हेच नियम दूस-या पॉलिसीला लागू होतील. कारण मयताचा रोग हा पॉलिसी घेतल्‍यानंतरचा आहे व मृत्‍यू हा दि.08.06.2009 रोजी म्‍हणजे पॉलिसी घेतल्‍यानंतर जवळपास दोन वर्षानंतरचा आहे.  प्रस्‍तावामध्‍ये मयताने त्‍यांचे आरोग्‍य चांगले आहे असे लिहीलेले जरी असले तरी हे त्‍यांचे आरोग्‍य चांगले नव्‍हते व ते आजारी होते हे आता गैरअर्जदार यांना सिध्‍द करावे लागेल.  कागदपञानुसार गैरअर्जदार हे सिध्‍द करु शकलेले नाहीत म्‍हणून मयतानंतर त्‍यांचे नॉमिनिस गैरअर्जदार यांनी दोन पॉलिसीची रक्‍कम रु.2,00,000/- प्रत्‍येकी देणे आवश्‍यक असताना ती न देऊन सेवेत ञूटी केली आहे.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत मयताची पत्‍नी व नॉमिनी अर्जदार हिला पॉलिसी नंबर 987008996 या बददल रु.2,00,000/- व पॉलिसी नंबर 983399789 या बददल रु.2,00,000/- नियमातील लाभासहीत दि.05.10.2009 पासून (इन्‍कार केल्‍याचे तारखेपासून) 9 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत, असे न केल्‍यास दंडणीय व्‍याज म्‍हणून 12 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत दयावेत.
3.                                         मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- दयावेत.
4.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                         श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                        सदस्‍य.
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER