(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदाकडून पॉलीसी घेतली होती. त्या पॉलीसीच्या दरम्यान म्हणजेच दि.09.11.2006 रोजी त्यांना बैलगाडीमुळे अपघात झाला. त्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी होऊन डॉ.पटवर्धन यांच्याकडे उपचारासाठी दाखल झाले, डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधोपचार व ऑपरेशन केले. त्याचा खर्च रुपये एक लाखापेक्षा जास्त झाला. या अपघाताचा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला, पंचनामा करण्यात आला. त्यानंतर तक्रारदारानी सिव्हील सर्जन औरंगाबाद यांच्याकडे स्वतःची तपासणी करुन घेतली. सिव्हील सर्जननी त्यांना 24 टक्के कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. तक्रारदारानी ते प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे घेऊन क्लेम फॉर्म गैरअर्जदाराकडे पाठवून दिला. दि.15.03.2008 रोजी गैरअर्जदारानी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु.1,00,000/- 24% व्याजदराने आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.1 आणि 2 यांनी लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलीसीच्या अटी व शर्ती 7.1.3.1 नुसार The conditions of the Master Policy document under point 7.1.3.1 is “Total and Permanent Disability means a disability caused by or which is the result of an accident (directly and solely by an accident, which has been caused by outward, violent and visible means) and which is total and permanent. The accident shall result in bodily injury or injuries to the Life Assured and such injury or injuries shall, independently of any other means, and within 120 days of the occurrence of the accident result in :- i. Total and irrecoverable loss of sight of both eyes; ii. Loss or severance of two or more limbs at or above wrist or ankles; iii. Total and irrevocable loss of sight of one eye and loss by severance of one limb at or above wrist or ankle; or iv. The Life Assured being in coma for a continuous period of at least 60 days; या अटी व शर्तीनुसार तक्रारदारास वरीलप्रमाणे अपघातामध्ये त्यांच्या अवयवाचे पूर्णपणे नुकसान झालेले नव्हते, तक्रारदारानी टोटल परमनंट डिसॅबिलिटीनुसार फक्त 24 टक्के अपंगत्व आल्याचे त्यांनी प्रमाणपत्र दाखल केलेले आहे, त्यामुळे तक्रारदारास पॉलीसीनुसार कायमचे अपंगत्व आलेले नाही. म्हणून त्यांचा क्लेम नामंजूर केलेला आहे, तो योग्य आहे. यावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. गैरअर्जदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी गैरअर्जदाराकडे एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स पॉलीसी घेतली होती. त्या पॉलीसीच्या अटी व शर्ती तक्रारदार आणि गैरअर्जदार या दोघावर ही बंधनकारक असतात. अटी व शर्ती 7.1.3.1 या नुसार विमाधारकास टोटल आणि परमनंट डिसॅबिलिटी किंवा, कायमचे अपंगत्व असणे आवश्यक असते. परंतू तक्रारदारानीच डॉक्टर सिव्हील सर्जनने त्यांना फक्त 24 टक्केच कायमचे अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे, त्यात जरी कायमचे अपंगत्व नमूद केलेले असले तरी पण, या अटी व शर्तीनुसार एक पूर्ण डोळयाची दृष्टी, दोन अवयव, मनगटाच्यावर किंवा घोटयाच्यावर हात व पाय निकामी होते, किंवा एक डोळयाची दृष्टी, किंवा विमाधारक कमीत कमी 60 दिवस कोमामध्ये असेल तर, त्यास टोटल कायम अपंगत्व आहे असे या पॉलीसीनुसार ठरलेले आहे. अशा कायमच्या अपंगत्व आलेल्या विमाधारकास या पॉलीसीचा फायदा मिळू शकतो. प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये तक्रारदारास अशा प्रकारचे कायमचे अपंगत्व आलेले नसल्यामुळे योग्य त्या कारणावरुन गैरअर्जदारांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे, तो योग्य आहे, असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रार नामंजूर करण्यात येते. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |