::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/12/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर प्रकरणात, मंचाने दिनांक 30/06/2017 रोजी अंतरिम आदेश पारित केले होते. त्याची पुर्तता विरुध्द पक्षाने करण्यासाठी प्रकरण असतांना, तक्रारकर्त्याच्या वकिलाने, आज दिनांक 28/12/2017 रोजी, पुरसिस देवून खालीलप्रमाणे मंचाला कळवले.
अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये वरिल प्रकरण आपसात तडजोड केले असून, गैरअर्जदाराने अर्जदाराचा टी.व्ही. दुरुस्त करुन दिला आहे. त्यामुळे अर्जदाराला यापुढे प्रकरण चालविणे नाही व प्रकरण काढून घेत आहे. करिता पुरसिस.
त्यामुळे सदर प्रकरण हे उभय पक्षांचे आपसात झाले, अशी मंचाची खात्री झाल्यामुळे, पुढील प्रोसेस कायमची इथेच थांबवण्यात येते.
अशास्थितीत, सदर तक्रार, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri