ग्राहक तक्रार क्र. 56/2015
दाखल तारीख : 20/01/2015
निकाल तारीख : 06/02/2016
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 16 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. हनुमंत सुर्यभान मारवाडकर,
वय – 35 वर्षे, धंदा – शेती,
रा.मुळेवाडी, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मा.व्यवस्थापक,
कृषीरत्न केमिकल्स अॅन्ड फर्टीलायझर्स,
विमल इंडस्ट्रीज, भवानी माता रोड
खांडवा, जि.खांडवा, मध्यप्रदेश.
2. प्रोप्रायटर, मे. साईनाथ कृषी सेवा केंद्र,
एस.टी. बसस्टॅड जवळ,
मेन रोड, तेर. ता.जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एम.टी.गंगावणे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधिज्ञ : श्री.डी.एन.सोनवणे.
न्यायनिर्णय
मा. सदस्य, सौ. विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
1) अर्जदाराने विप क्र. 2 यांच्याकडून विप क्र. 1 यांनी उत्पादीत व प्रक्रिया केलेल कृषी रत्न सोयाबीनचे बियाणची 03 बँग दि.11/07/2014 रोजी बिल क्र.145 प्रमाणे जेएस335 लॉट क्र.170647 व 170683 च्या रकमा रु.2,450/- प्रतिबॅग प्रमाणे एकुण रक्कम रु.7,350/- मध्ये विकत घेतल्या व सदरची बँग दि.12/07/2014 रोजी अर्जदार यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मुळेवाडी येथील जमिन गट क्र.104 मध्ये 0 हे 40 आर क्षेत्रावर व जमिन गट क्र.318 मध्ये 0 हे 80 आर क्षेत्रावर आवश्यक ती सर्व पुर्व मशागत व पेरणीसाठी आवश्यक बाबीची पडताळणी करुन पेरणी केली. मात्र शंका आल्याने विप क्र.1 व 2 यांना दि.22/07/2014 रोजी मा.कृषि अधिकारी साहेब, पंचायत समिती उस्मानाबाद यांच्याकडे विप क्र.1 यांचे कंपनीचे बियाणे न उगवल्याबाबत लेखी तक्रार दिली. सदर अर्जानुसार तालुकास्तरीय चोकशी उपसमिती यांना अर्जदार यांच्या शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा केला त्यामध्ये सरासरी उगवण ही 23 टक्के एवढी आहे असे निदर्शनास आले. तक यांना सदर सोयाबीनचे बाजार भावानुसार प्रति क्विंटल रु.3,500/- प्रमाणे रु.1,57,500/-चे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु विप क्र.1 व 2 यांनी निकृष्ठ दर्जाचे बियाणे विक्री केल्याने अर्जदार यांना रक्कम रु.1,57,000/5 व त्यासाठी झालेला खर्च रु.20,000/- असे एकूण रु.1,77,500/- रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. अर्जदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक व आर्थिक त्रासापोटी विप यांचेकडून नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- व सदर तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- अशी एकुण रु.1,99,5000/- व्याजासह मिळावी अशी विनंती केली आहे.
2) सदर तक्रारीबाबत विप क्र.1 यांना नोटीस पाठवण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे दि.23/03/2015 रोजी मंचात दाखल केले ते थोडक्यात पुढीलप्रमाणे.
आमच्या व्दारे सदर बियाणे कषिरत्न केमीकल एंड फर्टीयाझर यांना विकले नव्हते. आमचे व्दारा साईनाथ कृषि सेवा केंद्र यांना सदर बियाणे विकले होते. तरी सदर नोटीस कृषिरत्न केमीकल एवं फर्टिलायझर यांना पाठविण्यात यावे.
3) सदर तक्रारीबाबत विप क्र.2 यांना नोटीस पाठवण्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे दि.25/03/2015 रोजी मंचात दाखल केले ते थोडक्यात पुढीलप्रमाणे.
विप क्र.2 हे विप क्र.1 चे अधिकृत विक्रेते असल्याचे मान्य असून.तक यांना आपण 3 बॅग विकल्याचे मान्य आहे. बिलाच्या पावतीवरती स्पष्ट नमुद केलेले आहे की या बीलातील सर्व मालाची सील लेबल, टॅग, लॉट क्र. इ. सर्व तपासुन बरोबर असल्याची खात्री करुनच मी हे बियाणे स्वखुशीने खरेदी केले आहे असे नमूद केले आहे. विप क्र.2 यांचा सदरील सदोष बियाणाशी कांही संबंध नाही. म्हणून तक यांचा अर्ज खर्चासह नामंजूर करावा असे म्हणणे दिले आहे.
4) अर्जदाराने तक्रारी सोबत, खरेदी पावती, बियाणाचे लेबल, कृषी अधिकारी यांना पाठविलेले पत्र, उपविभागीय कृषी अधिकारी उस्मानाबाद यांचे पत्र, तपासणी अहवाल, सातबारा, लेखी युक्तिवाद वाचला व तोंडी युक्तिवाद एैकला त्याचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदाराला दोषयुक्त बियाणे विक्री करुन विप क्र.1,
उत्पादित कंपनी ने सेवेत त्रुटी केली का? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे का? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2
5) अर्जदाराने पेरणीसाठी बियाणे खरेदी केले आणिते उगवून आले नाही ही प्रमुख तक्रार आहे. तपासणी अहवालात बियाणे निकृष्ठ दर्जाचे असल्याने उगवनू आले नाही आणि न उगवण्याचे कारण म्हणजे बियाणे कुजलेल्या परिस्थिती / अवस्थेत आढळून आल्याने उगवणीवर परिणाम झाल्याचे दिसुन येते असा अहवालात नमुद केलेले आहे.
6) अर्जदाराला मौजे मुळेवाडी ता.जि. उस्मानाबाद येथे गट क्र.104 मध्ये 40 आर मध्ये व गट क्र.318 मध्ये 80 आर या क्षेत्रावर बियाणे पेरल्याचे म्हंटले आहे आणि प्रतिबॅग 15 क्विंटल प्रमाणे 3 बँगचे 45 क्विंटल एवढे उत्पन्न अपेक्षित होते. त्यानुसार बाजार भावानुसार प्रति क्विंटल रु.3,500/- प्रमाणे रु.1,57,500/- एवढे रकमेचे उत्पन्न झाले असते असे म्हंटल आहे. तसेच त्यासाठी झालेला खर्च रक्कम रु.20,000/- असा ही मागितला आहे. अर्जदाराने मशागतीच्या खर्चाचा तपशील अभिलेखावर दाखल केलेला नाही व कसला पुरावा नसल्याने तो ग्राहय धरणे संयुक्तिक वाटणार नाही म्हणून तो देता येणार नाही.
7) अर्जदाराची जमीन सातबाराप्रमाणे चांगल्या प्रकारात मोडते हे आकारावरुन कळते त्यामुळे एक बॅगेस 18 क्विंटल उत्पन्न निघाले असते असे ग्राहय धरता येईल. त्यामुळे 8X3=24, प्रति क्विंटल रु.3,000/- प्रमाणे 24X3000=रु.72,000/-एवढे उत्पन्न अर्जदारास मिळाले असते. परंतु 23 टक्के उगवण झाली म्हणून रु.16,160/- वजा जाता रु.55,440/- एवढे उत्पन्न मिळाले असते, परंतु बियाणे दोषयुक्त असल्याने त्यांना त्या रकमेसाठी मुकावे लागले हे निश्चतच ग्राहय धरावे लागेल.
8) वरील सर्व विवेंचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहोत की अर्जदाराला त्याची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1 उत्पादित कंपनी यांनी अर्जदारास बियाणे सदोष विक्री करुन सेवेत त्रुटी केल्याबद्दल व नुकसानीपोटी रक्कम रु.55,440/- (रुपये पंचावन्न हजार चारशे चाळीस फक्त) दि.20/01/2015 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश पारित दिनाकांपासून 30 दिवसात द्यावेत.
3) विप क्र.1 उत्पादित कंपनी यांनी अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) आदेश पारित दिनांकापासून 30 दिवसात द्यावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.