(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र सामनेवाला यांनी केलेल्या अर्जदाराची फसवणुकीची व अडवणुकीची चौकशी होवून त्यांना कडक शासन व्हावे, सामनेवाला कडून नो डयुजचा दाखला व आर.सी.बुकातील हायरपर्चेस शेरा कमी करण्यासाठी ना हरकत दाखला मिळावा, अर्जदार यांना झालेल्या त्रासाची व अडवणुकीची नुकसान भरपाई रक्कम रु.10,000/- मिळावी, अर्जदारास उर्वरीत रक्कम रु.3427/- मिळावी, अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी या कामी पान क्र.19 लगत लेखी म्हणणे व पान क्र.20 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः मुद्देः 1. अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय. 2. सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-नाही. 3. अंतीम आदेश?-अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला विरुध्द नामंजूर करणेत येत आहे. विवेचनः याकामी अर्जदार यांनी पान क्र.28 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला यांचे वतीने पान क्र.31 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. अर्जदार यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्जाऊ रक्कम दिली होती ही बाब सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.7 लगत सामनेवाला यांचे दि.16/08/2010 रोजीचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी पान क्र.23 लगत कर्ज खात्याचे स्टेटमेंट व पान क्र.24 लगत लोन कम गॅरेंटी अँग्रीमेंट दाखल केलेले आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.7, पान क्र.23 व पान क्र.24 लगतची कागदपत्रे यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार व सामनेवाला यांचे मध्ये दि.24/09/2008 रोजी करारनामा झालेला आहे. परंतु अर्जदार यांनी दुसरा, तिसरा व चौथा हप्ता मुदतीत भरलेला नाही. अर्जदार यांनी दि.30/09/2010 रोजी रक्कम रु.2,00,000/- भरलेले आहेत ते तिन महिने उशिराने भरलेले आहेत. दि.16/08/2010 रोजीचे स्टेटमेंट हे दि.01/04/2009 ते दि.30/06/2010 या कालावधीचेच आहे. रक्कम रु.4800/- ही रक्कम डाक्युमेंट चार्जेस व प्रासेसिंग चार्जेसपोटी सामनेवाला कडे भरलेले आहेत, या रकमेशी कर्ज फेडीशी काहीही संबंध नाही. अद्यापही अर्जदार यांचेकडून कर्जाऊ रक्कम येणे आहे. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही.” असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.7 लगत सामनेवाला यांचे दि.16/08/2010 रोजीचे स्टेटमेंट दाखल केलेले आहे तसेच पान क्र.8 लगत रक्कम रु.2,00,000/- भरल्याची पावती, पान क्र.9 लगत रक्कम रु.25,000/- भरल्याची पावती, पान क्र.10 लगत रक्कम रु.41,256/- भरल्याची पावती, पान क्र.11 लगत रक्कम रु.40,000/- भरल्याची पावती, पान क्र.12 लगत रक्कम रु.1256/- भरल्याची पावती असे कागदपत्र दाखल केलेले आहेत. सामनेवाला यांनी पान क्र.23 लगत अर्जदार यांचे कर्ज खात्याचे दि.08/11/2011 रोजी स्टेटमेंट ऑफ अकाऊंट दाखल केलेले आहे. वर उल्लेख केलेल्या पान क्र.8 ते 12 लगतच्या पावत्याप्रमाणे व पान क्र.7 चे स्टेटमेंट प्रमाणे रक्कम भरल्याबाबतच्या सर्व नोंदी पान क्र.23 चे स्टेटमेंटवरती दिसून येत आहेत परंतु अर्जदार यांनी योग्य त्या वेळेत योग्य त्या तारखेस हप्त्याची रक्कम भरलेलीच नाही, ही बाब पान क्र.23 चे स्टेटमेटवरुन दिसून येत आहे. पान क्र.23 चे स्टेटमेंटनुसार दि.08/11/2011 अखेर अद्यापही अर्जदार हे सामनेवाला यांना रक्कम रु.68,154.30 पैसे देणे लागत आहेत असे दिसून येत आहे. पान क्र.23 चे स्टेटमेंट व त्यामधील नोंदी या अयोग्य व चुकीच्या आहेत हे दर्शवण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. पान क्र.23 चे स्टेटमेंटनुसार अद्यापही अर्जदार हे सामनेवाला यांना रक्कम रु.68,154.30 पैसे देणे लागत आहेत हे स्पष्ट झालेले आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. |