ग्राहक तक्रार क्र. 91/2014
दाखल तारीख : 03/05/2014
निकाल तारीख : 09/06/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 06 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. दयानंद गणपती मोराळे,
वय - 28 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.जनजागृती शाळेजवळ, एस.टी. कॉलनी,
कळंब ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
कारबॉन कस्टमर केअर 245,
संत नगर, कैलासच्या पुर्वेस,
नवी दिल्ली 110065.
2. शाखा व्यवस्थापक,
सेल सिटी सोलुशन मोबाईल सेल्स अॅझड रिपेअरींग सेटर
दारुळकर कॉम्पलेक्स, पोलिस लाईनसमोर,
गाळा नं. 1 उस्मानाबाद.
3) अविष्कार मोबाईल शॉपी,
सुनिल मार्केटच्या बाजुस, न.प.गाळा क्र.7 कळंब,
ता. कळंब जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.बी.बी.देशमुख.
विरुध्द पक्षकारा क्र.1 विरुध्द तक्रार रद्द.
विरुध्द पक्षकार क्र. 2 व 3 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
अ) 1. तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदाराने (तक) विरुध्द पक्षकार (विप) यांच्याकडून उत्पादीत केलेला कारबॉन कंपनीचा मोबईल हॅण्डसेट विप क्र.3 यांच्याकडून दि.02/02/2013 रोजी रक्कम रु.8,799/- रुपयास खरेदी घेतला असुन सदर मोबाईल हॅण्डसेटचे मॉडेल ए-21 ज्याचा आय. एम. आई. आय. क्र. 91124090027211 असा आहे व सदर मोबाईल हॅण्डसेटची वॉरंटी 1 वर्षाची आहे.
2) पण सदर मोबाईल आपोआप बंद होणे इ. प्रकार घडु लागल्याने विप क्र.3 यांच्याकडे बिघाडाबाबत तक्रार केल्यांनतर विप क्र.3 यांनी तात्पुरती दुरस्ती करुन अर्जदारास देत राहिलात. परंतु सदर मोबाईल हॅण्डसेट हा व्यवस्थीत चालत नसल्याने दि.13/06/2013 रोजी विप क्र. 3 यांचेकडे येऊन सदर हॅण्डसेटच्या बिघाडाबाबत विचारणा केली असता विप क्र.3 ने विप क्र.2 यांच्याकडे दुरस्ती करण्यास सुचविले त्यावरुन अर्जदाराने दि.14/06/2013 रोजी विप क्र.2 यांच्याकडे सदरील मोबाईल हॅण्डसेट दुरुस्तीस दिला व त्याबाबत इंटरनेट जॉब सिट पावती अर्जदारास दिली. सदर मोबाईलमध्ये मॅन्युफक्चरींग डिफेक्ट असल्याने तो दुरुस्त होण्यास उशीर होईल असे सांगून अर्जदारास मोबाईल हॅण्डसेट दुरुस्त करुन देण्यास टाळाटाळ केली व नीवन हॅण्डसेट दि.19/09/2013 रोजी विपयांनी त्याच कंपनीचा मोबाईल वापरण्यासाठी दिला व सदरपावतीवर पुर्वीचपच आय.एम.ई आय क्र. टाकुन पुर्वीच्याच पावतीवर दिल्याने अर्जदाराने विप क्र. 2 यांच्याकडे त्याबबात तक्रार केल्यानंतर विप क्र.2 यांनी सदर पवतीवर स्वत:च्या हस्ताक्षरात नवीन आय.एम.ई. आ क्रमांक बदलून त्यावरशिक्का व सही मारुन अर्जदारास दिला. परंतु सदरील मोबाईल हा त्याच दिवशी बंद पडल्याने तो दि.20/09/2013 रोजी विप क्र. 2 यांच्याकडे परत केला. म्हणून तक्रादार यांचा व्यापार असल्याने मोबाईल वापरता न आल्याने त्यांचे आर्थिक मानसिक व शारीरिक नुकसान विप क्र. 1 ते 3 यांच्या बेजबाबदार पणामुळे झाले आहे.
3) मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास देऊ गैरव्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने रक्कम रु.68,799/- नुकसान भरपाई मिळणेसाठी दि.22/02/2014 रोजी रजि. पोहच पावतीने नोटीस पाठविली विप क्र.1 यांना न बाजावता परत आली. विप क्र. 2 व 3 यांना बजावून देखील विप यांनी कसलीही दाद न दिल्याने सदरील प्रकरण अर्जदारास या मे. कोर्टात दाखल करण्यास कारण घडले आहे. विप क्र.1 व 3 यांच्याकडून रक्कम रु.68,799/- नुकसान भरपाई देणे योग्य व न्यायचे होईल अशी विनंती केली आहे.
ब) सदर प्रकरणबाबत विप क्र. 1 यांच्या विरुध्द स्टेप्स न घेतल्याने दि.08/09/2014 रोजी प्रकरण विप क्र.1 यांच्या विरुध्द प्रकरण रद्द करण्यात आले.
क) सदर प्रकरणात विप क्र. 2 व 3 यांना नोटीस काढल्या असता त्यांनी आपले म्हणणे दाखल न केल्याने दि.11/07/2014 रोजी त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
ड) अर्जदार यांनी तक्रारी सोबत दोन खरेदी पावत्या, ग्राहक पोचपावती, ग्राहक पोचपावती, सर्व्हीस सेंटरची यादी, कारबॉन कंपनीचे मोबाईक पॉकेट, नोटीसची स्थळप्रत, नोटीसची तीन पोच पावत्या, नोटीसची बंद लिफाफा इ. कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच तक यांचा लेखी युक्तीवाद वाचला व तोंडी युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) तक हे विप क्र.2, व 3 यांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2) विप यांनी अर्जदार यांना देण्यात
येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहे का ? होय.
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
इ) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 ते 3 :
1) तक्रारदार यांनी सदर तक्रार दि.03/05/2014 रोजी दाखल केली असून त्यांत त्यांची मुख्य तक्रार विप यांनी सदोष मोबाईल हॅण्डसेट दिला असल्याने सदर मोबाईल हॅण्डसेट बदलून मिळावा तसेच तक यांना झालेला मानसिक, आर्थ्रिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व करीता ही तक्रार दाखल केली आहे.
2) सदर प्रकरणी विप क्र. 1 यांच्या विरुध्द तक यांनी योग्य स्टेप्स न घेतल्याने त्यांच्या विरुध्द सदर तक्रार रद्द करण्यात आली व विप क्र. 2 व 3 यांना नोटीस मिळून देखील त्यांनी त्याबाबत कोणतेही उत्तर न दिल्याने तयांच्या विरुध्द दि.11/09/2014 रोजी या मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला. म्हणून सदर प्रकरणी तक ने तक्रारीसोबत जोडलेले कागदपत्रे महत्वाची ठरतात व त्यांची सुक्ष्म पडताळणी केली असता तक्रारदाराने विप क्र. 1 अविष्कार मोबाईल शॉपी याचे नावाची तक्रारदार याचे नावे असलेली दि.02/02/2013 रोजीची कार्बन A 21, IMEI No.911240900927211, Battery No.911240900927229 असा नमूद असलेली रु.8,799/- ची पावती दाखल केली आहे. त्याच पावतीची दाखल असलेली दुसरी झेरॉक्स पाहता तक ने नमूद केल्याप्रमाणे Charger No. चे कॉलम मध्ये Battery Number BAK12110030212 असा नमूद केल्याचे दिसते यावरुन तक यांचे म्हणणे की दि.14/06/2013 रोजी विप क्र.3 यांच्याकडे मोबाईल हॅण्डसेट दुरुस्तीस दिला व सदर मोबाईल दुरुस्ती होत नसल्याने अखेर शेवटी ऊशीर होत असत्याने तब्बल तीन महीन्याहून अधीक काळाने म्हणजेच दि.19/09/3013 रोजी त्या बदल्यात नवीन मोबाईल हॅण्डसेट दिला यास अधीक पुष्टी मिळते.
3) बाजारात सेवा देतांना दुकानदारास आपल्या व्यवसायाची जपवणूक व वृध्दी करावयाची असल्यास त्यास सेवा देतांना अधिक तत्पर राहून कार्य करावे लागते किंबहूना त्याने ते अधीक काळजीपूर्वक करावे अशी सर्वसामान्य ग्राहकांची त्यांच्याकडून अपेक्षा असते म्हणूनच ग्राहक हा दुकानदाराकडे जावून ब-याच वेळेस त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन खरेदी करत असतो तसेच ग्राहक माल खरेदी करतांना दुकानदार अनेक प्रकारचे प्रलोभन व अमिष दाखवितो मात्र त्याव्यतरिक्त ग्राहक काही तक्रारी घेऊन आल्यास त्याचे समाधान न करता त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात ब-याच वेळा, बरेच दुकानदार / सेवा पुरवठादार धन्यता मानतात. अशाच प्रकारची ही तक्रार असल्याचे सदर कागदपत्रांवरुन व विप क्र.2 उस्मानाबाद येथील मंचाच्या कार्यालयाच्या अगदी जवळ असूनही आपली व आपल्या सहकारी व्यवसायीक बंधूंची बाजू मांडण्याची वा उपस्थित राहण्याची तसदीही न घेतल्याने त्यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. म्हणून आम्ही उपलब्ध कागदपत्रांचे सुक्ष्म निरीक्षण करुन मुद्दा क्र.1, 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक यांची तक्रार मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.2 व 3 यांनी तक यांना त्याचा मोबाईल हॅण्डसेट बदलून नवीन चालू स्थितीत असलेला मोबाईल त्यांच कंपनीचा व त्याच मॉडेलचा असलेला बदलून द्यावा किंवा त्याची तक्रारदाराने दिलेली खरेदी किंमत रु.8,799/- (रुपये आठ हजार सातशे नव्यांन्नव फक्त) परत द्यावे.
2) तक यांना नुकसान भरपाईपोटी व तक्रारीचा खर्च म्हणून विप क्र.2 व 3 यांनी प्रत्येकी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.