ग्राहक तक्रार क्र. 192/2014
अर्ज दाखल तारीख : 04/10/2014
अर्ज निकाल तारीख: 12/08/2015
कालावधी: वर्षे 10 महिने 09 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. रविकिरण राजाभाऊ शेरकर,
वय - 35 वर्षे, धंदा – विधिज्ञ,
रा.गणेशनगर, उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
कार्बन कस्टमर केअर सर्हिस,
(जैना मोबाईल इंडिया लि.)
डी- 170, ओखला इंन्डस्ट्रीयल एरिया,
फेज- 1 , न्यु दिल्ली -110020.
2. प्रो. प्रा.सेलसिटी सोल्युशन मोबाईल सेल्स
अॅन्ड रिपेअरींग सेंटर,
दारुळकर कॉम्पलेक्स,
पोलीस लाईनसमोर, गाळा नं.1 उस्मानाबाद,
ता. जि. उस्मानाबाद.
3. सलीम मोबाईल अॅन्ड वॉच सेंटर,
ताज कॉम्पलेक्स, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.बी.देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : श्री.जी.जी.चौधरी.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
अ) 1. अर्जदार हे मौजे उस्मानाबाद ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. तक यांनी दि.11/08/2013 रोजी रक्कम रु.7,000/- विप क्र.1 यांनी उत्पादीत केलेला हॅन्डसेट मॉडेल क्र.ए-21 ज्याचा आय.एम.ई.आय.क्र.911240903182434 विप क्र.1 कडून घेतला. सदरील हॅन्डसेट हा व्यवस्थित न चालता त्यामध्ये बिघाड असल्यामुळे आवाज कमी, जास्त तसेच चालू स्थिती आपोआप बंद होणे इ. प्रकार घडू लागल्याने अर्जदार विप क्र.3 यांचेकडे गेले असता विप क्र.2 ने तात्पुरती दुरुस्ती करुन अर्जदारास देत राहिले दि.04/08/2014 रोजी विप क्र.3 यांनी विप क्र.2 यांच्याकडे दुरुस्ती करण्यास सांगितले म्हणून विप क्र.2 यांच्याकडे दि.05/08/2014 रोजी सदरील मोबाईल खरेदीच्या पावती झेरॉक्ससह हॅन्डसेट दुरुस्तीसाठी दिला त्यावर विप यांनी सही शिक्का असलेली पावती दिली व दि.06/08/2014 रोजी हॅन्डसेट दुरुस्त करुन मिळेल असे सांगितले मात्र अद्यापर्यंत तो दिला नाही. विप यांना विधिज्ञांमार्फत नोटीस दिली असता त्याचे उत्तरही दिलेले नाही अथवा मोबाईल दुरुस्तही केलेला नाही. म्हणून मोबाईलची किंमत रु.7,000/- तसेच अर्जदारास झालेल्या आर्थिक मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.15,000/- तसेच मोबाईल वापरता न आल्याने अर्जदाराचे व्यवसायात झालेले नुकसानीबाबत रु.15,000/- अशी एकुण रु.37,000/- नुकसान भरपाई तसेच प्रकरणाचा खर्च रु.5,000/- विप कडून देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे
2. तक यांनी आपल्या तक्रारीसोबत विप यांना पाठविलेली नोटीस व त्याच्या पाहोच पावत्या तसेच विप क्र. 2 यांच्याकडील पावती व खरेदी पावती दाखल केली आहे.
ब) सदर तक्रारीबाबत मा. मंचाने विप क्र.1 यांना नोटीस काढली असता त्यांना नोटीस मिळूनही हजर झाले नसल्याने दि.31/03/2015 रोजी त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
क) सदर तक्रारीबाबत विप क्र. 2 यांना नोटीस काढली असता त्यांचे विधीज्ञ मंचात हजर झाले मात्र अनेक संधी मिळूनही आपले म्हणणे दाखल न केल्याने दि.31/03/2015 रोजी त्यांच्या विरोधात नो से आदेश पारीत करण्यात आले.
ड) सदर तक्रारीबाबत विप क्र.3 यांना नोटीस काढली असता त्यांनी आपले म्हणणे दि.02/03/2015 रोजी दाखल केले ते पुढीलप्रमाणे.
1. तक यांची तक्रार अमान्य असून तक यांनी सदर मोबाईल आपल्याकडून खरेदी केल्याचे मान्य केले आहे. सदर मोबाईल मध्ये खरेदी करतांना कोणत्याही प्रकारचे मॅनीफक्चरींग डिफेक्ट नव्हता तसेच तक यांनी तो खरेदी करतांना तपासून घेतला होता व जरी नंतर डिफेक्ट असल्याचे लक्षात आले असल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारी कंपनीच्या सेवा केंद्र यांची असून त्यात विप क्र.3 यांची कोणतीही भूमिका नसून तक यांनी तसा तो दुरुस्त करण्यास दिला असल्यास विप क्र.1 यांना त्याबद्दल काहीही माहिती नाही. म्हणून सदरची तक्रार विप क्र.3 विरुध्द खर्चासह रद्द होण्यास पात्र आहे असे नमूद केले आहे.
इ) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे लक्षात घेता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ई) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
1) तक चे म्हणणे प्रमाणे त्याने विप क्र.1 याच्याकडून मोबाईल इॅन्डसेट खेरेदी केला परंतु त्यात बिघाड असल्याचे लक्षात आल्याने विप क्र.2 यांच्याकडे सदर मोबाईल दुरस्ती करीता दिला असता तो आजूनही दुरुस्त करुन दिला नाही अशी मुख्य तक्रार तक यांची आहे. सदर बाबत विप क्र3 यांनी हजर होऊन आपला केवळ हॅन्डसेट विक्रीपर्यंतची सेवा देण्यापर्यंत मर्यादीत असून विक्री करतांना त्यात कोणत्याही प्रकारचा बिघाड नव्हता असे म्हणणे दिले आहे मात्र विप क्र. 1 व विप क्र. 2 यांनी आपले म्हणणे दाखल न केल्याने दि.31/03/2014 रोजी विप क्र.1 विरुध्द एकतर्फा व विप क्र.2 विरुध्द नो से आदेश पारीत झाले म्हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्य आहे असे दिसते म्हणून आम्ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्य असले असते तर विप क्र.1 यांनी नोटीस मिळूनही व विप क्र. 2 यांनी उपस्थित होऊनही आपले म्हणणे दाखल न करण्याचे काय कारण असू शकते. म्हणजेच त्यांच्याकडे तक्रारदाराची तक्रार खोडण्या इतपत किंवा हरकत नोंदविण्या इतपत पुरावे नसल्याने त्यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्हणणे दिले नाही. म्हणजेच त्यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे आणि तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत म्हणुन आम्ही मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक ची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1 व 2 यांनी तक यांचा हॅन्डसेट दुरुस्त करुन देऊन संयुक्तरित्या किंवा एकत्रितरित्या वेगळी नुकसान भरपाई रु.2,000/- सह द्यावा, किंवा त्याच प्रकारचा नवीन हॅन्डसेट द्यावा अथवा हे शक्य नसल्यास त्याची खरेदी किंमत रु.7,000/- (रुपये सात हजार फक्त) पावतीनुसार परत द्यावी.
3) विप क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरित्या व एकत्रितरित्या सदर तक्रारीचा खर्च रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावा.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.