Maharashtra

Ahmednagar

CC/17/36

Dr.Abhijit Narayan Misal - Complainant(s)

Versus

Manager, Kalika Nagari Sahakari Patsanstha Ltd - Opp.Party(s)

Hendre-Joshi

30 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/36
( Date of Filing : 01 Feb 2017 )
 
1. Dr.Abhijit Narayan Misal
R/o.Pragati Complex, 1st Floor, Opp.Nehru Market, Chitale Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Kalika Nagari Sahakari Patsanstha Ltd
R/o.Shahaji Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Chairman, Prabhakar Murlidhar Ambhore
R/o.2540, Shahaji Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
3. Vice Chairman, Vinod Suvalal Bothara
R/o.Opp.Bothara Gul Vyapari Firm, Adate Bajar, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
4. Director, Subhash Modalal Bayad
R/o.Bagadpatti, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
5. Director, Ashok Shivdas Zoting
R/o.1/4, Punyai, Pipeline Road, Hudco,(Savedi), Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:Hendre-Joshi, Advocate for the Complainant 1
 
Dated : 30 Mar 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ३०/०३/२०२१

 (द्वारा मा.अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर  तक्रार दाखल केलेली आहे.

२.     तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने सामनेवालेंचे पतसंस्‍थेमध्‍ये दिनांक ०२-०६-२०११ रोजी रक्‍कम रूपये १,००,०००/- मुदत ठेव रक्‍कम ठेवली होती. सदर मुदत ठेव पावतीचे दिनांक ०९-०६-२०१२ रोजी नुतनीकरण केले. सदर मुदत ठेव पावतीची मुदत संपल्‍यानंतर दिनांक ०२-०७-२०१३ रोजी वर नमुद रक्‍कम व्‍याजासह सामनेवालेकडे मागणी केली असता सामनेवालेने रक्‍कम तक्रारदाराला दिली नाही व वेगवेगळी कारणे दाखवुन सामनेवालेने तक्रारदाराला ती रक्‍कम परत केली नाही. तसेच तक्रारदाराने सामनेवालेकडे पासबुक नंबर ७/२७३४ यामध्‍ये रक्‍कम रूपये ४९,०००/- जमा केले होते, ते सुध्‍दा मागणी केली असता सामनेवालेने तक्रारदाराला दिले नाही. सामनेवालेने तक्रारदाराप्रती अनुचीत व्‍यापारीत प्रथेची अवलंबना केली, अशी तक्रार या आयोगात दाखल केली.  तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्रमांक १ ते ५ यांचेकडुन धनवर्षा ठेव खाते क्रमांक ७/२७३४ मधील रक्‍कम रूपये ४९,०००/- ही रक्‍कम व्‍याजासह तक्रारदाराला मिळावी व तक्रारदाराला मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती करण्‍यात आली आहे.

३.    तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले क्रमांक १ ते ३ यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर प्रकरणात हजर झाले, परंतु त्‍यांनी प्रकरणात कैफीयत दाखल केलेली नाही व सामनेवाले क्रमांक ४ व  ५ यांना नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणुन सामनेवाले क्रमांक १ ते ३ यांचेविरूध्‍द विना कैफीयत प्रकरण चालविणेचा आदेश पारती करण्‍यात आला व सामनेवाले क्रमांक ४ व ५ यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्‍यात आला.

४.    तक्रारदाराची दाखल तक्रार, शपथपत्र, दस्‍तऐवज व तोंडी युक्तिवाद यांचे आयोगामार्फत अवलोकन केले असता खालील निष्‍कर्षावरून अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

निष्‍कर्ष

५.    तक्रारदाराने सामनेवालेकडे दिनांक ०२-०६-२०११ रोजी मुदत ठेव पावती चा खाते क्रमांक १८६२० मध्‍ये रक्‍कम रूपये १,००,०००/- ठेवली होती व त्‍यावर सामनेवालेने १२ टक्‍के व्‍याज देण्‍याचे नोंदविले होते. तसेच तक्रारदाराने पासबुक नंबर ७/२७३४ यात तक्ररदाराचे एकुण रूपये ४९,०००/- ही रक्‍कम जमा आहे, असे दिसुन येते व सिध्‍द होते. सामनेवालेने बचाव पक्षात त्‍यांची बाजु मांडली नाही म्‍हणुन तक्रारदाराने तक्रारीत सामनेवालेचे विरूध्‍द लावलेले आरोप सिध्‍द होत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

१.  तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२. सामनेवाले क्रमांक १ ते ५ यांनी वैयक्तिकरितीने किंवा संयुक्तिकरीतीने तक्रारदाराची मुदत ठेव पावत खाते क्रमांक १८६२० मधील रक्‍कम रूपये १,००,०००/- (अक्षरी एक लाख) द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याजाने दिनांक  ०२-०६-२०१२ पासुन रक्‍कम अदा होईपर्यंत द्यावी. 

३.  सामनेवाले क्रमांक १ ते ५ यांनी वैयक्तिकरितीने किंवा संयुक्तिकरीतीने तक्रारदाराचे धनवर्षा ठेव खाते क्रमांक ७/२७३४ मधील रक्‍कम रूपये ४९,०००/- (अक्षरी एकोणपन्‍नास हजार) जुलै २०१२ पासुन द.सा.द.शे. ८ टक्‍के व्‍याजाने रक्‍कम अदा करावी.  

४.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रूपये १०,०००/- (अक्षरी रूपये दहा हजार) व तक्रारीचा खर्च  रूपये ५,०००/- (अक्षरी रूपये पाच हजार) द्यावे. 

५.  वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

६. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

७.  सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.