Maharashtra

Beed

CC/13/5

Arun Atmaram Kachare - Complainant(s)

Versus

Manager Iffco Tokyo General Insurance Co Ltd - Opp.Party(s)

Kukadgaonkar

29 Oct 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/13/5
 
1. Arun Atmaram Kachare
R/o Rajegaon Ta georai
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager Iffco Tokyo General Insurance Co Ltd
SFl House Lokbharti Complex Marol Morshi Road Mumabi
Mumbai
Maharashtra
2. Shriram Transport fininace Co Ltd
Rajyog Complex,1st Floor,Near Hina Hotel Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                निकालपत्र
                            दिनांक 29.10.2013
                    (घोषित द्वारा ः-श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष )
            तक्रारदार अरुण आत्‍माराम कचरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेमध्‍ये कसूर केल्‍याबददल नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी म्‍हणून दाखल केली आहे.
            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार राजेगांव ता.माजलगांव जि.बीड येथील रहिवासी असून ते शेती व्‍यवसाय करतात. तसेच टेम्‍पो चालकाचा व्‍यवसाय करतात. तक्रारदार यांनी संतोष खंदारे रा.आंबेगाव यांचेकडून टाटा मॅजीक टेम्‍पो क्र.एम.एच.-44-बी-1283 रक्‍कम रु.2,55,000/- खरेदी केला. सदरील टेम्‍पो हा संदेश मोटार्स बीड यांचेमार्फत खरेदी केला. तक्रारदार यांनी श्रीराम फायनान्‍स सामनेवाले क्र.2 यांचेकडून रु.1,50,000/- कर्ज घेतले. तक्रारदार यांनी स्‍वतःची रककम रु.1,05,000/- भरले. एकूण रु.2,55,000/- श्री. खंदारे यांना तक्रारदार यांनी दिले. तक्रारदार यांनी सदरील वाहनाचा विमा सामनेवाला क्र.1 यांचेकडे उतरविला आहे.
            तक्रारदार यांनी तक्रारीत पूढे असे कथन केले आहे की, दि.04..12.2011 रोजी तक्रारदार यांना सदरील वाहन दूरुस्‍तीसाठी श्री साई गॅरेज माजगांव येथे लावले होते. सदरील वाहनाची दूरुस्‍त   झाल्‍यानंतर तक्रारदार हे ड्रायव्‍हर पाहण्‍यासाठी गेले. त्‍यावेळेस तक्रारदार यांनी सदरील वाहन श्री साई गॅरेज यांचे समोर सुरक्षेच्‍या दृष्‍टीकोनातून लावले हेाते. दि.10.12.2011 रोजी तक्रारदार हे सकाळी 7.30 वाजता साई गॅरेज समोर गेले असता तेथे वाहन आढळून आले नाही. तक्रारदार यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला.परंतु ते मिळून आले नाही. सदरील वाहन दि.09.12.2011 ते 10.12.2011 चे दरम्‍यान रात्रीचे वेळी चोरीस गेले आहे. वाहनाचे चोरी बददल तक्रारदार यांनी माजलगांव पोलिस स्‍टेशनला दि.10.12.2011 रोजी कळविले परंतु पोलिसांनी तक्रारदार यांना वाहनाचा शोध घेण्‍यास सांगितले. सदरील वाहनाचा शोध घेऊन न सापडल्‍याने तक्रारदार यांनी दि.18.12.2011 रोजी पोलिस स्‍टेशन माजलगांव येथे रितसर तक्रार नोंदविली. तक्रारदार हे सामनेवाले क्र.2 यांचेकडे गेले व पोलिस स्‍टेशनला दिलेली फिर्याद दाखविली. सामनेवाले क्र.1 चे प्रतिनिधी यांनी तक्रारदाराच्‍या वाहनाच्‍या क्‍लेमसाठी आवश्‍यक असलेले सर्व कागदपत्र भरुन घेतले व तक्रारदारास सांगितले की, क्‍लेम मंजूर झाल्‍यानंतर त्‍यांना कळविण्‍यात येईल. तक्रारदार यांनी वारंवार सामनेवाले क्र.1 यांचे कार्यालयात तोंडी व फोन द्वारे विचारणा केली असता क्‍लेम मंजूर झाल्‍यानंतर कळविण्‍यात येईल असे सांगितले. सामनेवाले क्र.2 यांनी कर्ज वसुलीसाठी दि.06.04.2012 रोजी नोटीस पाठविली. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दि.27.11.2012 रोजी तक्रारदारास कळविले की, 307 दिवस क्‍लेम करण्‍यास उशिर झाला आहे त्‍यामुळे तो नाकारण्‍यात येत आहे. तक्रारदार यांचे कथन की, सदरील वाहनाची चोरी पॉलिसी मुदतीत असताना झाली आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम अनाधिकृतरित्‍या नाकारला आहे. सामनेवाले क्र.1 व 2 हे ऐकमेकाला पुरक व्‍यवसाय करतात व ग्राहकाला सेवा देतात. तक्रारदार यांची सामनेवाले क्र.1 व 2 यांनी फसवणूक केली आहे. दि.27.11.2012 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सेवा देण्‍यास त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून चोरीला गेलेले वाहनाची नुकसान भरपाई मिळावी तसेच तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा असे एकूण रु.3,1,,5,000/- सामनेवाले क्र.1 व 2 कडून मिळावेत अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी लेखी म्‍हणणे नि.13 अन्‍वये दाखल केले. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांनी वाहन चोरीस गेल्‍या बाबत विलंबाने पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार दिली आहे. त्‍या बाबत तक्रारदार यांनी कोणतेही संयूक्‍तीक कारण दिलेले नाही. तक्रारदार हे कधीही सामनेवाले क.1 यांचेकडे अगर त्‍यांचे प्रतिनिधी कडे आले नाही व वाहन चोरी झाल्‍या बबात कळविले नाही. तक्रारदार यांनी कोणतेही कागदपत्र सामनेवाले क्र.1 यांचेकडे सादर केले नाही. तक्रारदार यांनी तोंडी अगर फोनवर सामनेवाले क्र.1 यांना वाहन चोरी झाल्‍या बाबत कळविले नाही. सामनेवाल क्र.1 यांनी क्‍लेम करण्‍यास 307 दिवसांचा उशिर झाला या कारणास्‍तव तक्रारदार यांचा क्‍लेम नामंजूर केला आहे. सदरील क्‍लेम हा योग्‍य व वाजवी कारणासाठी केलेला आहे. तक्रारदार यांनी पॉलिसीमधील शर्ती व अटीचा भंग केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांचा क्‍लेम रदद केला आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांना दि.10.09.2012 रोजी सदरील वाहनाची चोरी झाली आहे ही बाब सामनेवाले क्र.1 यांना कळविली आहे. पॉलिसीच्‍या शर्ती व अटी प्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांना लेखी नोटीस देऊन वाहन चोरी झाल्‍या बाबत कळविणे आवश्‍यक होते. तक्रारदार यांनी 307 दिवसानंतर वाहन चोरी झाल्‍या बाबत सामनेवाले क्र.1 यांना कळविले आहे. तक्रारदार यांनी पॉलिसीतील शर्ती व अटीचा भंग केल्‍यामुळे तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारला आहे. सबब, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.12 अन्‍वये त्‍यांचे लेखी म्‍हणणे सादर केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे सदरील वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे स्‍वतंत्र व्‍यवसाय आहेत. तक्रारदार यांनी वाहन चोरी झाल्‍या बाबत सामनेवाला यांना कधीही कळविले नाही. सामनेवाले क्र.1 यांचे प्रतिनिधी सामनेवाले क्र.2 यांचे कार्यालयात कधीही उपस्थित नसतो. तक्रारदार यांचे वाहन चोरीस गेले त्‍या बाबत सामनेवाले क्र.2 यांचा व्‍यवहाराशी कोणताही संबंध नाही. तक्रारदार यांनी सदरील वाहन खरेदी करण्‍यासाठी कर्ज घेतले आहे ते फेडण्‍याची जबाबदारी तक्रारदार यांची आहे. सबब, सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्‍द तक्रार खर्चासह रदद करावी अशी विनंती केली आहे.
            तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.18 सोबत दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.3 वर सामनेवाले क्र.1 यांनी क्‍लेम नाकारल्‍या बाबत पत्र सादर केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांचेकडे कर्जाची मागणी केलया बाबत नोटीस सादर केली आहे. तसेच चोरी केलेल्‍या वाहनाच्‍या विमा पॉलिसीची झेरॉक्‍स प्रत दाखल केली आहे. एफ.आय.आर. ची प्रत, फौजदारी प्रक्रिया संहिता क्‍लेम 177 अन्‍वये दाखल केलेला फायनल रिपोर्ट, चोरीस गेलेल्‍या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांचे प्रतिनिधीचे शपथपत्र नि.13 सोबत दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी नि.15 सोबत तक्रारदार यांनी भरलेला क्‍लेम फॉर्म, विमा पॉलिसीतील शर्ती व अटी, नो क्‍लेम पत्र, दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी त्‍यांचे प्रतिनिधी प्रसाद अनंतराव जोशी यांचे शपथपत्र दाखल केले आहे,
 
            तक्रारदार यांचे वकील श्री.कूक्‍कडगांवकर यांचा यूक्‍तीवाद ऐकला, सामनेवाले क्र.1 यांचे वकील ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्‍तीवाद ऐकला, सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री. महाजन यांचा यूक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन
      सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत
      केली आहे काय ?                                        नाही.
2.    तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई
      मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                                    नाही.
3.    काय आदेश ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.
                                    कारणमिंमासा 
मुददा क्र.1 ते 3 ः-
            तक्रारदार यांचे वकील श्री.कूक्‍कडगांवकर यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचा मॅजिक टेम्‍पो नंबर एम.एच.-44-बी-1283 हा दुरुस्‍त झाल्‍यानंतर श्री साई गॅरेज यांचे समोर दि.09.12.2011 रोजी लावलेला होता. तक्रारदार हे ड्रायव्‍हर पाहण्‍यासाठी गेले. ते दि.10.12.2011 रोजी टेम्‍पो घेण्‍यासाठी आले असता त्‍यांना टेम्‍पो ज्‍याठिकाणी उभा केला होता तेथे आढळून आला नाही. तक्रारदार यांनी सदर टेम्‍पोची त्‍यांचे नातेवाईकाकडे व इतरत्र शोधाशोध केली. तक्रारदार यांनी सदरील बाब पोलिसांचे निदर्शनास आणली परंतु पोलिसांनी वाहन शोधण्‍यास सांगितले. वाहन शोधूनही सापडले नाही म्‍हणून तक्रारदार यांनी माजलगांव पोलिस स्‍टेशन येथे रितसर तक्रार केली. सदर वाहन चोरीस गेल्‍याबददल सामनेवाले क्र.2 यांना कल्‍पना दिली.तसेच सामनेवाले क्र.1 यांचे प्रतिनिधी यांनी क्‍लेम कामी सर्व आवश्‍यक कागदपत्र भरुन दिले. असे असतानाही सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांनी वाहन चोरी झाल्‍या बाबत कळविण्‍यास कोणताही विलंब केलेला नाही. तक्रारदार हे अशिक्षीत असून त्‍यांना कायदयाचे ज्ञान नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी लेखी स्‍वरुपात सामनेवाले क्र.1 यांना वाहन चोरी झाल्‍या बाबत कळविलेले नाही. त्‍यामुळे सामनेवाले क्र.1 यांना कळविण्‍यास अक्षम्‍य विलंब झाला आहे असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदार यांनी विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटी या बाबत माहीती नव्‍हती त्‍यामुळे तक्रारदार हे निष्‍काळजी होते असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदार यांचे वकिलांनी त्‍यांचे यूक्‍तीवादाचे समर्थनार्थ खालील नमुद केलेल्‍या न्‍यायनिर्णयाचा हवाला दिला.
 
II (2006) CPJ 19 (NC)
 
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
 
Rajendra Plastics                                                                  --Complainant
Versus
New India Assurance Company Ltd. & ors.                        –Opposite Party
 
                        In this cited case, Hon ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi In para no.9 and 10 of the Judgement observed that, we find that, the repudiation of the claim on the basis of condition 8 of this policy has neither been substantiated nor been proved by any evidence as to how this claim was fraudulent or based on a false declaration.   It is further observed that, the report of the Surveyor has to be given due importance, deficiency in the service proved,  opposite party  liable to pay assessed loss with interest.
 
            सामनेवाले क्र.1 यांचे वकिल श्री.ए.पी.कुलकर्णी यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सदरील वाहन चोरी झाल्‍या बाबत माजलगांव पोलिस स्‍टेशन मध्‍ये 9 दिवसानंतर तक्रार नोंदविली. तसेच सदरील वाहन चोरी झाल्‍या बाबत सामनेवाले क्र. 1 यांना 307 दिवस पर्यत कळविण्‍यात आले नाही. सदरील तक्रारदार यांची कृती विमा पॉलिसीमध्‍ये नमूद केलेल्‍या शर्ती व अटीचा भंग करणारी आहे. वाहन चोरी झाल्‍यानंतर लगेचच तक्रारदार यांनी सदरील बाब पोलिस स्‍टेशन आणि विमा कंपनीला कळविणे क्रमप्राप्‍त होत पंरतु तक्रारदार हे 307 दिवस शांत बसून रहिले व तदनंतर वाहन चोरी झाल्‍या बाबत सामनेवाले क्र.1 यांना कळविले. तक्रारदार हे स्‍वतः निष्‍काळजी असल्‍यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाहीत. सामनेवाले यांनी कोणतीही सेवेत त्रूटी ठेवली नाही.
            सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री.महाजन यांनी असा यूक्‍तीवादक केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडून सदरील वाहन खरेदी करण्‍यासाठी कर्ज घेतले होते. तक्रारदार यांनी वाहन चोरी झाल्‍यानंतर त्‍या बाबत सामनेवाले यांना कधीही कळविले नाही अगर प्रतिनिधी यांना सांगितले नाही. तक्रारदार यांचे वाहन चोरी बाबत सामनेवाले यांचा कोणताही संबंध नाही. त्‍या संबंधी कोणतीही सेवा सामनेवाले यांनी देण्‍याचे प्रयोजन नाही. सबब, सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्‍दची तक्रार रदद करण्‍यात यावी.
            वर नमूद केलेला यूक्‍तीवाद लक्षात घेऊन तक्रारदार व सामनेवाले यांचा पुरावा व कागदपत्र यांचे अवलोकन करणे क्रमप्राप्‍त ठरते. तक्रारदार यांचे नुसार सदरील वाहन दि.09.12.2011 ते 10..12.2011 चे दरम्‍यान चोरीला गेले. तक्रारदार यांनी कथन केले की, त्‍यांनी सदरील बाब पोलिस स्‍टेशन यांचे निदर्शनास आणली व सामनेवाले क्र.2 यांनी कळविले व तसेच सामनेवाले क्र.1 यांचे प्रतिनिधीना कळविले व कागदपत्राची पूर्तता केली परंतु तोंडी शब्‍दा व्‍यतिरीक्‍त तक्रारदार यांनी कोणताही पुरावा या मंचापूढे हजर केला नाही. कोणत्‍या प्रतिनिधीला कागदपत्राची पुर्तता केली त्‍यांचे नांव नमूद केले नाही. अगर कोणत्‍या दिनांकाला सामनेवाले क्र.1 व 2 यांना दिले या बाबत तक्रारीत स्‍पष्‍ट उल्‍लेख केलेला नाही. तसेच पोलिस स्‍टेशनलाही वाहन चोरी झाल्‍यानंतर ताबडतोब खबर दिल्‍या बाबत पुरावा उपलब्‍ध नाही. तक्रारदार यांनी पोलिस स्‍टेशनला दि.18.12.2011 रोजी तक्रार दिल्‍या संबंधीत दाखल केलेल्‍या एफ.आय.आर. वरुन निदर्शनास येते. सदरील एफआयआर चे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये तक्रारदार यांनी वाहन चोरी झाल्‍या बाबत पोलिस स्‍टेशनला खबर दिली होती परंतु वाहनाचा शोध घेण्‍यास सांगितले असे मजकूर कूठेही लिहीलेला नाही. तसेच विमा कंपनीला वाहन चोरी झाल्‍या बाबत कळविले आहे हे ही लिहीलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचे कथन की, वाहन चोरी झाल्‍या बाबत त्‍यांने खबर पोलिस स्‍टेशनला दिली होती व सामनेवाले क्र.1 व 2 यांना दिली होती ही बाब शाबीत होत नाही. तक्रारदार यांनी विलंबाने पोलिस स्‍टेशनमध्‍ये खबर दिल्‍याचे आढळून येते. सदरील तक्रार दिल्‍यानंतर वाहनाचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही म्‍हणून माजलागांव पोलिस स्‍टेशनने न्‍यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांचे कोर्टात “ अ” समसरी म्‍हणून मंजूर करण्‍यास विनंती केली व “ अ” समरी मंजूर करण्‍यात आली.
 
            तक्रारदार यांचे कथन की, त्‍यांनी वाहन चोरी झाल्‍या बाबत सामनेवाले क्र.1 यांना कळविले आहे परंतु तक्रारदार यांना सामनेवाले क्र.1 यांनी कळविले बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाले क्र.1 यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे मंचाचे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी  सामनेवाले क्र.1 यांचेकडे 307 दिवसानंतर सदरील वाहन चोरी झाले आहे आणि त्‍याकामी क्‍लेम दाखल केला आहे असे निदर्शनास येते.
 
            सामनेवाले क्र.1 यांचे वकिलांनी या मंचाचे निदर्शनास
 
 
 
 
 
 
III (2009) CPJ
 
Hon ble National Consumer Disiputes Redressal Commission, New Delhi
 Revision Petition No.3719 of 2011  दि.3.7.2012 रोजी जो निर्णय दिला त्‍यावर मंचाचे लक्ष वेधले.
Hon ble National Consumer Disiputes Redressal Commission,
                      New Delhi
 
Revision Peition No.3719/2011 
 
Siraj Khan s/o Shri Mohd Sidique                                      -Petitioner
 
Versus
 
Mahindra Finance Ltd. & anr.                                          –Respondents.
 
                        In para no.5 is observed that, there was inordinate delay in informing the police as well as the opposite parties about the alleged incident. Nothing has been produced before us to counter this important aspect.    It is well settled by a catena of judgements that  “time is of essence ” in such cases and delay is in lodging the FIR and sending intimation about theft to the insurer would be fatal to the recovery of the insured vehicle and hence repudiation of the claim on this ground would be justified.
 
                        तक्रारदार यांनी सदरील वाहन सामनेवाले क्र.1 यांचेकडे विमा उतरविलेला होता. त्‍यामधील शर्ती व अटी विमा पॉलिसीमध्‍ये दिलेल्‍या आहेत. विमा पॉलिसी सामनेवाले क्र.1 यांनी दाखल केलेली आहे. विमा पॉलिसीमध्‍ये दिलेल्‍या शर्ती व अटीचे अवलोकन केले असता त्‍यात असे नमूद केले आहे की, एखादी घटना, अगर नुकसान झाल्‍यास मालकाने त्‍यांची माहीती ताबडतोब विमा कंपनीला देणे गरजेचे आहे. तसेच नुकसानीचा क्‍लेम मागणी करणे गरजेचे आहे. तसेच सदरील घटने बाबत लेखी स्‍वरुपात घटना घडल्‍यानंतर ताबडतोब विमा कंपनीला कळविणे गरजेचे आहे. सदरील अटीचे अवलोकन केले असता व तक्रारदार यांनी दाखल केलेला पुराव्‍याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी वाहन चोरी झाल्‍या बाबत संबंधीत पोलिस स्‍टेशनला विलंबाने माहीती दिली. तसेच सामनेवाले क्र.1 यांचेकडे 307 दिवस पर्यत कोणताही क्‍लेम दाखल केला नाही. यावरुन तक्रारदार यांने पॉलिसीमध्‍ये दिलेल्‍या शर्ती व अटीचा भंग केला आहे असे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी वाहन चोरी झाल्‍यानंतर सदरील बाब सामनेवाले क्र.1 यांना लेखी स्‍वरुपात ताबडतोब कळविणे गरजेचे होते व क्‍लेम दाखल करणे गरजेचे होते. 307 दिवसांचा विलंब हा फार मोठा विलंब आहे. त्‍यांचा विचार केला असता तक्रारदार हे निष्‍काळजीपणे वागले आहेत असे स्‍पष्‍ट दिसून येते. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम ज्‍या कारणासाठी नामंजूर केला आहे त्‍यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी पॉलिसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केला आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन सामनेवाले यांनी कोणतीही सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्‍हणता येणार नाही. सबब, या मंचाचे मत असे की, सामनेवाले क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रूटी ठेवली नाही. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्‍कम नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाहीत. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.
 
            मुददा क्र.1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
 
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                     आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2.    खर्चाबददल आदेश नाही.
      3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.