जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.162/2008. प्रकरण दाखल दिनांक – 02/05/2008. प्रकरण निकाल दिनांक – 14/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. श्री.बाबुराव पि.शंकरराव तांबोळी, अर्जदार. वय वर्षे 68, धंदा पेन्शनर, रा.शंकरस्मृती 37, यशवंतनगर, नांदेड. विरुध्द. मुख्य शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार. आय.सी.आय.सी.आय.बँक, पहिला माळा,उज्वल मोटार्स, हिंगोली रोड,नांदेड. गैरअर्जदार तर्फे - अड.एस.एन.हाके. गैरअर्जदारा तर्फे - अड.एन.एन.पावडे. निकालपत्र (द्वारा मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार बाबुराव तांबोळी यांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडुन दुचाकी वाहनासाठी रु.31,500/- कर्ज घेतले. कर्जाचे परतफेडीसाठी एकुण 32 हप्ते ठरवून देण्यात आले. त्यापैकी आठ हप्त्याचे नगदी स्वरुपात रक्कम रु.9,140/- वाहन घेतानांच दिले व उर्वरित 24 हप्ते रु.1,140/- प्रमाणे परतफेड करण्याचे ठरले. त्यानंतर एकुण 11 हप्त्याची रु.1,140/- प्रमाणे परतफेड केली. त्यापैकी 13 हप्त्याची परतफेड अर्जदाराने त्याची एकुण रक्कम रु.14,820/- धनादेशाद्वारे केली. उर्वरित 6 हप्त्याची हप्त्याची रक्कम रु.6,840/- नगदी स्वरुपात भरली. अर्जदाराने एकुण रक्कम रु.21,660/- घेतलेल्या कर्जाची परतफेड 19 नियमित हप्त्यात केली आहे. आणि उर्वरित 8 हप्त्याची रक्कम रु.9,140/- नगदी दिले असे एकुण रु.30,800/- गैरअर्जदारास दिले आहेत. अर्जदार बाहेर गांवी गेले असता, त्यांना कोणतीही पुर्व सुचना न देता दि.09/08/2006 रोज अचानकपणे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन जप्त केली. त्यानंतर गैरअर्जदाराकडे विचारण केली असता, त्यांनी गाडी रु.9,000/- ला विकुन टाकली आणि नंतर रु.7,663/- मागणीची नोटीस पाठविली जे की, बेकायदेकशर आहे. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे अर्जदाराकडील चार हप्त्याची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम अर्जदारास परत करावे आणि त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.20,000/-गैरअर्जदाराकडुन मिळावेत अशी मागणी केली आहे. यात गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, गैरअर्जदार यांनी अर्जदारास कर्जापोटी एकुण 24 हप्ते पाडुन दिले होते, 32 हप्ते पाडुन दिल्याचे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराने नियमित तारखेस हप्त भरीत नव्हता. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे एकुण रु.21,660/- जमा केले आहे. अर्जदार नियमीत हप्ते भरत नसल्यामुळे अटी व नियमाच्या आधीन राहुन त्यांची गाडी जप्त केली आहे आणि ती कार्यवाही बरोबर आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन ऑक्शन सेलमध्ये योग्य त्या किंमतीस म्हणजे रु.9,500/- विक्री केली आहे. अर्जदाराकडील चार थकीत हप्त्याची रक्कम बाकी आहे. सदरील रक्कम अर्जदाराने गाडी विकल्यांनतर अर्जदाराच्याय खात्यामध्ये वजा करुन उर्वरित रक्कमेची करारातील नियमानुसार लॉस सेल नोटीस पाठवुन रु.7,400/- मागणी केली. अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जा सोबत यादीप्रमाणे दस्तऐवज व शपथपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत यादीप्रमाणे दस्तऐवज व शपथपत्र दाखल केले आहे. अर्जदारा तर्फे वकील एस.एन.हाके यानी युक्तीवाद केला. युक्तीवादाचे वेळी गैरअर्जदारा तर्फे कोणीही हजर नाही. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी सेवा देण्यामध्ये कमतरता केली काय? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार यांचेकडे कर्ज रक्कमेचे परतफेडी पोटी भरलेल्या हप्त्यांच्या पावत्या दाखल केल्या आहेत. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात अगर शपथपत्रामध्ये अर्जदार हे ग्राहक असल्याची बाब नाकारलेली नाही. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यासोबत अर्जदार यांचे कर्ज खात्याचा उतारा दाखल केलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 - अर्जदार यांनी वाहनासाठी गैरअर्जदार यांचेकडुन कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाची परतफेड अर्जदार यांनी मासिक हप्ता रक्कम रु.1,140/- याप्रमाणे 24 हप्त्यात करण्याचे ठरलेले होते. अर्जदार यांनी माहे ऑगष्ट 2006 मध्ये कर्जाचा हप्त न भरल्याने गैरअर्जदार यांनी दि.09/08/206 रोजी अर्जदार यांची गाडी जप्त केली आहे. त्याप्रमाणे गैरअर्जदाराने दि.07/08/2006 रोजी अर्जदार यांना नोटीस पाठवुन थकबाकी रक्क्म भरणे बाबत कळविले आहे ही बाब दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.26/09/2006 रोजी ऑक्शन सेल बाबत नोटीस पाठविल्याचे गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या नोटीसवरुन स्पष्ट होत आहे. त्यानंतर गैरअर्जदार यांना दि.16/10/2006 रोजी रक्कम रुद्य7,400/- व इतर चार्जेस सात दिवसात गैरअर्जदार यांचेकडे आणुन भरण्या विषयी कळविल्याचे गैरअर्जदार यांचे दि.16/10/2006 रोजीच्या नोटीसवरुन स्पष्ट होत आहे. त्यानंतर पुन्हा गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.06/11/2006 रोजी नोटीस पाठवुन कर्ज हप्त्याची थकीत रक्कम व इतर चार्जेससहीत होणारे असे एकुण रक्कम भरणे विषयी नोटीस पाठविल्याचे दि.06/11/2006 चे नोटीसवरुन स्पष्ट होत आहे. सदरची नोटीस अर्जदार यांना दिल्यानंतर अर्जदार यांनी सदर नोटीसला उत्तर दिल्याचे अगर थकीत रक्कमेचे भरणा केल्याचे दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होत नाही. म्हणजेच अर्जदार यांना वेळावेळी गैरअर्जदार यांनी थकीत रक्कम भरणा करुन सदरच वाहन ताब्यात घेण्या विषयी कळविल्यानंतर अर्जदाराने त्याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसुन येत नाही. गैरअर्जदार यांनी दि.30/06/2008 रोजीचे कागदपत्र यादीने वाहनाच्या विक्रीचे विवरण दाखल केलेले आहे. त्यानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे जप्त केलेले वाहनाची विक्री दि.07/04/2007 रोजी केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.10/10/2007 रोजी अड. निलेश पावडे यांच्या मार्फत थकबाकी भरणा करण्या विषयी नोटीस पाठविल्याचे दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी थकीत रक्कमेचा भरणे पोटी कळवुनही अर्जदाराने गैरअर्जदारांचे कर्जाची थकीत रक्कम भरली नाही अगर अर्जदाराचे स्वतःचे वाहन गैरअर्जदाराचे ताब्यातुन घेण्या बाबत ऑगष्ट 2006 पासुन कोणतीही कार्यवाही केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. गैरअर्जदाराने सदर वाहनाची विक्री केल्यानंतर येणा-या रक्कमेचा अर्जदार यांचे कर्ज खात्यात जमा करुन उरलेल्या थकीत कर्ज रक्कमेची मागणी अर्जदार यांचेकडे दि.10/10/2007 चे नोटीसने केल्यानंतर अर्जदार सदर मंचात सदरची तक्रार गैरअर्जदार यांचे विरुध्द घेऊन आल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजेच अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी ऑगष्ट 2006 मध्ये अर्जदार यांचे वाहन जप्त करुन नेलेनंतर मंचात तक्रार दाखल करेपर्यंत अर्जदारांनी सदरचे वाहन परत मिळण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे दिसुन येत आहे. गैरअर्जदारांनी त्यांचे म्हणणे शपथपत्र व कागदपत्र दाखल केल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदारांचे म्हणणे व कोणतेही कागदपत्र नाकारलेले नाही म्हणजेच अर्जदार यांनी प्रती उत्तर दाखल केले नाही अगर गैरअर्जदाराचे कोणतेही कागदपत्र नाकारलेले नाही. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र व त्यांनी दाखल केलेले कागदपत्र याचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्या मध्ये कोणतीही कमतरता केली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्रय त्यांनी दाखल केलेले कागदपत्र त्यांचे तर्फे केलेला वकीलांचा युक्तीवाद. गैरअर्जदार यांनी युक्तीवाद केला नाही. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |