निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 26/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 29/10/2012
तक्रार निकाल दिनांकः- 10 /12/2013
कालावधी वर्ष.01महिने.04 दिवस.12
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
निलेश सुरेंद्र कामतीकर. अर्जदार
वय 37 वर्ष,व्यवसायःव्यापार, अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.काद्राबाद प्लॉट,परभणी
विरुध्द
1 व्यवस्थापक, गैरअर्जदार
आयसीआयसीआय लोंम्बार्ड जनरल इन्शुरंन्स कं.ली. अॅड.अजय व्यास.
इंटरफेस विल्डींग क्रं.11,401/402,4था मजला,
न्यु लिंक रोड, मालाड(प.),मुंबई -400064
मंडळ कार्यालय, जिंतुर रोड, परभणी.
2 ए.पी.अॅड असोशिएट्स,
ई 301,शिवम अपार्टमेंट,सेक्टर - 5,
वसंत नगरी,वसई (पू).-401208
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा. सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या अरोपावरुन अर्जदाने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने त्यांच्या वैयक्तीक कामासाठी व कुंटूबांच्या वापरासाठी सन 2009 मध्ये महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा या कंपनीची स्कॉपिओ हि कार विकत घेतली. सदरील गाडीचा विमा गैरअर्जदार कंपनीकडे रक्कम रु,11982/- हप्ता भरुन दिनांक 04/10/2011 ते दिनांक 03/10/2012 पर्यंत एक वर्षासाठी रु,4,65,245/- एवढया किंमतीसाठी पॉलीसी क्र 3001/578/3813/02/000 अन्वये काढला होता. दिनांक 22/10/2011 रोजी सकाळी 8.30 वाजता ड्रायव्हर किशोर भासले गाडी घेवून एकटाच औरंगाबाद हून परभणीकडे जालना रोडने परत निघाला असता. बीड बायपास रोडजवळ 4 अज्ञात इसमांनी ड्रायव्हरला जालना येथे सोडण्याची विनंती केली. व ड्रायव्हरने त्यांची विनंती मान्य करुन त्यांना गाडीत घेतले परंतू अज्ञात इसमांनी ड्रायव्हरला बेशूध्द करुन गाडी घेऊन पोबारा केला. परभणी येथील सरकारी दवाखान्यात ड्रायव्हर वर उपचार करण्यात आले. तदनंतर एम.आय.डी.सी. सिडको,औरंगाबाद शहर पोलीसांनी 4 अज्ञात चोरटया विरुध्द एफ आय आर क्र.174/2011 दिनांक 25/10/2011 रोजी दाखल केला. चोरीस गेलेल्या वाहनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह गैरअर्जदार क्र 2 यांच्याकडे क्लेम दाखल केला असता गैरअर्जदाराने अतीशय तकलादू स्वरुपाची कारणे दाखवून अर्जदाराचा वाजवी क्लेम निरस्त केला म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या स्कॉपिओ गाडीच्या विना दाव्याची रक्कम रु 4,65,245/- दिनांक 1/06/2012 पासून द.सा.द.शे.13.5 व्याजदराने द्यावी तसेच मानसीक त्रासापोटी रक्कम 20,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु, 5000/- अर्जदारास द्यावेत अशा मागण्या मंचासोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जा सोबत शपथपऋ नि.क्र 2 वर पूराव्यातील कागदपत्र नि.4 व नि.14 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्र 1 व 2 यांना तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्र 1 यांनी प्राथमीक मुद्या असा उपस्थित केला आहे की ग्राहक सरंक्षण कायदा 1986 च्या कलम 11 च्या तरतूदीनुसार सदरचा वाद या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकत नाही. कारण गैरअर्जदाराचे शाखा कार्यालय, परभणी येथे नाही. तसेच तक्रारीस कोणतेही कारण पूर्णतः अथवा अंशतः परभणी जिल्हा मंचाच्या कार्यक्षेत्रात घडलेले नाही.
दोन्ही पक्षाचे विचार लक्षात घेऊन प्राथमीक मुद्या ठरविण्यात आला.
प्राथमीक मुद्या. उत्तर.
1 सदरचा वाद या मंचाच्या कार्यक्षेत्रात
चालवण्यास पात्र आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
प्रस्तूतच्या प्रकरणात अर्जदाराने त्याच्या जाती मालकीच्या नि.क्र. एम.एम.22 एन 1500 वाहनाची पॉलीसी गैरअर्जदार क्र. 1 कडून घेतलेली होती. गैरअर्जदार क्र 1 व त्यांचे प्रतिनि धी गैरअर्जदार क्रं.2 हे दोघेही परभणी बाहेरील आहेत. त्यांचे शाखा कार्यालय अथवा एजंट हे परभणी येथे कार्यरत असल्याने अर्जदाराचे कथन नाही.तसेच सदरचे वाहन दिनांक 22/10/2011 रोजी औरंगाबाद येथून चोरीला गेलेले आहे. त्यामुळे ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 11 च्या तरतूदीनूसार सदरचा वाद या मंचासमोर चालण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदाराने मंचासमोर वरीष्ठ नयायालयाचे न्याय निवाडे दाखल केले आहेत.
1) 2009 iv CPJ page no.40 Hon.Supreme Court-
Sonic Surgical v/s National Insurance
2) 2005 CPR vol III Page 200 Hon.State Commission Mumbai)
Shri,Bhagwat Shamrao Raut v/s M. Kumar Builders
3) 1998 CPJ Page no.79 Hon.National Commission New Delhi
Starline Moter v/s Naval Kishor
4) 2003 III CPJ page no.90 Hon.National Commission
Prctex prakash v/s widia
5) 1991 II CPJ page no 686 Hon National Commission New Delhi
Indian Airlines v/s consumer education & Research society
अर्जदाराने मंचासमोर मा.सर्वोच्छ न्यायालयाचा न्याय निवाड दाखल केले आहे.
2010(1) CPR 28(SC)
उपरोक्त न्यायनिवाडया मध्ये मा.वरीष्ठ न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताचा आधार घेऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार या मंचात चालू शकत नसल्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज
त्यास परत करण्यात येत आहे.
2 दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.
वि.ग.आंचेवार