Maharashtra

Thane

CC/09/314

MANOJ MANOHAR NANAL - Complainant(s)

Versus

Manager, ICICI BANK - Opp.Party(s)

Jyoti Shekade

13 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/314
 
1. MANOJ MANOHAR NANAL
प्‍लॉट नं डि 15 ओम कैलास को हौ सो छेडा रोड सारस्‍वत कॉलनी डोंबिवली पूर्व ठाणे
...........Complainant(s)
Versus
1. Manager, ICICI BANK
क्रेडीट कार्डस चार्ज डिपार्टमेंट एम्‍पायर हाऊस लोअर परेल मुंबई
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 13 Aug 2015

न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

                                                           

  1.        तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून घेतलेल्‍या क्रेडिट कार्डचा वापर सन 2005 पासून करतात. तक्रारदार सदर कार्डावर केलेल्‍या व्‍यवहाराची नियमितपणे परतफेड करतात.
  2.          सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 19/04/2008 रोजी पाठविलेल्‍या विवरणपत्रामध्‍ये रु. 9,000/- व रु. 1,298/- चे व्‍यवहार पुणे येथे व रु. 5,000/- चा व्‍यवहार नवी मुंबई येथे केल्‍याबाबत नमूद केले होते. परंतु तक्रारदार पुणे व नवी मुंबई येथे गेले नाहीत व सदर व्‍यवहार केले नाहीत. तक्रारदारांचे सदर क्रेडिट कार्डची मर्यादा फक्‍त   रु. 12,000/- एवढी असून वरील व्‍यवहार एकूण रु. 15,859/- एवढया रकमेचा झाल्‍यामुळे रु. 500/- व सर्व्‍हीस टॅक्‍स रु. 61.80 सामनेवाले यांनी तक्रारदारांचे नांवे टाकला आहे.
  3.         तक्रारदारांना वरील व्‍यवहाराचा मेसेज (SMS) मोबाईलवर आल्‍यानंतर सामनेवाले बँकेशी तात्‍काळ संपर्क केला व सदर माहिती बँकेच्‍या संबंधीत अधिका-यांना कळविली. तसेच दि. 14/05/2008 रोजी बँकेचे ग्राहक तक्रार निवारण अधिकारी यांचेकडे तक्रार केली. परंतु सामनेवाले यांनी यासंदर्भात कोणतीही चौकशी केली नाही. तक्रारदारांनी क्रेडिट कार्ड बंद करण्‍यास सांगितले असूनही बंद केले नाही. सामनेवाले यांनी तक्रारीचे निवारण न करता बेकायदेशीररित्‍या क्रेडिट कार्डवरील व्‍यवहाराची पूर्ण रक्‍कम भरणा करण्‍यास भाग पाडले अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
  4.          सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍याविरुध्‍द क्रेडिट कार्डच्‍या रकमेच्‍या वसुलीसाठी मा. जिल्‍‍हा न्‍यायालय, ठाणे येथे सामनेवाले यांचेविरुध्‍द प्रकरण दाखल केले. जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांनी (Pre-litigation) दावापूर्व प्रकरणे लोकन्‍यायालयापुढे आपसांत तडजोडीने मिटविण्‍याकरीता दि. 18/01/2009 रोजी ठेवली होती. सदर प्रकरण लोकअदालतमध्‍ये ठेवले होते. अशाप्रकारे सामनेवाले यांनी क्रेडिट कार्ड व्‍यवहारातील रक्‍कम तक्रारदारांकडून कायदेशीररित्‍या वसूल केली आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांची सेवेतील त्रुटी स्‍पष्‍ट होत नाही.
  5.             तक्रारदारांनी क्रेडिट कार्ड दि. 5/4/2008 रोजी वरील व्‍यवहाराबाबतची तक्रार सामनेवाले यांचेकडे जून, 2008 पर्यंत केली नाही. तसेच पोलिसांकडे फिर्याद दाखल केली नाही. तक्रारदारांनी तक्रारीमध्‍ये सामनेवाले यांचेविरुध्‍द नमूद केलेला मजकूर चुकीचा आहे. तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचा गैरवापर (misuse) केला आहे. सदर कार्ड इतर व्‍यक्‍तीस वापरण्‍यासाठी दिले आहे.
  6.        तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र, सामनेवाले यांची लेखी कैफियत, शपथपत्र  यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला. यावरुन खालीलप्रमाणे बाबी स्‍पष्‍ट होतातः
  7.        तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांना त्‍यांचे क्रेडीट कार्डवरील दि. 05/04/2008 रोजीच्‍या व्‍यवहाराचा मेसेज आल्‍यावर तात्‍काळ सामनेवाले बँकेशी संपर्क केला. तसेच दि. 19/04/2008 रोजीचे सामनेवाले बँकेतील खातेउतारा/विवरणपत्र मिळाले. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे जूनपर्यंत लेखी तक्रार केलेली दिसत नाही.
  8.        सामनेवाले यांनी दि. 03/07/2014 रोजी दाखल केलेल्‍या शपथपत्रामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या दि. 05/04/2008 रोजीच्‍या व्‍यवहाराबाबची तपासणी केली व वादग्रस्‍त ट्रान्‍सेक्‍शन 17/08/2009, दि. 18/08/2009 व दि. 31/08/2009 रोजी अनुक्रमे (reversed) परत केले आहेत. तक्रारदारांचे क्रेडिट कार्डची थकबाकी रक्‍कम (outstanding) बेबाक करुन क्रेडिट कार्डचे खाते बंद केले आहे. त्‍यामुळे सदर प्रकरणात तक्रारदारांना तक्रार पुढे चालविण्‍यास कोणतेही कारण शिल्‍लक नाही असे नमूद केले आहे.
  9.         तक्रारदार सातत्‍याने गैरहजर असल्‍यामुळे तक्रारीतील दाखल कागदपत्रांवरुन गुणवत्‍तेवर सदर प्रकरण निकाली काढण्‍याचा आदेश मंचाने केला.
  10.           सामनेवाले यांच्‍या शपथपत्रानुसार तक्रारदारांची क्रेडीट कार्डची थकबाकी बेबाक केली असून क्रेडिट कार्ड खाते बंद करण्‍यात आले आहे. सामनेवाले यांनी दि. 05/04/2008 रोजीच्‍या transaction ची तपासणी करुन सदर transaction ची रक्‍कम तक्रारदारांच्‍या खात्‍यातून रिव्‍हर्स केली आहे. अशा परिस्थिती सामनेवाले यांची सेवेतील त्रुटी होत नाही असे मंचाचे मत आहे.

           सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

                आ दे श़

  1. तक्रार क्र. 314/2009 रद्द करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.