जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/250 प्रकरण दाखल तारीख - 11/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. लक्ष्मण भ्र. संभाजी कुंजरवाड वय 51 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा. मंगरुळ ता.हिमायतनगर जि. नांदेड विरुध्द. 1. मॅनेजर, आय.सी.आय.सी.आय.लोंम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी कलामंदिर नांदेड. गैरअर्जदार 2. मॅनेजर, बाफना मोटर्स, सांगवी, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.शिवराज पाटील गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.अजय व्यास गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्यक्ष ) 1. अर्जदारांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार यांनी दि.17.12.2007 रोजी टाटा मॅजीक कंपनीची गाडी गैरअर्जदार क्र.2 कडून खरेदी केली. ज्यांचा क्रमांक एमएच-26-एन-1465 आहे. सदर गाडीचा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून विमा घेतला ज्यांचा कालावधी दि.17.12.2007 ते दि.16.12.2008 असा होता. दि.16.5.2008 रोजी सदर गाडी पाटनूर या गावी जात असताना दुपारी 12.30 वाजता गाडीने अचानक पेट घेतला व आग लागून गाडी जळाली व त्यात गाडीचे अंदाजे रु.3,00,000/- चे नूकसान झाले. सदर घटनेची माहीती पोलिस स्टेशन बारड ता.मुखेड यांना दिली, त्यांनी रितसर पंचनामा केला व गून्हा नंबर 04/2008 नोंदवून पंचनामा केला त्यांची प्रत तक्रारीसोबत सादर केली आहे. सदर घटनेबाबत अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना कळविले व नूकसान भरपाई देण्याची तोंडी वचन गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास दिले. सदर गाडीचे जळीत घटनेबददल सर्व कागदपञ गैरअर्जदार क्र.1 यांचे कर्मचारी श्री.संतोष रेनके यांच्याकडे दिले. वेळोवेळी गाडीच्या नूकसानीची रक्कम गैरअर्जदार क्र.1 यांना मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून अर्जदाराने दि.01.09.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस दिली, नोटीस मिळूनही गैरअर्जदार यांनी अर्जदारास नूकसान भरपाईची रक्कम दिली नाही. म्हणून सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, नूकसान भरपाईपोटी रु.3,00,000/- व्याजासह, तसेच मानसिक.शारीरिक व आर्थीक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. हे मान्य नाही की, दि.17.12.2007 ते 16.12.2008 या कालावधीमध्ये पॉलिसी व्हॅलिंड होती ? अपघात गैरअर्जदार यांना मान्य नाही तसेच हे मान्य नाही की, दि.16.5.2008 रोजी अपघातामध्ये वाहनाचे नूकसान झाले ? हे मान्य आहे की, अपघाताबददल अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना सांगितले पण हे मान्य नाही की, अपघाता बददल सर्व कागदपञ दाखल केले होते. गैरअर्जदार यांनी रक्कम देण्याबाबत कोणतेही वचन दिले नव्हते. कोणतीही नोटीस गैरअर्जदार क्र.1 यांना मिळालेली नाही. गैरअर्जदार यांनी पॅसेंजर कॅरिंग पॅकेज पॉलिसी क्र.3004/53201025/00/000 ही दि.19.12.2007 ते 18.12.2008 या कालावधी करिता वाहन क्र.एमएच-26-एन-1465 यासाठी दिली होती. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना अपघाताबददल कागदपञ सादर करण्यास सांगितले पण त्यांनी ते दिले नाहीत. अर्जदार हे मंचापासून हे लपवित आहेत की, त्यांनी कागदपञ न दिल्यामूळे गैरअर्जदार हे रक्कम देऊ शकलेले नाहीत. त्यांना अर्जदाराचा दावा फेटाळलेला नाही. तसेच अर्जदाराची तक्रार ही मूदतीत नाही, अपघात हा दि.16.5.2008 रोजी झाला व तक्रार ही दि.11.10.2010 रोजी दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे सर्व्हेअर यांना वाहनाचे नूकसानीची माहीती काढण्यास सांगितले असता त्यांनी रु.2,26,444/- चे वाहनाचे नूकसान झाल्याचे म्हटले आहे. असे करुन गेरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 3. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.हे खरे आहे की, अर्जदार यांनी सदर वाहन त्यांचेकडून खरेदी केले होते. सदर गाडीचा क्रमांक हा एमएच-26-एन-1465 हा आहे की नाही याबददल माहीती नाही ? त्यांना अपघाताबददल काहीही माहीती नाही म्हणून त्यांनी अर्जदाराची तक्रार मान्य नाही. तसेच अर्जदाराने सदर तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द कोणताही आक्षेप घेतलेला नाही किंवा तक्रार नाही. गैरअर्जदारांच्या सेवेमध्ये कोणतीही ञूटी नसून त्यांचे विरुध्दची तक्रार ही खारीज करावी असे म्हटले आहे. 4. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर व दोन्ही बाजूचा यूक्तीवाद ऐकल्यानंतर जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? होय 2. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 3. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- 5. गैरअर्जदार क्र.1 यांनी जे आपले म्हणणे दिले आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की, अर्जदाराने वरील तक्रार अपघात झाल्याचे दिनांकापासून दोन वर्षाचे आंत दाखल करावयास पाहिजे होती. गैरअर्जदार क्र.1 यांच्या लेखी म्हणण्याच्या परिच्छेद क्र.15 मध्ये असे स्पष्ट म्हटलेले आहे की, आजपर्यतही त्यांनी अर्जदारांचा क्लेम निकाली काढलेला नाही किंवा नाकारलेला नाही. त्यामूळे त्यांचे सेवेत ञूटी होऊ शकत नाही. जर गैरअर्जदार क्र.1 यांचे असे म्हणणे असेल तर ते क्लेम आजपर्यतही नाकारण्यात आलेला नाही म्हणून कॉज ऑफ अक्शन हे सलग चालू आहे. म्हणून या तक्रारीला मूदतीचा बाध येऊ शकत नाही त्यामूळ ही तक्रार मूदतीत आहे असे गृहीत धरण्यास हरकत नाही म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मूददा क्र 2 व 3 ः- 6. हे दोन्ही मूददे परस्पराशी पूरक असल्यामूळे एकञितपणे चर्चिण्यात येत आहे. कागदपञावरुन असे दिसते की, गैरअर्जदार क्र.1 यांनीच सर्व्हेअरची नेमणूक केलेली होती व त्याप्रमाणे त्यांच्याच सर्व्हेअरने त्यांचा लेखी अहवाल दाखल केलेला होता ज्यांची एक प्रत या तक्रारीमध्ये दाखल केली आहे. सदरी अपघात पॉलिसीच्या कालावधी मध्येच झालेला होता याबददल दूमत नाही. गैरअर्जदार क्र.1 च्याच सर्व्हेअरने नूकसान किती झाले त्याबददलचा लेखी अहवाल दिलेला आहे व सर्व्हेअरच्या म्हणण्याप्रमाणे सदरी गाडीचे एकूण नूकसान रु.2,26,444/- इतके झालेले आहे. अर्जदाराच्या वकिल महोदयांनी असे कथन केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 चाच सर्व्हेअर सांगतो की, अर्जदाराच्या गाडीचे नूकसान रु.2,26,444/- चे झालेले आहे त्यामूळै गैरअर्जदार क्र.1 ला कमीत कमी तेवढी रक्कम देणे बंधनकारक आहे. दोन्ही पक्षाचे लेखी म्हणणे अवलोकन केले असता असे दिसते की, गैरअर्जदार क्र.1 यांनी विनाकारण हा क्लेम प्रलंबित ठेऊन अर्जदारास मानसिक ञास देण्याचाच प्रयत्न केलेलो आहे. जेव्हा सर्व्हेअरचा अहवाल त्यांना मिळाला होता तेव्हा त्यांनी ताबडतोब सर्व्हेअरच्या रिपोर्टनुसार रक्कम दयावयास पाहिजे होती ते न करुन त्यांनी सेवेत ञूटीच केल्याचे स्पष्ट दिसते. गैरअर्जदार क्र.1 हे सदरी रक्कम नाकरु शकत नाहीत कारण सदरी गाडी चालू कंडीशनमध्ये जळाल्याची व त्या गाडीचे बरेच नूकसान झाल्याचे व ते ही पॉलिसीच्या कालावधीमध्ये झाल्याचे कागदपञावरुन स्पष्ट दिसते. या परिस्थितीमध्ये गैरअर्जदार क्र.1 चा सर्व्हेअर, जो त्यामधील तरबेज व्यक्ती आहे, त्यांचा लेखी अहवाल नाकारण्याचे मूळीच कारण नाही. वरील सर्व परिस्थितीवरुन व गैरअर्जदार क्र.1 ने कबूल केलेल्या घटनेवरुन या मंचाचे असे मत झाले आहे की, अर्जदार हे रु.3,00,000/- जरी वसूल करण्यास पाञ नसले तरी गैरअर्जदार क्र.1 यांचे सर्व्हेअरच्या अहवालानुसार अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 कडून त्यांचे गाडीस झालेल्या नूकसानीपोटी म्हणून एकूण रु.2,26,444/- घेण्यास पाञ आहेत. गैरअर्जदाराने ती रक्कम न देऊन निश्चितच सेवेत ञूटी केलेली आहे. वरील कारणावरुन आमचे असे मत आहे की, अर्जदार वरील रक्कम गैरअर्जदार क्र.1 कडून ताबडतोब घेण्यास पाञ आहेत. म्हणून हे दोन्ही मूददे सकारात्मक उत्तरीत केले आहेत. मूददा क्र.4 ः- 7. वर उल्लेख केल्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचे सर्व्हेअरच्या अहवालानुसार कृती न केल्यामूळे व अर्जदारास ती रक्कम न दिल्यामूळै अर्जदारास निश्चितच मानसिक ञास झालेला आहे. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दाव्याचा खर्च म्हणून रु.5,000/- अधिकची वसूली करण्यास हक्कदार आहेत असे वाटते. 8. वरील सर्व कथनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.1. 2. या तक्रारीचा निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आंत गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास रु.2,26,444/- गाडीचे नूकसानीपोटी म्हणून दयावेत, तसे न केल्यास अर्जदार हे वरील रक्कमेवर 9 टक्के व्याजासह वसूल करण्यास पाञ राहतील. 3. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास 30 दिवसांचे आंत मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दाव्याचा खर्च म्हणून रु.5,000/- दयावेत, तसे न केल्यास या रक्कमेवर देखील 9 टक्के व्याज वसूल करण्याचा अधिकार अर्जदारास राहील.3. 4. गैरअर्जदार क्र.2 विरुध्द आदेश नाही. 5. गैरअर्जदार क्र.1 ने आपला खर्च सोसावा. 6. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |