निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 27/02/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 09/07/2013 तक्रार निकाल दिनांकः- 11/03/2014
कालावधी 08 महिने. 02 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
अनुसयाबाई भ्र.बाबुराव खंदारे, अर्जदार
वय 50 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.मा.तु.पारवे.
रा.धानोरा मोत्या ता.पूर्णा,जि.परभणी.
विरुध्द
1 व्यवस्थापक, गैरअर्जदार.
आय.सी.आय.सी.आय. अॅड.अजय व्यास.
लोंबार्ड जनरल इंन्सुरन्स कंपनी लि.
दुसरा मजला अलकनंदा कॉम्पलेक्स बाबा पेट्रोल पंपाजवळ,
अदालत रोड, औरंगाबाद.
2 तहसिलदार साहेब.
तहसिल कार्यालय पूर्णा,
ता.पूर्णा जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराने सदरचे प्रकरण दाखल करण्याकरीता उशीर झाला व झालेला विलंब माफ करण्याबाबत सदरचा अर्ज नि.क्रमांक 6 वर दाखल केलेला आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तिचे पती दिनांक 09/12/2005 रोजी अपघातात मरण पावले. म्हणून अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीच्या विमादाव्या पोटी 1 लाख रुपये मिळावेत म्हणून तिने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दिनांक 15/02/2006 रोजी विमादावा दाखल केला होता. तेव्हापासून अर्जदाराने सदरच्या विमादाव्याची रक्कम मिळावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 च्या कार्यालयात वेळोवेळी चकरा मारल्या गैरअर्जदार क्रमांक 2 ने महिनाभर थांबा तुमचा प्रस्ताव प्रलंबीत आहे असे उत्तर दिले. व गैरअर्जदार क्रमांक 2 च्या सांगण्यावरुन सदर विम्याची रक्कम मिळेल या आशेने आज रोजी पर्यंत वाट पाहिली, परंतु अद्याप पर्यंत तिला विम्याची रक्कम मिळाली नाही. व तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराच्या प्रस्तावाचे काय झाले याबाबत अर्जदारास लेखी कळविले नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, ती ग्रामीण भागात राहणारी असून तिच्या पाठीमागे कोणही कर्ता पुरुष नाही व ती असुशिक्षीत आहे व अंगठे बहाद्दर अबला नारी आहे. म्हणून ती गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 विरुध्द कोणत्याही प्रकारे तक्रार दाखल करु शकली नाही, तरी मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करण्यात यावा व अर्जदारास झालेला उशीर माफ करण्यात यावा.
सदर विलंब माफीच्या अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 7 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
विलंब माफीच्या अर्जास लेखी म्हणणे सादर करण्याकरीता मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकीला मार्फत हजर व नि.क्रमांक 19 वर आपले लेखी म्हणणे सादर केले, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरचा अर्जदाराचा विलंब माफीचा अर्ज कायद्याच्या दृष्टीने चालवणे योग्य नाही व तो खारीज होणे योग्य आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे की, अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, तिचे पती 09/12/2005 रोजी अपघातात मरण पावले व तिने तिच्या मयत पतीचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे 15/02/2006 रोजी दाखल केला, अर्जदाराने तिचा दावा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल केलेला बेकायदेशिर आहे जे की, G.R. 05/01/2005 च्या विरुध्द आहे. G.R. प्रपत्र ई प्रमाणे अर्जदाराने घटना घडल्यापासून 7 दिवसाच्या आत विमादावा दाखल करणे आवश्यक आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे की, सदरची तक्रार ही अर्जदाराने तिचे पती मयत झाल्यानंतर 8 वर्षांनी दाखल केली आहे जे की, अर्जदाराने प्रस्तुत तक्रार 15/02/2008 पूर्वीच दाखल करणे आवश्यक होते.
तसेच अर्जदाराने तिच्या विलंब माफीच्या सदर अर्जामध्ये विलंबा बाबत प्रत्येक दिवशीचे कारण काय झाले हे सांगीतले नाही. सदरच्या अर्जात कांहीच तथ्य नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा सदरचा विलंब माफीचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.
गैरअर्जदार क्रमांक 1 याने यापूर्वीच मंचासमोर अर्जदाराच्या मुळ तक्रारीस नि.क्रमांक 14 वर लेखी जबाब सादर केला आहे व नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. त्यात देखील गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदरच्या विलंबा बाबत जोरदार आक्षेप घेतला आहे व प्रकरण खारीज करण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यास मंचाची नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराला मुळ तक्रार दाखल करणेसाठी झालेला विलंब
माफ करण्यास अर्जदार पात्र आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचा सदरच्या विलंब माफीच्या संपूर्ण अर्जाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अर्जदाराचे पती दिनांक 09/12/2005 रोजी अपघातात मृत्यू झाले होते. व त्यानंतर अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून तिच्या मयत पतीचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दिनांक 15/02/2006 रोजी दाखल केले होते, असे दिसून येते अर्जदाराने 15/02/2006 पासून ते तक्रार अर्ज दाखल करण्यापर्यंतच्या तारखे पर्यंत विमादाव्याची वाट पाहीली म्हणून तक्रार दाखल करणेस उशीर झाला व तसेच अर्जदार असुशिक्षीत आहे. अंगठा बहाद्दर अबला नारी आहे. हे अर्जदाराचे कारण मंचास योग्य वाटत नाही. तसेच अर्जदाराने आपल्या संपूर्ण तक्रारी मध्ये सदरचा दावा दाखल करणेसाठी एकुण किती दिवसाचा विलंब झाला हे स्पष्टपणे कोठेही नमुद केलेले नाही. केवळ मोघमपणे झालेला उशीर माफ करा असे म्हंटले आहे. जे की, विलंब माफीसाठी सदरचा अर्ज कायद्याच्या दृष्टीने योग्य कारण नाही.
याबाबत मा.राज्य आयोग मुंबई यांनी CPR 2012 (2) All MR (J) 21 समीर पाटील विरुध्द आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड Complaint Case NO. 145/2011 या प्रकरणात म्हंटले आहे की, Consumer protection Act. 1986, s -24 –A – Limitation Act 1963, Article -44- / Limitation Complaint regarding Insurance Claim / cause of action commences from date on which complainant suffers loss and not from date on which insurance claim was repudiated. Art 44 of limitation Act is not Applicable to Consumer complaints.
तसेच मा.राज्य आयोग मुंबई यांनी 2012 (2) All MR ( Journal ) 25 ICICI Lombard V/s Chaturbai Revision Petitions NO.18/2011 मध्ये म्हंटले आहे की, Consumer Protection Act (1986) S-24-A Delay in filing consumer complaint -- condonation – Insurance Claim in the event of farmers death – delay condoned without considering reasons of delay and without even calculating actual days of delay—unreasoned order – held – delay cannotbe condoned on moral grounds – matter remanded back district forum for denovo consideration of condonetion of delay application.
तसेच मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली याने 2013 (4) CPR 58 (N.C.) Ram Bhagat V/s New Holland fiat Pvt. Ltd. म्हंटले आहे की, Petitioner is supposed to explain day to day delay सदर प्रकरणातील निकाल प्रस्तुत अर्जास तंतोतंत लागु पडतात.
अर्जदाराने प्रस्तुत अर्जात किती दिवसांचा विलंब झाला याचा उल्लेख केलेला नाही, व तसेच कारण देखील योग्य दिलेला नाही. अर्जदार निश्चित तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ होण्यास पात्र नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा विलंब माफीचा अर्ज मुळ तक्रारीसह फेटाळण्यात येतो.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.