(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी त्यांच्या हिरो होंडा मोटार सायकलचा विमा गैरअर्जदाराकडून घेतलेला होता. त्यावेळेस त्यांना आरटीओ कार्यालयाकडून शिकाऊ परवाना (लर्नींग लायसन्स) दिनांक 18/9/2008 रोजी दिलेले होते. दिनांक 17/11/2008 रोजी रात्री 10:30 ते 10:50 च्या दरम्यान तक्रारदार त्यांच्या मोटार सायकलवरुन जात असताना एका अज्ञान वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला. सदर अपघातात त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला. अपघातामुळे मोटार सायकलचे नुकसान झाले त्यासाठी तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे क्लेम दाखल केला. गैरअर्जदारानी दिनांक 7/2/2009 च्या पत्राने तक्रारदारास सदर क्लेम, चालक शिकाऊ परवानाधारक असल्यामुळे नामंजूर करण्यात आला म्हणून सदरील तक्रार. तकारदार गैरअर्जदाराकडून त्यांच्या गाडीच्या नुकसानभरपाईपोटी रु 40,098/- तसेच नुकसान भरपाई म्हणून रु 20,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदाराने शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदाराने लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार Motor Vehicle Rules 1989 rule 3 प्रमाणे तक्रारदाराजवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना अपघाताच्या वेळेस नव्हता. या कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यात आला आहे. गैरअर्जदारानी Motor Vehicle Rule 1989 rule 3 चा उल्लेख लेखी जवाबात केला आहे तो खालीलप्रमाणे. General - The provisions of sub section (1) of section 3 shall not apply to a person while receiveing instructions or gaining experience in driving with the object of presenting himself for a test of competence to drive, so long as – a) such person is the holder of an effective leariner’s license isssued to him in form 3 to drive the vehicle. b) Such person is accompanied by an instructor holding an effective driving license to drive the vehicle and such instructor is asitting in such a position to control or stop the vehicle; and c) There is painted, in the front and rear of the vehicle or on a plate or a card affixed to the front or rear, the letter “L” in red on a white background Provided that a person, while receiving instructions or gaining experience in driving a motorcycle (with or without a side car attached), shall not carry any other person on the motorcycle except for the purpose and in the manner referred to in the clause (b). वरील रुल 3 प्रमाणे तसेच पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार तक्रारदाराजवळ इफेक्टीव्ह लर्नींग लायसन्स नव्हते म्हणून क्लेम नामंजूर केला आहे तो योग्य आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदार त्यांच्या तक्रारीमध्ये अपघाताच्या वेळेस त्यांच्याजवळ लर्नींग ड्रायव्हिंग लायसन्स होते हे कबूल करतात आणि नेमके याच कारणावरुन गैरअर्जदारानी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. गैरअर्जदारानी Central Motor Vehicle Rule 1989 Rule 3 दाखल केले आहे व त्यानुसार लर्नींग लायसन्सधारक गाडी चालवित असताना त्यांच्या सोबत एक इन्स्ट्रक्टर असावा व त्याच्याजवळ इफेक्टीव ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. अपघाताच्या वेळेस किंवा कुठल्याही कारणाने ज्यावेळेस गाडीला नियंत्रणामध्ये ठेवावयाचे असल्यास अशा वेळी लर्नींग लायसन्सधारका जवळ इन्स्ट्रक्टर असणे गरजेचे असते असे त्यात नमूद केले आहे. तक्रारदाराने त्यांच्या बरोबर असलेल्या इसमाजवळ इफेक्टीव्ह ड्रायव्हिंग लायसन्स होते किंवा नव्हते याबद्दल कुठलाही पुरावा मंचात दाखल केला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारदाराजवळ इफेक्टिव ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते या कारणावरुन आणि Central Motor Vehicle Act नुसार तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे तो योग्य व बरोबर आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |