निकालपत्र :- (दि.10.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजू तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे सर्व त्या कागदपत्रांची पूर्तता करुन रुपये 2,19,000/- इतके कर्जाची दि.01.04.2005 रोजी उचल करुन ESCORTS FT 35 ट्रॅक्टर नं. MH 09 AL 6513 हे वाहन खरेदी केले. तक्रारदारांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना सदर वाहन वापरणे अशक्यप्राय झाले. त्यामुळे त्यांनी सामनेवाला यांना ट्रॅक्टर विकून कर्ज रक्कम भागवित असल्याचे सांगितले; परंतु, सामनेवाला बँकेने ट्रॅक्टरचे इन्स्पेक्शन व व्हॅल्युएशन करुन त्यांच्या तथाकथित ग्राहकास दाखवितो असे सांगून ट्रॅक्टर घेवून गेले. त्यांनी ट्रॅक्टर एका ग्राहकास विक्री केला. त्यातून कर्ज रक्कम फेउ करुन घेतो असे सांगितले. परंतु, सामनेवाला यांनी रुपये 1,80,000/- इतक्या कमी किंमतीस विकला असल्याचे सांगितले. सदर ट्रॅक्टरच्या किंमतीपेक्षा 1 लाखाने कमी किंमतीस विकला आहे. त्यामुळे सदर 1 लाख सामनेवाला यांनी देणेबाबत आदेश व्हावेत, तसेच दि.28.11.2008 रोजीच्या नोटीसीप्रमाणे कारवाई करु नये असे आदेश व्हावेत, कर्जफेड दाखला देणेचा आदेश व्हावा. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व खर्च रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी पाठविलेल्या नोटीसीची प्रत व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला बँकेने तक्रारदारांनी तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांचे कर्ज प्रकरण थकित राहिले असल्यांने अटी व शर्तींप्रमाणे तक्रारदारांचे वाहन ताब्यात घेवून सर्व्हेअरकडून इन्स्पेक्शन केले व त्याप्रमाणे विक्रीपूर्व नोटीस तक्रारदारांना पाठविलेली आहे. परंतु, सदरची नोटीस तक्रारदारांनी स्विकारलेली नाही व बाजारभावाप्रमाणे सदरचे वाहन रुपये 1,80,000/- इतक्या रक्कमेस विक्री केले आहे. सबब, तक्रारदारांनी तक्रार फेटाळणेत येवून सामनेवाला यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ डिलीव्हरी नोट, ट्रॅक्टर खरेदी घेणा-या ग्राहकाचे पत्र, बीड फॉर्मेट, फ्रेश सेल अप्रुव्हल रिक्वेस्ट फॉर्म, पोस्ट सेल नोटीस, प्रि-सेल नोटीस, तक्रारदारांना दिलेली नोटीस, इन्स्पेक्शन रिपोर्ट, ट्रॅक्टरचे फोटो, अॅसेट पझेसन किट इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तसेच, तक्रारदारांच्या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे कर्ज थकित आहे. त्याप्रमाणे सामनेवाला बँकेने तक्रारदारांना नोटीस पाठविलेली आहे. तसेच, सदरचे वाहन विक्रीपूर्व नोटीसही पाठविलेची दिसून येते. सदर वाहनाच्या विक्री संदर्भातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता व त्या अनुषंगाने तक्रारदारांनी सदर वाहनाच्या बाजारीमुल्याविषयी तक्रारदारांनी त्यांच्या कथनाशिवाय कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब, आदेश. आदेश (1) प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत येते. (2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |