Maharashtra

Gondia

CC/07/77

Khumansingh Chintaman Mchirke - Complainant(s)

Versus

Manager, Hiro Honda Moter Ltd - Opp.Party(s)

Adv. Lilhare

12 May 2008

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGAON ROAD, GONDIA
 
Complaint Case No. CC/07/77
 
1. Khumansingh Chintaman Mchirke
Pathantola, Post Sonpuri, Tah. Salekasa
Gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Hiro Honda Moter Ltd
Shivam 16 Wing, Congresh Nagar , Dhantoli, Nagpur
Nagpur
Maharastra
2. Shri. Deepak Automobile
Shri. gurunanak Road, Gondia
Gondiya
Maharastra
3. shri. Swastik Motor
Station Road, Aamgaon
Gondiya
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. P. B. POTDUKHE PRESIDENT
 HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain Member
 HON'ABLE MRS. MOHINI BHILKAR MEMBER
 
PRESENT:
MR. LILHARE, Advocate
 
 
MR. JAISWAL, Advocate
 
ORDER

 

                                                          --- आदेश --
                                                          (पारित दि. 26-10-2006 )
द्वारा -श्रीमतीप्रतिभाबा. पोटदुखे, अध्यक्षा :-
       तक्रारकर्ता श्री. खुमनसिंग चिंतामन मछीरके यांनी दाखल केलेल्‍या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.....................
  1. दि. 02 -01-2006 रोजी त.क.यांनी हिरो होंडा सुपर स्‍प्‍लेंडर मोटर सायकल इंजिन नं. 05 एमएएई 03358 , चेसीस नं. 05 एमएएएफ 03358 ही रुपये 46850/- मध्‍ये वि.प.क्रं. 2 यांच्‍याकडून खरेदी केली. त्‍याचा इनव्‍हॉईस क्रमांक डीए/बी/ए/1709 असा होता. मोटर सायकल खरेदी केल्‍यानंतर त.क. यांनी आ.टी.ओ.ऑफिस गोंदिया येथे मोटर सायकलचे रजिस्‍ट्रेशन केले, त्‍याचा क्रं. एमएच 35/एम/2373 असा आहे.
  2. वि.प.क्रं. 3 हे वि.प.क्रं. 1 व 2 चे सब-डिलर आहेत. वि.प.क्रं. 3 यांनी त.क.यांना मॅन्‍यूअलची प्रत दिली. मोटर सायकल खरेदी केल्‍यानंतर 15 दिवसाच्‍या आतच गाडीचे इंजिन हे मोठया प्रमाणात धूर सोडायला लागले व गाडीला जास्‍त इंधन लागू लागले. तेव्‍हा त.क. यांनी वि.प.क्रं. 2 व 3 यांच्‍याशी संपर्क साधला पण त्‍यानीं त.क.यांच्‍या विनंती कडे कोणतेही लक्ष दिले नाही.
  3. त.क.यांनी मॅन्‍यूअल प्रमाणे गाडीचा वापर केला परंतु गाडीचे इंजिन व इतर भागा मध्‍ये निर्मिती दोष आहे व ती चालण्‍यासारखी नाही.
  4. त.क.यांनी अनेकदा विनंती केल्‍यानंतर वि.प.क्रं. 2 व 3 यांनी गाडीचे ब्‍लॉक किट दोनदा बदलून दिले. परंतु गाडी मधील दोष दूर होऊ शकला नाही. त.क. यांनी वि.प.क्रं. 2 व 3 यांना अनेकदा सदर वाहन बदलून देण्‍याची विनंती केली परंतु वि.प.यांनी ती नाकारली.
  5. त.क.यांनी मागणी केली आहे की. त्‍यांची मोटर सायकल ही बदलून देण्‍यात यावी व त्‍यांना शारीरिक त्रासासाठी रुपये 1,00,000/- एवढी नुकसान भरपाई मिळावी.
  6. वि.प.क्रं. 1 ते 3 यांनी त्‍यांचे लेखी बयाणा निशाणी क्रं. 16 वर दाखल केले आहे. वि.प.म्‍हणतात की, त.क.यांची तक्रार ही सदर ग्राहक मंचाच्‍या संक्षिप्‍त कार्य पध्‍दतीत चालण्‍यासारखी नाही. त.क.यांनी अनेक महत्‍वाचे तथ्‍य लपवून ठेवलेले आहे. वि.प.यांच्‍या सेवेत कोणतीही न्‍यूनता नाही. त.क.यांना विकण्‍यात आलेले वाहन हे जास्‍त धूर सोडत नव्‍हते अथवा त्‍याला जास्‍त इंधन सुध्‍दा लागत नव्‍हते. त.क. यांनी मॅन्‍यूअल प्रमाणे वाहनाचा वापर केलेला नाही. वाहनाच्‍या कोणत्‍याही भागात अथवा इंजिनमध्‍ये निर्मिती दोष नाही. त.क.यांनी दाखल केलेली तक्रार ही खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
कारणेनिष्कर्ष
 
  1. त.क. व वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले शपथपत्र,कागदपत्र लेखी जबाब, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की,वि.प.यांनी दिलेली वॉरंटी ही गाडीत बिघाड झाल्‍यास फक्‍त ज्‍या भागात बिघाड झाला तो भाग बदलून देण्‍याएवढीच मर्यादित आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांची हिरो होंडा मोटर सायकल बदलून देण्‍याची मागणी ही मान्‍य करता येऊ शकत नाही.
  2. वि.प.यांनी त.क.यांना दि. 04 जुन 2007 व दि. 24 ऑगस्‍ट 07 या दिवशी पत्र लिहून त्‍याची हिरो होंडा मोटर सायकल गोंदिया वर्कशॉप येथे तपासणीसाठी आणण्‍याची विनंती केली आहे. ही दोन्‍ही पत्रे तक्रारकर्ता यांना मिळाल्‍याचे रेकॉर्डवरुन दिसून येते तरी सुध्‍दा तक्रारकर्ता यांनी त्‍यांची हिरो होंडा मोटर सायकल ही तपासणीस नेल्‍याचे दिसून येत नाही.
  3. त.क.यांनी अभय कुमार पांडा विरुध्‍द मे. बजाज अटो लि. व कृष्‍णकुमार विरुध्‍द रहेजा अटोमोबाईल्‍स व इतर हे आदरणीय राष्‍ट्रीय आयोगाचे केस लॉ रेकॉर्डवर दाखल केले आहे. सदर ग्राहक प्रकरणातील तथ्‍य भिन्‍न असल्‍यामुळे सदर केस लॉ या प्रकरणात लागू होत नाही.
 
               असे तथ्‍य व परिस्थितीत असतांना सदर आदेश पारित करण्‍यात येत आहे.
 
                                                       .... आदेश ....
  1. तक्रारकर्ता यांनी सदर मोटर सायकल तपासण्‍याकरिता वि.प.क्रं. 2यांच्‍याकडे घेऊन जावी. वि.प.क्रं. 2 यांनी त्‍यांच्‍या गाडीची तपासणी करुन ती दुरुस्‍त करुन द्यावी. तपासणीनंतर असे लक्षात आले की, गाडीचा धुराचा त्रास हा दुरुस्‍ती करता येण्‍यासारखा नाहीत तर वि.प.याच्‍या तर्फे सदर भाग हा बदलून देण्‍यात यावा.
  2. मानसिक , शारीरिक त्रास व तक्रारीचा खर्च याबद्दल कोणताही आदेश नाही.
  3. वि.प.यांनी आदेशाचे पालन आदेशाच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत करावे. अन्‍यथा ते ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम-27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.
 
 
[HON'ABLE MRS. P. B. POTDUKHE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain]
Member
 
[HON'ABLE MRS. MOHINI BHILKAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.